चीन म्हणतो, भारत एक गलिच्छ देश!

Submitted by विजय आंग्रे on 24 July, 2012 - 04:18

भारतीय किती गलिच्छ आहेत हे सांगणारे फोटो आणि त्यावरील चीनमधील नेटीझनच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर प्रसिद्ध झाले आहेत. या लेखात एकीकडे भारताच्या धार्मिक मुद्द्यावर स्तुतीचे चार शब्द लिहिल्यानंतर येथील अस्वच्छतेबद्दल आणि गलिच्छपणाबद्दल मोठ्या प्रमाणावर राळ ओतली आहे. या लेखावर इंटरनेटकरांनी मोठ्या प्रमाणावर टीकाही केली आहे. काहींनी हे पक्षपाती, भारताबद्दल माहिती नसताना केलेले लेखन असे म्हटले आहे तर काहींनी हे फोटो खोटे असल्याचेही म्हटले आहे.

हे सर्व खरे आहे. एखाद्या परक्या देशाने 'माझ्या' देशाबद्दल असे काहीही म्हणणे, दाखवणे कोणालाही राग यावा असेच आहे. माझ्या निसर्गसौंदर्याने भरलेल्या आणि 'अतुलनीय' अशा देशाची फक्त वाईट बाजू दाखवणे हे वाईटच आहे. हा राग, चीड, उद्वेग सारेसारे मान्य केले आणि डोके थोडे शांतपणे ठेवून स्वतःला प्रश्न विचारला की, हे सारे खोटे आहे का? तर उत्तर नकारार्थी येत नाही. देशातील गलिच्छपणापुढे जर आरसा ठेवला तर त्यात याहून काही वेगळे प्रतिबिंब उमटणार आहे का?
----------------------------------------------------------------------------------------------------------------
त्या साईटची लिंक इथे देत आहे. पण ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर ते फोटो पहावेत.
---------------------------------------------------------------
तर यावर मायबोलीकरांच काय मत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कचरा मुळातच कमी व्हावा यासाठी वैयक्तिक पातळीवर, हापिसात, कॉलनीत काही प्रयत्न केले आहेत?>>
माझे २ पैसे-
१. गेल्या वर्षीपासून शाडूचा गणपती आणून, तो घरातल्या बागेतच विसर्जन करायला सुरुवात केली.

२. रोजचे निर्माल्य बागेतच जाते.

३. ओल्या कचर्‍यापासून गांडूळखत तयार करण्याचे असफल प्रयत्न केलेत. सध्या पावसामुळे तो वेगळ्या पिशवीतून कचर्‍यातच जातोय. Sad पण झाडांचा कचरा मात्र जमिनीतच जिरवायचा प्रयत्न चालू आहे.

४. मुलाना देखील आतापासुनच कचरा कुठेही न टाकता कचरापेटीतच टाकायचा हे सांगत आहोत.

५. वाढदिवस वा तत्सम पार्टीच्यावेळी डिस्पोजेबल ताटल्या, ग्लास न वापरता, स्टीलच्याच वापरते.
(बरीच माणसे होणार असतील आणि जवळची असतील, तर तात्पुरती भांडी उसनीही आणता येतील)

६. भाजीला जाताना, कायम घरुनच कापडी पिशवी घेऊन जाते. न आणणार्‍याना, २ शब्द ऐकवून प्रवृत्त करते Happy

आणखी काही आठवले तर लिहीन.

@ अश्विनी डोंगरे

छान प्रयत्न आहे...... कापडी पिशवी, शाडुचा गणपती हे तर उत्तमच आहे.... पण कागदी डिस्पोजेबल का नाही वापरायचे?

>>>हे सारे खोटे आहे का? तर उत्तर नकारार्थी येत नाह>>><<

हे खोटे नाही. पन एका शेंबड्याने दुसर्‍याला शेंबडे म्हणण्यासारखे आहे. ते चूक आहे. म्हणून भारतातील घाण नाकारता येत नाही. पण कोणी कोणाला बोलावे असे अहे ते.

चायना सुद्धा तितकच गलिच्छ आहे. मी पाहिलाय. Happy
सगळे मॅन्युफॅक्चरींग प्लँट्स तिथे आहेत. तिथला भाग पाहिला तर पळून जावू असेच आहे.जसे भारतातले काही पॉकेट्स अस्वच्छ, गरीब आहेत तसेह्च तिथे सुद्धा आहे.

