पुण्यात स्फोट ??????

Submitted by मुरारी on 1 August, 2012 - 11:32

पुण्यात स्फोट ??????

पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास तीन ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15315763.cms

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला स्फोट जेव्हा बालगंधर्वला झाला तेव्हा आम्हाला वाटले की अण्णा हजारेंच्या आंदोलनाशी काही संबंध आहे.

हो एकूण चार स्फोट झालेत.
१. बालगंधर्वच्या बाहेर पडण्याच्या गेटजवळ
२. मॅकडोनल्डस च्या बाहेरच्या कचरा पेटीत
३. देना बॅंक च्या जवळ (झेड ब्रिजची जे एम रोडवरची एन्ट्री आहे त्याच्या उजव्या बाजूला)
४. गरवारी ब्रिजजवळ (चितळेच्या दुकानाच्या इथे.)
५. पाचवा बॉम्ब लाईव्ह होता तो डिफ्यूज केला.

काल साम टिव्हीवर बातमी दाखवत होते की, पुणे पोलिसांना २ निनावी पत्रं आली होती ज्यात असा उल्लेख होता की १३ जुन ते १५ ऑगस्टच्या दरम्यान पुण्यात घातपाती कारवाया होण्याची शक्यता आहे. त्यात जिवितहानी सुद्धा होऊ शकते. इ. आणि त्या पत्रांकडे म्हणे पुणे पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले आहे. असं वारंवार सांगत होते. Sad

काय सुरू आहे हे पुण्यात? Sad

हे करण्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार. सगळ्यांचे इथे लक्ष वेधुन घेऊन दुस-या कुठल्यातरी जागेवरुन/गोष्टीवरुन लक्ष उडवुन लावायचे हा हेतू तर नाहीय ना??? >>>>>
मागच्या अण्णा हजारे उपोषणाच्या वेळी दादरला प्लाझा जवळ भर वस्तीत पण कमी तीव्रतेचे स्फोट व आता पुण्यात. नक्की कोणाचा हात आहे यात Uhoh
असो पुणेकर्स काळजी घ्या.....

दक्षे, पोलीसांचे निम्मे टपाल हे निनावी पत्रानी भरलेले असते. त्यात बर्‍याच पत्रात असेच काहीबाही असते. अशा प्रत्येक पत्राच्या मागे पोलीस पळत सुटले तर शक्तीचा अपव्यय होतो आणि पोलीसांची दिशाभूल करण्याचाही तो एक डाव असतो. म्हणजे असे की एखाद्या व्ही आय पीचा दौरा असेल त्या दिवशी अवैध धंद्यावाले निर्धास्त असतात कारण बंदोबस्तामुळे पोलीस आपल्याकडे फिरकणारही नाहीत याची त्याना खात्री असते Happy

.

बाजो हेच अगदी मी गजालीवर लिहिलं होतं. की चेष्टेत सुद्धा उगिचच फायर ब्रिगेड्ला फोन करणारे लोक असतात तसं हे पत्र देखिल असेल.
आपल्या लोकांनाही थोदा सिरियसनेस कधी येणार?? Sad

काळजी घ्या सर्वजण .. . दयानंद पाटीलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना. त्यांच्या परिवारासाठी, बहिणीसाठी सहवेदना.

अशा प्रत्येक पत्राच्या मागे पोलीस पळत सुटले तर शक्तीचा अपव्यय होतो आणि पोलीसांची दिशाभूल करण्याचाही तो एक डाव असतो पोलिसांच्या शक्तीचा अपव्यय ?

अबु जिन्दालने सांगितल्या प्रमाणे पुण्याहून इंडीयन मुजाहीद्दीन साठी शेकड्याने मुले
भरती केली होती आणि त्या मूळेच पुणे सतत बाँब हल्ल्याच्या केंद्र स्थानी राहीले आहे.

