‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’

Submitted by गौतमिपुत्रशालिवाहन on 17 June, 2012 - 06:31

हा विषयाचा मायबोलीवर अनेकदा गांधीवादी आणि सावरकरवादी आयडीनी कीस काढलेला आहे.
तरी सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ विचार व्हावा.
प्रा. शेषराव मोरे यांनी संशोधन करून ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केला आहे.

"""एका टप्प्यानंतर ‘अखंड भारता’चा आग्रह धरल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे रक्षण करणे आणि एक राष्ट्र म्हणून कारभार चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव गांधीजींसह कॉंग्रेसला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच भारताची फाळणी कॉंग्रेसने पूर्ण विचारांती स्वीकारली.""" http://bit.ly/MV5vGN

या ग्रंथातील मते जर खरी सप्रमाण असतील तर सावरकर x गांधी हा वाद कायमचा मिटेल हि अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

लोकसत्तातील लेखावरून मनात उद्भवलेले हे प्रश्न. मूळ ग्रंथ अद्याप वाचायचा आहे.

*भारताच्या फाळणीसाठी कॉंग्रेसला व गांधीजींना ‘जबाबदार’ धरायचे की त्यांना फाळणीचे ‘श्रेय’ द्यायचे? ‘गांधीजींमुळेच आम्ही फाळणी स्वीकारली,’ असे नेहरू म्हणाले ते काही खोटे नव्हते. *

डी आर मंकेकरांचे पुस्तकामुळे आतापर्यंत नेहरू-पटेल्-जीना फाळणीला जबाबदार असा समज होता.

* सर सय्यद अहमद यांच्या काळापासून (१८८७) सत्तेत हिंदूंच्या बरोबरीचा वाटा (parity) देण्याची त्यांची मागणी होती. सर सय्यदांपासून जिनांपर्यंत सर्वानीच ही ५०-५० टक्के वाटपाची मागणी केली होती. त्यासाठी तात्त्विक आधार म्हणून ‘मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत,’ हा (द्विराष्ट्रवादाचा) सिद्धांत त्यांनी मांडला होता.*

म्हणजे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणाचा हे आता तरी पटणार का?

*काँग्रेससमोरचा वा देशासमोरचा खरा प्रश्न स्वातंत्र्यप्राप्ती हा नव्हता, तर तत्पूर्वी हिंदू-मुस्लीम समस्या वा सत्तावाटपाचा प्रश्न सोडविणे, हा होता. ‘आधी हिंदू-मुस्लीम ऐक्य, मग स्वराज्य’ असे गांधीजी म्हणत, याचा अर्थ हाच होता.
१९२१ पासून ते पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव काँग्रेसमध्ये संमत होऊ देत नव्हते. १९२९ चा पूर्ण स्वातंत्र्याचा ठरावही त्यांच्या विरोधात करण्यात आला होता. त्यानंतर १९३० मध्ये झालेल्या आंदोलनातील मागण्यांना त्यांनी स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पर्शही होऊ दिला नव्हता व काँग्रेसच्या ठरावातील हवाच काढून घेतली होती. १९४२ ला त्यांनी तोपर्यंतची घोषणा उलटी करून ‘आधी स्वराज्य, मग हिंदू-मुस्लीम ऐक्य’ अशी केली. त्यांनी असे का केले? आमच्या अभ्यासाचा निष्कर्ष हा की, फाळणीचा तोडगा निश्चित करूनच त्यांनी ‘छोडो भारत’ची घोषणा केली होती.*

‘छोडो भारत’ची वाटचाल 'तोडो भारत' होणार कि काय अशी शंका सावरकरांना त्याचवेळी आली होती.

