पावसाळा स्पेशल

Submitted by deepac73 on 9 July, 2012 - 09:35

पावसाळा चालू झाला आहे, रोजच्या जेवणात बनवता येतील अशा 'पावसाळा स्पेशल' रेसिपी साण्गा ना

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपा, कोनो गाव तुम्हरा? आमच्याकडे पुण्याला तर पाऊसच नाही. Sad

तिथे पावसाळा असेल तर गरमा गरम सुप्स पी. (व्हिट) नुडल्स/पास्ता आणि सुप हा एक फंडु मेन्यु असतो बाहेर रपारप पाऊस पडताना. खरं तर कोणतेही गरमागरम आणि स्पायसी पदार्थ खायला पावसाळ्यात मजा येते.
नो नो टु सलाडस/कच्चा भाज्या. इतर वेळेला मी बिग टाइम फॅन आहे, पण पावसाळ्यात नकोच वाटतात.

मनिमाऊ>> अनुमोदन
मी मुंबैकर आहे. काल गरम कढी भात केला. लेकीला पण खूप आवडतो
आता सूप्स्....जरा छान रेसिपी येउ देत

रोस्ट व्हेजिटेबल्स विथ होलॅंडेज सॉस
गार्लिक ब्रेड आणि सूप्स
सूपी मॅगी नुड्ल्स
गरम गरम मऊ भात तूप मेतकुट Happy

गरम वरण भात, वर तुपाची धार, गोड लिंबाच्या लोणच्याची फोड, पापड
भरपेट खाऊन पांघरूणात गुडुप झोप, झोपताना डोक्याला विक्स लावायला विसरू नये.

कमलाबाई ओगलेंच्या पद्धतीची मुगाच्या डाळिची व तांदूळाची खिचडी बरोबर लसणाची चटणी. कोशिंबिर नको.

गरम गरम पोळी तूप लावून बटाट्याच्या काचर्‍या.

गरमागरम भात आणी बेसनाचे गोळे घालुन आमटी

वाडगाभर वाफाळती मॅगी
भज्यांपेक्षा ब्रेड पकोडा किंवा पावाची भजी .

गरमा गरम मट्ण वडे ....रविवारी भरपेट खाल्लेत्....बाहेर मस्त पाऊस होता....:-)
वाफाळते hot and sour soup आणि chicken lollipop
आले घालून चहा आणि सामोसे गुरुक्रुपा चे असतील तर बेस्ट्च ...yummy.....

पिठल भात-भाकरी
भजी

घरी केलेले गरमा गरम बटाटे वडे.

सुप्स त्यातुन पाया सुप अगदी स्पेशल.

तळलेले गरमागरम कुरकुरीत बोंबील नुसते खाणे आहाहा Lol

थोडं चरलं पाहिजेच पाऊस पडताना, >> थोडं ???? पावसात घरी असाल तर चरण मस्ट. मग सोबतिला पुस्तक किन्वा जुनी गाणी

हे माझे पावसाळ्यातले आवडते पदार्थ...
----पावसातून भिजून आल्यावर कुर्कुरीत खेकडा भजी आणि आलं घातलेला फक्कड चहा...
----गरमागरम खिचडी.. त्यावर तूपाची धार, सोबतीला लोणचं
----मऊ शिजवलेला भात + मेतकूट, तूप / गरम डाळ वांगं / गरम तूरीची आमटी
----खरपूस भाजलेली भाकरी + तव्यातून ताटात आलेलं भरीत / पिठलं, कांदा
---- मस्त गरमागरम सूप्स!!!

साक्षी, अगं पावसातुन भिजुन आल्यावर........ आणि त्याच्यापुढे भली मोठी लिस्ट दिली आहेस.हे सगळं एकापाठोपाठ कि काय? पावसाळ्यात थोडं कमीच खावं. Wink Happy

पावसाळ्यात थोडं कमीच खावं>>> मनिमाऊ, हे सगळं एका दिवशी नाही... रोज एक असं.... Happy

साक्षी कुफेहेपा? आता यातला एक तरी पदार्थ खाणं मस्ट झालंय >>>> दक्षिणा... Proud आता घरी जाऊन यातलं काहितरी बनवून खाल्ल्याशिवाय पापक्षालन होणार नाही.... Happy

नताशा दिनेश यांच्या पाऊलखुणा धुंडाळ.. लग्गेच कळेल.
बाय द वे, जे काही गरमा गरम असेल ते सर्व पावसाळ्यात चांगलं.. काय म्हणता? Happy

Pages