कागदी बद्दल नव्हते मी बोलत. हल्ली ते फोमचे मिळतात ना, ते सर्रास दिसतात कचरापेटीत.
कागदी डीशचा वापर सगळीकडे नाही करता येत.

आगाऊच्या ओल्या-सुक्या कचर्‍याच्या स्टेटमेंटला पुर्ण अनुमोदन. मनपाने कंपल्शन केलं होतं, पण तरीही किती लोक ते पाळतात?

आमच्या सोसायटीमधे वर्मिकल्चरसाठी टॅंक्स आहेत. त्यात नॉन बायोडिग्रेडेबल कचरा टाकुच शकत नाही, म्हणुन पत्रक काढुन, नोटीस लावुन आणि मिटींग लावुन लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला, पण काही कुटुंब पालथ्या घड्यावर पाणी. वेगळी पिशवी ठेवतच नाहीत. कचरा गोळा करणार्‍या कुटुंबाला आपल्या ओल्या कचर्‍यात हात घालुन कचरा सॉर्ट करायला लागतो, याबद्दल या लोकांना लाज / अपराधी वाटत नाही. जे माणसाची कदर करत नाहीत ते निसर्ग खड्ड्यात जावु दे म्हणणारच.

सावलीच्या पोस्टला अनुमोदन. यक्क ! काय गलिच्छ फोटो आहेत. या गंगेत स्नान करण्यासाठी हिंदु जन्मभर तरसतात? आणि यामधे डुबकी मारली कि जन्माचं सार्थक होतं? मरताना गंगाजल तोंडात घातल्यावर कितपत पुण्य मिळतं गंगाच जाणे, पण जीव मात्र पटकन जात असेल.

अश्विनी, तुझी पोस्ट मस्तच. यातला प्रत्येक नियम आम्हीही पाळतोच. 'नो प्लास्टिक'ला जेवढा होइल तेवढा हातभार लावते मी. पण रस्त्यावर पडलेले प्रचंड कॅरीबॅग्ज आणि प्लास्टिकचे ढीग पाहिले की फ्रस्ट्रेट व्हायला होतं.

इथे मालदीवमध्येसुद्धा कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रचंड प्रश्न आहे. सगळा कचरा समुद्रकिनार्‍यावर नेऊन टाकतात Sad

प्लॅस्टिकचा (पिशव्या, बाटल्या) वापर अतिप्रमाणात आहे.
आमच्यापरीने हातभार म्हणजे :
१. दुकानदार प्लॅस्टिकच्या पिशव्या देत असेल तर आवर्जून नको म्हणून सांगतो आणि स्वतःच्या पर्समध्ये किंवा कापडी बॅगेत सामान घेतो.
(ह्यावर दुकानदार तु क टाकतात त्याकडे दुर्लक्ष करतो)

२. मिनरल वॉटरच वापरावे लागत असल्याने खूप बाटल्या साठतात. होता होईल तो त्यांचे क्राफ्टस वगैरे बनवून सत्कारणी लावतो.
अर्थात शेवटी देश सोडून जाताना हे सगळं समुद्रकिनार्‍यावरच जाणार ह्याचं वाईट वाटतंच.

३. जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांना त्यांच्या कलाकलाने पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी समजावत राहतो.

बाकी कुठेही कचरा रस्त्यात न टाकायचा नियम इथे आणि देशातही कटाक्षाने पाळतो.

भारतातील अस्वच्छता हि बर्‍याच काराणांशी निगडित आहे.

गंगेच्या ठिकाणी चाललेले धर्माच्या प्रथेखाली एकदम बजबज्पुरी वाटली. किळस यावा इतपत हे प्रकार आहेत.
ते प्रकार केण्यास मनाई केलीत सरकारने व ठोस पावले उचलली तर बरं.(प्रथा- प्रेताग्नी गंगेच्या काठी, पूजा, पाठ वगैरे).

देवपूजा/प्रथा ह्याचे अवास्तव अवडंबर मांडलेले ठिकाणं भारतात बरीच मिळतील.

स्वतःच्या घरात आपण वेगळे ठेवले तरी मनपाचे कचरा उचलणारे सगळं शेवटी एकाच डब्यात टाकतात हे मी पाह्यलेलं आहे. त्यामुळे मनपाचे नियम आणि त्याची अंमलबजावणी हा मुद्दा थोडा वादाचाच आहे. ते असो.

