चहा कुठे प्यावा ?

Submitted by Kiran.. on 6 August, 2012 - 00:18

पुण्यातली चहाची प्रसिद्ध ठिकाणं कोणती ? त्या त्या ठिकाणच्या चहाचं आणि त्या दुकानाचं वैशिष्ट्य याबद्दलच्या चर्चेसाठी धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चहा कुठे प्यावा ?
<<
आजकाल (काही) लोंकाची बुद्धी इतकी गहाण पडलेय की वरिल प्रश्न विचारावा लागतोय "चहा कुठे प्यावा?"
घरात बसून प्या, घर नसेल तर टपरीवर प्या, रस्त्यावर उभे राहून प्या, फुकटे असालतर चहाच्या वेळेला कुणाच्यातरी घरी जाऊन प्या.........

आता जिलेब्या कश्या खाव्यात (पाडाव्यात) असा ही एक धागा काढा....

जिलब्यांचा तुमचा स्वतःचा अनूभव असेल तर लिहा ना इथे कुणी मनाई केलीय तुम्हाला ?:खोखो:

शनीपाराजवळचे पण अमृततुल्य छान होते, बंद पडले वाटतं.

जिलब्यांचा तुमचा स्वतःचा अनूभव असेल तर लिहा ना
<<
नाय वो असला कुठचा बी जिलब्या पाडायचा अनुबव नाय आपल्याला, हवय तर लेखन मंदी जाऊन बघू सकता तुम्ही....

इथे कुणी मनाई केलीय तुम्हाला ?
<<

मनाई नाय केली कुनी. पन कस हाय फुकट जागा मिळाल्यावर झटका आल्यागत लागतात काहीजन जिलब्या पाडाया.

रॉबिन हुड,

एका मायबोलीकराचे वडील गेल्याची बातमी पहिल्या पानावर आत्ताच आली आहे. आपण कृपया गांभीर्य प्रकट कराल काय? Happy

धन्यवाद

मस्त धागा आहे..... चहाच्या देखील रेसिपीज असतात Uhoh ...... आले,वेलची,केशर,मसाला,गवती हे प्रकार माहीत होते, पण या नविन चहा रेसिपीज बघायलाच हव्यात

खर तर रॉबीनहूडना मी असा प्रतीसाद देणार नव्हते.:फिदी: पण टीका करताना निदान थोडे तरी सौम्य शब्द वापरायचे होते त्यांनी. धागा काय काढावा, कुठला काढावा हा वैयक्तीक प्रश्न आहे, आणी हा धागा चांगल्या सल्ल्यावर व आठवणींवर आहे, मग त्यात ही उपहासात्मक भाषा का?

परक्या गावात किंवा घरापासुन लांब गेले असता भूक लागली/ दमले की निदान चहा कॉफी तरतरी आणतात, खाण्यातुन जी विषबाधा होऊ शकते ती या उकळलेल्या पेयातुन नाही हे पण लक्षात ठेवावे, पाणी बाधते पण चहा नाही, सॉरी पोस्ट लांबल्याबद्दल.

पण मी म्हणतो माणसानी चहा प्यावाच का? आता चहा पिण्याचे किती दुष्परिणाम असतात ते पहा...!

  • १. ‘कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे ‘अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट’ नामक पदार्थ केवळ कोर्‍या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य (भूक अल्प होणे) घडवणारा असतो.
  • दिवसाला अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.
  • २. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.
  • ३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, तहान, पक्षाघातासारखे वातविकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे, असे विकार बळावतात.
  • ४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.
  • ५. टपरीवर चहा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
  • ६. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, तसेच एप्रिल, मे आणि ऑक्टोबर या मासात सर्वांनी चहा जपून अन् प्रमाणात प्यायला हवा.
  • ७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

>> अहिल्यादेवीजवळ कुठला चहा मिळतो ? आज जाईन.
शाळेसमोरच आहे.
रामदास.. यांची तेलकट्ट कांदा भजी पण मस्त असतात. Happy
त्याजवळच्या बोळात पण एक आहे. नाव आठवत नाही, गर्दी दिसेल तिथे आहे. याचा चहा जास्त छान पण बसायला जागा नाही.

