निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मार्जन म्हणजे स्वच्छ करणे >> मग परीमार्जन असे का म्हणतो आपण स्पेशली पापाचे परिमार्जन. त्यातील परी शब्द नक्की काय अर्थाने आहे?

जी स्वतःला सतत स्वच्छ करत असते ती मार्जारः - मांजर...

अगदी अगदी.. आमचा बोका कायम ह्याच कामात असतो. सगळे साफ करुन झाले की तो जिभेने आपला पंजा ओला करतो आणि तो तोंडावरुन फिरवतो.

सुरवातीला त्याला पिण्याच्यासाठी पाणी ठेवायचे पण तो ते प्यायचा नाही. माझे कमळ मातीच्या मोठ्या टबात ठेवलेय. तिथले पाणी बहुतेक दिवसभर थंड राहते. एस फक्त हेच पाणी पितो. पण पाणी प्यायच्या आधी तो पाण्यात डोकावतो, मग पाण्यावरुन हात फिरवतो. बहुतेक वरचा कचरा, धुळ बाजुला करत असणार आणि मग पाणी पितो.

एसला आणल्यामुळे ऐशुला खुप फायदा झाला. दिवसभर घरात एकटे राहाणे खुप कंटाळवाणे होते. पण आता तिचा वेळ एसचे निरिक्षण करण्यात जातो.

शांकली, तुझ्यामाझ्यात स्पर्धा लागेल मार्जारपुराणात कोणाच्या पोस्टी जास्त याबद्दल. Happy

अगदी अगदी.. आमचा बोका कायम ह्याच कामात असतो. सगळे साफ करुन झाले की तो जिभेने आपला पंजा ओला करतो आणि तो तोंडावरुन फिरवतो.

सुरवातीला त्याला पिण्याच्यासाठी पाणी ठेवायचे पण तो ते प्यायचा नाही. माझे कमळ मातीच्या मोठ्या टबात ठेवलेय. तिथले पाणी बहुतेक दिवसभर थंड राहते. एस फक्त हेच पाणी पितो. पण पाणी प्यायच्या आधी तो पाण्यात डोकावतो, मग पाण्यावरुन हात फिरवतो. बहुतेक वरचा कचरा, धुळ बाजुला करत असणार आणि मग पाणी पितो. >>>>>>.व्वा! साधने, मांजर आवडत नाही म्हणतेस, पण निरिक्षण बरेच करतेस की. Lol

शांकली मी तुला एक भेट देणार आहे. Proud

हो गं साधना! मला आणि मुलींना मांजरं प्रचंड आवडतात आणि ह्यांना बिलकुल आवडत नाहीत. त्यामुळे हे असे टोमणे मला सतत ऐकून घ्यावे लागतात. (आणि मला ही पण भिती वाटते अधून मधून की हे मांजरांवर सूड म्हणून १/२ साप घरात आणून पाळतील की काय!! ह्यांचं काही सांगता येत नाही.)

जिप्सी कोथिंबिरीच्या फुलांचा फोटो भारीच आहे आणि असे हिरवे धने मी प्रथमच (रोपावरचे) बघितले.

काय भेट देणारेस गं?

अजुन दोन मांजरे.... Happy

अगं हे निरिक्षण ऐशुचे आहे. ती दिवसभर कुत्र्यामांजरांमध्येच दंग असते. आता कॉलेजात गेलीय तर लगेच फोन करुन कालचाच बोका परत भेटल्याचे सांगत होती.

अगं मला हार्पिस (नागीण) झालीये. त्यामुळे गेले काही दिवस घरीच आहे मी.पण पिल्लू घरी आणलंस तर मात्र मला आणि माझ्या मुलींना घराबाहेर जावं लागेल...

अगं मला हार्पिस (नागीण) झालीये. त्यामुळे गेले काही दिवस घरीच आहे मी.>>>>>>>>>अरेरे, मला माहीतच नाही ग. कशी आहेस आता? Uhoh

धन्यवाद जिप्सी. आता हे कॅलेंडरचे पान अ‍ॅकच्युअल साईझ मधे दिसत आहे. मुळात कॅलेंडरची साईझच लहान असल्याने ओरिजिनल वाचतानासुद्धा त्रास होतो, भिंग घ्यावे लागते. बारा महीन्यांसाठी बारा कागद असे एकूण ३६५ दिवसांचे (३६५ बॉटनिकल चित्रांचे) कॅलेंडर आहे.