आपण करायच्या जेवढ्या गोष्टी शक्य आहे तेवढ्या करण्याचा प्रयत्न असतो माझा. पण ते पुरेसे आहे का? तर नाही.

अनेक गोष्टींचे प्रॉपर डिस्पोजल काय असते ह्याबद्दल घोळ असतो. संपलेले बॅटरी सेल्स कचर्‍यात टाकू नका असे लिहिलेले असते त्याचे काय करायचे? अश्या गोष्टींचे काय होते? त्यांची योग्य विल्हेवाट कशी लावायची असते? गेलेल्या सिडी आणि तत्सम इलेक्ट्रॉनिक कचरा कुठे टाकायचा असतो?

कागद हा मूळचा बायोडिग्रेडेबल धरला तरी तो बनवताना वापरलेली रसायने, शाईमधली रसायने यांचे काय?
तोच मुद्दा कापडाचा आणि कपड्यांचा. संपूर्णपणे बायोडिग्रेडेबल फायबर(कापूस, रेशीम, लोकर, कातडी) आपण वापरू शकतो का? तर नाही. असे कापड आणि त्याचा मेंटेनन्स हे सामान्याला परवडण्यासारखे नाहीच. तसेच ह्याच्या मूळ कच्च्या मालापासून वस्तू बनवतानाच्या प्रक्रियेतल्या वस्तूंचे (रसायने, डाय इत्यादी) यांचे काय?
रंग जाणारा कपडा आपण धुतो तेव्हा डॉमेस्टिक सुवेजमधे आपण अत्यंत घातक आणि इंडस्ट्रीयल वापराचे रसायन सहजी मिसळून देत असतो. त्याचे काय?
सिंथेटिक कपडे (जे कुणालाही घालता येणार नाहीत, त्याचे काहीही अपसायकलिंग/ रिसायकलिंग सहजी करता येणार नाही असे) कुठे टाकायचे? त्याचे काय व्हायला हवे जेणेकरून ते कमीतकमी हानिकारक होईल?

असे बरेच प्रश्न माझ्यासमोर उभे रहातात. या संदर्भाने मला प्रबोधनाची गरज आहे. कुणी माहिती देऊ शकले तर उत्तमच. अन्यथा माझा माझा उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चालू आहेच.

असो विषयांतर खूप झाले.

नीधप, इलेक्ट्रॉनिक कचर्‍याबद्दल मीही लिहिणार होतो. मी बर्‍याच ठिकाणी विचारले - इलेक्ट्रॉनिक वाल्या दुकानदारांनाही विचारले. कोणालाही माहीत नव्हते. सगळे म्हणतात नेहमीच्या कचर्‍यातच टाका.

अमेरिकेत बॅटरीपासून इतर कोणताही इलेक्ट्रोनिक कचरा नेहमीच्या कचर्‍यात टाकत नाहीत. ते स्वीकारणारी ठिकाणे कॉर्पोरेशन ने ठिकठिकाणी उपलब्ध केलेली आहेत. तेथेच तो नेऊन द्यायचा असतो (ते डिस्पोज करण्याचा वेगळा चार्ज आपल्याकडून ती इलेक्ट्रोनिक वस्तू विकत घेतानाच घेतला जातो). तसे काहीतरी केले पाहिजे आपल्याकडेही. कारण आता आपल्याकडेही असा कचरा प्रचंड प्रमाणात निर्माण होतो.

ज्यांना ज्यांना हा गलिच्छपणा आहे हे मान्य आहे त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार !

मला माझा देश स्वच्छ आणि सुंदर असावा आणि त्याचं कौतुक जगाने करावं असं खूप वाटतं. पण ते जगाला तसं दिसलं पाहीजे ना ! आणि तसं नसेल तर मग समस्या आहे आणि समस्या आहे हे मान्य करणे हेच समस्या सोडवण्याचं पहिलं पाऊल असतं. ज्यांना समस्या नाही असं वाटतंय त्यांना आहे असंच चालू राहू द्या असं वाटतंय असं समजायला हरकत नाही.

ही एक राष्ट्रीय समस्या आहे हे आमीरखानने न सांगताही पटलेलं असेल तर ती सोडवण्यासाठी काय काय करता येईल याचे मुद्दे अपेक्षित आहेत.

