निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा.. वा.. जागु ने तुझ्या आवाजाला सुगंधी उत्तर दिलं..
आता दिनेश दाना पण अशीच एक जोरदार हाक घाल पाहू.. Happy
जागु आईकडून परत आलीस कि नाय अजून???

शोभा.. वा.. जागु ने तुझ्या आवाजाला सुगंधी उत्तर दिलं..
आता दिनेश दाना पण अशीच एक जोरदार हाक घाल पाहू.. स्मित>>>>>>>...अग जागू पर्यंत पोहोचली हाद. दिनेशदांपर्यंत पोहचेल की नाही काय माहित. पण प्र्यत्न करूया. तू पण हाक मार ग Happy
दिनेशदाआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ...................................:हाहा:

झोप मोड तर नाही केली ना मी?
शोभा आमच्या ऑफिसमध्ये झोपण्याची सोय तितकिशी चांगली नाही Lol

जागु आईकडून परत आलीस कि नाय अजून???
अग आई कडे सकाळी जाउन संध्याकाळी परत यायचे. आता ऑफिसमध्ये आहे. आज कामामुळे वेळ नव्हता मिळत. आता बोला.

ही वेल तिची फळं आणि त्यातल्या म्हातार्‍या पहा.
या फळाची कवचं हार्ड आहेत ती वाळल्यावर नारळा सारखी दिसतात. आडवी धरली तर पणती सारखी दिसतात. वेताळ टेकडीवर याचे वेल आहेत.
fala.jpgfala1.jpg

सुदुपार !
आज इकडे पावसाची रिम झिम चांगली सुरु आहे,अस वातावरण पुण्यात खुप दिवसांनी बघायल मिळालं.

जो_एस,
या म्हातार्‍या हवेत सोडुन लहानपणी खुप खेळायचो,अनेक झाडावर याची वेल बघायला मिळायची,अलिकडे कुठे बघायला मिळालं नाही(तस पहायला तसा वेळ कुठे आहे ?) ,त्यामुळे कदाचित लहान मुले यांच्या सोबत खेळताना दिसत नसतील

शोभा,
तुम्ही दिलेलं ओव्याच रोप खुप झपाट्याने वाढलं,आणि कुंडीबाहेर पसरलं,पानांचा अनेकांना उपयोग झाला.

जो_एस / सुधीर - तुम्ही ज्या वेलाचा फोटो टाकलाय (शेंगा व म्हाता-या) तो कावळी (Cryptolepis buchanani) या विषारी वनस्पतीचा आहे. मागे शांकलीने याच वनस्पतीवर "घटित - अघटित" ( http://www.maayboli.com/node/31522) हा लेख लिहिला होता.

मी मागे खाजेच्या झाडाबद्दल लिहीले होते. ते हेच. ह्याला नुसता हात जरी लागला तरी लगेच खाज येते.

मी मागे खाजेच्या झाडाबद्दल लिहीले होते. ते हेच. ह्याला नुसता हात जरी लागला तरी लगेच खाज येते.>>>> दिनेशदा, साधना - कुठे आहेत???????? सांगणार का या झाडाबद्दल ?????

जो_एस,
वेल, पणती फळं,म्हातार्‍या.. खूपच छान फोटो आहेत.
जागु.. वेलकम बॅक Happy .. हे खाजेचं झाड कित्येक वर्षात पाहायला मिळालं नव्हतं.. भलतंच नॉस्टेल्जिक..

मी अश्या प्रकारची झाडे उत्तरांचल च्या ट्रेक च्या वेळेस अनुभवली आहेत, पण पाण्याने हात धुतला की लगेच खाज थांबते.

हे खाजेचं झाड बहुतेक Utricaceae या कुळातले असावे उदा. Urtica dioica या प्रकारच्या वनस्पतींच्या खोडावर, पानांवर पोकळ केस असतात ज्याला ट्रायकोम्स म्हणातात. या केसाद्वारे आपल्या शरीरात हिस्टामाईन व इतरही रसायने टोचली जातात ज्यामुळे आपल्याला खाज सुटते. या वनस्पतींना त्यामुळे स्टिंगिंग नीडल असेही नाव आहे.

Urtica dioica या प्रकारच्या वनस्पतींच्या खोडावर, पानांवर असलेले पोकळ केस ( ट्रायकोम्स ) -सर्व फोटो विकिपिडीयावरुन साभार...

