‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’

Submitted by गौतमिपुत्रशालिवाहन on 17 June, 2012 - 06:31

हा विषयाचा मायबोलीवर अनेकदा गांधीवादी आणि सावरकरवादी आयडीनी कीस काढलेला आहे.
तरी सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ विचार व्हावा.
प्रा. शेषराव मोरे यांनी संशोधन करून ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केला आहे.

"""एका टप्प्यानंतर ‘अखंड भारता’चा आग्रह धरल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे रक्षण करणे आणि एक राष्ट्र म्हणून कारभार चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव गांधीजींसह कॉंग्रेसला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच भारताची फाळणी कॉंग्रेसने पूर्ण विचारांती स्वीकारली.""" http://bit.ly/MV5vGN

या ग्रंथातील मते जर खरी सप्रमाण असतील तर सावरकर x गांधी हा वाद कायमचा मिटेल हि अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

इतिहास, राजकारण, जाती, धर्म व संस्कृती यावरील वादासाठीचे पान'
वाद कसला डोंबलाचा - नुसती 'असंबद्ध, खोटी विधाने लिहिण्यासाठी, जी मते आपल्याला आवडत नाहीत ती मते लिहिणार्‍यांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यासाठी' असे म्हणा.

कदाचित शरीरातली घाण सार्वजनिक ठिकाणी टाकण्याची पद्धत फारशी प्रचलित नसल्याने एका विशिष्ठ ठिकाणी जाउन लोक करतात, तशी द्वेष, हिंसक विचार, राग, अहंकार इ मूलक मनातली घाण टाकण्यासाठी लोक आजकाल मायबोलीवर अश्या धाग्यांवर येतात.

कदाचित इथले लोक प्रत्यक्षात सुसंस्कृत, सुशिक्षित, नि सभ्य असतील, पण वरचेवर मनातली, शरीरतली घाण उत्सर्जित करणे अत्यावश्यक आहे. काही लोकांमधे खूप घाणच असते, ते नेहेमीच इथे येणार यात काय संशय!

तेंव्हा मायबोलीवरील अश्या धाग्यांचा उपयोग या कामासाठी करावा, नि घाण करायची असेल तेंव्हाच इथे यावे, हे योग्य.

चांगल्या चांगल्या बातम्या, साहित्य, इ. साठी इतर अनेक धागे आहेतच.

आता काही देशात मात्र सरळ चड्डी सोडून, लोटा घेऊन, भर रस्त्यावर बसण्याची पद्धतच आहे, तसे त्याहि ठिकाणी काही लोक येतातच, पण सहसा अपवाद.

हे आहे हे असे आहे हो. समजून घ्या - कुणि लिहीले याला महत्व न देता, लिहीलेले खरे आहे की खोटे आहे, ते वाचून काही उपयोग आहे का याचा विचार करावा नि मग काही बोलू नये!!

हटकेश्वर, हटकेश्वर!!

<सावरकरांनी अनेक वेळा माफी मागितली व अटी मान्य करून ते सुटले हे संपूर्ण खोटे आहे. तसे असते तर ते १९११ मध्येच सुटले असते. १९२३ मध्ये ते क्षयाने गंभीर आजारी पडल्यावर त्यांना १९२४ मध्ये तुरूंगातून सोडून रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची अंदमानातील तुरूंगात १४ वर्षे शिक्षा पूर्ण झाली होती>

पुढील महिती http://www.savarkar.org/ येथूनच घेतलेली आहे.
"१९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.
१९२१ मे.२ बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.
१९२४ जाने.६ राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातुन सुटका.
अंदमानात सावरकरांची प्रकृती ढासळल्याने सरकारने त्यांना भारतात परत पाठवले हे खरे आहे का ?
ब्रिटिश शासन सावरकर बंधुंच्या प्रकृतीबाबत पूर्णपणे बेफिकीर होते आणि त्यांना व अन्य राजबंद्यांना प्राथमिक वैद्यकीय उपचारही पुरवण्यात येत नव्हते. बाबाराव सावरकरांना तेथे विशेष छळ सोसावा लागला. पण ब्रिटिशांनी सावरकर बंधुंना भारतात परत पाठवले ते त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे नव्हे तर ब्रिटिशांना अंदमानचा तुरूंगच बंद करावयाचा होता म्हणून. ही खरी वस्तुस्थिती आहे. अंदमानातील दुरवस्थेबद्दल भारतात जनमत प्रक्षुब्ध होत चालले होते हे त्यामागील कारण आहे."