मा.बो. वर असे तत्पर मदतनीस आहेत म्हणूनच ईथे येण्यात मजा आहे.

नाजुक कोथिंबीरी आणि हिरवे धणे मस्तच.

मांजरांची पिल्ले खुप गोड दिसतात.. तशी सगळ्यांचीच पिल्ले गोड दिसतात, मोठी झाली की मात्र....... Happy

ऐशूलाही कबुतरे आवडत नाहीत. Happy

जिप्सी मस्त आणि सुरेख फोटो आहेत आणि नेहमीच असतात. कसे करता तुम्ही?
मी जेव्हा ईथे फोटो अपलोड करते तेव्हा रिसाईझ करताना, अपलोड करताना त्यातील क्लॅरिटी जाते. Sad

या भागाच्या पहिल्या पानावर मी बायनॉमिअल सिस्टिमबद्दल लिहिले होते. त्यासंबंधानेच पुढे लिहित आहे. कुणालाही काहीही प्रश्न असल्यास लगेच विचारणे (मनात कुठलाही गंड न बाळगता - कारण यातून मलाच जास्त शिकायला मिळणार आहे. दिनेशदांसारखे जाणकार व्यक्तिमत्व इथे उपलब्ध असल्याने आपल्या सर्व शंकांचे समाधान ते नक्कीच करु शकतील - इतरही जे कोणी जाणकार असतील त्यांनीही यात कृपया सहभाग घेणे ही विनंती).

कुठल्याही प्राणी / कीटक / पक्षी / सूक्ष्मजीव / झाडे इ.च्या वर्गीकरणाचा "नाव" हा पायाच म्हणता येईल. मागे सांगितल्याप्रमाणे नावातूनच त्या वनस्पतीबद्दल बरेच कळते.
सुरवात नारळापासून करतो.

नारळ - Cocos nucifera हे पाम जातीतले असून कोकोस ही जिनस असून नुसिफेरा ही स्पिसीज आहे. कूळ (फॅमिली) - Arecaceae (palm family). पोर्तुगीज / स्पॅनिश भाषेत कोकोस याचा अर्थ हसरा चेहरा (दात दाखवणारा) असा होतो. नारळाला शेंडीच्या आत लपलेली तीन भोके नीट पाहिली तर माणसाच्या चेह-याचा भास होतो त्यावरुन हे "नाव" आले आहे.
यासंदर्भात (नारळ, त्याचे नाव, जाती , प्रजाती) कोणाला अजून माहिती द्यायची असल्यास कृपया देणे. असे करत करत आपण पुढे जाऊया.
मी हे जे लिहित आहे हे कोणालाही अजून चांगल्या पद्धतीने लिहिता आल्यास त्याचे स्वागतच आहे.
"नावे ठेवणे" - याबाबतच्या गप्पांचा मी फक्त नारळ फोडलाय - इतकेच.

मी जेव्हा ईथे फोटो अपलोड करते तेव्हा रिसाईझ करताना, अपलोड करताना त्यातील क्लॅरिटी जाते

पिकासा किंवा फ्लिकरवरुन टाकले तर साईज हवी तितकी मोठी ठेवता येते. कसे टाकायचे हे इथे ब-यच जणांना माहित आहे, कोणीतरी सविस्तर मार्गदर्शन करेलच (मीच केले असते पण इथे मेले हाफिसातले काम पण करावे लागते ना ;))

फ्लिकरवरुन कोणी इथे फोटो टाकु नका, माझ्या ऑफिसात क्लिकर चालत नाही, पिकासा चालते.

याहु गृप्स चालतात, मेल चालत नाही.. बॅन करणारे पण किती मेंटल ब्लॉक्स ठेऊन बॅन करतात ना.... Happy

कमळाचे बॉटनिकल नाव निम्फेसी आणि ग्रिक मायथॉलॉजीमध्ये सुंदर कुमारिकांना उद्देशुन वापरलेले निम्फ हे विशेषण याचाही काहीतरी संबंध असेलच ना.... आता कमळाच्या नावावरुन कमळासारख्याच गोड असणा-या सुंद-यांना निम्फ म्हणायला लागले की सुंद-यांप्रमाणे गोड असलेल्या कमळांना निम्फ म्हणायला लागले हे कसे कळायचे???????:)

दोन दिवस डोकावता आले नाही. साधनाला मांजर आवडायला लागले बहुतेक, का मांजर आहे म्हणून कबूतर कमी झालीत !!

