भारतीय किती गलिच्छ आहेत हे सांगणारे फोटो आणि त्यावरील चीनमधील नेटीझनच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर प्रसिद्ध झाले आहेत. या लेखात एकीकडे भारताच्या धार्मिक मुद्द्यावर स्तुतीचे चार शब्द लिहिल्यानंतर येथील अस्वच्छतेबद्दल आणि गलिच्छपणाबद्दल मोठ्या प्रमाणावर राळ ओतली आहे. या लेखावर इंटरनेटकरांनी मोठ्या प्रमाणावर टीकाही केली आहे. काहींनी हे पक्षपाती, भारताबद्दल माहिती नसताना केलेले लेखन असे म्हटले आहे तर काहींनी हे फोटो खोटे असल्याचेही म्हटले आहे.
हे सर्व खरे आहे. एखाद्या परक्या देशाने 'माझ्या' देशाबद्दल असे काहीही म्हणणे, दाखवणे कोणालाही राग यावा असेच आहे. माझ्या निसर्गसौंदर्याने भरलेल्या आणि 'अतुलनीय' अशा देशाची फक्त वाईट बाजू दाखवणे हे वाईटच आहे. हा राग, चीड, उद्वेग सारेसारे मान्य केले आणि डोके थोडे शांतपणे ठेवून स्वतःला प्रश्न विचारला की, हे सारे खोटे आहे का? तर उत्तर नकारार्थी येत नाही. देशातील गलिच्छपणापुढे जर आरसा ठेवला तर त्यात याहून काही वेगळे प्रतिबिंब उमटणार आहे का?
----------------------------------------------------------------------------------------------------------------
त्या साईटची लिंक इथे देत आहे. पण ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर ते फोटो पहावेत.
---------------------------------------------------------------
तर यावर मायबोलीकरांच काय मत आहे.
ज्ञानेश, तुमच्या दोन्ही
ज्ञानेश, तुमच्या दोन्ही पोस्टींना अनुमोदन.
फक्त चीनचे नाही तर इतर
फक्त चीनचे नाही तर इतर नेटिझन्स सुद्धा हेच म्हणतात.
खालील लेख पण वाचुन घ्या.
http://postmasculine.com/a-dust-over-india
ज्ञानेश >> ++१
@किरण >>कच-याचे वर्गीकरण आणि
@किरण
>>कच-याचे वर्गीकरण आणि त्याचे डिस्पोजल ( पर्यायी शब्द सुचवा प्लीज) <<
डिस्पोजलला पर्यायी शब्द ' विल्हेवाट ' म्हणजे पुढील संपूर्ण व्यवस्था.
भारतीय रेल्वे जगातील मोठे
भारतीय रेल्वे जगातील मोठे खुले शौचालय
भारतीय रेल्वे हे जगातील सर्वांत मोठे खुले शौचालय असल्याचा उपहास ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला.
भारत ही जगाची सार्वजनिक घाणीची राजधानी आहे. जगातील 60 टक्के खुले शौचालय भारतात आहे. ही बाब भारतासाठी लाजीरवाणी आहे, असे ते या वेळी म्हणाले.
रॉबिनहूड, स्टेशनवर लोकांनी
रॉबिनहूड, स्टेशनवर लोकांनी प्लॅटफॉर्मच्या फार कडेला (रूळाच्या जास्त जवळ) येऊ नये म्हणून केलेली रचना आहे ती :P. कल्याण स्टेशनवर प्रयत्न करून पाहा
@ मी भास्कर थँक्स रे
@ मी भास्कर
थँक्स रे
चित्र पहावतही नाही...
चित्र पहावतही नाही...
गलिच्छ आहे हे प्रथम मन्य करायला हवे तरच ते दुर कसे करता येईल यावर विचार करता येईल...
चीन म्हणतो या गोष्टीला काही अर्थ नाही. आपण चित्र प्रसिद्ध करणार्याचे आभारच मानायला हवे.... निदान त्यामुळे तरी आपले लक्ष या महत्वाच्या प्रश्नाकडे वेधले गेले.
फारच अवघड गेलं सगळे फोटो
फारच अवघड गेलं सगळे फोटो बघताना. अगदी हताश वाटतय! ह्या विषयी आपण (मी स्वतः) काही करत नाही किंवा काहीही न करण्याचा निर्णय घेतल्याची लाज ही वाटते.
