पुण्यात स्फोट ??????

Submitted by मुरारी on 1 August, 2012 - 11:32

पुण्यात स्फोट ??????

पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास तीन ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15315763.cms

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वश्री किरण आणि बाळू जोशी....

'पत्रकार' या जमातीमध्ये जो थिल्लरपणा बोकाळला आहे तो खर्‍या अर्थाने अत्यंत चिंताजनक असा विषय आहे आणि वेळ पडल्यास शासनानेच या संदर्भात या चॅनेल्स आणि टॅब्लॉईड धर्तीच्या वर्तमानपत्रांच्या रीपोर्टर्ससाठी ठोस अशी नियमावली घालून दिणे गरजेचे आहे असे वाटू लागले आहे. लोकशाही प्रणाली मानली गेली असल्याने तुम्ही आम्ही शासनाला त्याच्या सो-कॉल्ड नाकर्तेपणाबाबत कितीही शिव्या घालू शकतो, पण दुसरीकडे त्याचवेळी आपलेही कर्तव्य आहे की असा कुणी दहावी-बारावी कसाबास पास आणि फालतू दर्जाचा तीन महिन्याचा गल्लीबोळातील जर्नालिझम डिप्लोमा {१० पैकी ९ जणांना जर्नालिझमचे स्पेलिंगही येत नसेल} घेऊन वर्तमानपत्रांच्या जंजाळात पंधराशे दोन हजारावर चिकटलेला पोर्‍या वा पोरगी एखाद्या ठिकाणी जर चुकीचे वार्तांकन करण्यात गर्क असेल तर त्याला थांबविणे.....हल्ली यात रेडिओ जॅकी नावाचा एक प्रकार अ‍ॅड झाला आहे, हा तर आणखीन् एक वैतागाचा प्रकार आहे.

एका कॉलेजमध्ये मी आणि माझे तीन सहकारी ऑडिटला गेलो होतो. काम व्यवस्थित चालू होतेही. दुपारच्या सेशनमध्ये सायन्स विंगला १५ मिनिटाची एक 'रेसेस' असते, त्याची बेल झाली आणि वर्गातून मुलेमुली बाहेर पडली....[हे सर्वत्रच असते].....दोनतीन मिनिटांनी काही मोठा गलका ऐकू आला म्हणून शेजारच्या रेस्ट रूममध्ये ऑडिटला बसलेले आम्ही चौघेही बाहेर आलो. इमारतीतील स्टाफ रूममधून बरेच प्राध्यापक मंडळी तसेच कार्यालयातून शिपाईही धावत आल्याचे आम्ही पाहिले. एक मुलगी जिन्यात कोसळली होती, अन् तिच्या डोक्याच्या मागील बाजूने रक्तस्त्रावही होत होता. साहजिकच उपप्राचार्यांनी सुपरव्हायझर आदी मंडळीनी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली....जी काही योग्य ती सर्व कार्यवाही कॉलेजकडून झाली. आम्हीही कामाला लागलो.