काल जरा वेळ मिळाला, म्हणून लहानपणीची आठवण काढत बसलो होतो, त्यावेळी खरडलेलं हे काहीतरी(च) !
आता जे लोक ४०/५० च्या वयोगटात आहेत, त्यांचे बालपण अगदी शहरात गेले असले तरी,
बहुतेक खेळ निसर्गाशी संबधितच असायचे. तशी शहरेही वाढलेली नव्हती. मुंबईचे म्हणायचे
तर दादर, माटुंगा यांच्या उत्तरेला तर शहरी वाराही फारसा लागलेला नव्हता.

उगाचच लहानपणीचे उद्योग आठवले. आम्ही मालाडला रहात असताना, समोरच्या वाड्याला
मेंदीचे कुंपण होते. ती झाडे बरीच उंच वाढलेली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचा एक दिवस मेंदीचा
कार्यक्रम असायचा.
आता कशी बाजारात तयार पावडर मिळते आणि अगदी हवे तर तयार कोनही मिळतात. तसे त्यावेळी
नव्हते. खरं तर आतासारखी लग्नात मेंह्दीची रसम वगैरे पण नसायची. मराठी घरात मेंदी हा निव्वळ
हौसेचा भाग असायचा.
तर आमचे उद्योग असा असायचा. साधारण सकाळीच हा बेत ठरायचा. पण आम्हाला जरा दुपारची
वाट बघावी लागायची. ( कारणं येताहेत पुढे.)

बेत ठरला कि मेंदिच्या शेंड्याकडच्या फ़ांदया तोडायचे काम असायचे. या फ़ांद्या निवडताना अगदी
कोवळी पाने किंवा अगदी जून पाने चालत नसत. कारण तशी मेंदी रंगत नाही, असा आमचा समज
होता. फ़ुले वा फळे आलेली फ़ांदी पण चालत नसे, कारण त्यानेही रंग चढत नाही, असे आम्हाला
वाटायचे. आता झाडावरच्या फ़ांद्या तोडताना हे बघणे शक्यच नसायचे, त्यामूळे आधी त्या हव्या
तशा, म्हणजे हाताला येतील तशा तोडायच्या. आमच्या या उद्योगाला कुणाची हरकत नसे, कारण
तशीही त्या झाडांची छाटणी करायचीच असे.
मग या फ़ांद्या निवडायच्या. त्यासाठी एखादा रद्दी पेपर लागे. तोपण घरून मागून आणावा लागे.
मग कोंडाळे करुन, सात घरातली मिळून दहा जण आम्ही नीट पाने वेगळी करायचो. त्यातली
मिरीएवढी फळे, एकमेकांना मारायला वापरायचो. पण त्यातली काही निवडलेल्या पानात पडली,
तर मुली तोंड वाकडे करायच्या किंवा बावळट्ट आहेस, म्हणायच्या.

मग ती पाने स्वच्छ धुण्याचा कार्यक्रम व्हायचा. आमच्या घराच्या आवारातच एक विहीर होती आणि
आम्हा मुलांची ती हक्काची जागा होती ( या विहीरीबाबत पुढे कधीतरी ) हि पाने आणि विहिरीजवळचा
एक दगड किंवा पायरी स्वच्छ केली जायची आणि तिथे वाटण्याचा कार्यक्रम व्हायचा.