गंगेत खुप घाण आहे हे ऐकून होतो पण ते प्रेतं वगैरे बघून तर अक्षरशः निशब्द व्हायला झाले!
हे घ्या! जयराम रमेश,
हे घ्या! जयराम रमेश, ज्यांच्याकडे ही परिस्थिती बदलायची पॉवर आहे तेच जर हा हताश सूर लावतात तर ह्या इथल्या चर्चेने वैगेरे काय होणार?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15232428.cms
भारतीय माणूस वैयक्तिक स्तरावर
भारतीय माणूस वैयक्तिक स्तरावर स्वच्छ असतो पण सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत कमालीचा बेफिकिर असतो अशी त्याची ख्याती सर्वदूर आहे. लोकसंख्येच्या स्फोटामुळे तर सार्वजनिक स्वच्छतेचा पार बोर्या वाजला आहे. नुसत्या लोकजागृतीने ऐकणारी आपली जनता आहे असे वाटत नाही.
सार्वजनिक संडास तर घाणीचे आगरच असतात. सशुल्क असतील तर जरा तरी सुसह्य. पूर्वी सेप्टिक टँक बसवत असत. ते जर योग्य आकाराचे आणि उत्तम बांधणीचे असतील तर चांगले चालत असत. खेड्यांकरता चांगलेच होते. या बाबतीत पुण्यातील गांधीभवनच्या आवारात अशा अनेक प्रकारच्या सेप्तिक टॅम्कची मॉडेल्स आहेत.
आपल्या गलिच्छपणात कचर्याचाही भयानक मोठा हात आहे. तीही शहरांना भेडसावणारी मोठीच समस्या आहे.
चीनने म्हटले म्हणून राग यायचे कारण नाही. पण चीनी लोकही 'हमसे कुछ कम नही'. पण तेथे फटके मारून स्वच्छ राहायला भाग पाडले जाऊ शकते. आपल्याकडे?
विनोद आणि उपहास यातून बाहेर
विनोद आणि उपहास यातून बाहेर पडू या का? आपण काय करू शकू याचा विचार करू या का? मला आणि माझ्या कुटुंबियाना मदत करायला खूप आवडेल.
आपण काय करू शकू याचा विचार
आपण काय करू शकू याचा विचार करू या का?
हे आवाहन करून झालेले आहे.
इ-कचर्याच्या
इ-कचर्याच्या विल्हेवाटीसंबंधीचे नियम १ मे २०१२ पासून लागू झालेले आहेत. इ-कचरा गोळा करण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादक आणि वितरकांवर आहे. इ-कचर्यासाठी त्यांनी कलेक्शन सेंटर्स उभारून तशी माहिती एण्ड युझर्स/उपभोक्त्यांपर्यंत पोचविणे अपेक्षित आहे. सध्यातरी इ-कचर्यासाठी उत्पादक, वितरक आणि घाऊक उपभोक्ते (bulk users) यांना जबाबदार धरले जाईल.
www.business-standard.com/generalnews/news/e-waste-disposal-rules-come-i...
http://moef.nic.in/downloads/rules-and-regulations/1035e_eng.pdf
As per the guidelines of
As per the guidelines of Hazardous Waste Management Division of Central Pollution Control Board, an arm of the Union Environment Ministry, there is a need to encourage recycling of all useful and valuable material from e-waste so as to conserve the ever depleting natural resources.
Putting the onus of environmentally safe e-waste disposal on the manufacturers, it said, the producer is responsible for "setting up collection centres or take-back (electronic) systems either individually or collectively".
जे जे रिसायकल करणे फायदेशीर असते ते ते कंपन्या फायदा वाढविण्यासाठी करीतच असतात. या कचरा गोळा करणे आणी त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी त्यांच्यावर टाकणे ही चांगली तरतूद आहे. नवा कायदा जर काटेकोरपणे अंमलत आला ( शक्यता कमी) तर वस्तु निर्मितीच्याच वेळी , वस्तु कचरा ठरल्यावर त्याची विल्हेवाट आपल्यालाच लावायची आहे या जाणीवेने त्या स्तरावरच थोडी काळजी घेतली जाईल.
भरत धन्यवाद. आता निदान या
भरत धन्यवाद. आता निदान या कायद्याची माहिती देता येइल दुकानवाल्यांशी बोलताना.
