ऑलिंपिक २०१२ - उद्घाटन/समारोप सोहळा

Submitted by लोला on 27 July, 2012 - 14:20

2012 च्या लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याविषयी लिहिण्याचा धागा.

तुम्हाला काय आवडले, आवडले नाही..

इथे थोडी
झलक १
झलक २ पहा.

गेल्या वेळी बिजींगने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले. काल डॅनी बॉयलची मुलाखत पहाताना ते सगळे विसरुन नव्या नजरेनं आजचा सोहळा पहावा लागणार असं वाटलं. Wink

Let the games begin..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ला॑यटींग ऑफ द फ्लेम.... सिंपली अमेझिंग!!!!!

ग्रेट सेरेमोनी..... Happy

वेल वर्थ गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग Happy

पॉल मकार्ट्नी च्या गाण्याने सांगता!

लंडन ऑलिम्पिक गेम्स २०१२ ओफिशिअली ओपन....ऑलिम्पिक फ्लेम लिट.... लेट द गेम्स बिगीन!!! Happy

ऑल द बेस्ट!!!

ऑलिंपीक रिंग मस्तच... हिरवा सेट पण चान दिसला..सुरुवातीचे ते मनोरे मस्त होते.. राणीची एंट्री पण मस्त..
परेड पर्यंत झोपलो...:(
पोवा बद्दल नाही लिहिलं कोणी?:)

मला सुरुवात अन ते इन्डस्ट्रियल रेवोल्युशन वगैरे पर्यन्त जाम बोरिंग वाटलं. फायरवर्क्स वाल्या रिंग्ज मस्त दिसल्या. नन्तर बाँड अन राणीची स्ट्न्ट एन्ट्री आवडली मात्र Happy आणि स्पीड बोट मधे बेकहॅम तर जामच आवडला (तो कसाही आला असता तरी आवडलाच असता म्हणा) बाकी खरे सांगायचे तर भव्य असला तरी एकूण प्रोग्राम कंटाळवाणा होता!

मला थोडा कंटाळवाणा वाटला. ह्या पेक्षा commonwealth games, Delhi (Kalmadi fame :-)) खुप छान होता. असो बघुया भारताला किती पदके मिळतात ते.

मला थोडा कंटाळवाणा वाटला. ह्या पेक्षा commonwealth games, Delhi (Kalmadi fame ) खुप छान होता. असो बघुया भारताला किती पदके मिळतात ते.
>>>>>>> उलट मी विचार करत होते कि भारताला किती वर्षं लागतील असा भव्यादिव्य कार्यक्रम सादर करायला Proud

मला जे काहि सादर करत होते ते डोक्यात शिरायला वेळ लागत होता,पण जे काहि होतं ते (माझ्या) डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. Happy

<<मला सुरुवात अन ते इन्डस्ट्रियल रेवोल्युशन वगैरे पर्यन्त जाम बोरिंग वाटलं. >>
मला पण.
कार्यक्रम होता मात्र एकदम भव्यदिव्य. इंडस्ट्रियलायझेशन दाखवताना ते सगळे मनोरे कुठून बाहेर आले ? ....जमिनीतून ?

फायरवर्क्स रिन्ग्ज मस्तच.
हॉस्पिटलच्या बेडसवर उड्या मारणारी पिल्लं कसली एन्जॉय करत होती.

खर्‍या राणीनेच उडी मारली का ??? आम्हाला विश्वास बसला नाही. मग आम्ही मनाची समजूत घातली की सुरक्षिततेसाठी खरी राणी दुसरीकडून आली आणि डमीने उडी मारली Lol

परेड मलेशियापर्यंत आल्यावर मात्र कोचवरच टीव्ही चालू ठेवून झोपून गेले. पुढे काय काय झालं ?