*१९४० पासूनच गांधीजी सातत्याने सांगत होते की, आठ कोटी मुसलमानांना फाळणी पाहिजेच असेल तर जगातील कोणतीही शक्ती ती रोखू शकणार नाही. मुसलमानांची इच्छा असेल तर फाळणी करण्यास ते नेहमीच तयार होते. त्यांचे म्हणणे एवढेच होते की, फाळणी जिनांना पाहिजे असली तरी मुसलमानांना नको आहे. ती त्यांच्या हिताविरुद्ध व इस्लामविरोधी आहे. आपण आधी स्वातंत्र्य मिळवू, मग फाळणी करू, असेही ते त्यांना सांगत असत. १९४३ ची फाळणीची ‘राजाजी योजना’ त्यांच्या संमतीनेच तयार केलेली होती. सप्टेंबर १९४४ मध्ये १७ दिवस मुंबईत जिनांच्या घरी जाऊन त्यांनी ‘राजाजी योजने’च्या धर्तीवरच फाळणी स्वीकारण्याची जिनांना विनंती केली होती. *

म्हणजे १९४३ पासूनच फाळणीची तयारी झाली होती तर! मग ती अत्त्याचार , रक्तपात आणि वित्तहानी न होता कशी होईल याची काऴजी कुणी घ्यायची होती?

*‘माझ्या प्रेतावरूनच देशाची फाळणी होईल,’ असे गांधीजी अनेकदा म्हणाले होते. अखंड भारताचे भावनिक, आध्यात्मिक व नतिक समर्थन; तर वस्तुत: व व्यवहारत: फाळणीच्या दिशेने वाटचाल- अशी त्यांची राजनीती होती.*

ज्या भागातील लोकांवर फाळणीची कुर्‍हाड कोसळणार होती, त्यांचा समज कांहीही झाले तरी गांधिजी फाळणी स्वीकारणार नाहीत असाच झाला असेलना? गांधिजी बोलतात तसे करतात अशीच त्याकाळि त्यांची प्रतिमा होती ना? त्यांची आतील राजनीति सामान्यांना कळली असेल?

*शेवटी राजकारणात जिनांपेक्षा गांधीजी वरचढ ठरले. *?

*पाहिजे तर भाऊ म्हणून तुमचा मुस्लीम बहुसंख्याक भाग तुम्हाला तोडून देतो, पण द्विराष्ट्रवाद मान्य करून अखंड भारतातील ‘माझ्या हिंदूं’ना तुमच्या दयेवर सोडणार नाही, असेच जणू ते जिनांना सांगत होते. *

असे दयेवर सोडणे हे घातक आहे असे त्यांना कळले होते तर पाकमध्ये गेलेल्या भागातील हिंदूंचा त्यांनी काही विचार केलेला होता का?

डॉ. अभिराम दीक्षित,

विकीपिडीयातील माहिती ही फारशी विश्वासार्ह नसते. तिथल्या माहितीला अनेकदा कोणताही आधार नसतो.

तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये सुरवातीलाच हे वाक्य आहे.

This article needs additional citations for verification. Please help improve this article by adding citations to reliable sources. Unsourced material may be challenged and removed. (December 2011)

या वाक्यावरूनच या माहितीची विश्वासार्हता लक्षात येते.

डॉ. अभिराम दीक्षित,
विकीपिडीयातील माहिती ही फारशी विश्वासार्ह नसते. तिथल्या माहितीला अनेकदा कोणताही आधार नसतो.>>>>दिक्षित त्यापेक्षा तुम्ही मास्तुरेपिडीया या वेबसाईटला जा पाहीजे तशी पाहीजे तेवढी माहीती तोडफोड करुन पाहीजे त्या रंगात रंगवुन मिळते.... Proud Proud -:}}

Happy

फाळणी होऊन आता ६० वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे, तरीही त्याच कवित्व संपत नाही. त्यावेळेस जे काही निर्णय घेतले असतील, त्याची कारण मीमांसा करणं पूर्णपणे शक्य नाहीये कारण, सगळ्याच गोष्टी पुस्तकरूपाने अस्तित्वात नाही. त्यामुळे फाळणी का झाली ह्याचे खरे कारण कळणे अवघड आहे, हि एक राजकीय तडजोड होती कि एक अपरिहार्यता, किवा नेहरुंना सत्ता हवी होती किवा अजून काही, नक्की सांगणे अवघड आहे. काँग्रेसने मागच्या ६० वर्षात इतिहास मनाप्रमाणे लिहिला आहे, भारत जो काही आहे ते नेहरू आणि गांधीमुळेच. भगतसिंघ, टिळक, आझाद, सावरकर आणि इतर यांचे योगदान नावापुरते दाखवले आहे.