ओल्या सुक्या कचर्‍याच्या व्यवस्थापनाचा व त्यावर घेतलेल्या भूमिकेचा या चर्चेशी काय संबंध आहे? (आता हे नको ब्वॉ, की वैयक्तीक पातळीवर स्वच्छता राखली की देश स्वच्छ होईल वगैरे! ) (आमच्याहीइथे दोन तीन वर्षांपासून ओला व कोरडा कचरा वेगळा ठेवतात.)

शिक्षणाचा अभाव व शिक्षणाची इच्छा नसणे हे घटक अशा अस्वच्छतेस अधिक (की सर्वाधिक?) कारणीभूत असावेत. (पुन्हा - शिकलेले लोक असे वागतच नाहीत असे विधान करू इच्छित नाही, ब्रॉडली म्हणतोय)

मूळ मुद्दा आम्ही गलिच्छ आहोत हे चीनने का सांगावे? तर त्यात 'आम्ही गलिच्छ आहोत' हे मुळातच मान्य केले गेलेले दिसते.

परदेशात प्लास्टिक कचरा जाळला जात नाही. नागपूरमधे प्रो अलका झाडगावकर यांनी १ किलि प्लास्टिक वेस्टपासून १ लिटर पेट्रोल बनवायचा प्रयोग संपन्न केला आहे. आता त्याचे हक्क त्यांनी निरंजन शहा या उद्योगपतीला दिलेले आहेत. पण हा प्रकल्प नागपुरात कार्यान्वित आहेअ. नागपुरातले माबोकर्स लिहीतीलच त्यावर. या पेट्रोलवर मोटरसायकल चालवून पाहीली. व्यवस्थित चालते. प्लास्टीक वेस्ट साठी हा एक उत्तम पर्याय आहे.

अस्वच्छतेच्या मागची सामाजिक आणि धार्मिक कारणे हा बेफिकीर यांचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यावर नक्कीच काम व्हायला हवं. पण कसं आणि काय ?

किरण, मी सामाजिक मत दिले

पण काय करता येईल, या आपल्या मुद्याबाबत माझे नम्र मतः

अ‍ॅक्च्युअली 'कायदा अंमलबजावणी' प्रामाणिक व कठोर असणे या गुणवैशिष्ट्याला भारत देश व भारतीय नागरीक 'य' वर्षांपासून मुकलेलेच आहेत. असा कचरा वगैरे करणार्‍यांना कडक शासन व तिथल्यातिथे अंमलात आणायला हवे खरे तर!

(उदा: पाण्याचा प्रचंड बारमाही साठा असलेली, धार्मिक महत्व मिळालेली, साहित्यात खूपदा उल्लेखली गेलेली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या अनेक परिचयांपैकी एक परिचय असलेली गंगा ही असल्या प्रदुषणापासून वाचवण्याचे प्रामाणिक व कठोर प्रयत्न केले जायला हवेत. - अर्थातच, असे प्रयत्न सार्वत्रीकही हवेतच - पण हे न करण्यामागे पुन्हा भ्रष्टाचार व शिक्षण व सुधारणा करणे या दोन गोष्टींची इच्छा नसणे हेच असेल बहुधा)

लोकांना टोल भरण्याची सवय लागली, खाजगी शाळांची सवय लागली, हागणदारीमुक्त गावाची सवय झाली... तसे प्रयत्न केले गेले तर फरक पडणार नाही का ? भारतियांची मानसिकता ही डंडा पडा तो ही सुधरेंगे ही आहे. चौकात ट्रॅफिक पोलीस नसेल तर कुणी सिग्नल पाळत नाही पण पोलीस असला कि सगळे निमुट उभे असतात.

तसे प्रयत्न केले गेले तर फरक पडणार नाही का <<<

माणूस पटकन परिस्थितीशी मिळतेजुळते घेऊ शकतो. त्यामुळे गंभीर व सातत्याने प्रयत्न झाले तर सवय लागेलही.

पण मोक्ष मिळण्यासाठी प्रेत प्रवाहात ढकलणे, पापमुक्त होण्यासाठी डुंबणे आणि तीर्थक्षेत्र सार्वजनिक असल्याने 'जी च्या जी मध्ये गेली स्वच्छता' हा दृष्टिकोन जोपासणे या सवयी काही अंशी श्रद्धांशी, समजुतींशी तर काही अंशी 'शिक्षाच मिळत नसण्याशी' संबंधीत आहेत असे वाटते.