सकाळच्या वेळी आमच्या मोलकरणी तिथे कपडे धूवायच्या त्यामूळे ती जागा मोकळी होईपर्यत
आम्हाला वाट बघावी लागे. मग आईकडून वरवंटा मागून आणायचा. तोसुद्धा सकाळी मोकळा
नसायचाच. आई हातात वरवंटा देताना, बघ पायावर पाडशील, असे म्हणायची. त्यावेळी आया
जपून ने वगैरे म्हणत नसत.
तो वरवंटा मिळाला तरी वाटणे आम्हाला जमत नसे. मग आधी ती पाने ठेचून घ्यायचा.
वरवंटा हातात धरणे पण जमत नसे. मग एखादी मुलगी ते काम हातात घ्यायची. तिला पण
बारीक वाटणे जमायचेच नाही. मग आम्ही तिला म्हणायचो, कायपण, मुलगी असून वाटता येत
नाही. ( आता मुलींना असे बोलता येणार नाही, त्यावेळी आम्ही सहज म्हणायचो.)
मेंदी बारीक वाटल्याशिवाय रंगणार नाही, असा आमचा समज म्हणून एखाद्या मोठ्या ताईला,
गळ घातली जायची, ती पण जरा भाव खाऊन, पण मोठा वाटा घेईन या अटीवर थोडी मेंदी
वाटून द्यायची, आणि बारीक वाटलेल्या मेंदीपैकी बरीचशी ती घेऊन जायची. मेंदी वाटताना,
वरवंट्याला हात लावताना, आजूबाजूची मेंदी गोळा करताना आमचे अर्धे हात रंगलेले असत.
तरीपण मुलांनी हाताला मेंदी लावायची नसते, याबाबत आम्ही ठाम होतो.

मग मुली आपले हात साबणाने धुवून यायच्या. आजकालच्या नाजूक सुबक नक्ष्या अर्थातच
त्याकाळी नसायच्या मेंदी लावायची म्हणजे संपूर्ण हातावर ती थापायची आणि त्यातून उरली
तर पायावर थापायची. मग त्या मुली जेरबंद व्हायच्या आणि हात सुकवत बसायच्या.
तरी त्यातल्या त्यात आम्ही जे डिझाईन करायचा प्रयत्न करायचो, त्याचे अजून हसू येते.

सगळ्यात सोपा पण त्यातल्या त्यात बरा दिसणारा प्रकार म्हणजे मुलीच्या हाताच्या आकाराप्रमाणे
सुपारी ते लिंबाएवढा मेंदीचा गोळा घेऊन तो तळहातावर मधोमध गोल थापायचा आणि बोटाना
टोकाला, एका पेरापर्यंत लेप द्यायचा. अगदीच हौस असेल तर आणखी चार वाटाण्याएवढे गोळे
घेऊन मधल्या गोळ्यांच्या चारी बाजूने लावायचे.
पण आणखी काही प्रकार केलेले आठवताहेत. मेंदीचीच न वाटलेली पाने हातावर फ़ुलासारखी
रचायची आणि त्यावर गोळा थापायचा. पण हा प्रयोग काही यशस्वी व्हायचा नाही, कारण
पाने जागेवर रहायची नाहीत आणि समजा राहिली तरी त्याखाली मेंदी रंगायची, त्यामूळे
हवे ते डिझाईन तयार व्हायचे नाही. त्यावर शक्कल लढवली होती ती जवळच्या शेवग्याच्या
गोंदाने पाने चिकटवायची. पण तोही गोंद पुरेसा नसायचा आणि आमचा हात काही त्यावर
पोचायचा नाही. झाडावर चढायला सक्त मनाई होती, कारण फ़ांद्या अगदीच कमकुवत.

मग एकाच्या डोक्यातून शक्कल निघाली कि मेणाने ती पाने चिकटवायची. मग आईला विचारून
मेणबत्ती आणि काडेपेटी आणायची. ( त्यावेळी सर्व वस्तू आईला विचारूनच न्याव्या लागत, खरे
तर आईला काढूनच द्याव्या लागत. कारण असा वस्तू मुलांच्या हाती लागू नयेत म्हणून मुद्दामच
ऊंचावर ठेवलेल्या असत.) मेणाने काही पाने चिकटायची नाहीत. मग सरळ हातावरच मेणाचे ठिपके
पाडायचा उद्योग चालायचा. तेही एक कौशल्य असायचे. फ़ार वरून पाडला तर तो पसरायचा, फ़ार
खालून पाडला तर जास्त चटका बसायचा. मग एका हाताने मुलीचा हात धरुन नेमक्या अंतरावरुन
हे ठिपके पाडायचे. त्यावेळी लक्ष अगदी हातावर असायचे. ( कारण तेच, मुली बावळट्ट आहेस, असे
म्हणायच्या.) हा प्रयोग मात्र बहुतांशी यशस्वी व्हायचा.

