ऑलिंपिक २०१२ - उद्घाटन/समारोप सोहळा

Submitted by लोला on 27 July, 2012 - 14:20

2012 च्या लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याविषयी लिहिण्याचा धागा.

तुम्हाला काय आवडले, आवडले नाही..

इथे थोडी
झलक १
झलक २ पहा.

गेल्या वेळी बिजींगने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले. काल डॅनी बॉयलची मुलाखत पहाताना ते सगळे विसरुन नव्या नजरेनं आजचा सोहळा पहावा लागणार असं वाटलं. Wink

Let the games begin..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता-प्रीति
को बद्दल धन्यवाद...
~ १९८० आणि १९८४ ही दोन्ही ऑलिम्पिक्स अगदी आज घडत असल्याप्रमाणे माझ्या नजरेसमोर येतात, इतके आम्ही क्रिडाप्रेमी त्या दरम्यान घडलेल्या "ऑलिम्पिक बहिष्कार" प्रकरणाच्या चर्चेत गुंतत असू. ८० च्या मॉस्को ऑलिम्पिकवर अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी बहिष्कार टाकला कारण रशियाने अफगाणिस्तानात केलेली घुसखोरी. तर त्याचा बदला म्हणून ८४ च्या लॉस एन्जल्सवर रशियाने बहिष्कार घोषित केला. १९८० मध्ये अमेरिकन धावपटू शर्यतीत नव्हते म्हणून इंग्लंडच्या सेबॅस्टिअन को ला १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळाले अशी काहीशी बोचरी टीका त्यावेळेच्या मिडियातून झाली होती, तिचा वचपा त्याने थेट अमेरिकेतच अमेरिकेच्याच धावपटूंच्या उपस्थितीतच परत त्याच १५०० मी. च्या गटात 'सुवर्णपदक' मिळवून काढला. आख्ख्या इंग्लंडने त्याला पहिल्या पेक्षा दुसर्‍या पदकाच्यावेळी डोक्यावर घेतले होते. आमचा तर तो हीरोच बनला होता....[चॅरिअट्स ऑफ फायर मुळेही]

त्या दरम्यान त्याच्याविषयी जे काही भरभरून लिहून यायचे त्यावरून हेही समजले की सेबॅस्टिअनची आई ही मूळची आपल्या पंजाबची टिना लाल. सरदारसिंग तिचे वडील. ते दिल्लीस्थित होते. टिनाने लंडनच्या पीटर को यांच्याशी विवाह केला होता. दोन्ही पदकांच्यासमयी टिना को यानी आपल्या मुलाचा पराक्रम पाहिला होता. २००५ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर तिच्या स्मृतीनिमित्य सेबॅस्टिअन को आपल्या आजोबांचे दिल्लीतील घर (जिथे त्याची आई राहात असे) व व्यवसायाचे हॉटेल पाहाण्यास नोव्हेम्बर २००९ मध्येआला होता. यावेळी दिल्ली दूरदर्शनवर त्याची मुलाखत श्री.नरोत्तम पुरी यानी घेतली होती....आजही त्यांच्या आर्काईव्हजमध्ये ती असेलच.

दिल्लीतील आजोबांच्या हॉटेल भेटीच्यावेळेचा सेबॅस्टिअन को चा त्याच हॉटेलसमोरील एक फोटो :

Coe.jpg

~ काल त्याला स्टेडिअममध्ये भाषण करताना पाहिले आणि ह्या सार्‍या जुन्या आठवणी जागृत झाल्या.

अशोक पाटील

ओपनींग परेडमध्ये भारतीय चमुबरोबर ती आगंतुक महिला कोण होती? मीट रोमनींचं निरिक्षण बरोबर होतं तर... आर दे रीअली रेडी फॉर ऑलिंपिक्स?

पाटील, हे वेगळ्या धाग्यावर लिहाल का? आठवणी, खेळाडूंची माहिती इ.?

राज, कुठली महिला? Happy
Djibouti च्या चमूत एक महिला भारतीय पद्धतीचे सोन्याचे दागिने घालून आली होती. नेकलेस कपाळावर बांधला होता, पाहिला का कोणी?

परेड "उरकली" असे वाटले. "पटापट पुढे सरका" Proud कोणाला फार वेळ दिला नाही.