दुर्दैवाने दुसर्‍या दिवशी त्या मुलीचे सरकारी इस्पितळातच निधन झाले. "अपघाती मृत्यू' अशी नोंद असल्याने पोलिसांची ड्युटी असते त्यानुसार एक सबइन्स्पेक्टर दोन पोलिस मुलीच्या निधनाचे सोपस्कार आटोपल्यावर दुसर्‍या दिवशी कॉलेजवर जाबजबाबासाठी आले. [हे नियमाप्रमाणे होत असते, कॉलेजने मुलांचा ग्रुप विमा उतरविलेला असतो, त्यासाठीही पोलिस पंचनाम्याची गरज असतेच]. या पोलिसांच्यासमवेत 'कॉलेजमधील तरुणीचा आकस्मित मृत्यू...' अशी चमचमीत बातमी देण्यास उत्सुक असलेले दोन स्थानिक वार्ताहरही आपण म्हणजे कुलदीप नायर आणि अरुण शौरीचे बाप असल्यासारखे दाखवित कॉलेज कॉरिडॉरमध्ये आले. घटना पाहिलेले प्रत्यक्षदर्शी कुणीतरी लागते म्हणून त्या मुलीच्या वर्गातील दोन मुली, दोन मुले, एक प्राध्यापक, बेलमन यांच्या साक्षी नोंदविल्या गेल्या. कॉलेज स्टाफखेरीज बाहेरच्या कुणा व्यक्तीने 'हा अपघात पाहिला आहे का ?" असे विचारल्यावर व्हाईस-प्रिन्सिपलनी मला तशी साक्ष देण्याची विनंती केली...जी मी मानली. तसे इन्स्पेक्टरला सांगितलेही, आणि दप्तरी हवालदाराने ते नोंदवूनही घेतले. जवळपास तपास झालाही....पण असे सहजासहजी आणि 'अळणी' झालेले त्या वार्ताहरपटूंना सहन झाले नसावे....मला आणि व्हा.प्रिन्सिपलना अडवून त्यातील मिसरुडही नीट न फुटलेला बाब्याने विचारले, "सर, आम्हाला असे कळाले आहे, की त्या मुलीने आत्महत्या केली आहे....खरे आहे का ?"... एक सणसणीत लगवावी इतका संताप आला होता मला, पण व्हा.प्रिन्सिपलना असे पब्लिकली चिडून चालत नाही. मला थांबवून, ते शांतपणे म्हणाले, 'त्या मुलीचे दोनच दिवसापूर्वी अपेन्डिक्सचे ऑपरेशन झाले होते, तापही होताच तिला....तरीही त्यांच्या आईने घरी पडून राहाण्यापेक्षा कॉलेजला, मन रमेल' असे सांगून पाठविले. कदाचित त्या तापाच्या भरात अशक्ततेमुळी तिला चक्कर आली आणि ती पायरी घसरून पडली, हे बेलमनने पाहिले....आणि जिन्यावर शंभर पोरेपोरी असताना एखादी मुलगी आत्महत्या कशी करू शकेल...?' इतके संयत उत्तर देवूनही दोघेही आणखीन् काय मसाला मिळू शकतो का त्यातच गुंगले होते....शेवटी इन्स्पेक्टरनी 'झाले की आता, चला..' असे काहीसे डाफरल्यासारखे केल्यावर ते उद्याचे निखिल वागळे चेहरा टाकून गेटबाहेर गेले.

थोडक्यात एखादा १९-२० वर्षीच्या मुलीचा मृत्यू ही 'न्यूज' जर होऊ शकत नसेल तर या शिकाऊ उमेदवारांच्या तोंडची चवच निघून जाते की काय असे वाटते.

फार चीप झाली आहे ही मिडियागिरी.

किरण व बाजो शी सहमत.
अशोक सर, फार दिवसांनी 'सर्वश्री' हा शब्द पाहिला.

या तथाकथीत 'मेडिया'बद्दल माझेही २ पैसे.

यांच्या हातात माईकचे बोंडुक असते, अन हे 'प्रश्न' विचारीत असतात. लहानपणापासून मास्तरांचे प्रश्न ऐकून उत्तरे देण्याचीच फक्त सवय आपल्याला असते. त्यामुळे होतात २ गोष्टी. एकतर यांना प्रश्नांची उत्तरे ठाऊक आहेत असे इम्प्रेशन, अन हे विचारताहेत म्हणजे हे मास्तरांसारखे ऑथॉरिटी फिगर आहेत, अशी कुठेतरी बहुतेकांची समजुत असते. त्यामुळेच यांच्या मूर्ख प्रश्नांचे चाळे लोक चालवून घेत असावेत. बाकी पोटभरू अन गल्लाभरू प्रकाराने काला जादू अन ताईत तसेच भूत प्रेत अन भविष्य विकणार्‍या या सगळ्या 'न्यूज' च्यानल्सवर विश्वास ठेवणे सोडाच, पहाणे देखिल मी बंद केले आहे.

व्यक्तिगतरित्या यांच्या संपर्कात येणे म्हणजे शिक्षाच असते..

<'पत्रकार' या जमातीमध्ये जो थिल्लरपणा बोकाळला आहे तो खर्‍या अर्थाने अत्यंत चिंताजनक असा विषय आहे आणि वेळ पडल्यास शासनानेच या संदर्भात या चॅनेल्स आणि टॅब्लॉईड धर्तीच्या वर्तमानपत्रांच्या रीपोर्टर्ससाठी ठोस अशी नियमावली घालून दिणे गरजेचे आहे असे वाटू लागले आह>
२६ नोव्हेंबरनंतर त्यांचा इलेक्ट्रॉनिक मिडियाचा स्वयंशासनाचा (सेल्फ-सेन्सॉर)निर्णय झाला होता ना? (पावसाळ्याच्या दिवसांत जुन्याच क्लिप्स दाखवून अतिवृष्टीचा, पाणी साचल्याचा आभास निर्माण केला जातो आणि जनतेत घबराट पसरवली जाते हेही ललक्षात आले आहे.) प्रेस कौन्सिल कशासाठी आहे? शासनाने काही नियम करायला घेतले तर ती अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची गळाचेपी होते असा गळा काढायला सगळेच तयार असतील.