अंदमानात येऊन एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी इंग्रजांना पहिली विनंती केली होती. पुढेही अनेकदा केली. सुटका झाल्यावर पुन्हा संसार सुरू केला. एका वर्षातच एक अपत्य जन्माला आले. मग ती संसाराची राखरांगोळी इ. वर्णने कशाकरिता? ११ वर्षांतच अंदमानातून सुटका झालेली असताना सावरकरांच्या बिल्ल्यावर १९१०-१९६० असे आकडे आहेत अशी वर्णने कशाकरता? पुढे हाती शस्त्र घेणार नाही असे कबूल केल्यावर 'रणावीण स्वातंत्र्य'ची वर्णने कशासाठी?

सावरकरांनी माफी मागून सुटका करून घेतली यात त्यांचा धूर्तपणा इ. असेलही. पण मुळात गांधींना राजबंद्याचा दर्जा मिळून शारीरिक कष्ट/यातना सहन करावे लागले नाहीत आणि सावरकरांना ते सहन करावे लागले यामुळे गांधी लहान कसे काय बुवा ठरतात?
अनुयायांची संख्या हा निकष खोटा ठरविण्यासाठी दिलेली उदाहरणे बालबुद्धीची आणि हास्यास्पद आहेत. गांधींना शारीरिक दृष्ट्या संपविले त्याला आज ६४ वर्षे झालीत तरी त्यांचा विचार कधीही संपविता येणार नाही हे सत्य आहे.

झक्की काय हे ? अजून जुनी सवय गेली नाही का ? जाऊ द्या. परत एकदा एविएठी ला जाऊन या, मन शांत होईल. Proud

>>एका वर्षातच एक अपत्य जन्माला आले. मग ती संसाराची राखरांगोळी इ. वर्णने कशाकरिता?
संसार असल्यावरच संसाराची राखरांगोळी होते ना? आणि संसाराची म्हणजे कुटुंबिय, जी काही तुटपुंजी असेल ती मालमत्ता, हे सगळंच आलं.

>>पुढे हाती शस्त्र घेणार नाही असे कबूल केल्यावर 'रणावीण स्वातंत्र्य'ची वर्णने कशासाठी?
आणि शिवाय इंग्रजांना (म्हणजे शत्रूला) कबूल केलेला शब्द पाळायची काहीही गरज नव्हती. महाराजांकडून स्फूर्ती घेतलेल्या अनेकांनी हे अंमलात आणले. महाराज म्हणायचे शत्रूला मी दगा दिलेला अनेक ठिकाणी दिसेल पण मित्रांना दगा दिलेला दाखवा!! आणि इंग्रज तर बोलून चालून शत्रूच. मग प्रश्नच मिटला.

शिवाय, अगदीच वादासाठी वाद या धर्तीवर बोलायचे तर त्यांनी शस्त्रे हाती घेणार नाही सांगितले होते. इतरांना घेण्याची प्रेरणा तर देऊ शकतातच ना? Wink

>>शिवाय, अगदीच वादासाठी वाद या धर्तीवर बोलायचे तर त्यांनी शस्त्रे हाती घेणार नाही सांगितले होते. इतरांना घेण्याची प्रेरणा तर देऊ शकतातच ना? <<
मंजोजी,
तेच तर इथे दुखणे आहे. नको त्यांना नको त्या कारणासाठी शस्त्रे धरण्याच्या प्रेरणा दिल्या. शिष्योत्तम नथूराम यांनीही तेथूनच डायरेक्ट प्रेरणा घेतली होती काय? कृपया खुलासा करावा. माझा इतिहास थोडा कच्चा आहे.