टू ब्रिटिश इज राइट. पण म्हणूनच छान वाट्ले काही प्रसंग. हॉस्पिटल मधली मुले का आली ते समजले नव्हते इथे वाचल्यावर कळले. पूर्वी कूल ब्रिटानिया म्हणून एक कँपेन आला होता त्या प्रमाणे सर्व ब्रिटिश गोष्टी व संस्कृतीची आयटेम वाइज प्रेझेंटेशन वाटले. स्पीड बोटीतून ज्योतीचे आगमन पण खरे तर एका ज्जेम्स बाँड सिनेमाचा ओपनिन्ग सिक्वेन्स आहे तसेच वाटले.

खरे तर अ‍ॅटलांटा, ग्रीस, बीजिंग चे सेरिमनी जास्त स्पेक्टॅक्युलर होते.

>>मला सुरुवात अन ते इन्डस्ट्रियल रेवोल्युशन वगैरे पर्यन्त जाम बोरिंग वाटलं. फायरवर्क्स वाल्या रिंग्ज मस्त दिसल्या. नन्तर बाँड अन राणीची स्ट्न्ट एन्ट्री आवडली मात्र आणि स्पीड बोट मधे बेकहॅम तर जामच आवडला (तो कसाही आला असता तरी आवडलाच असता म्हणा) बाकी खरे सांगायचे तर भव्य असला तरी एकूण प्रोग्राम कंटाळवाणा होता!
>> सहमत अगदीच.

रुणू, राणीची डमीच ग. ती कसली उडी मारतेय तेही स्कर्ट घालून Wink

>>Djibouti च्या चमूत एक महिला भारतीय पद्धतीचे सोन्याचे दागिने घालून आली होती. नेकलेस कपाळावर बांधला होता, पाहिला का कोणी?>> हो पाहिला.

@ लोला

~ यू आर राईट. एखाद्या खेळाडूबद्दल इतकी सविस्तर माहिती 'उदघाटन सोहळा' धाग्यावर येणे अपेक्षित नव्हते. पण सेबॅस्टिअन को वरील प्रेमापोटी ते ओघात घडले हे मात्र खरे.

नवीन धाग्याचा जरूर विचार करतो.

मला संपूर्ण ओपनिंग सेरिमनी पहायची आहे. तुकड्यातुकड्यांत पाहिली. जे चुकले ते चुकवण्यासारखेच होते असे इथे वाचून वाटतेय. ज्योतसे ज्योत जलानेचा क्षण अद्वितीय होता. रोलिंगबाईंचे साम्राज्यही अवतरले होते म्हणे?
खेळाडूंची परेड अर्धी डीडीस्पोर्ट्सवर पाहिली , तिथे कॉमेंट्री नसल्याने चुकल्यासारखे वाटले. ध्वजधारक कोण कोण आहेत याबद्दल उत्सुकता होती. इएसपीएनवर कॉमेंट्री आहे याचा शोध लागल्यावर तिथे अर्धवट पाहता आली. पण ही परेड वाटली नाही. खेळाडू रमत गमत काही चक्क नाचत चालले होते. असे समारोपाच्या वेळी चालतात ना?
<ओपनींग परेडमध्ये भारतीय चमुबरोबर ती आगंतुक महिला कोण होती?> मला वाटले की याहीवेळी कोणत्यातरी खेळाडूच्या समारंभाच्या पोशाखात घोळ झालाय!
भारताचे chef de mission कोण हे शेवटपर्यंत ठरले नव्हते म्हणे! ते सरदरजी अजितपाल सिंग होते का?

रच्याकने, आजच्याच दिवशी (२९ जुलै) दुसर्‍या महायुद्धानंतरच्या पहिल्या अश्या १९४८ लंडन ऑलिंपिक्सचे उद्घाटन झाले होते.

रुणू, राणीची डमीच ग. ती कसली उडी मारतेय तेही स्कर्ट घालून >> Lol तेही खरंच म्हणा.

भरत,
आला होता. पण तो भितीदायक वाटण्यापेक्षा विनोदीच जास्त वाटत होता.

