कोल्हापुरी पेशल शब्दकोष

Submitted by मन-कवडा on 31 March, 2009 - 01:22

फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!

कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोत्यात घालुन हाग्या मारला त्याला. >>>
अरे व्हय की.
आमच एक पीटीच मास्तर आमाला दम द्यायच.
काय रे ये, हाग्या मार पायजेल काय?

तो नुसताच कोरडा दम. त्यानी कधीच कोणाला मारल नाय. उलट पोराना लाडाने फुटबॉल द्यायचे आणि मग काय १७-१७ प्लेयर्सच्या दोन टीमा आख्ख्या ग्राउंडभर उंडारायच्या...

आमचे इम्ग्लिशचे सर नेहमी शिकवताना वाक्यात नवरा बायकोची नावे आली की 'गेले फडात..!' म्हणायचे..

शंकर अँड गौरी.... गेले फडात.. !

(उसाच्या फडात कशाला जायचे असे विचारु नये.. जुने मराठी शिणेमे बघावेत, आपोआप समजेल.. Happy )

>>शिकरण म्हणजे आमरस
हे असे कुठे आहे? Uhoh
कोल्हापुरात शिकरण म्हणजे केळी,दुध्,साखर [हवे तर तूप आणि मध घालून पंचामृत करा :)]

>>१७-१७ प्लेयर्सच्या टीमा >>>>> हे फकस्त कोल्हापुरातच हुणार
उरलेल्याना बाहेर ठेवले तर खेळू देतील का ते.. म्हणून असतील्,नसतील त्या सगळ्याना घेऊन मॅच लावायची

>>शिकरण म्हणजे आमरस
हे असे कुठे आहे? >>
मि पण पहिल्यान्दाच ऐकलय... कागल आणि कोल्हापुरात...

दळप = दळण
पिठी = मैदा
खर्डा = मिरचीचा ठेचा

खास शेतकरी लोक वापरणारे शब्द

गेल्या वर्शी - गुदस्ता
घाणेरडा - घन्ताडं
आगाऊ - बेणं
श्रीमुखात भड्कावीन - कानसूल फोडीन
पायतानानं केसं काडीन हा एक खास शब्द

नमस्कार समस्त करवीरकर !!! (हे 'नाम' अजून कुणी कसे वापरले नाही, आपल्या बंधु/भगिनीसाठी?)
दोन दिवसापूर्वी मायबोलीकर झालो. नवा असल्याने विविध विषयांची चाचपणी करीत असताना हे "दुधाळी मैदान" सापडले आणि किती आनंद झाला असेल याची कल्पना "तुमास्नी" आलीच असेल.

माझ्याकडून साटप्यात काही भर =

१. "...च्यायला, हे आलं, सईत सू करायला."
२. "त्याला काय बी करू नका, त्यो आमचा हुक्मी यक्का हाया !"
३. "बत्तीशी काय काडतोस? लई गुटरगू करू नकोस, बत्तीसातलं बाराच ठेवीन."
४. "काईट, लई भंगार ! जातय बग आठवड्यात बोंबलत"
५. "गजनी बघीतला, आमर्‍यानं तोडलया नुस्तं"

नंतर येतो.
प्रतीक

भेंडाळणे = दमणे / थकणे
लावून देणे = (कुठे) जायला परवानगी देणे
वानीतिनीचा/ची = नवस-सायासाने अथवा दीर्घ प्रतिक्षेनंतर प्राप्त झालेला/ली

हितं `पायखाना' कुटं दिसंना झालाय की वो....

>> लै भारी, पण पैखाना हा शब्द हैद्राबाद साईड ला जस्त वापरतात ना? (सौजन्यः अंग्रेज चित्रपट)

>>`पायखाना' कुटं दिसंना
अरे आधी होता, ते पान वहाते होते सुरु केले तेव्हा, सो वाहून गेला असेल पायखाना Proud

बर झाल अ‍ॅड केलास ते...

मी हा शब्द खूप लहानपणी ऐकला होता.. पण सध्या कोणी म्हणत नाही वाटत

पायखाना म्हणजे काय? >> हैद्राबाद साईडला, संडासाला पायखाना (पैखाना) म्हणतात.

इथे पण तोच अर्थ आहे [अ‍ॅटलिस्ट मला तरी त्या अर्थाने माहीत आहे].. जुने लोक वापरायचे हा शब्द या अर्थाने

अग्गायायाया....... नाद खुळा..... असाच टाईम पास करत हुतो आनी हे गावल.......... लडतर ह्यो शब्द टाईप केलता गुगल मदी आनी हिकड आलो... आन बगतोय तर येकापेक्षा यक भारी कोल्हापूरी शब्द..... आपन तर फिदा हेच्यावर..... लाग्लीच हीत जॉईन झालो.... माज्याकादन हे काही अस्सल शब्द.....