स्त्रोतः झी टि व्ही बातम्या (१ ऑगस्ट )

पुणे - जंगली महाराज रस्त्यावर बुधवारी सापडलेले बॉंब कमी तीव्रतेचे नव्हे तर उच्च क्षमतेचे होते. मात्र, जोडणीतील दोषांमुळे त्यांचे स्फोट योग्य पद्धतीने झाले नाहीत, त्यामुळे मोठी हानी टळली, अशी माहिती पोलिस सूत्रांनी आज दिली. सातही बॉंबमध्ये सुमारे आठ-दहा किलो अमोनियम नायट्रेट आणि डिटोनेटर असल्याचेही उघड झाले आहे.

http://online2.esakal.com/esakal/20120803/4992911938769247217.htm

मी पण बातमी वाचल्यावर हादरले. Sad
दयानंद पाटील आरोपींपैकी एक असू शकेल. त्याच्याबद्दल त्याचे शेजारी वगैरे पुर्णपणे अनभिज्ञ आहेत. काही लोक त्याला 'पेंटर' समजतात तर काहीजण 'टेलर'
त्याच्या घराच्या झडतीत त्याचा पासपोर्ट आणि पेन ड्राईव्ह वगैरे सारख्या गोष्टी सापडल्यात. त्याच्या पासपोर्टवरील नोंदी सांगतात की तो जॉर्डन मध्ये ७ महिने राहिला होता. का ते कुणालाच माहीती नाही.

माणसे मारण्याची योजना असणार. सरकारच्या नाकावर टिच्चून.

आता जबाबदारी घेईन एखादी संघटना. बसतील बोंबा मारत काही दिवस.

विषारी साप मारून टाकले नाहीत तर ते पुन्हा पुन्हा दंशतात.

अहो ते एन डी ए मधे लेक्च्र्र र म्हणुन काम करतात. जर्मन बेकरीत स्फोट करत्तात्, घोडे दलालाकडे ५ - ५ पास्पोर्ट असतात्, आणि म्हणे पुण्यात काय चालालय. स्टेट पोली स मंत्र्याचे पाय चाटत असतात त्र्यानां आरडीएअकक्स म्हणजे काय हे स्फॉट झाअल्यावर एआरडीने (आर्मामेंट रि.ऑर्गनायझेशन पुणे) यानी शिकवले.तो पर्यंत ते कच्चे रबर म्हणु न दाउ दला मदत करत बसले असते.

कुठल्याही पोलिसा ला मेल करणे,एम एम एस पाठवणे विचारा म्ह णजे त्यांचे ज्ञान पाजळेल. त्याना सोफ्ट फोर्म मधील लायसन्स दाखवले तरी प्रिंट कोपी दाखवा म्हणतात पोलीस! त्यांना काय कळनमॅग्नेशियम्,पोटेशिम्य्म म्हणज कशाशी खातात.

त्यांच्या कुठल्याही प्रयोगशालेतील उपकरणे तपासा आणिए सांगा तपास कसा आणि केव्हा करणार ?
शेवटी अमेरिकन्स येउन सांगतील कसा झाला स्फोट !

एक बॉम्ब निकामी करतानाचे फोटो पाहिलेत का?
मला फार वाइट वाटल.
बॉम्ब निकामी करणारा शब्दशः जीवावर उदार होउनच हे काम करतोय.
त्यांचे हेल्मेट फक्त डोक्यापुरतं. चेहरा पुर्ण उघडाच. हात पुर्ण उघडेच. बॉम्ब निकामी करताना एक चुक झाली तर निकामी करणार्‍या माणसाची जिवंत राहण्याची शक्यता खुपच कमी.
आपल्याकडे अत्याधुनिक सोयीसुविधा नाहियेत पोलिसांकडेही.
Sad

झकास अनुमोदन. अगदी हिच सेम चर्चा आम्हीही केली. सुदैवाने तो बॉम्ब निकामी झाला... असं काम करणार्‍यांच्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल याची कल्पना न करणंच उत्तम. Sad

एक बॉम्ब निकामी करतानाचे फोटो पाहिलेत का?
मला फार वाइट वाटल.
बॉम्ब निकामी करणारा शब्दशः जीवावर उदार होउनच हे काम करतोय.
त्यांचे हेल्मेट फक्त डोक्यापुरतं. चेहरा पुर्ण उघडाच. हात पुर्ण उघडेच. बॉम्ब निकामी करताना एक चुक झाली तर निकामी करणार्‍या माणसाची जिवंत राहण्याची शक्यता खुपच कमी.
आपल्याकडे अत्याधुनिक सोयीसुविधा नाहियेत पोलिसांकडेही.>>>>>>>>>>.अगदी खर. ते लोक जिवावर उदार होऊनच आपले जीव वाचवतात. त्याना सलाम!