माझं वरातीनंतर घोडं... Happy
संपूर्ण कार्यक्रम अजूनही कुठे बघायला मिळेल का? मी स्पर्धक देशांच्या एन्ट्री सुरू व्हायच्या जस्ट आधी पेंगले. आधीचा कार्यक्रम मधूनच बिटस अ‍ॅण्ड फ्लॅशेस मधे ब्रिलियंट आणि एरवी 'जस्ट टू ब्रिटीश' होता. मि. बीन माझ्यासाठी हायेस्ट पॉइंट होता. माझे डोळे पडू लागले पहाटे ३ च्या सुमारास. त्याच आसपास देशांची पथके यायला सुरूवात झाली. माझ्या घराच्या हॉलने बघितला सगळा सोहळा. Happy

त्या लाल शर्ट, निळी पॅन्ट महिलेबद्दल आज इथे पेप्रात पण आलंय. तिला इथून गेलेल्या चमूपैकी कोणीच ओळखत नाही म्हणे.

बोटीतला बेखम............................ !!!!!!!!!!!!!!

>>त्या लाल शर्ट, निळी पॅन्ट महिलेबद्दल आज इथे पेप्रात पण आलंय. तिला इथून गेलेल्या चमूपैकी कोणीच ओळखत नाही म्हणे>> ते सगळं कबूल. पण तिच्या आजूबाजूला चालत असलेल्या लोकांनाही ती खटकू नये? की कोणाचच तिच्याकडे लक्ष नव्हतं. काल परेड पाहिली तेव्हा भारताचं नाव घेतल्यावर VIP बॉक्समध्ये आपली लोकं उभी राहिलेली पाहिली.

अगं चालत असलेल्यांना सांगण्यात आलं की ती सिक्युरिटीवाली आहे आणि अमुक स्टेप पर्यंतच येणार. तसा दुसरा अजून एक होता तो त्या अमुक स्टेपला थांबला. ही कशी काय पुढे आली तेही कोणाला कळले नाही. असे पेप्रात आलेय. खखोदेजा. Happy

बेकहम ला बघून माझ्य्या तोंडून बरेच उस्फुर्त हर्षोद्गार आले, तर माझी ढालगज लेक लगेच " हे ! अयॅम टेलिंग बाबा !" >>
माझ्या पण तोंडातून अस्सेच हर्षोद्गार आले....बाबा (लेकाचा) शेजारीच बसला होता. त्याने एक तु क टाकलाच Lol

इथल्या commentator ने त्याचा "फॉर्मर आयकॉन" असा उल्लेख केला. Proud

त्या बाईची न्यूज आता इथेही सगळीकडे आहे-
http://www.cnn.com/2012/07/29/sport/olympics-india-mystery-woman/index.html

जर्मनीचा वेष व्हॉलिबॉल कोर्टचे रंग बघून केला वाटतं. पण कोर्टपेक्षा वेष छान होता. ते कोर्ट भयानक गुलाबी रंग आणि बाजूने तेवढाच भयानक निळा रंग असलेले आहे. बघताना डोळ्याला त्रास होऊ लागला.

इतर ठिकाणीही तो गुलाबी (की गुलबक्षी की वांगी tt.gif) रंग दिसतो. वेबसाईटवरही आहे तो-
http://www.london2012.com/medals/
टेनिस कोर्टच्या बाजूने हिरवा आणि हा रंग असे कॉम्बि बरे दिसते. (ड्रेस, साडी साठी वगैरे)

समारोप सोहळा लाईव्ह इथे आत्ता उपलब्ध आहे-
http://www.nbcolympics.com/liveextra/video-watch.html?video=live-closing...

स्ट्रीमीन्ग मुळे टीव्ही प्रेक्षकसंख्यवर परिणाम होत नाही असा साक्षात्कार झाल्याने एनबीसीने हा निर्णय घेतला. ७ वाजता टीव्हीवरही बघता येईल.

याहू वर क्लोजिंग सेरेमनी चे फोटो आहेत त्यात ३ रा फोटो एक सरदारजीचा आहे... त्याच्यपुढे रिओ च पर्फॉर्मर अस काहितरी लिहीलय Lol

वेका + १

>>अशक्य रटाळ..
मै, सत्ता संपल्यावर जगाची पिळवणूक करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाल्यासारखे वागले. Proud

भांगडा पाहिला की नाही?

Pages