"एका टप्प्यानंतर ‘अखंड भारता’चा आग्रह धरल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे रक्षण करणे आणि एक राष्ट्र म्हणून कारभार चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव गांधीजींसह कॉंग्रेसला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच भारताची फाळणी कॉंग्रेसने पूर्ण विचारांती स्वीकारली." >>>>>

वरील मत सद्यस्थिती पाहता अजिबात पटत नाही. उलट या देशात हिंदू असणे हेच एक मोठे पाप आहे. कुठल्याही एका जाती धर्माला आक्षेप नाही परंतु, जे काही तुष्टीकरण चालले आहे त्यावरून भविष्यात काय होणार आहे याची कल्पना येते. काश्मीरचा फुटीरतावादाचा प्रश्न, माओवादी, उत्तरपूर्व राज्यांचा प्रश्न, गुरखाल्यंड इ भावी होऊ घातलेल्या फाळण्या असे अनेक प्रश्न कॉंग्रेसने निर्माण केले आहेत. इंग्रजांनी तोडा, फोडा, राज्य करा हि निती अवलंबिली होती, कॉंग्रेस तो वारसा समर्थपणे चालवत आहे. बुद्धिभेद करून राज्य कसे मिळवावे हि कला कॉंग्रेसला उमगली आहे.

थोड्याश्या विषयांतराबद्दल क्षमस्व.

इंग्रजांनी तोडा, फोडा, राज्य करा हि निती अवलंबिली होती, कॉंग्रेस तो वारसा समर्थपणे चालवत आहे. बुद्धिभेद करून राज्य कसे मिळवावे हि कला कॉंग्रेसला उमगली आहे.
----- काँग्रेसला पर्याय आहे कुठे ? १९४७ मधे पण पर्याय नव्हता आणि आजही नाही आहे. भाजपाची परिस्थिती पहाता काँग्रेसला राज्य मिळवणे वा असलेले टिकवणे यासाठी काहीच करावे लागत नाही. जनता काँग्रेसला विटलेली आहे पण भाजपाने काही किमान विश्वास संपादन केलेला नाही आहे.

उदय, अगदी योग्य निरिक्षण आहे. भारतात जो दुसरा पर्याय आहे तो अजुन बाल्यावस्थेत आहे मुख्यतः शहरी बाबु अश्या पक्षात आहे. ज्यांना शेतकीमधले काही कळत नाही. त्यामुळ कृषीप्रधान देशात त्यांना स्थान नाही .तरिही दरवर्षी निर्लज्जपणे असले लोक निवडणुकिला उभे असतात.

>>भारतात जो दुसरा पर्याय आहे तो अजुन बाल्यावस्थेत आहे मुख्यतः शहरी बाबु अश्या पक्षात आहे. ज्यांना शेतकीमधले काही कळत नाही. त्यामुळ कृषीप्रधान देशात त्यांना स्थान नाही .तरिही दरवर्षी निर्लज्जपणे असले लोक निवडणुकिला उभे असतात.

निषेध ! Angry
कायद्यामधे / घटनेमधे असा कोणताही नियम नाहीये, ज्यांचा शेती / गावे यांच्याशी संबंध नाही अशा शहरी लोकांनी निवडणूक लढवू नये असे म्हणत असाल तर अनेकानेक लोकांना (ज्यांना तुम्ही देखील कधी पाठिंबा दिला असेल) राजकारण संन्यास घ्यावा लागेल.
तुमचे म्हणणे गावे आणि शेतकी पुरते बोलायचे तर बरोबर आहे, पण शहरी विभागांमधे शहरी बाबूच उभे राहिले पाहिजेत. गावाकडच्या लोकांनी शहरात निवडणूकीला उभे राहूच नये असे नाही, किंवा व्हा.व्ह.
पण ज्या त्या विभागाचे प्रतिनिधित्व त्या त्या भागातल्या लोकांनी करणेच जास्त योग्य आहे.