अ‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
<<<

यामुळेच हल्ली मूळ आय डीं ना आपले ड्यु आय कोणते तेच आठवत नसावे (किंवा उलटेही) Proud

केदार जाधव | 6 August, 2012 - 02:28
नाही ज्ञानेश, तिथे ते चालू आहे. फुगेवाडीला मेगामार्ट समोर, नाशीक फाट्यावर आणि पिंपळे गुरव या तिनही ठिकाणी अशोका मधील चहा मिळतो. स्मित >> आबासाहेब पिंपळे गुरव मधे कुठे मिळतो सांगाल का ? मी तिथेच राहतो , लगेच जाता येइल
<<<<<<<<<< रामकृष्ण मंगल कार्यालयासमोर

रच्याकने, मी ही तिथेच राहतो.

ज्ञानेश Happy

रॉबीनहूड माहिती चांगली आहे, पण चहा एवढेच पित्तकारक गोष्टी साबुदाणा, शेंगदाणे, काजू, बदाम या आहेत, पण तरीही उपासाला या वापरतातच, आणी मूळात उपास करणे हेच चुकीचे असते तरी तो श्रद्धेने, भावनेने केला जातो त्याचे काय?

दिवसाला २ कप चहा पुरेसा.

पाणी उकळुन त्यात चहा पावडर घालुन, भांडे झाकुन ठेवावे नंतर कपात/ मगात साखर ( हवी तेवढी) घालुन चहा त्यात गाळुन मग दूध घालावे, अशा रीतीने बनवलेला चहा अजीबात बाधत नाही.

माझा मामा वयाच्या ८० पर्यंत दिवसातुन ४ कप चहा घेत होता, तो ही उकळलेला, त्याला काहीही झाले नाही, नजर चांगलीच होती. अर्थात, प्रत्येकाला तसे जमेलच असे नाही, आणी अनूकरण करु पण नये.

एक कप चहासाठी इतके अंतर म्हणजे खरा दर्दी म्हणायला पाहीजे.<<<

अज्ञान अज्ञान Lol

एक कप चहासाठी आता ज्ञानेश जगात कुठेही जाईल Lol

व्हिनस, या धाग्याचे शीर्षक 'निधर्मवाद्यांनी चहा कुठे प्यावा' असे असते तर एक हजार प्रतिसाद झाले असते आत्तापर्यंत

- पिंपरी , साई मंदिर चौकापासून महादेव पॅटिसवाला कडे जाणार्‍या रस्त्यावर निलम टी हाऊस
- पुण्यात जोगेश्वरी मंदिरासमोरचे अमृततुल्य, -
- बुधवार चौकात मजुर अड्ड्यापाशी पहाटे २.३० ते ६.३० या वेळॅत एक हातगाडी असते
- खेड शिवापूर जकातनाक्याचा अलिकडे असलेले कैलास

या धाग्याचे शीर्षक 'निधर्मवाद्यांनी चहा कुठे प्यावा' असे असते तर एक हजार प्रतिसाद झाले असते आत्तापर्यंत

Lol

डेक्कनला पूरब च्या समोर चहाचं हॉटेल आहे. तिथला चहा खरंच मस्त आहे. पार्किंगचा प्रश्न आहे मात्र.. तो सुटला तर मुद्दामून चहा घ्यायला हरकत नाही.

अहिल्यादेवीजवळ कुठला चहा मिळतो ? आज जाईन.>>>>>>>>> अगदी अहिल्यादेवी शाळेच्या समोर एक छोटी गल्ली निघते...आनि कायम गर्दी असते Happy
टपरी च नाव मला आठवत नाही...पण तो मसाला वापरतो ...तो वेगळाच आहे काहीतरी...मी कित्येकवेळा घोट घेतल्यानंतर गेस करत बसते...पन नककी काय वापरतो..अजुन कळल नाही Sad

अजुन एक सांगेन..चहा प्यायला तु चान्स मिळाल्यावर चीन मधे जा Proud .. तिथे चहा सर्व्ह करण ही पण एक कला असते..आनि त्याचे प्रशिक्षण पण दिले जाते ...एका मोठ्या नळकांड्यातुन हाताच्या तळ्व्या पेक्षा पण छोट्या कपात चहा ओतला जातो..पहायला मस्त वाटत.... आनि आप्ल्यापेक्षा चिनी लोकांनी खुप वेगवेगले फ्लेवर डेव्लप केले आहेत

Pages