नाद करू नको नाईतर इस्कटून टाकीन.....
कुणाच्या जीवावर उडायलयस.......
आंधळी गुट्टा ( क्रिकेट मध्ये आडवा तिडवा मारलेला शॉट )
ह्म्म्म...ह्यो बगा शाहू महाराज....(स्वतःला शहाणा समजणारा)
बाकीचे शब्द तर इथे आहेतच....

कोल्हापुरात मंडळांची नावे पण खूप विनोदी आहेत...
काही उदाहरणे...

गणित ग्रुप. (टेंबलाई वाडी )
ऑक्टोबर- मार्च ग्रुप (रविवार पेठ)
रक्षक ग्रुप (बहुतेक लक्ष्मीपुरी)
भगव वादळ (फुलेवाडी)
जादू ग्रुप (टेंबे रोड)
संडास चौक ( खंडोबा तालीम, शिवाजी पेठ).... आणि ह्यांचा झेंडा पण आहे, जो खंडोबा तालमीच्या गणपती मिरवणुकीत असतो)
झाड ग्रुप

आणि असे बरेच आहेत.............

ब्लड ग्रुप
आबा-घुमीव ग्रुप

>>१. "...च्यायला, हे आलं, सईत सू करायला."
Rofl

बादवे, अमोघ, एका वर्षानंतर या धाग्याला वर काढल्याबद्दल धन्यवाद... मी पण विसरून गेलो होतो Happy

हे घ्या टोटल गोळा केलयं

कोल्हापुरी पेशल शब्दकोष

नाद्या बाद - जो याचा नाद करेल तो बाद
मस्त रे १ नम्बर
बुक्का पाडला
खुळ्या टाळ्क्याचं : अत्यंत वेडपट
कुटं : कुठे
बाद झालं
वरकी : हा एक टोस्टचा प्रकार आहे बहुधा
गुच्ची : बुक्की
बोंबाललं : बोंबललं
वस्साड तोंडाच्या
लय टिवटिव करु नकस - जास्त बोलु नको
सपल सगळं! : संपलं सगळं!
थुक्की : थुंकी
गावलं : सापडलं
ह्म्म्म...ह्यो बगा शाहू महाराज : स्वतःला शहाणा समजणारा
कावला : रागावला
मनाचे श्लोक शिकीवणे : उगीच भाव मारणे
हेन तेन : इत्यादि
जाग्याव पलटी
गंडलईस
चरचरीत
मायंदाळ : भरपूर
तरतरित
काय मर्दा
सपलच की !!
घसघषित
अरं बाटग्या...
वांडर
लै शानं झालंईस
बोलून घान केलीस बग !
काय राव
जिकल्यात जमा
जोतिबा पन्हाळा : टरका
जिकलंस भावा
आरं मर्दा
तूच रे!
त्वांड मीट...
तानुन दे
काय काय आनि?
लय झालं आता
हान तिच्यायला
डोक्यावर पडलायास का ???
वरिप उडीप
लेकाच्या!
सायबांची क्रुपा..
वांड
खम्प्लेट
लडतर
च्या भात खाऊन ये जा..
यिउनफिरुन गंगावेशः परत तिथचं येने
कोन कटवलईस काय नाई?
आनि काय निवान्त?
आनि काय मन्तईस (म्हणतो आहेस ?)
खुळ्या टाळ्क्याचं : अत्यंत वेडपट
चांगलं वागा जरा, नविन कपडे शिवुया..
म्हनुन कुठं नेत नाही..
घरी बसनार पोत्यावर...आनी..
जास्त नाटकं नको..
झ्यांगः बावळ्ट
हा तर..
काय वाट्टलं ते...
खटक्यावर बोट..जाग्यावर पलटी !! (याचा मला अर्थ माहीत नाही..जाणकारांनी अर्थबोध करुन द्यावा )
परसाकडला जाणे : शौचाला जाणे
लई बेस / लई झ्याक: खुप छान
वडाप : पुण्यातील टमटम / डुगडुगी
किरयानिस्टिक : वेडपट ( याचा उगम कसा झाला..काही माहीत नाही..जाणकारांनी अर्थबोध करुन द्यावा )
झिंगलयस काय? : थकलास काय?
पेटलायस काय : चिडलास काय?
तटतय : अडलय
लाईन : गर्लफ्रेंड
लाईनी : गर्लफ्रेंड्स
(यावरुनच लाईन टाकणे, लाईन मारणे, लाईन देने अशा अनेक वाक्यप्रचारांचा उगम झाला आहे )
वंगाळ : खराब
दाल्ला : नवरा
न्हानगा : छोटा
पायतान : चप्पल
येडच्याप : वेडा
आरं जा
बाकी
कानाखाली आर्केश्ट्रा वाजवीन
कानाखाली जाळ काढीन
ते पार भंजाळलंय
बघतंयस काय.. डोळं काढून गोट्या खेळीन
कुनाला तंबी करायलंयस?
डोक्यावं पडलंयस काय?
काय गुडघ्यावं पडलंयस काय?
तर्राट पळा
काय वडिन्ग्यासनं आलईस काय ?
खिरीत खराटा
तुमच्याकडं
जेवलासा?
उश्शेर..
काय आनि विशेष?
निवांत बगा..
हुन्द्या मग शिस्तीत्...चलतो
बरर बरर
अजुन काही...
कोळसा ओढणे
झ्जोल करुन टाक
जाग्यावर पलटी
आबा घुमिव (गाडी जोरात हाणा असे म्हणाय्चे असेल तर)
इस्काटलईस काय
येडच्याप
दगुड
मर्दान्या...
ओ रिस्पॉन्स हाय काय?
टक्कुर फिरलय व्हर र तुज?
अजुन काही...
अजुन एक
पाखरु
नाद्खुळा
लई भारी
शिपारस
शंकरशाळा
किर्‍यानिष्ट
सायको
सर्कीट
बुक्का पाडणे
विशय कट
रिक्शा फिरवु नकोसः गावभर दंगा करु नकोस
आम्बं लई पाडालाईस
शुन्य मिनटांत आवर
पुंगी टाईट होणे
दाडवान तोडीन
मंडळात जमा
काटाकिर्र्र्र्र्र्र
चक्कित जाळ
कायकीः माहीत नाही
काय काय ओः कसे आहात?
जरा कळं काढ कीः जरा थांबा
खिजला
आबा कावत्यात
कान गच्च करनेः कानाखाली वाजवने
गंडीव्/फशिव
अरे काय?
काक्काय आलंय बघा
घेता का इस्काटु
खाऊंदे गरीब
ए गंजक्या
कसलं हाईस रेरेरे...
येतयस काय, गेलेलस काय
काय सभा लावलियास?
तुमचा बा काय सर्कशीत हुता काय?"
कुनाच्यात उठाय बसाय अस्तोय माहित हाय न्हव."
माझ्या नादाला लागु नकोस नाहीतर दाढ्वान काढुन हातात देइन.
त्येला आता असा तंगीवतो बघ.
काय लइ शायनिंग माराय लागलइस.
पायतानानं मारीन
मुंबैला जावुन आल्यावर लइ शानं म्हनत नाहीत.
लइ शाना हाइस झोप जा.
एका गुच्चीत गार करीन बघ.
कोंबड्या पकड तु
कातीला आलयसं काय रं...
पाय काढून खुट्टीला आड्कीन.....
कुनाला तंबी करायलंयस?
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....
सुइइइइइइइइइइइ सटाक
अगायायायायायाया
करर गोळा...
"भावा" : दोस्ता, मित्रा, सख्या, भाउ, दादा