<'पत्रकार' या जमातीमध्ये जो थिल्लरपणा बोकाळला आहे तो खर्‍या अर्थाने अत्यंत चिंताजनक असा विषय आहे आणि वेळ पडल्यास शासनानेच या संदर्भात या चॅनेल्स आणि टॅब्लॉईड धर्तीच्या वर्तमानपत्रांच्या रीपोर्टर्ससाठी ठोस अशी नियमावली घालून दिणे गरजेचे आहे असे वाटू लागले आह>.>>>>>>> भरतशी सहमत आहे,
आणी ही नियमावलीचे पालन न करणारांना कठोर शिक्षा करावी, तरच या थिल्लरपणाला आळा बसेल...

Kiran.. ,

>> सिद्दीकीला संपवण्यासाठी मोहोळला आत पाठवलं असावं अशा अर्थाच्या दोन ओळी कुठल्याही वृत्तपत्रात येऊ
>> नयेत हे आताच्या रिपोर्टींगच्या पार्शवभूमीवर आश्चर्याचं वाटतंय.

मला वाटतं अशा अर्थाची टिप्पणी सकाळमध्ये आली आहे. कृपया इथली बातमी पहा :
http://72.78.249.125/esakal/20120611/5736507418964825346.htm
तळाशी पोलीसांतली अनधिकृत चर्चा दिली आहे.

परंतु तुमचा मुद्दा पटला. अर्थात सिद्दिकीला संपवायला मोहोळला आत पाठवलं असावं हे इतकं धडधडीत सत्य आहे की सर्वांना ते आपोआपच कळतं.

आ.न.,
-गा.पै.

@ इब्लिस ~ रीअली डॉक्टर ? मी माझ्या शासकीय पत्रव्यवहारात 'सर्वश्री' अभिनाम नेहमी वापरतो, कारण एकच अहवाल एकाचवेळी चारपाच व्यक्तींना पाठविणे गरजेचे असते, आणि मग प्रत्येकाला 'श्री.' लिहिण्यापेक्षा ते घाऊक 'सर्वश्री' बरे पडते.

बाकी 'बाबा, तंत्र, मंत्र, चेन, अंगठी, माळा, धूप....' आदी हिडिस वाटणारे प्रकार याच आधुनिक चॅनेल्सवर सुरू झाल्याचे पाहिल्यावर मनी जो काही विशाद दाटला तो शब्दांनी चितारणेही अशक्य. मग तुमच्यासारखाच निर्णय.....ती चॅनेल्स लॉक करून टाकणे.

@ भरत मयेकर ~ "सेल्फ सेन्सॉर" म्हणजे काय असते हे फक्त मेट्रो सिटीतील बिग हाऊसेसना माहीत असेल, कदाचित. पण जिल्हा पातळीवर अमुकतमुक राजकारण्याच्या आशीर्वादाने आणि सक्रीय आर्थिक पाठबळाने कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे उगवलेल्या वर्तमानपत्रांना कसले आले आहे सेल्फ सेन्सॉर ? काय ह्या चकटमे फुकट खारे शेंगदाणे खात हिंडणार्‍या पत्रकारांचे वाचन असते की सामाजिक भान ? नुस्ते पत्रकाराचे ओळखपत्र घेऊन इकडेतिकडे बाजीरावकी करत हिंडायचे, उपसंपादकाने सांगितलेल्या वेळेत काहीबाही खरडून द्यायचे, संपला दिवस.