इब्लिस | 26 June, 2012 - 18:44 नवीन
>>शिवाय, अगदीच वादासाठी वाद या धर्तीवर बोलायचे तर त्यांनी शस्त्रे हाती घेणार नाही सांगितले होते. इतरांना घेण्याची प्रेरणा तर देऊ शकतातच ना? <<
मंजोजी,
तेच तर इथे दुखणे आहे. नको त्यांना नको त्या कारणासाठी शस्त्रे धरण्याच्या प्रेरणा दिल्या. शिष्योत्तम नथूराम यांनीही तेथूनच डायरेक्ट प्रेरणा घेतली होती काय? कृपया खुलासा करावा
. माझा इतिहास थोडा कच्चा आहे.

AIblis.JPG

बरं झालं कबूल केलंत. खरं तर बराच कच्चा आहे. इतिहास कच्चा असलेल्यांशी मी यापुढे बोलणार नाही असे ठरवले आहे Proud

अरे!!! हा विषय अजून सुरु आहे? लोक चंद्रावर जाऊन तिथल्या जमिनीवर आपापले हक्क सांगू लागले.... आणि तुम्ही अजून सिंधु नदीच्या अलीकडेच उभे!!! Proud

गांधी आणि सावरकर दोन्हीचे पाठीराखे, उच्चरवात आपापल्या नेत्यांचे गुणगान करतात. आपलाच नेता कसा श्रेष्ठ आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण गांधी आणि सावरकर दोघेही आपापल्या जागेवर महानच आहेत. दोघांचे मार्ग वेगळे असतील पण ध्येय एकच होते याबाबत दुमत नसावे. सर्व निधर्मवादी गांधीजींना मानतात आणि धर्मांध हिंदू सावरकरांना असा सरळ साधा हिशोब आहे पाठीराख्यांचा. मस्त बुद्धिभेद आहे हा. हिंदूंच्या बाजूने बोलणारा हा धर्मांध आणि उर्वरित कितीही धर्मांध असले तरीही केवळ हिंदू नाहीत म्हणून निधर्मी, समानतावादी. इंग्रजांनी जो भेद केला तो अजूनही कायम आहेच. सावरकरांनी माफी मागितली असं ब्रिटीश म्हणतात म्हणून ते खरे मानायचे? नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये म्हणतात शिवाजी हे लुटारू होते, तेव्हा शेपूट घालून शांत बसायचे असले हे बेगडी राष्ट्रप्रेमी. नेहरू नेते म्हणून महान असतील पण म्हणून आमच्या दैवताला काहीही म्हणायचं अधिकार त्यांना नाही. मी असं म्हणेल त्यांना शिवाजी कळलेच नसावेत. तसेच ज्यांना गांधी मान्य आहेत त्यांनी सावरकरावर टीका करू नये. आणि हेच सावरकर अनुयायानाही लागू होते. कशाला उगाच सावरकर विरुद्ध गांधी असे चित्र उभे करायचे?

विषय आहे ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ त्याच अनुषंगाने चर्चा राहिली तर बरच होईल.

विषय आहे ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ त्याच अनुषंगाने चर्चा राहिली तर बरच होईल.>> तुमच्या पोस्टमधे नेहरू नि शिवाजी नसते तर शेवटच्या वाक्याला अर्थ उरतो हो. नाहितर गायीचा निबंध झाला कि Happy

या प्राण्यांच्या यादीत साळींदर, खारूताई, भुभु, मुंगुस, हम्मा, बैल, म्हैस, पिंगळा, टिटवी, तरस, चित्ता, बिबट्या, घोडा, गाढव, घार, गरुड ( लाजरा नाही ) ससाणा, खेचर अशी बरीच भर पडु शकते याची प्राणी आणी पक्षीमित्रांनी कृपया त्वरीत नोंद घ्यावी ही कळकळीची नम्र विनंती.

