ऑलिंपिक २०१२ - उद्घाटन/समारोप सोहळा

Submitted by लोला on 27 July, 2012 - 14:20

2012 च्या लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याविषयी लिहिण्याचा धागा.

तुम्हाला काय आवडले, आवडले नाही..

इथे थोडी
झलक १
झलक २ पहा.

गेल्या वेळी बिजींगने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले. काल डॅनी बॉयलची मुलाखत पहाताना ते सगळे विसरुन नव्या नजरेनं आजचा सोहळा पहावा लागणार असं वाटलं. Wink

Let the games begin..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेकॉर्डेड भाग आता पाहिला..
कंटळ्वाणा वाटला...:(

कदाचित या प्रकारच्या संगीताची काहीच सम्ज, ओळख नसल्याने असेल...
त्या सर्व बँड्स्/गायक्/गायिकांकांध्ये मला फक्त :
-स्पाईस गर्ल्स- मिसेस बेखम मुळे ऐकून माहित होत्या
-वी विल रॉक यू- ऐकून माहित होतं..
- जॉन लेनन- बीटलस माहित आहेत..

ते मधेच फॅशन मॉडेल्स येवून कॅट वॉक का करून गेलेत , काही कळलं नाही..
न न्युज्पेपर प्रिंट चे कपडे , गाड्या , ऑक्टोपस वगैरे च प्रयोजन कळलं नाही Sad

लॉर्ड कोह चं साधं सरळ छोटसं भाषण आवडलं, When our time came Britain, we did it right !

Pages