....आणि त्या एंटरटेनमेन्ट चॅनेल्सवाल्या पोरींचे ते माईकचे मुंडके घेऊन इकडेतिकडे थिरकणे पाहणे तर डोक्यात संताप आणते. काय अभ्यास असतो या मुलींचा अमुक एका इव्हेन्टचा ? एका सिनेअ‍ॅवॉर्डसचा कार्यक्रम चालू होता....आणि नटीपेक्षाही जास्त रंगलेली ही बया आपल्या कॅमेरामनबरोबर फाजील उत्साहाने रनिंग कॉमेन्ट्री करीत होती, हॉलच्या बाहेर, प्रवेशद्वाराजवळ, अखंड बकबक करीत. चित्रपटसृष्टीतील लहानमोठे कलाकार, तंत्रज्ञ येत होते, आत जात होते. काही वेळाने दिलीपकुमार आपली पत्नी सायराबानू यांच्यासह तिथे आले. आता दिलीपकुमार यांचे वय, त्यांची प्रकृती, त्यांचे चित्रपटसृष्टीतील स्थान....याचा काडीचाही अभ्यास नसणारी ती दिवटी त्यांच्यासमोर जाताना कॅमेर्‍याकडे पाहात चित्कारली, "और अब ये देखीये हिंदी फिल्म के मुघले आझम आ गये...." आणि, "सर, सर" करीत माईक दिलीपकुमार यांच्यासमोर नेऊ लागली. दिलीपकुमार यानी जास्त काही न बोलता इतकेच सांगितले, "मॅडम, कुछ स्टडी किजीएगा....मै मुघले आझम नही, पापा पृथ्वीराज थे |"....आणि तितकाच नम्रपणा दाखवत ते पत्नीसह आत गेले.

पण ह्या रंगूबाईला दिलीपकुमार जे काही बोलले त्याचे वैषम्य बिलकुल वाटल्याचे दिसले नाही...तिच्या दृष्टीने आता त्यानंतर कोण येते त्या गाडीकडे लक्ष.

जो कार्यक्रम कव्हर करायचा त्याचा कोणता अभ्यास असतो वा काय यांच्या सीनिअर्सनी यांचे ओरिएंटेशन घेतलेले असते....याचे काही तारतम्य नाही...अंगावर आवश्यक ते मांस आणि इंग्लिश मिडिअमचे शिक्षण, एवढ्या भांडवलावर झाल्या ह्या बरखा दत्त.

अशोक पाटील

@ गामा पैलवान

ती बातमी वाचली. रविवार सप्तरंग पुरवणी मधे सकाळने जी चर्चा घडवून आणली तिचा फोकस तुरुंगातला भ्रष्टाचार. टोळीयुद्ध आणि अव्यवस्था यावर होता. ज्या ज्या वेळी येरवडा तुरुंगात तपासाच्या दृष्टीने संवेदनशील अशा गुन्हेगाराला ठेवले जाते त्या त्या वेळी तिथला बंदोबस्त कडेकोट असतो. अशा कैद्याल इतरांपेक्षा वेगळे ठेवले गेलेले आहे. अगदी बिल्ला रंगा, अरुण गवळी ते जनरल वैद्य यांचे मारेकरी या प्रत्येक गुन्ह्यात हे दिसून आलेले आहे. म्हणूनच या कैद्यांपर्यंत इतरांना पोहोचता आलेले नाही.

पण अंडा सेल मधे मोहोळ ला ठेवण्याचा निर्णय कसा झाला ? कातिल सिद्दीकी देशद्रोही कृत्यात होता म्हणून त्याला मोहोळने संपवला या बातमीत मोहोळचे उदात्तीकरण तर आहेच आहे पण जर्मन बेकरी स्फोटाचा तपास इथे बंद होतो यावरुन लक्ष दुसरीकडे वळवणे देखील होत आहे. जर्मन बेकरी स्फोट हे संवेदनशील प्रकरण नाही का ? सिद्दीकीच्या मृत्यूचे परिणाम या प्रकरणावर काय होतात याबद्दल सकाळमधेही अवाक्षर नाही. एकतर मोहोळला हिरो बनवायचं किंवा किरकोळ बाचाबाचीतून खून झाला यातून गांभीर्य कमी करायचं अशा पद्धतीचं हे रिपोर्टिंग वाटतं.

वृत्तपत्रातील आताचे हेडलाईन्स पाहीले तर दयानंद पाटीलला त्यांनी जवळपास धर्मांतिरीत अतिरेकी म्हणून जवळजवळ घोषितच केलेले आहे. या लोकांना सिद्दीकाला वेगळे का ठेवले नाही असे प्रश्न पडले नसावेत याचं राहून राहून आश्चर्य वाटतंय ?