माझ्या मते इथे २ मुद्दे आहेत .
१ . आपण गलिच्छ आहोत का ?
याच उत्तर सर्वानुमते होयच आहे . लोकमत वाल्यांसारखा पोल घेतला तर उत्तर "होय म्हणतायत १००% लोक" येइल .
त्यासाठी त्या चित्रांची काहीच गरज नाही . फक्त घरातून बाहेर पडला तरी आपल्याला तेच दिसेल .
आणि हे बदलायची इच्छाशक्ती ना लोकांमधे आहे न सरकारमधे .
अहो गंगा लांबची गोष्ट आहे , आमच्या इचलकरंजीच्या पंचगंगेच पाणी एवढ घाण आहे की ४० लोक काविळीने मेले , हजारो बाधित आहेत . पण अजूनही ती घाण दूर करावी अस कुणालाच वाटत नाही . पालिकेच समर्थन काय तर ह्या वर्षी पाऊस पडला नाही म्हणून घाण वाहून गेली नाही . Sad

२ . हे चीनने (किंवा माझ्या आधीच्या पोस्टमधल्या प्रमाणे ब्रिटनने) सांगायची गरज आहे का ?
माझ्या मते नाही . कारण हे कुणी सहज लिहित असेल असे मला वाटत नाही .जर तुम्ही त्या दोन्ही लिंकच्या खाली दिलेल्या प्रतिक्रिया वाचल्या तर कितीतरी जणानी हे वाचून भारतात पर्यटनास जाण्यास भीती वाटत असल्याचे लिहिले आहे . अर्थात एवढ्याशाने कुणी आपला निर्णय बदलत नसले तरी भारताची प्रतिमा डागाळतेयच ना . इथे कुठेच मी आपल्या गलिच्छतेच समर्थन करत नाहीये . पण हे जाणूनबुजून कुरापत काढणे ही चुकीचेच. (रच्याकने TIME ची ममो वरची पोस्ट ही तशीच , ते कसे 'underachiever' आहेत आहे ना आम्हाला माहिती , पण अमेरिकेच्या एखाद्या नियतकलिकाला कशाला पाहिजे ते ?)

केदार जाधव

जागतिकीकरणात या गोष्टी टाळता येणारेत का ? आपण नाही का बांग्लादेश, पाकिस्तान यांना नावं ठेवत ? मुस्लीम देशातल्या चालीरितींबद्दल आपल्याकडे लेखच्या लेख नाहीत का येत ?

फक्त वाराणसी पुरते बोलायचे झाल्यास मुळात प्रेत सरळ गंगे मध्ये टाकणे ह्यावर बंदी आलीच पाहिजे. एवढे सुद्धा आपल्याला जमू नये? गंगे मधलं एक भाग वेगळा काढून तो फक्त अस्थी विसर्जनासाठी राखीव ठेवला पाहिजे. तिथून ते वेगळ्या दिएशेने वळवले पाहिजे. बाकी सर्व नदी साफ ठेवली पाहिजे. ह्यावर अनेक प्रकल्प झाले, परंतु उपयोग कशाचाच झाला नाही. पण आज जर आपण गणपती विसर्जनाचे उदाहरण घेतले (आणि तिथे फक्त माती, plaster of परीस, रंग ह्याच गोष्टी आहेत), तर पाणी दूषित होऊ नये म्हणून उपाय योजना करण्यात आल्याच ना?

गंगे मधलं एक भाग वेगळा काढून तो फक्त अस्थी विसर्जनासाठी राखीव ठेवला पाहिजे.

किती हास्यास्पद उपाय.... १०० मढी नदीत विखरुन टाकली काय किंवा एकाच भागात टाकली काय, नदीचे प्रदुष्ण तितकेच होणार ना? नदीचा भाग वेगळा काढणार म्हणजे नेमकं काय करणार?

स्वच्छता ह्या विष या ची व्याप्ती फार मोठी आहे.