कॉंग्रेसने अखंड भारत नाकारून ६०-६२ वर्षे उलटून गेली.. आणखी किती वर्ष त्याला "चालू घडामोड" म्हणून कीस पाडत बसणार ??

कॉंग्रेसने अखंड भारत नाकारून ६०-६२ वर्षे उलटून गेली.. आणखी किती वर्ष त्याला "चालू घडामोड" म्हणून कीस पाडत बसणार ?? >>>>>>

अनुमोदन.. गतकाळातील घडामोडी किंवा अखंड देशाचे स्वप्नरंजन असा धागा काढा त्याच्यासाठी आता Happy

gandhiji.gif

salute gandhiji

पराग, >>> Lol

ते आपण "चालू" म्हणजे "सध्याच्या" अशा अर्थाने बघतो की चालू म्हणजे "लबाड्/कारस्थानी" अर्थाने त्यावर ठरेल Happy

फारेण्डजी,
'वेबमास्टर' यांनी इथे 'चालू घडामोडी' असे सदर केले आहे. त्यांना अभिप्रेत असलेला 'चालू' कोन्ता त्ये जरा इच्चारुन बगा पाहू

गांधीजीनी इंग्रजांच्या तावडितुन एक गाव जरी मुक्त केले असते तरी ते वंदनीयच ठरले असते.. इतका मोठा देश त्यानी मिळवुन देउनही त्यांच्याबद्देल ज्याना आदर वाटत नाहि, ते सगळे लोक करंटे म्हतले पाहिजेत.

Kiran.. | 23 June, 2012 - 23:53 नवीन
स्वातंत्र्यानंतर हागणदारीमुक्त गाव योजना चालू झाली.
<<

हो किरण. पूर्वी हागणदरीयुक्त गावे असत. हागणदरी पाहिली आहेत का कधी? घरच्या स्त्रीयांना अन तुम्हालाही 'तसे' कधी 'जावे' लागू नये या उद्देशाने ती योजना राबविली जाते. उपयोगी योजना आहे याबद्दल अनुमोदन.

(मुक्त) इब्लिस.

गांधीजीनी इंग्रजांच्या तावडितुन एक गाव जरी मुक्त केले असते तरी ते वंदनीयच ठरले असते.. इतका मोठा देश त्यानी मिळवुन देउनही त्यांच्याबद्देल ज्याना आदर वाटत नाहि, ते सगळे लोक करंटे म्हतले पाहिजेत.
-------- जामोप्याजी गांधीजीं बद्दल बहुतेकांना आदरच आहे. फक्त काही लोकं त्यांनी आणि केवळ त्यांनीच देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले असे मानतात आणि संपुर्ण श्रेय त्यांनाच देतात, ते देताना अनेकांचा सहभाग आहे हे नाकारतात तर काही लोकं हजारो स्वातंत्र्यसेनानीं प्रमाणे गांधीजींचा देखील सहभाग आहे असे मानतात, आणि एक तिसरा गट आहे जो त्यांना किंवा त्यांच्या सहभागाला अजिबातच मानत नाही.

१९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. पण ते मिळतांना देशाचे दोन तुकडे, किमान दहा लाख लोकांची कत्तल, कोटी च्या वर लोकांचे स्थलांतर अशी जबरदस्त किंमत मोजली आहे. आज लाखो भारतीय 'देशासाठी' काही करायला तयार आहेत (ते त्या काळी पण होतेच) पण दुर्दैवाने नेतेपदाची जागा रिकामी आहे. अण्णा हजारेंमधे तसे ते थोडेफार दिसले होते... पण तो केवळ आभास होता. १९४७ पेक्षा आजची परिस्थिती जास्तच आव्हानात्मक आहे असे वाटते.