कि त्याच्या जाण्यातच सर्वांचं हित असावं ? तेलगी जिवंत आहे का ही देखील आठवण या निमित्ताने झाली. नेहमी संवेदनशील प्रकरणातील दुवा इश्वरास प्यारा होत असतो. फेअरफॅक्स प्रकरणात महत्वाची साक्ष देण्यासाठी भारतात आलेले श्री लखुभाई पाठक हे लॉजमधील खोलीत मृतावस्थेत सापडले होते. आदरणिय श्री. पी. व्ही. नरसिंहराव हे निर्दोष सुटले. हर्षद मेहता देखील कारागृहात मृतावस्थेत आढळला. तळेगावचे आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खूनाबद्दल चर्चा थंडावली. नेमकं काय घडत असतं सामान्य जनतेला कधीही कळणार नाही. सत्याचा आव आणणारे आणि लोकशाहीचा स्तंभ असणारे वगैरे देखील सत्याच्या बाजूने आहेत यावरचा विश्वास डळमळीत होतो आहे हे नक्की !

Kiran..,

आपल्याला १००% अनुमोदन. आज प्रत्येक वृत्तपत्राला बोलविता धनी आहे. त्याच्या तालावर संपादक नाचतो. अमुक एका प्रकारची बातमी प्रविष्ट करू नये अशी आज्ञा निघाली की त्यासमोर संपादकाला नमावेच लागते. यामुळे वृत्तपत्रस्वातंत्र्य ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे. साहजिकच वृत्तपत्रांनी वाचकांना यथायोग्य चर्चेद्वारे शहाणे करणे हे सर्वथैव असंभव.

लोकशाहीच्या एका स्तंभाची अशी दयनीय अवस्था असली तरी खचून जाण्याचं कारण नाही. त्याकरिता वृत्तपत्र हा लोकशाहीचा आधारस्तंभ का मानला गेला आहे ते बघायला पाहिजे. वृत्तपत्राचा वाचकाशी संबंध दोन प्रकारे यावा :

१. पत्राने वाचकापुढे योग्य माहिती ठेवावी (यथोचित वार्तांकन).
२. या वार्तांकनाच्या आधारे विचारमंथन घडून यावे.

या दोहोंमुळे वाचकांना दृष्टीकोन विकसित करायला मदत होते.

बटक्या पत्रांमुळे उपरोक्त प्रक्रिया घडून येत नाही. मात्र आज संपर्कक्रांती झाल्याने बातमीसाठी वृत्तपत्रांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तसेच विचारमंथनासाठी अनेकविध व्यासपीठे (विशेषत: आंतरजलीय) उपलब्ध होत असल्याने वृत्तपत्रांवर विसंबून राहण्याचीही गरज नाही.

त्यामुळे जरी भारतीय वृत्तपत्रसृष्टीची अवस्था केविलवाणी असली तरी आपण खचून जाता कामा नये.

जाताजाता : परदेशी वृत्तपत्रांची देखील थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. (हे भारतातील दुर्व्यवस्थेचे समर्थन नव्हे!) एक उदाहरण देतो :

इराकमध्ये जनसंहारक अस्त्रे असल्याचा अहवाल देणार्‍या डेव्हिड केलीने म्हणे आत्महत्या केली. प्रत्यक्षात इराकमध्ये अशी अस्त्रे सापडली नाहीत. ब्रिटीश वृत्तपत्रांनी हा विषय तडीस लावून धरायला हवा होता. कारण याच अहवालाच्या आधारे पुढे बुश आणि ब्लेअर जोडीने इराकमध्ये २००३ साली सैन्य घुसवले. पण 'ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी' हा नियम दलाली वृत्तपत्रांनी स्वत:स लागू करवून घेतला! घरोघरी मातीच्याच चुली!!

आ.न.,
-गा.पै.

अमेरिकेतील विसकॉन्सिन प्रांतात एका गुरुद्वारावर माथेफिरूने केलेल्या गोळीबारात २०-३० लोक जखमी झाले आहे आणि आता तिथे पोलिस कारवाई चालू आहेत.

ही घटना.....आपल्या "आजतक" ची थोर थोर निवेदिका कशी सांगत आहे ते ऐकले....त्याची झलक.