इथे परदेशात सर्व सेवां फक्त पैसे भरुनच मिळतात. अगदी सिवरेज प्रोसेसीग चा चार्ज ही दरमहीन्या
काठी वसूल केला जातो. जेंव्हा पैसे घेतले जातात तेंव्हा सर्वीस् ही दिली जाते.
दर घरां काठी पडणारे सांडपाणी हे पाईप व्दारे, व्हाकूम ट्रक व्दारे प्रक्रिया करण्याच्या स्थळा पर्यंत
पोहोचवले जाते. तिथे त्याचे व्यवस्थीत प्रक्रीया करून पाणी शुद्द केले जाते व ते पाणी रस्त्या लगतच्या
हिरवळ पोसण्यासाठी वापरले जाते.

आपल्या मुंबईत सांडपाणी पाईपने आणून समुद्रात सोडले जाते. नावाला त्या सांड पाण्यातुन तरंगणारे
पदार्थ वेगळे केले जातात. सांडपाण्यावर प्रोसेसिंगसाठी नावाला दोन लगून महा नगर पालिकेने बांधले
आहेत. ह्याचा परीणाम ( लगुन नसण्याचा, सांडपाणी प्रोसेस न करण्याचा) असा झाला आहे की जर\
विमानातून मूंबईच्या किनार्याच निरीक्षण केले तर तिन कीमी पर्यंतचा समुद्रहा गटारी सारखाच काळा दिसतो.
अगदि उरलेला समुद्र आपल्याला वेगळा दिसतो.

ज्या देशात सुलभ सौचालया बाहेर लोक प्रातःविधीला स्वता: बसतात मुलांना बसवतात आणि
सौचालयाला लागणारे पैसे वाचवतात तिथे काय उपाय करणार.

पैसे देऊन कुठलीही सेवा घ्यावीच लागेल अशी आपल्या समाजाची मनस्थीती तयार झालेली नाही. त्यामूळेहा
आड मार्ग शोधून काढला जातो. आपल्या समाजाला सर्व जबाबदारी शासनावर सोपवुन आपण नामानिराळे
रहाण्याची सवय झालेली आहे, किंबहूना तशी ती करवलेली आहे.

मध्यम वर्गीय महीलांना बाहेर गेल्यास महीला प्रसाधन ग्रूहांची कमतरता असल्याने किती कुचंबणा
होते हे सर्वांना माहीत असेलच. असे असताना ही आपण सुलभ सौचालयाकडे पाठ फिरवतो कारण त्यांचा
दर्जा.

परदेशातल्या स्वच्छतेचे कृपया कौतुक नको.
कचर्‍याचा पुनर्वापर करण्याच्या तंत्रात हे देश पुढे आहेत हे निर्विवाद. पण पुनर्वापराची प्रक्रिया आणि तिचा कार्बन फुटप्रिंट (प्रतिशब्द सुचवावा) हा वादाचा मुद्दा आहे.

हे लोकं त्यांचा कचरा कुठे डंप करतात हे इथे तपासून पाहा.
http://www.storyofstuff.org/movies-all/story-of-bottled-water/
(या रिकाम्या बाटल्या कुठे आणि किती दूरवरून आणून टाकल्या जातात ते पाहा)

आपल्या कचर्‍याचे काय होते हे अभ्यासण्यासाठी दोन वर्षांपूर्वी कचरा जमा करणार्‍या घंटागाडीत बसून उरळी देवाचीच्या कचरा डेपोला जाऊन कचर्‍याचा तो डोंगर चढून गेलो होतो.
तिथे झालेले साक्षात्कार एवढे भीषण होते की अजूनही कचरा करताना ते आठवतात आणि कचरा करण्यावर आपसूक नियंत्रण येते.
रोज आपण काय काय कचरा पेटीत टाकतो हे दोन तीन-दिवस कागदावर लिहीण्याचा एक छोटासा घरगुती प्रयोग जरी आपण केला तरी आपण कचरा निर्मितीचा २४*७ चालणारा कारखाना आहोत हे आपल्याच लक्षात येईल.
(याची उग्र झलक पाहायची असल्यास अतुल पेठेंची 'कचराकोंडी' पाहावी. विदारक असले तरी सत्य आहे)

ओला-सुका वेगळा केला तरी कचरा व्यवस्थापनाच्या चक्रात तो कुठेतरी (कचरापेटी/घंटागाडी/मोठे डंपर/डेपो) एकत्र होतोच हे तर अगदीच सत्य.
त्यावेळी केलेल्या आटापिट्यातून 'स्वतः जमेल तेवढा कमी कचरा करावा' आणि
'कचरा गोळा करणार्‍यांविषयी माणूसकी ठेवावी' या दोन गोष्टी मात्र कायमच्या शिकलो.

