कोल्हापुरी पेशल शब्दकोष

Submitted by मन-कवडा on 31 March, 2009 - 01:22

फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!

कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए ..थंड घे… उगा वाकळंत झोपून चंद्राला पाय लाऊ नकंस>>> Rofl

अमान मोमिन त्याण्ची सॉफ्ट कॉपी पण मिळाली>>> हायला ग्रेट Happy

मोबाइलात एमपीथ्री म्हणुन कन्व्हर्ट करता येइल का?
तयार ठेवा... Happy

मोबाइलात एमपीथ्री म्हणुन कन्व्हर्ट करता येइल का?
तयार ठेवा...>>> आहे माझ्या मोबाइल मध्येच आहे.

कोल्हापूरची खास शिवी आठवली सकाळी 'सुक्काळीच्या">>> सक्काळी सक्काळी रामाचं नाव घ्यावं Wink

निवांता......काय आठवण काढलीस तू 'अमान मोमीन' या वल्लीची ! एकदम झकासरावासारखे झकास वाटले.

तुला आश्चर्य वाटेल वा वाटणारही नाही....पण मी आणि माझे तीनचार मित्र प्रत्यक्ष अमान मोमीन आणि त्यांचे थोरले बंधू मन्सूर यांच्याशी थेट इथे कोल्हापूरात मनसोक्त गप्पा मारीत असू......कोल्हापुरी मुस्लिम भाषा हे एक अजब रसायन आहे. ज्याच्या आस्वाद तू त्या एमपी३ मधून घेत असशीलच.

मामा मला ती कॉपी अमेरिकेत मिळाली, एका ओळखिच्याकडुन. तोपर्यंत मला ते नाव देखिल ठाउक नव्हते. ते म्हणाले अरे तु कोल्हापुरचा ना मग हे ऐक. आता परत एकदा या विषयावर गप्पा मारायला बसायला पाहिजे.

नमस्कार, मी आजच जॉईन झालोय हितं..पैला कोल्लापूरचा ग्रुप जॉईन केला आणि हा धागा बगून आख्ख ल्हानपन आटवलं..ह्यातले जवळजवळ सगळे शब्द माझ्या नेहमीच्या वापरात होते.. Happy आता लई मज्जा वाटत्या..

ल्हान अस्ताना, पानाच्या टपरीवर एकदम बारक्या टी.व्ही.वर आपली म्याच चाल्लेली असली की तिथं "हूं म्हनून" गर्दी असनार आनि त्या गर्दीत नवीन कोण आला की ठरलेला प्रश्न

१. "किती झाला?"
२. "१२३ वर २"
१. "तेंडल्या हाय काय?"
२. "हाय हाय अजून..मारायलयं.."
१. "मग जिकतय घे.."

यामध्ये "तेंडल्या" ला "बाळ्या" म्हणायची फ्याशन पन हुती.. Happy

- चिर्कुट

योक् शब्द राहिला की "येशेल"
येशेल म्हंजे (वाघाचे पंजे) "गोडेतेल/शेंगतेल"

ग्रामीण भागात सापाचा उल्लेख थेट केला जात नाही. (घाबरून)
साप चावलाय हे सांगायचे असेल तर 'पान लागलेय' असा शब्दप्रयोग केला जातो.

एरवी सापाचा उल्लेख 'लांबडे' असा केला जातो.

अजुन एक
आपण 'एकजण' असे म्हणतो तेथे 'एकटा" असे म्हणतात. उदा एकटा भेटला होता. एकटा काय म्हन्ला की तराट जा वर्च्या बाजुला मंग घावल रस्ता.

असो.

Pages