दक्श्णीणाजी
अशा लो कांचे फक्त फोटो आणि पुतळे - १५ ऑगस्ट ला उभे रहातात आणि पुढारी त्याव्रर मते मिळवतात?
आठवा जाधवांचे सध्याचे पोस्टींग कुठे आहे ? ओंबाळे चया पत्नीस पेन्शन मिल्ते का?

अशोक कामटेच्यआ पत्नीचे पुस्तक वाचा.
फक्त फोटो आणि सहानुभुती! साधे पेन्शन वेळेवर मिळाले तरी खुप झाले.

((.........बॉम्ब निकामी करणारा शब्दशः जीवावर उदार होउनच हे काम करतोय.
त्यांचे हेल्मेट फक्त डोक्यापुरतं. चेहरा पुर्ण उघडाच. हात पुर्ण उघडेच......))
अगदी बरोबर. माझ्याही मनात हेच आल.
नशीब तो बॉम्ब निकामी झाला.

झकास, दक्षिणा तसेच सुनिल जोग यानी मांडलेले मुद्दे योग्य तर आहेच, पण 'बॉम्ब निकामी' करण्याचा खास महाराष्ट्रीयन स्टाईल अगदी दलाल स्ट्रीट, मुंबई आणि जर्मन बेकरी, पुणे इथेही तशीच चालू असल्याचे स्टील फोटोग्राफ्स खुद्द दोन्हीकडील पोलिस मुख्यालयात उपलब्ध आहेत. त्यावर राज्यातील सुरक्षितता या विषयावर गृहखात्याच्या ज्या मासिक मीटिंग होत असतात तिथे चर्चा होत नसेल ?

मंत्र्याच्या आगेमागे किती तांबड्यापिवळ्या बल्बच्या पायलट गाड्या ट्याँव ट्याँव केकाटत घुमल्या पाहिजेत यावर तासनतास चर्चा होत असते आणि संभाव्य बॉम्ब निकामी करणार्‍या तज्ज्ञासाठी आधुनिक ओव्हरऑल कोट देण्यासाठी यांच्याकडे निधी उपलब्ध असत नाही, हे खरे तर या राज्याला अशोभनीयच आहे. पण नोकरी करणारेही असे जीवावर उदार होऊन करतात म्हणजे त्यांच्या आणि दुसरीकडे जीवे मुठीत धरून बसलेल्या त्यांच्या बायकापोरांसाठी आपणच प्रार्थना करणे योग्य होईल....दुसरे तरी आपण काय करणार ?

अशोक पाटील

बेसुमार शहरीकरण आणि नियोजनाचा अभाव यामुळे गुन्हेगार आणि अतिरेकी यांचे हे शहर आवडते बनणार यात शंका नाही. कचरा उचलण्याच्या यंत्रणेचा फज्जा उडालाय, दुकानांनी पार्किंगच्या जागा व्यापल्यात, म्हणूनच रस्त्यावर किंवा फूटपाथवर सायकल्स, बाईक्स कशाही उभ्या राहतात. या बेशिस्तीत काहीही वावगे आहे असं कुणालाच वाटत नाही. जिथे बेशिस्त तिथे घातपात करणे सोपे जाणारच. बेशिस्त नसेल तर स्फोट होणार नाहीत असं नाही, पण शिस्तबद्ध नागरिकांमधे एखादा काहीतरी संशयास्पद वागणारा उठून दिसतो. त्याच्या हालचालींवर मर्यादा येतात आणि शक्यता अशा कारवायांची कमी होते.

दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था ज्यांच्या ताब्यात आहे त्या महाराष्ट्राच्या पोलीसपाटलांवर आज कुणाचाच विश्वास राहीलेला नाही. बोलका पोपट अशी उपाधी मात्र मिळाली. उद्या अण्णा हजारेंच्या आंदोलनावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे स्फोट झाले असं कुणी म्हणालं तरीही कुणाला आश्चर्य वाटणार नाही यावरून सरकारनेही जनमानसातली आपली विश्वासार्हता पडताळून पहावी आणि योग्य तो बोध घ्यावा.

