पुण्यात स्फोट ??????

Submitted by मुरारी on 1 August, 2012 - 11:32

पुण्यात स्फोट ??????

पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास तीन ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15315763.cms

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरवारेजवळदेखिल स्फोट झालाय. सगळे स्फोट कमी तीव्रतेचे आहेत.
अफवांवर विश्वास ठेऊ नका असे पोलिसांनी आवाहन केलयं.

गरवारे ब्रीज जवळ... गरवारे जवळ नाही... सगळे स्फोट जंगली महाराज रोड वरच झाले आहेत.. दोन टोकांना

सगळे काही ठीक आहे...स्फोट फार तीव्रतेचे नाहीयेत...चॅनेलवाले एका सायकलचे नुकसान झाले अशी बातमी वारंवार दाखवत आहेत. त्यांच्या या तपशीलाला हसावे का रडावे कळत नाहीये....

एकाच वेळी इतक्या ठिकाणी गर्दीच्या वेळी स्फोट करायचे पण जास्त हानी होणार नाही हे पाहायचे..

हे करण्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. सगळ्यांचे इथे लक्ष वेधुन घेऊन दुस-या कुठल्यातरी जागेवरुन/गोष्टीवरुन लक्ष उडवुन लावायचे हा हेतू तर नाहीय ना???

हे करण्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. सगळ्यांचे इथे लक्ष वेधुन घेऊन दुस-या कुठल्यातरी जागेवरुन/गोष्टीवरुन लक्ष उडवुन लावायचे हा हेतू तर नाहीय ना???
>>
माझ्या घरीही अगदी हीच चर्चा चालू आहे Wink

एकामागोमाग एक असे ६ स्फोट झालेत आणि पोलीस सांगताहेत हे प्लान्ड स्फोट नाहीत म्हणून. स्फोटांची तीव्रता कमी होती या एकमेव कारणामुळे हे तर सिद्ध होत नाही ना की हे कोणीतरी प्लान करुनच केलं आहे.

नविन होममिनिस्टरांचा बालगंधर्वला आयोजित दौरा होता म्हणे आज संध्याकाळी, पण तो काही कारणाने रद्द झाला...काहीतरी संबंध असावा.

>>>हे करण्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. सगळ्यांचे इथे लक्ष वेधुन घेऊन दुस-या कुठल्यातरी जागेवरुन/गोष्टीवरुन लक्ष उडवुन लावायचे हा हेतू तर नाहीय ना>>><<

+१

सकाळमधल्या या बातमीच्या खाली अनेकांनी हे स्फोट म्हणजे पूर्वप्रयोग असल्याचा संशय व्यक्त केलाय. म्हणजेच नजीकच्या भविष्यात अधिक तीव्रतेचे स्फोट घडू शकतात.

पुण्यातल्या सर्वांनी (निवासी व बाहेरचे दोघांनीही) सदैव सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

-गा.पै.

बाप रे!! काळजी घ्या !!
१५ ऑगस्ट जवळ येत असता असली दुष्कृत्ये करायला कोण टपलेले असतात कोण जाणे Sad

खाली अनेकांनी हे स्फोट म्हणजे पूर्वप्रयोग असल्याचा संशय व्यक्त केलाय. << हिच शक्यता वाटतेय, पोलिस यंत्रणेला / सरकारला कोणतातरी संदेश देण्याच्या हेतू यामागे असावा असेच दिसतेय अन्यथा मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवू शकणारे स्पोट केले असते

Pages