800px-Nettle.jpg

याच कुळातील PileaCadierei ही वनस्पती -

800px-PileaCadierei.jpg

याच कुळातील Boehmeria nivea ही वनस्पती
Boehmeria_nivea_1.jpg

सुप्रभात.

शशांक तुमचा ३ नंबरच्या फोटोतील झाड मी दिलेले आहे. ह्याला तुम्ही म्हणता तसे केस असतात.

वर्षू नील धंन्यवाद

जागू हे खाजेचे झाड लहानपणी पाहिले आहे. पावसाळ्यात जास्त असायची.

सध्या पानं, कळ्या, फुलांवर बारीक पिवळट कण असतात, पाण्याने धुतले तर जातात. फार वाढले तर पानं आकसायला लागतात. खास करून जास्वंद, गोकर्णाची फुलं, अनंत, पालक यावर जास्त आहेत. तगर, झेंडू वगैरे वर नाहीत. आणि पानांच्या खालून जास्त असतात. ही कोणती कीड आहे. त्याला काही उपाय.

जागू, ती खाजेची झाडे आता खुप फोफावतील, दिसताक्षणीच उपटून टाकायची.
रच्याकने, हे केस सिलिकॉनचे बनलेले असतात. म्हणजे मानवाला काचेचा शोध लागायच्या बर्‍याच आधी, झाडांनी ती तयार केली होती. मानवाला निसर्गात ज्वालामुखीत सापडणार्‍या नैसर्गिक काचेपासून, प्रेरणा मिळाली असावी.

रच्याकने, हे केस सिलिकॉनचे बनलेले असतात.>>>
म्हणून ते त्वचेला लागले की ग्लासवुल सारखा इफेक्ट येतो का? ग्लासवुल मुळेही चांगलीच खाज येते.

जागू, ती खाजेची झाडे आता खुप फोफावतील, दिसताक्षणीच उपटून टाकायची.
दिनेशदा लहानपणापासून तेच उद्योग असायचे माझे. पण ते काढल्यावर भयानक खाजही यायची.

ही आईकडे कुंडीत झालेली सुरवंटे.

शोभा,
तुम्ही दिलेलं ओव्याच रोप खुप झपाट्याने वाढलं,आणि कुंडीबाहेर पसरलं,पानांचा अनेकांना उपयोग झाला.>>>>>>>>>तुम्हाला झाला की नाही. Happy

जागू, कसले रंगीत आहेत ग हे सुरवंट. मस्त दिसतायत. मी हे प्रथमच पाहिले. Happy

जागू, कसले रंगीत आहेत ग हे सुरवंट. मस्त दिसतायत. मी हे प्रथमच पाहिले.>>>>>> नुसते दिसायलच मस्त, एकदा का यांची खा खा सुरु झाली की नको जीव करुन सोडतात अगदी... सगळ्या बागेतील पान न पान खाऊन टाकतील की काय अशी दहशत निर्माण करतात........ फार म्हणजे फारच वैताग आणतात हे सुरवंट.... आमच्याही बागेत प्रकटतीलच आता - पावसात यांची वाढ अशी काही झपाट्याने होते की बस्स......

शशांक..छान स्पष्ट फोटो आहेत.. सिलिकॉन चे केस.. ऐकावे ते नवलंच.. Happy
दिनेश दा ने शोभेची हाक ऐकलेली दिसतीये Happy Happy
सगळे सुरवंट असेच रंगीत असतात??

त्या सुरवंटांकडे नजर ठेवायला हवी म्हणजे कोष आणि किटक दोन्ही दिसतील. पण मनिप्लांटवर सहसा येत नाहीत सुरवंट, हा किटक नक्कीच खास असणार.

नाही कसे? मी आले आहे ना!

august-horiba-calender-page-001.jpg

हे horiba कंपनीचे ऑगस्टचे कॅलेंडर आहे. ( Japanese Botonical Art )
जपानी भाषा वाचता येत नाही. खूपच लहान फॉन्ट मधे झाडांची चित्रे आणि इंग्रजीत बॉटनिकल नावे आहेत. कॅलेंडरचे पान स्कॅन केले आहे पण मुळात साईझ खूप लहान आहे. काही करता येईल का?

मला तरी हे चित्र नीट दिसत नाहीये. पण बोटॅनिकल नावे इंग्रजीत असतील, तर शशांक शांकली त्यांचा अर्थ लावू शकतील.

Pages