Biggrin

गरुड ( लाजरा नाही ) ???
म्हंजे काय? निर्लज्ज / लाजरा गरूड असा काही पक्षी प्रकार असतो का?

(बॉटनीत कच्चा असलेला) इब्लिस

>>> ब्रिटिश शासन सावरकर बंधुंच्या प्रकृतीबाबत पूर्णपणे बेफिकीर होते आणि त्यांना व अन्य राजबंद्यांना प्राथमिक वैद्यकीय उपचारही पुरवण्यात येत नव्हते.

एक्झॅटली! त्यांना भरपूर हालअपेष्टा, कष्ट होतील अशीच शिक्षा दिली होती. या शिक्षेची आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या राजवाड्यातील स्थानबद्धतेची तुलना कशी होणार?

>>> अंदमानातील दुरवस्थेबद्दल भारतात जनमत प्रक्षुब्ध होत चालले होते हे त्यामागील कारण आहे.

ब्रिटिशांनी भारताच्या जनमताची कधीच पर्वा केली नव्हती.

>>> सुटका झाल्यावर पुन्हा संसार सुरू केला. एका वर्षातच एक अपत्य जन्माला आले. मग ती संसाराची राखरांगोळी इ. वर्णने कशाकरिता?

अत्यंत हास्यास्पद दावा आहे. ऐन तारूण्यातील १४ वर्षे तुरूंगात काढल्यानंतर व कुटुंबातील तीनही बंधू तुरूंगात गेल्यानंतर संसाराची राखरांगोळी होते का संसार फुलतो?

>>> ११ वर्षांतच अंदमानातून सुटका झालेली असताना सावरकरांच्या बिल्ल्यावर १९१०-१९६० असे आकडे आहेत अशी वर्णने कशाकरता?

कारण त्यांना ५० वर्षांची शिक्षा झाली होती म्हणून. तुमचा विचित्र तर्क आहे. तुम्हाला वाटंतय की गांधीजी सर्व सुखसोयी उपलब्ध असलेल्या राजवाड्यात स्थानबद्ध होते तरी तसा उल्लेख करायचा नाही आणि सावरकरांना ५० वर्षांची शिक्षा झाली होती आणि त्यांनी ऐन तारूण्यात संसाराची राखरांगोळी करून अनेक वर्षे कठोर शिक्षा सहन केली, तरी तसाही उल्लेख करायचा नाही. अजबच आहे हे!

>>> पुढे हाती शस्त्र घेणार नाही असे कबूल केल्यावर 'रणावीण स्वातंत्र्य'ची वर्णने कशासाठी?

कारण चरखा चालवून आणि (स्वतःच्या) रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वातंत्र्य मिळत नसते आणि रणावीण स्वातंत्र्य कोणालाच मिळत नसते म्हणून.

>>> अनुयायांची संख्या हा निकष खोटा ठरविण्यासाठी दिलेली उदाहरणे बालबुद्धीची आणि हास्यास्पद आहेत.

ज्याला अनुयायी जास्त तो अत्यंत महान माणूस हा निष्कर्ष अत्यंत बालबुद्धीचा आणि हास्यास्पद आहे.

>>> गांधींना शारीरिक दृष्ट्या संपविले त्याला आज ६४ वर्षे झालीत तरी त्यांचा विचार कधीही संपविता येणार नाही हे सत्य आहे.

हे अत्यंत हास्यास्पद वाक्य आहे. अशी वाक्ये सरकारी जाहिरातीत आणि टीव्हीवरील पूर्वीच्या "ज्ञानदीप" नावाच्या एका अत्यंत बाळबोध व रटाळ कार्यक्रमातच शोभतात. गांधीजींचे अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, कोणी तुमच्या एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा इ. विचार त्यांच्या हयातीतच नष्ट झाले होते.

Pages