ऑलिंपिक २०१२ - उद्घाटन/समारोप सोहळा

Submitted by लोला on 27 July, 2012 - 14:20

2012 च्या लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याविषयी लिहिण्याचा धागा.

तुम्हाला काय आवडले, आवडले नाही..

इथे थोडी
झलक १
झलक २ पहा.

गेल्या वेळी बिजींगने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले. काल डॅनी बॉयलची मुलाखत पहाताना ते सगळे विसरुन नव्या नजरेनं आजचा सोहळा पहावा लागणार असं वाटलं. Wink

Let the games begin..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत ( पूर्व किनार्‍यावर दिसत नाहीयेत लाईव्ह ;(). NBC वर संध्या ७.३० वाजता आहेत..:(...म्हणजे लंडन मध्ये संपल्यावर इथे टीव्ही वर दिसतील.

निळं ऑलिंपिक स्टेडियम काय जबरदस्त दिसतं... पण मध्ये मध्ये जाहिराती रसभंग करतायत..

कोणि माबोकर आहेत का स्टेडियम मध्ये? मृदुला? मिलिंदा?

मि बीन इन लंडन सिंफनी ऑर्केस्ट्रा..... Lol

चॅरिएट्स ऑफ फायर... केव्वळ अप्रतिम!

आमच्याकडे नो जाहिरात... Happy

मी पण बघतेय ( घरुन ). राणीची एंट्री फुल्ल टाईमपास. पण ते हेलिकॉप्टरचं शुटिंग अजून जरा ऊन उतरल्यावर घ्यायला पाहिजे होतं. दिग्दर्शनातील गूफ अप Wink

बी बी सी च्या वेब्साईट वर ट्वीटर अप्डेट्स आहेत.
लाईव्ह स्ट्रीमिण्ग कुठेच दिसत नाहीय, अमेरिकेत.

अगो Lol

राणी ची एंट्री... आयडिया आवडली... पण तो डॅनिअल क्रेग काय बाँड म्हनून सुट होत नही बा... तिथे शॉन कॉनरीच हवा... Happy

ऑझी ऑझी ऑझी..... ओय ओय ओय!!!!!!!

ऑस्ट्रेलियन टीम - फ्लॅग बेअरर - आम्च्या कॅनबरन - 'लॉरेन जॅक्सन'!!!! बस्केट्बॉल प्लेअर Happy

६ फूट ५ इंच ... तिला शेकहँड केला होता एका गेम च्या वेळेस तेव्हा मला माझी मान पूर्ण स्ट्रेच करुन बघाव लागल होतं... माझ्याहुन फुटभर उंच!!!

इकडे कॉमेंटेटर म्हणे, चीन सारखाच भारत सुद्धा मोठा देश असूनही खेळाडू मात्र चीनपेक्षा बरेच कमी , असं का? तर बरोबरची बाई म्हणाली की भारतात खेळापेक्षा शिक्षणाला महत्व देतात Happy

Pages