हॉस्पिटलच्या बेडसवर उड्या मारणारी पिल्लं कसली एन्जॉय करत होती. >>>>> अगदी अगदी. मी नवर्‍याला विचारलं हि मुलं खरच झोपुन गेली तर Happy

इथे आम्ही भारतीय वेळेप्रमाणे रात्री १ ते पहाटे ५.१५ पर्यंत...."अब हम आपको दूरदर्शन के केन्द्र वापस ले चलते है !" असे निवेदकाने म्हणपर्यंत हा उदघाटन सोहळा पाहिला.....आणि इतके जागरण केल्याचे चीज झाले असेच म्हणतो. नेत्रदीपक रोषणाई, इतिहासाचे सादरीकरण, पोशाख, स्वयंसेवकांची शिस्त [आपल्या भाषणात ऑलिम्पिक अध्यक्षांनी जेव्हा स्वयंसेवकांचे खास आभार मानले त्यावेळी सार्‍या स्टेडिअमभर टाळ्यांचा जो प्रचंड कडकडाट गुंजला, तो ऐकून त्या सार्‍या स्वयंसेवकांना आपल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले असेल], लहान मुलांचा लक्षणीय सहभाग, लाव्हारसातून पाच खंडांची वर्तुळे तयार होणे, जेम्स बाँडने चक्क बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन अदबीने राणीला कार्यक्रमस्थळी घेऊन येणे ('राणी' साठी निवडलेले मॉडेल इतके हुबेहूब होते की, तिने हेलिकॉप्टरमधून पॅराशूटच्या साहाय्याने स्टेडिअममध्ये उडी घेऊपर्यंत आम्हाला पत्ताच नव्हता की ती खरी 'राणी' नाही....मस्तच कल्पना).

ऑफिशिअल उदघाटनाच्या वेळी भाषण करताना १९८० व १९८४ च्या ऑलिम्पिक्समध्ये १५०० मी.धावणे गटातील सुवर्णपदक विजेत्या, ५५ वर्षाच्या 'तरुण' सेबॅस्टिअन को याला पाहणे फार आनंददायी घटना होती. आज जलतरणपटू फ्लेप्स याची जी प्रतिमा जगभराच्या क्रिडाप्रेमींच्या मनी आहे, तशीच लोकप्रियता सेबेस्टिअनने त्या काळी मिळविली होती.

आद्याक्षरानुसार मग झालेल्या नेशन परेडच्यावेळी 'इंडिया' ही अक्षरे कधी झळकतील याची वाट पाहात होतो. पहाटे ४-४.१५ च्या सुमारास सुशीलकुमार आणि अन्य भारतीय खेळाडू आलेही, आणि त्याचवेळी या नतद्रष्ट दूरदर्शनच्या अधिकार्‍यांनी टीव्ही पडद्याच्या निम्म्याहून जास्त जागांवर जाहिराती टाकण्याची दुर्बुद्धी सुचली....इतकी चीड आली त्यावेळी या कल्पकताशून्य केन्द्राची ! बाकीच्या राष्ट्रांच्या सर्व फ्लॅग बेअरर्स आणि गाजलेले खेळाडू पाहताना एकही जाहिरात नव्हती पण आमच्या देशाच्या रात्रभर जागलेल्या क्रिडाप्रेमींच्या वाट्याला फक्त सुशीलकुमार यालाच एकदोन सेकंद पाहणे आले....झेंडाही दिसला नाही व्यवस्थित.

~ आणखीन् एक संतापजनक बाब म्हणजे परेडच्या वेळी ज्या कोणत्या देशाचा संघ मैदानात प्रविष्ठ करताच त्या देशाचे तसेच फ्लॅग बेअररचे नाव मैदानात पुकारले जायचे; आणि तसे होताच खास कक्षात बसलेले त्या त्या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान वा जे कुणी सरकारचे प्रतिनिधीत्व करणारे असतील ते आपल्या पत्नीसह चटदिशी उभे राहून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहनात्मक शुभेच्छा देत असल्याचे दिसत होते. "अ‍ॅण्ड नाऊ इंडिया...." असा पुकारा होताच बीबीसीचा कॅमेरा त्या प्रतिनिधी कक्षाकडे गेला. तिथे एक शिख दांपत्य आरामात रेलले होते. श्री.प्रतिनिधी यानी उठण्यासाठी काही हालचाल केल्याचे जाणवले वा ना जाणवले, पण शेजारी असलेल्या सौ.प्रतिनिधी तश्शाच ढीम्म बसून राहिल्या खुर्चीत.