स्टेट पोली स मंत्र्याचे पाय चाटत असतात त्र्यानां आरडीएअकक्स म्हणजे काय हे स्फॉट झाअल्यावर एआरडीने (आर्मामेंट रि.ऑर्गनायझेशन पुणे) यानी शिकवले>>>>>>> पाय चाटणे म्हणजे काय हो. अतिशय गलिच्छ वाक्यप्रयोग वापरलाय :रागः काहि अपवाद वगळले तर कुणीहि मनापासून मंत्र्याच्या मागे पुढे करत नाहि. त्यांची ड्युटीच असते ती. ज्यांच्या घरात पोलिस आहेत त्यांना विचारा,किती ताप देतात हे मंत्री पोलिसांना Sad कित्येक पोलिसांना धडाडीचे निर्णय घेता येत नाहित.पोलिसांना माहित असतं कि बांगलादेशी बेकायदेशीर राहतात.पण त्याकडे दुर्लक्ष करणच त्यांना सोयीचं पडतं कारण त्या बां.दे.ला परत त्याच्या देशात सोडेपर्यंतची ( पब्लिक ट्रान्स्पोर्र्टने) जबाबदारी पोलिसावर असते व त्याकरीता कोणतीहि अतिरीक्त सुरक्षा पुरवली जात नाहि.ह्यात तो बां.दे. पळाला तर त्या पोलिसाचच निलंबन होऊ शकतं. कोण एवढी जबाबदारी घेईल.? आणि कोणासाठी? कारण राजकिय पाठिंबा अजिबात नसतो. सुरवातीच्या काळात जोमाने काम करणारे पण नंतर नंतर राजकारणाला कंटाळतात.मग आपण बरे आणि आपले घरदार हिच मानसिकता असते बहुतेकांची. आणि मला त्यात काहिच चुकिचे वाटत नाहि.

कुठल्याही पोलिसा ला मेल करणे,एम एम एस पाठवणे विचारा म्ह णजे त्यांचे ज्ञान पाजळेल. त्याना सोफ्ट फोर्म मधील लायसन्स दाखवले तरी प्रिंट कोपी दाखवा म्हणतात पोलीस! त्यांना काय कळनमॅग्नेशियम्,पोटेशिम्य्म म्हणज कशाशी खातात.
>>>>>>> कसं कळणार? शिकवायला पाहिजे ना? कुणिहि जन्मतः शिकुन नाहि येत हे. आणि आपल्यासारखा रीकामा वेळहि नसतो हो त्यांच्याकडे गुगलवर सर्च करायला.

This is our culture. Agree or not. Politicians are our leaders and are one of us. We elect them. So no one should be blamed. No one wants to take responsibility or stand behind someone who wants to do something.

भान,

१०० % अनुमोदन !!

बांग्ला देशीच सोडा, साध्या आरोपीला कोर्टा समोर ऊभ करायला,जाताना (आरोपीच्या + साक्षीदाराच्या)
बाहेरच्या जेवणाचा खर्च सरकार देत नाही. खबरी ठेवून बित्तं बातमी काढायला हि सरकार पैसे देत नाही.

मुंबई हल्ल्याच्या वेळेला AK 47 च्या समोर निधड्या छातीने सामोर जाणारे ही आपले पोलिसच होते.

आता पोलिस दलात MCom, MA झालेले ऊमेदवार आलेले मी पाहिलेत, आणि ते कामही करताना पाहीले
आहेत. आताचे पोलिस दल तेवढ्या तयारीच आहे हे मी सांगू शकतो अर्थातच ह्याला अपवाद असणारच.

ह्या विरूद्ध मुंबईला आपली सेवा देणार्या पोलि सां साठी राज्य सरकार काय करते ते पहावे.
मुंबईतील् कित्येक पोलिस शिपाई झोपड्पट्टीत रहातात व आपल्या कामावर बस, रेल्वेने जातात. पोलिस दलाला
रुजु होताना २४ तास कामाला वाहुन घेईन अशी लेखी ग्वाही द्यावी लागते.
ह्या पोलिसांना कुठल्या ही सणाचा आंनद लुटताना पाहीलय का ? ते कसे लुटणार आंनद ते सणाच्या दिवशी
रस्त्यावर बंदोबस्ताच्या ड्युटीवर, असे सर्व्व असुनही ते कायम हसतमुख असतात.