*पाहिजे तर भाऊ म्हणून तुमचा मुस्लीम बहुसंख्याक भाग तुम्हाला तोडून देतो, पण द्विराष्ट्रवाद मान्य करून अखंड भारतातील ‘माझ्या हिंदूं’ना तुमच्या दयेवर सोडणार नाही, असेच जणू ते जिनांना सांगत होते. *
------ "माझे हिंदू तुमच्या दयेवर" यावर तिव्र आक्षेप... गांधीजी 'माझे हिंदू' आणि तुझे मुस्लिम असे करतील हे काही पटत नाही... गांधीजींना छोटेपणा देण्यासाठी हा खोडसाळपणा वाटतो.

>>गांधीजीनी इंग्रजांच्या तावडितुन एक गाव जरी मुक्त केले असते तरी ते वंदनीयच ठरले असते.. इतका मोठा देश त्यानी मिळवुन देउनही त्यांच्याबद्देल ज्याना आदर वाटत नाहि, ते सगळे लोक करंटे म्हतले पाहिजेत.<<<

जामोप्या, good jokes
Rofl

Rofl

इतका मोठा देश त्यानी मिळवुन देउनही त्यांच्याबद्देल ज्याना आदरवाटत नाहि, ते सगळे लोक करंटे म्हतले पाहिजेत.<<<करंट्यांना फक्त 'त्यांच्यातला' व्यक्ती असेल तरच आदर वाटतो ,भलेही त्याचे कार्य कितीही फुटकळ असु देत, त्याची अशी पब्लिसिटी करतात कि आधुनिक मार्केटिंग पद्धतीही फिक्या पडाव्यात.

गांधीजी 'माझे हिंदू' आणि तुझे मुस्लिम असे करतील हे काही पटत नाही..

अगदी अनुमोदन... आफ्रिकेसारख्या परक्या देशातही अन्यायाविरिद्ध लढणारा मनुष्य माझे हिंदु आणि तुझे मुसलमान अशा विचारसरणीचा असु शकत नाहि.

छान

Bapuji.jpg

Rofl

यात हसण्यासारखे काय आहे? गांधीजींचा साधेपणा ( सिंप्लिसिटी) दर्शवायला हे चित्र वापरले जाते.

The greatness of this man was his simplicity.

गांधीजींचे इस्लाम / पैगंबर याबाबत मत :

.I became more than ever convinced that it was not the sword that won a place for Islam in those days in the scheme of life. It was the rigid simplicity, the utter self-effacement of the prophet, the scrupulous regard for his pledges, his intense devotion to his friends and followers, his intrepidity, his fearlessness, his absolute trust in God and his own mission. These, and not the sword carried everything before them and surmounted every trouble." YOUNG INDIA, 1924

g pr.jpg

हो ना किती साधे होते गांधीजी. असलेलं दूध नको. बकरीचंच हवं म्हणे. मग ते शोधायला किती का पैसे आणि कष्ट पडेनात. बसा शोधत!
सरोजिनी नायडू एकदा "Bapu it costs a lot of money to keep you in poverty" असं म्हणाल्या होत्या. Rofl

Rofl

आता इथे स्वस्त महागाचा संबंध कुठे आला? ज्याला जे योग्य वाटते ते त्याने खावे/ प्यावे. मोदक ६ रुपयाला मिळतो, अंडं साडे तीन रुपयाला येतं... स्वस्त मिळते म्हणून मोदकाऐवजी तुम्ही अंडं वापराल का? Biggrin

मंदार-जोशी | 25 June, 2012 - 09:35 नवीन
हो ना किती साधे होते गांधीजी. असलेलं दूध नको. बकरीचंच हवं म्हणे. मग ते शोधायला किती का पैसे आणि कष्ट पडेनात. बसा शोधत!
सरोजिनी नायडू एकदा "Bapu itcosts a lot of money to keep you in poverty" असं म्हणाल्या होत्या.>>>>एक क्रांतिकारक वाघिणीचे दुध पिऊन म्हणे इंग्रजांना देशाबाहेर घालवणार होते, पुढे इंग्रजांना "मायबापाचा" दर्जा देऊन हातभर माफिपत्रे त्यांच्याकडे पाठवली आणी भ्याडपणे स्वतःची सुटका करुन घेतली. असल्या कागदी वाघांपेक्षा बापूंची शेळी किंवा बकरी परवडली Proud Proud

Pages