सरकारी प्रतिनिधींची अशी उदासिनता नाही म्हटले तरी खटकतेच. त्या तुलनेत त्याच कक्षेतील ओबामा कुटुंबियांचा उत्साह जाणवण्याइतका होता.

असो...तरीही एक देखणा सोहळा... विशेषतः स्टेडिअममधील प्रचंड आकाराची ती ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलीत करणे.....नो डाऊट स्प्लेन्डिड एफर्टस.

अशोक पाटील

मला एकंदर सगळा कार्यक्रम आवडला Happy

सुरुवातीला ते फार्मिंग, इंडस्ट्रिअलायझेशन थोडे बोर वाटले पण ते एकंदर सेट्स, म्युझिक,कलाकारांची अ‍ॅक्टींग इ इ सगळेच भव्यदिव्य आनि आचंबित करणारे होते... Happy

ड्रमिंग आवडले... काहितरी ९०० च्या वर ड्रमर्स होते... मोस्टली सगळे स्वयंसेवक...

लहान मुलांचे बेड्स वर उड्या मारणे आणि मेरी पॉपिन्स आकाशातुन उडत येऊन जमिनीवर मस्तच Happy .

म्युझिकल ट्रिब्युट म्हणुन जी लवस्टोरी होती ती ठीक ठीक... Happy

चॅरिएट्स ऑफ फायर मस्त...आणि मि बीन चा आचरटपणा Lol

जेम्स बाँड आणि राणी ची एंट्री Lol मला राणीचे कौतुक वाटले की अश्या 'फिल्मी' प्लॉट तिने खेळकर वृत्तीने घेतला Happy

ऑलिंपिक ध्वज मैदानात आला आनि फ्लॅग पोस्ट कडे जाताना वाटेत मोहमद अली यांच्या जवळ थांबला... खुपच इमोशनल क्षण होता...

ऑलिंपिक फ्लेम चे स्पीडबोटमधुन आगमन... छान Happy खेळाडुंनी प्रज्वलित केलेल्या कळ्या पेटत पेटत पुढे एकत्र मोठी फ्लेम झाली ती आयडिया फारच आवडली. मैदानात येताना प्रत्येक संघासोबत येणार्‍या छोट्या मुलांच्या हातात ते 'कोन' कसले आहेत याची उत्सुकता होती.... ते कोन्स म्हणजेच त्या कळ्या हे नंतर समजले. एकंदर २०४ देशांच्या २०४ कळ्या मिळुन मोठी ज्योत झाली Happy

एकंदर सर्व कार्यक्रम अगदी स्पेक्टॅक्युलर होता...आतषबाजी, लायटींग. सेट्स... सगळच ग्रेट! किती ते प्लॅनिंग, मेहेनत, ओर्गनायजिंग, सिक्युरिटी.... मैदानात एव्हढे कलाकार होते...आणि पडद्यामागे किती असतिल??? .... सगळ्यांचेच कौतुक Happy

काय वातावरण असेल ना??? बघतानाच आपण इतके इन्व्हॉल्व होतो, प्रत्यक्क्षात काय सही वाटत असेल ना???

सुरुवातीचा भाग (आणि एकंदरच) जरा लो-बजेट मूव्ही वाटला. Proud
costume खर्चिक नाही, खूप जास्त लोकांचा सहभाग नाही. ठराविक synchronized किंवा खूप स्किल लागेल असे नाच, शो नाहीत. त्यामुळे सरावाला कमी वेळ लागला असेल. सेटही फार काही भव्य दिव्य नव्हता.
राणीच्या एन्ट्रीची कल्पना, फायरवर्क्स, फायर रिन्ग्ज वगैरे काही छान गोष्टीही होत्या पण यापूर्वी पाहिलेल्याच्या तुलनेत काही स्पेक्टॅक्युलर वगैरे वाटले नाही.

इथल्या काही comments-
http://www.washingtonpost.com/world/europe/as-olympics-open-britain-rock...

too British, laced as they were with obscure references to the National Health Service and English club music
it seemed like the rock-and-roll Olympics, an event celebrating the shared culture of the English-speaking world

बिजिंगच्या भव्य सोहळ्यावर अधिक भव्य करून मात करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा काहि वेगळे करण्याचा प्रयत्न आवडला.