ह्या पोलिसांना कुठल्या ही सणाचा आंनद लुटताना पाहीलय का ? ते कसे लुटणार आंनद ते सणाच्या दिवशी
रस्त्यावर बंदोबस्ताच्या ड्युटीवर, असे सर्व्व असुनही ते कायम हसतमुख असतात. >>>>>> मी पण हे सगळं लिहिणार होते,पण विषयांतर झालं असतं. पण एक बाब नक्किच लिहावीशी वाटते. मी पोलिस कॉलनीत लहानाची मोठी झालेय. प्रत्येक सणांना वडिलांसकट बर्‍याच ऑफिसर्सना कामावर जाताना पहायचे. पण कुणीच कधी पडक्या चेहर्‍याने नाहि गेलं. सणवार ,मुलांचे वाढदिवस ई. नाहि हे सगळ्यांनी मान्य केलेलं. पोलिसपण बर्‍याच तडजोडी करतात हो.

भान,
तुमच्या भावनांशी सहमत.
एकंदरीतच "मी" काय केले यापेक्षा सरकारने/पोलिसांनी/मुन्शीपाल्टीने/अमक्याने/तमक्याने काय करावे याचेच चिंतन करायची सवय आपल्याला (पक्षी आपणा सर्वांना : बहुसंख्य प्रतिसाद वाचता झालेले मत) लागलेली आहे, हे खेदाने मान्य करतो...

पुण्यासारख्या शहरात पोलिसांकडे बॉब निकामी करताना घालायच सूट नसावा हे धक्कादायक आणि संतापजनक आहे. अशा सूट्सची खरेदी पाच वर्षांपासून लाल फिती आणि पळवाटा-चोरवाटांत अडकली आहे. : इंडियन एक्स्प्रेसमधली बातमी.

भरत

आजवरच्या अशा दहशतवादी घटनानंतर एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे. माध्यमांचा दृष्टीकोण.

दयानंद पाटील याचे धर्मांतर : ही बातमी कशाच्या आधारे दिली असावी ?
दयानंद पाटील याचे जॉर्डन कनेक्शन : पोलिसांचा तपास चालू आहे. तो पूर्ण झालेला नसतानाच असे मथळे देण्यामागे काय कारण असावे ?
दयानंद पाटील यांनी धर्मांतर केले नाही. पत्नीचा दावा : दावा हा शब्द कसा काय ? स्पष्टीकरण योग्य शब्द ठरला असता ना ?
रमजान शेख शी झालेलं संभाषण -रमजान शेखशी झालेलं संभाषण संशयित म्हणून माध्यमांनी जाहीर का करून टाकले. असेलही तसं. पण थांबायचं होतं. पाटील ज्या दुकानात काम करत होता त्या मालकाची चौकशी का नाही ?

पाटील संशयित नाही असं आता पोलीस जाहीर करताहेत. पोलीसांचा तपास अजूनही संपलेला नाही. ते सर्व शक्यतांचा विचार करत असतात. दहशतवादी संघटन यामागे असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीनुसार ते अशा घटनेची जबाबदारी घेतात. अशी जबाबदारी कुणीच घेतलेली नसताना माध्यमं कशाच्या जोरावर निष्कर्ष काढत आहेत ?

कातिल सिद्दीकीच्या खूनाचा बदला हा मथळा तर पहिल्याच दिवशी दिला गेला. माध्यमांनी पुरावे पोलिसांकडे आणून द्यावेत. एकीकड अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणून पोलीस सूत्रांचा हवाला देत दोन ओळी छापायच्या आणि एकीकडे ही अशी बातमीबाजी करायची. माध्यमांचा हेतू नेमका काय आहे ?

कातिल सिद्दीकीच्या खूनाचा बदला असं त्यांना का वाटलेलं असावं ? येरवडा जेल सारख्या महत्वाच्या ठिकाणी जर्मन बेकरी बाँबस्फोटातल्या एका संशयिताचा खून होतो त्या वेळी या खूनामागे अशी कटकारस्थाने माध्यमांना का दिसली नाहीत ? त्यावेळी फक्त दोन गटातल्या मारामारीत सिद्दीकाचा खून हे स्पष्टीकरण त्यांना पुरेसं झालं. का ?