पण एका खास ठिकाणी मात्र मेंदी लावलेली मुलांना चालत असे, ती जागा म्हणजे कपाळ. ज्याच्या
कपाळावरची मेंदीची टिकली रंगेल, तो पुढे राजा किंवा राणी होणार, असा समज होता. पण एकतर
कपाळावर मेंदी चिकटायची नाही. अगदी घट्ट दाबून बसवली कि मान मागे करुन वर बघत बसावे
लागायचे, नाहीतर ती टिकली पडायची. पण कुणाच्याही कपाळावरची मेंदी रंगलेली मात्र आठवत नाही.

तरीही भरपूर मेंदी उरलेली असायची. मग आम्ही आमच्या कुत्र्याला पकडून आणायचो. तो बिचारा
रंगाने बिस्किट कलरचाच होता, त्यामूळे त्यांच्या केसावर मेंदी रंगली असती तरी दिसली नसती.
त्यामूळे त्याच्या पाठीवर वगैरे मेंदी थापायची. आणि त्याला घट्ट धरुन ठेवायचे. कारण त्याने कुणाच्या
पायरीवर जाऊन अंग झटकले तर सगळी भिंत रंगायची. बरं त्याच्या अंगावर जास्त वेळ मेंदी ठेवताही
येत नसे कारण सुकल्यावर ती, काढणे त्याला आणि आम्हालाही शक्य नसायचे. त्यामूळे थापून झाली
कि लगेच त्याला धुवायचे काम असे. मला कौतूक वाटते तो प्रचंड नाराज असायचा, पण आमच्या
प्रेमाखातर सगळे सहन करायचा. धुतला कि सुसाट पळत सुटायचा, अंग झटकून टाकायचा आणि
मातीत लोळायचा.

ज्या ताईने बारीक वाटलेली मेंदी नेली असेल, ती मात्र हिंगाच्या डबीत ती घेऊन ( हो त्यावेळी
हिंगाची पत्र्याची डबी सहज उपलब्द्ध असे आणि जिथे रोजच्या वापरातल्या कप आणि वाट्या
खराब करायच्या नसत, तिथे तिचा वापर होई.)
नक्षी काढायला अर्थातच कोन नसे. फ़ारतर काडेपेटीची काडी मिळायची. तिच्यावर मेंदी चिकटत
असे आणि जरा वेलबुट्टी काढता येत असे. हिराच्या काडीवर ती अजिबात चिकटत नसे.
कोन नसे असे मी म्हणालो कारण त्याकाळी प्लॅस्टीकच आम्हाला दुर्मिळ होते. ( मिळाले तर
एका काठीला बांधून शेकोटीत जाळायचे आणि त्याचे जळते थेंब जमिनीवर पाडायचे हा उद्योग.
जी.ए. चा प्लॅस्टीकचे विश्व नावाचा लघुनिबंध आमच्या पुस्तकात होता.)

मेंदी वाटताना, आजकाल तिच्याच चहाचे पाणी वगैरे काहीकाही मिसळतात. आमच्याकडे मात्र
असे काहि मिसळले जात नसे. क्वचित कुणीतरी नखभर चुना देत असे.

त्याकाळी आमच्या घरासमोर काही उत्तर भारतीय ( राजस्थानी पण असतील ) कुटुंब होती.
त्या बायका मेंदी वाटताना त्यात भेंडी घालत असत. आणि मग ती चांगली चिकट झाली
कि त्याने नक्षी काढत असत.

मग बाजारात तयार मेंदी आली आणि हा सगळा खटाटोप आटपलाच. तयार मेंदीची पावडर
मस्कतच्या बाजारात पण असायची. तिथल्या बायका मुली पण हौसेने मेंदी लावायचा.
आफ्रिकेतल्या सोमालिया, सुदान भागातल्या बायकाही हौसेने मेंदी काढतात. पण त्याची डिझाईन हि
नेहमी भौतिक म्हणजे रेषा, चौकोन वगैरेच असतात. मागे दिपांजलीने सांगितले होते कि, हा प्रकार
बहुतेक नजर लागू नये, म्हणून असतो.
(विषय निघाला होता, ऐश्वर्याच्या उमराव जान मधल्या मेंदीवरुन !! )

Pages