भल्यामोठ्या शहराचा कचरा कसा नियंत्रणात येईल..? हा विचार करणे स्तुत्य आहेच पण 'मी कचरा कसा कमी करेन' हा विचार अधिकच रास्त आणि व्यवहार्य आहे.

बाकी, हा विषय 'चर्चेत' आणल्याबद्दल त्या चिनी माध्यमाचे आभार.
मागे उरळी देवाचीच्या कचरा डेपोला आग लागली होती तेंव्हा असेच छोटे वादळ उठले होते.
चिनी काय, भरतीय काय किंवा अमेरिकन काय..शेवटी मानवी वृत्ती थोड्याफार फरकाने सारखीच.

आणि हो, शिक्षणाचा (म्हणजे अशिक्षीत असण्याचा) आणि याचा संबंध नाही बरं का..!
सध्या राहातो त्या कोथ्रुडातल्या 'उच्चभ्रु' सोसायटीत गेल्याच आठवड्यात एक दूर्दैवी सूचना वाचायला मिळाली. घराच्या बाल्कनीत वरील मजल्यावरून नको तो (आणि गलिच्छ) कचरा टाकल्या जातोय त्याबद्दल निषेध व्यक्त करणारी..

>>>आणि हो, शिक्षणाचा (म्हणजे अशिक्षीत असण्याचा) आणि याचा संबंध नाही बरं का..!<<<

माझं विधान पुन्हा एकदा वाचावेत.

<<शिक्षणाचा अभाव व शिक्षणाची इच्छा नसणे हे घटक अशा अस्वच्छतेस अधिक (की सर्वाधिक?) कारणीभूत असावेत. (पुन्हा - शिकलेले लोक असे वागतच नाहीत असे विधान करू इच्छित नाही, ब्रॉडली म्हणतोय)
>>>>

बेफिकीरजी,
शिक्षणाची इच्छा नसणे<< या घटकाचा संबंध इथे नसावा. (इच्छा नसणे हे देखिल ब्रॉडली घेता येऊ शकते!)
'कचरा व्यवस्थापन' या शिक्षणाचा (संस्कार म्हणू हवं तर) अभाव मात्र जरूर असावा.

काहीही...
म्हणे आपण गलिच्छ आहोतच.. च्यायला कोणता देश नाही? इथे अमेरिकेत उकिरडे चरणारे आणि नवनवीन cuisine च्या नावाखाली वाट्टेल ती घाण खाणारे आणि करणारे लोक आहेतच.
चीनमध्ये कोणाचे काय खातात आणि उरलेल्या अवयवांचे काय करतात हे नवीन सांगायला नको..
देवळांच्या गलिच्छ पणाचे कौतुक मला नका सांगू... बिजिंग शांघाय मधे ज्याला पोर पैदा करायचे स्वातंत्र्य नाही त्यांच्या स्वच्छतेच्या कव्वाल्या कोणाला ऐकवताय? .. लोकांना गुलामवृत्ती लावून दिखाव्याची स्वच्छता काय चाटायचीये?
माझ्या हापिसातल्या चीन्याला मी बीजिंग ऑलिंपिक च्या वेळेस चायनाने कसे pollution control केले ही news दाखवली तेव्हा खिन्न हसून म्हणाला की जवळ जवळ ७०००० लोकांना शहर स्वच्छ दिसायला हवे म्हणून 'गुल' केले.. स्थलांतरित नाही.. 'गुल'.. !

म्हणे विधवा स्त्री हे पाप असे धर्म सांगतो.. हे धर्म सांगत नाही तर धर्माचे नाव धारण करून एक माणूसच दुसर्या माणसाला सांगतो.. सांगणारा मूर्ख, ऐकणारा शतमूर्ख.. पण इथे काय संबंध?

देवळांमध्ये घाण दिस्तेय? साफ करा.. गंगेत प्रेत दिस्तेय, उतरा आणि बाजूला करून विध्युतदाहीनीत द्या.. पण केवळ असले फोटो लावून आपण मूळातच कसे गलिच्छ आहोत हे पटवणे फार केविल्वाणे आहे..

Pages