वाराणसीत विद्युतदाहिनी
वाराणसीत विद्युतदाहिनी वापरण्याबद्दल निरुत्साह : टाइम्स ऑफ इंडियातील बातमी
वाराणसीत विद्युतदाहिनी
वाराणसीत विद्युतदाहिनी वापरण्याबद्दल निरुत्साह : टाइम्स ऑफ इंडियातील बातमी
Electric crematorium has few takers in Varanasi ह्या मथळ्याचा असा
अर्थ कसा काय काढला ?
ह्या बातमीत दिल्याप्रमाणे हरिश्चद्रं घाटा वरील लाकूड विक्रेतेच लोकांना ठकवत आहेत हे स्पष्ट आहे.
पुर्ण बातमी वाचलेली दिसत नाही.
मा. विवेक नाईक, परवाच
मा. विवेक नाईक,
परवाच स्मशानात जाण्याचा दुर्योग आला होता.
तिथे सनातनवाल्यांनी लावलेले बोर्ड वाचून करमणूक झाली. पुढच्यावेळी जाईन तेव्हा आठवणीने धाग्याचा विषय म्हणून हे बोर्ड फोटू काढून लावीन.
त्यात इतर बोर्डांबरोबर 'विद्युद्दाहिनी वापरणे हे हिंदूधर्माविरोधी कसे आहे?' असला एक बोर्ड आहे..
इब्लिस बाय द वे तुमचा
इब्लिस
बाय द वे तुमचा वरचा प्रतिसाद ही चुकुन दुसर्याच धाग्यावर पडला !
तुम्हाला कदाचीत तो जमोप्याच्या (हिंदु द्फन वैगेरे) धाग्यावर द्यायला पाहीजे होता,
मग तो तिथे विषयाला धरुन झाला असता.
एवीतेवी भरत मयेकरांनी दिलेली बातमी Times of India ची आहे म्हणजे फारशी तथ्य नसलेली ( तुमच्या
म्हणण्या प्रमाणे )!!
ज्याप्रमाणे स्वातन्त्र्या
ज्याप्रमाणे स्वातन्त्र्या साठी चळवळ, भ्रष्टाचार विरोधी चळवळ .... त्याच प्रमाणे स्वछ्छते साठी चळवळ आवश्य़क आहे. शासना प्रमाणे च *जनते* चा मोठा सहभाग आवश्यक आहे. व्यक्तीगत प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत, पण ते फारच तुटपुन्जे. परदेशातल्या फडतुस गोष्टीचे अनुकरण सर्व आटापीटा करुन आपली जनता करत असते. स्वछ्छते सारख्या एखाद्या चान्गल्या गोष्टीचे अनुकरण करायला काय हरकत आहे.
हजारो ख्वाहीशॅ ऐसी की हर ख्वाहीशॅ पे दम नीकले !!!
सत्य आहे ते आहे. पण आपणही
सत्य आहे ते आहे. पण आपणही गंगेला स्वच्छ करायला पाहिजे. ordinanace आणून प्रेते वगैरे साठी निर्बंध आणला पाहिजे.
हिंदु दफन धाग्याचे दफन केले .
हिंदु दफन धाग्याचे दफन केले .
त्याची पुढील चर्चा इथे होऊ शकेल.
हाय्ला! तिकडं कुलुप लावलं का
हाय्ला! तिकडं कुलुप लावलं का अॅडमिनने?
हिंदु दफन धाग्याचे दफन केले .
हिंदु दफन धाग्याचे दफन केले . त्याची पुढील चर्चा इथे होऊ शकेल.
नको, इथे चर्चा नको. हिंदु रीती रिवाज असाएक धागा आहे, तिथे होईल. ( मला चुकुन्वातले होते हा तोच धागा आहे. )
इब्लिस, तुम्ही दाखवलेल्या
इब्लिस,
तुम्ही दाखवलेल्या त्या बेल्टला बिजागरी नाहीत. केवळ शोभेचं कुलूप दिसतंय! ते उघडून काहीही मिळणार नाही याची १००% खात्री!!:हहगलो:
आ.न.,
-गा.पै.
काय हे गामा! अहो अॅडमिनने
काय हे गामा!
अहो अॅडमिनने लावलेलं कुलुप आहे ते. पहिली गोष्ट उघडणारच नाही.
चर्चा महान वळणावर पोचली आहे
चर्चा महान वळणावर पोचली आहे
Pages