“I love this already — mainly because it's so British it will be confusing the hell out of the rest of the world,” CNN’s British talk-show host Piers Morgan tweeted Friday night. >> Lol

** NBC वाल्यांनी मात्र फेल्प्स बेस्ट ऑलिंपियन वगैरे बडबड करून वात आणला. जेस्सी ओवेन्स anybody ?
*** शेवटी खास रोमनीला ज्योत पेटवायला सांगून खास ब्रिटिश टंग चीक इन ह्यूमर दाखवतील कि काय असे मला सारखे वाटत होते Lol

लोला Happy costume खर्चिक नाही, खूप जास्त लोकांचा सहभाग नाही. ठराविक synchronized किंवा खूप स्किल लागेल असे नाच, शो नाहीत. त्यामुळे सरावाला कमी वेळ लागला असेल. सेटही फार काही भव्य दिव्य नव्हता.
राणीच्या एन्ट्रीची कल्पना, फायरवर्क्स, फायर रिन्ग्ज वगैरे काही छान गोष्टीही होत्या पण यापूर्वी पाहिलेल्याच्या तुलनेत काही स्पेक्टॅक्युलर वगैरे वाटले नाही. >> +++१

फार्मिंग, इन्डस्ट्र्या, हेल्थ केअर ?? हे असले महान बोरिंग विषय निवडले तिथेच एन्टर्टेनमेन्ट ची वाट लागली.
गवत गुंडाळून नेताना, त्या फॅक्टर्‍या सेटप करताना तर "आवरा" असे म्हणायची वेळ आली. लहान मुले, हॉस्पिटल इ. काय जो नाच (?) होता तो आणि नंतर इन्टरनेट, टीनेजर्स वगैरे पर्फॉर्मन्स पण असाच पॉइन्टलेस वाटला. उगीच कायतरी विक्षिप्तपणा Happy
एकूण मला तर झोप आली जाम.

तो पाकळ्या प्रज्वलित करण्याचा भाग मी दुपारी पाहिला. त्याची मशाल बनली ते पहायला छान वाटलं.

अशोक,
गेले २-४ दिवस कर्टन-रेझर टाईपचे काही कार्यक्रम पाहिले. तेव्हा सॅबेस्टियन को याला स्क्रीनवर पाहून मलाही तुम्ही लिहिलंयत त्याप्रमाणेच अतिशय आनंद झाला होता.
खेळाडू म्हणून तो अतिशय लोकप्रिय होताच. आताही लंडन ऑलिंपिक प्रमुख म्हणून तो अतिशय उत्साहाने आणि मनापासून वावरताना दिसला.
डेव्हिड कॅमेरून आणि सॅबेस्टियन को यांची प्रेस कॉन्फरन्स काल बीबीसीवर दाखवली होती.

~ आणखीन् एक संतापजनक बाब म्हणजे परेडच्या वेळी ज्या कोणत्या देशाचा संघ मैदानात प्रविष्ठ करताच त्या देशाचे तसेच फ्लॅग बेअररचे नाव मैदानात पुकारले जायचे; आणि तसे होताच खास कक्षात बसलेले त्या त्या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान वा जे कुणी सरकारचे प्रतिनिधीत्व करणारे असतील ते आपल्या पत्नीसह चटदिशी उभे राहून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहनात्मक शुभेच्छा देत असल्याचे दिसत होते. "अ‍ॅण्ड नाऊ इंडिया...." असा पुकारा होताच बीबीसीचा कॅमेरा त्या प्रतिनिधी कक्षाकडे गेला. तिथे एक शिख दांपत्य आरामात रेलले होते. श्री.प्रतिनिधी यानी उठण्यासाठी काही हालचाल केल्याचे जाणवले वा ना जाणवले, पण शेजारी असलेल्या सौ.प्रतिनिधी तश्शाच ढीम्म बसून राहिल्या खुर्चीत.
>>>>>> अगदी. Sad

Pages