"...इस समय की बडी खबर ये है. विसकॉन्सिन गुरुद्वारापे एक हमलेवार ने स्टेनगन से हमला किया है. बीस घायल हुये और कई बच्चों को बंदी बना रखा है...." इथपर्यंत ओके मानू या. आता त्या हमलेवारचे वर्णन करताना बाई म्हणतात, "हमलावर आदमी गंजा है और उसके सीरपर कोई बाल नही...!"

काय याचा अर्थ घ्यायचा ? 'गंजा' म्हटले की समजले की टीव्ही प्रेक्षकाला.

असल्या अगाध ज्ञानाला चॅनेलवाले चापही लावत नाही....एकदा नव्हे तर सातवेळा ती बाई तसेच सांगत होती.

आपल्याला १००% अनुमोदन. आज प्रत्येक वृत्तपत्राला बोलविता धनी आहे. त्याच्या तालावर संपादक नाचतो. अमुक एका प्रकारची बातमी प्रविष्ट करू नये अशी आज्ञा निघाली की त्यासमोर संपादकाला नमावेच लागते. यामुळे वृत्तपत्रस्वातंत्र्य ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे. साहजिकच वृत्तपत्रांनी वाचकांना यथायोग्य चर्चेद्वारे शहाणे करणे हे सर्वथैव असंभव.

अनुमोदन, गामाजी,

http://www.rediff.com/business/slide-show/slide-show-1-special-beginning...

हा एक चांगला लेख रिडीफ वर आलेला आहे.

दुसरा एक छान संदर्भ म्हणजे हि खालील एक अप्रतिम डॉक्युमेंटरी..

http://www.youtube.com/watch?v=n9dKQ4IB2hY

अत्यंत पद्धतशीर बनवलेली आहे. साधी गोष्ट आहे, रामदेव बाबाचे उपोषण सुरु असताना एनडीटीव्ही सायरस भरुचा चा एक आचरट कार्यक्रम दाखवत होता. निरा राडीया प्रकरण तर ताजेच आहे (जरी दबलेले असले तरी)..

सोशल मिडिया (ट्विटर वगैरे) मुळे गोष्टींचा फोलपणा उघड होऊ लागला आहे. आसाम दंगल जवळपास एक आठवडा दाबण्यात आली होती. संपादकांना नमावे लागते हे म्हणण्यापेक्षा संपादक हे राजकीय पक्षांचे एक्स्टेन्शन झाले आहेत. फक्त राजकीय पक्ष नाही, तर कॉर्पोरेट घराणे देखील यात महत्वाचे भागीदार आहेत. पैसा तर हे लोक निर्माण करतात, राजकारणी तर फक्त तो इथला तिथे करतात.

चॅनेल्समधे अभिषिक्त आणि अनभिषिक्त असे दोन प्रकार निघाले आहेत का?
नवीनच माहिती. पूर्वी हे नव्हते Happy
नक्की काय फरक आहे ह्या दोघात? कुणी जाणकार समजावतील का?

चॅनेल्समधे अभिषिक्त आणि अनभिषिक्त असे दोन प्रकार निघाले आहेत का?>>
हो ना . एखादा बाप हे पोरगं माझं नव्हे असा जेव्हा विश्वामित्री पवित्रा घेतो तेव्हा त्याला अनभिषिक्त म्हणू(खरा दुसराच शब्द वापरायचा होता पण ते इथे बरे दिसत नाही :)). उदा- जनसंघ, भाजप ही अपत्ये आमची नाहीत. तसेच जैन च्यानेलही आमचे नाही.(अर्थात 'राजाश्रय ' गेल्यावर तेही मेले आपोआप....)

अहो, अनभिषिक्त या शब्दाला आधीच एक अर्थ आहे. अभिषेक न झालेला असा तो अर्थ. उगाच वाट्टेल त्या शब्दाला वाट्टेल त्या अर्थाने वापरायचा अट्टाहास सोडा. त्याऐवजी एखादा नावाजलेला शब्दकोष घ्या.
असो. (गैरसमज झाल्याने लिहिलेली वाक्ये खोडली आहेत)

.

मध्यंतरी कुणी तरी नाराज होतं म्हणे. नाराजीचं कारण समजलं नाही पण नाराजीही आपोआपच गेली म्हणे. मुंबईत हिंसाचार झाला, आसामींवर हल्ले झाले आणि

कॅगचा रिपोर्टही आला. ( तो येणारच होता का ?)

Pages