आणि हे पण वाचा आणि आपली प्रतिक्रिया पण द्या
माझं कोल्हापूर

मला जोडा: http://www.proknowliz.info/

चला जाउ कोल्हापुरी पंचगंगा नदीतीरी,
अरं कोल्हापुर राजधानी मावळ्याची

अरं कोल्हापुरी फेटा बांध, पायामध्ये पायताण,
पैलवानी छाती काढुन चाल पुढती
दाजी रं दाजी रं जी जी ...... जी

कोल्हापुरचा पैलवान, हत्तीवानी चाले छान
कुस्ती मध्ये डंका वाजे चहुमुलकी....

दुधकट्टा गंगावेशी, कळ्याभोर उभ्या म्हशी
भैय्या नव्हं, भैय्या नव्हं.. हैय्या म्हणुन दुध पाजती
दाजी रं दाजी रं जी जी ...... जी

kramash:

Proud

"च्यामारी त्याच्या.........पायतान तुटस्तोवर हाणला पायजे....... "

अरेच्या ती लावणी मिळाली मला पुर्ण... आता ती स्कॅन करुन टाकतो. लै भारीय... आवडेल सगळ्यांनाच. आणि हो अमान मोमिन त्याण्ची सॉफ्ट कॉपी पण मिळाली. मस्तय थोडी ॑ क्वॉलिटी खराब आहे कान देउन एकावं लागलं. पण वर्थ इट. Happy

राम राम कोल्हापुरकर... "आत्ताच वविच्या नोंदणीत महत्वाची नोंदणी झालेय.. दस्तुर खुद्द अजय गल्लेवाल अर्थात आपण सगळे रोज सक्काळ संध्याकाळ रात्री-बेरात्री कल्ला करत हिंडतो त्या मायबोलीचे सर्वेसर्वा यंदाच्या वविला जाति नी हजर असणार आहेत हो!!!!!!तेव्हा आपलीही नाव लवकर नोंदवा

Pages