सिद्दीकीला संपवण्यासाठी मोहोळला आत पाठवलं असावं अशा अर्थाच्या दोन ओळी कुठल्याही वृत्तपत्रात येऊ नयेत हे आताच्या रिपोर्टींगच्या पार्शवभूमीवर आश्चर्याचं वाटतंय. जर ती दोन गटातली धुमश्चक्री होती तर मग त्या खूनाचा बदला म्हणून बाँबस्फोट झाले असं माध्यमांना का वाटत असावं हे एक वाचक म्हणून जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे.

ज्याप्रमाणे नेत्यांना वार्ताहर आडवेतिडवे प्रश्न विचारत असतात त्याप्रमाणे हे वार्ताहर जनतेला उत्तरदायी होतील का ? जनतेच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे असतील का ? जर्मन बेकरी स्फोटातली एक कडी निखळली याबद्दल माध्यमांना खंत वाटल्याचे दिसून आलेले नाही.

आताच्या स्फोटाबद्दल माध्यमांनी वाटेल तसे सूचक रिपोर्टिंग करून लोकांमधे संभ्रम पसरवू नये ही विनंती आहे.

माध्यमांचा हेतू नेमका काय आहे ?

>>
सबसे तेज आणि एक्सक्लुझिव हे खरे परवलीचे शब्द. मग ते असत्य, चुकीचे, अपुरे, समाजासाठी/देशासाठी धोकादायक असले तरी चालेल. मग ते दुसर्‍याकडे नाही ते माझ्याकडे आहे यात भूषण...त्यासाठी वाचलीच नसेल तर 'द अल्मायटी' ही कादम्बरी वाचा. आसामात नुकत्याच झालेल्या विनयभंगाच्या केसम्ध्ये चॅनेलची टीम बलात्कार चालू असताना बलात्काराच्या शूटिंगमध्ये गर्क होती. आता सरकारने तर हा बलात्काराचा 'इवेन्ट' त्या चॅनेलने 'प्रायोजित' केला होता असा आरोप केला आहे. 'द अल्मायटी ' वाचली तर हा आरोप अगदी बेसलेस आहे असे तुम्हालाही म्हणव्णार नाही. त्या मुलीची सुटका करणे आमचे काम नव्हते. आमचे रिपोर्टिंग हे काम आहे असे 'प्रोफेशनल' स्पष्टीकरण त्या चॅनेलने दिले आहे.. आपण मात्र डोळे फाडफाडून यांच्या 'बातम्या' पहायच्या आणि त्यांचा टी आरपी वाढवून त्याना मोठे आणि विश्वासार्ह करायचे.

('YZ channel वर तर मी 'दयानंद पाटील जात होता रोज मशिदीच्या दारावरून घरी' अशीही ब्रेकिंग न्यूज पाहिली आहे.:फिदी: ;))
बारावी पास झालेले आणि कुठल्या तरी मान्यता नसलेल्या गावगन्ना संस्थेतून जर्नॅलिझमचे सर्टिफिकेट कोर्सेस केलेली , एक चॅनेलमधून हाकलून दिल्याने दुसर्‍या चॅनेल वरआलेली, पंचविशीतली मंडळी हे यांचे कान आणि डोळे. एकच ओळ फिरवून १०-१० वेळा हे सांगणार...याना एसीपी आणि डीसीपी तला कनिष्ठ कोण आणि वरिष्ठ कोण हे माहीत नाही. महाराष्त्रातले तालुके सोडा जिल्ह्यांची तरी नावे याना माहीत असतात काय? अशा पोटभरू 'पत्रकारां' वर विसम्बून यांच्या बातम्या आपण एकमेकांना सांगणार !
वास्तविक एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याला कॅमेर्‍याने शूट करणे हे प्रोफेशनल इथिक्समध्ये बसत तर नाहीच पण तो गुन्हाही आहे हे याना कोणी धडा शिकवून सांगत कसे नाही? पुन्हा 'खळ्ळ खटॅक' झालं की लोकशाहीचा कुठला चौथा का ५ वा खाम्ब कलथला म्हणून हे शंख करणार...:)

Pages