‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’

Submitted by गौतमिपुत्रशालिवाहन on 17 June, 2012 - 06:31

हा विषयाचा मायबोलीवर अनेकदा गांधीवादी आणि सावरकरवादी आयडीनी कीस काढलेला आहे.
तरी सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ विचार व्हावा.
प्रा. शेषराव मोरे यांनी संशोधन करून ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केला आहे.

"""एका टप्प्यानंतर ‘अखंड भारता’चा आग्रह धरल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे रक्षण करणे आणि एक राष्ट्र म्हणून कारभार चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव गांधीजींसह कॉंग्रेसला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच भारताची फाळणी कॉंग्रेसने पूर्ण विचारांती स्वीकारली.""" http://bit.ly/MV5vGN

या ग्रंथातील मते जर खरी सप्रमाण असतील तर सावरकर x गांधी हा वाद कायमचा मिटेल हि अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

३) कोणत्या गुन्ह्याला कोणती शिक्षा द्यायची हे गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून असते.
इतिहास,कोणी किती कठोर शिक्षा भोगली यावर व्यक्तीचे महानपण ठरवीत नाही. अनुयायी किती होते, त्याने दाखविलेला मार्ग किती लोकांनी स्वीकारला यावर ते ठरते.>>>>अनुमोदन.
महात्म्याचे अनुयायी जगभर आहेत

ही टेप वारंवार वाजविली जाते म्हणून लिहिणे भाग पडले आहे. >>>>>>>> ...केवळ एकाच गोष्ट आहे.... तिचेच सारखे भांडवल करत आहेत.. काळे पाणी आणि आगा पॅलेस......बस याच दोन गोष्टींवर यांचे दुकान चालते..
नथुरामसारख्या देशद्रोह्याला नमन करणार्यांकडुन अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे..:राग:

येथे, माबोवर व आख्ख्या जगात दोनच विचारसरणी असलेले लोक आहेत का:
१. गांधीजी सर्वात थोर, त्यांच्यामुळेच फक्त आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. बाकी एकही शब्द ऐकून घेणार नाही. काही बोललात तर तुम्ही सावरकरवाले, भाजपावाले, एका विशिष्ठ जातीचे/विचारसरणीचे व नथुराम चे सपोर्टर्स.
२. सावरकर सर्वात थोर. त्यांना डावलले गेले व त्यांच्यावर अन्याय झाला.बाकी एकही शब्द ऐकून घेणार नाही. काही बोललात तर तुम्ही काँग्रेसी, अहिंसावादी, निधर्मांध, हिंदू असण्याची लाज वाटणारे वगैरे.

कोणीही कसेही मत दिले की बरेच लोक त्यांना या दोनपैकी एका कॅटेगरीत ताबडतोब बसवतात असे दिसते Happy

>>नथुरामसारख्या देशद्रोह्याला नमन करणार्यांकडुन अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे..
उदय, याला तीव्र आक्षेप. त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला हवे तर खूनी म्हणा पण तो देशद्रोही निश्चितच नव्हता.
अगदी त्यावेळच्या गांधीवाद्यांनीही त्याला देशद्रोही म्हटले नव्हते. उलट तो देशभक्तच होता.
बाकी चालुद्या.

>>इतिहास,कोणी किती कठोर शिक्षा भोगली यावर व्यक्तीचे महानपण ठरवीत नाही. अनुयायी किती होते, त्याने दाखविलेला मार्ग किती लोकांनी स्वीकारला यावर ते ठरते <<

इतिहासात 'महान' अशी नोंद होण्यासाठी ' त्याने दाखविलेला मार्ग किती लोकांनी स्वीकारला' हा एकमेव निकष आहे का? हिटलरने तथाकथित लोकशाही मार्गानेच अल्पावधित जवळपास सगळे जर्मन लोक आपल्यामागे खेचले, त्यांना युद्धात लोटले, जर्मनीचा संपूर्ण पराभव होईतोवर ते त्याच्याबरोबर राहिले, मग जर्मन लोकांनी हिटलरला महान ठरवावे काय? ते समर्थनीय होईल का? तसे करणे योग्य होणार नाही. तेव्हां हे तत्व तपासायला लागेल.

ठिक आहे मंदार ...............तुझा आक्षेप मान्य ....मी माझे शब्द मागे घेतो...... फक्त मला एकच सांग....त्याने असे काय केले . ज्यात देशभक्ती दिसुन आली.....? .....खरच..मला माहीत नाही ....कृपया माहीती दे....

उदय,
आपण सगळेच देशभक्त आहोत की नाही? मग देशभक्ती दाखवायला विशेष 'करुन दाखवावे' लागते असे नाही.
तो विषय वेगळा आहे. आपण त्यावर नंतर बोलू. Happy

सगळे देशभक्तच असतात ....... फक्त एक कृतीचा फरक असतो........ त्याच्या कृत्याने किती फरक पडला हे लक्षातच घेत नाही कुणी..?

अरे सोड अरे उदय. टंकायचा कंटाळा आहे, आणि एवढं भलं मोठं टंकलिखित करु शकत नाही आत्ता तरी कार्यालयात बसून.

आपण बोलू तेव्हा सांगतो नक्की. Happy आत्ता सोड ते!

एल. ओ. एल.!!
'देशभक्ती दाखवायला विशेष 'करुन दाखवावे' लागते असे नाही.'!! :हहहाहाहीहीहूहूगलो:
बरोब्बर!

***

दासू जी,
किती अनुयायी या निकषावरच नव्हे, तर काही 'इतर' 'विशेष' कारणांमुळे मा. अ‍ॅडॉल्फ हिटलरही महानच होते असे मानणारे लोकही आपल्याकडे (अजूनही) आहेत. हो की नाही?

Biggrin

हिटलर हा वळवळकरांचा आर्यबंधु होता.

हिटलर हा शब्द आर्य या शब्दापासून तयार झाला आहे.. हिटल आर्य ( हिटल- हिट म्हणजे बडवणारा, आक्रमण करणारा, वीर इ इ ) . म्हणजे महान वीर आर्य. त्याचाच अपभ्रंश होऊन हिटलर शब्द तयार झाला.

Rofl

नथुराम देशभक्त होता!!!!!!!!!!

Rofl

एक दिवस पाऊस पडला, तर लगेच नथुरामी छत्र्या उगवल्या !! Proud

अ‍ॅडॉल्फ हिटलर...........................मी मानतो........... दुसरे महायुध्द आणि ज्यु ची कत्लेआम चा विषय सोडुन दिल्यास...हिटलर नक्कीच चांगला आणि कणखर नेता होता.... ज्या प्रमाने जर्मनी ला पाताळातुन वर काढले.. ते स्तुत्य होते....

दामोदरसुत | 26 June, 2012 -04:47 नवीन
>>इतिहास,कोणी किती कठोर शिक्षा भोगली यावर व्यक्तीचे महानपण ठरवीत नाही. अनुयायी किती होते, त्याने दाखविलेला मार्ग किती लोकांनी स्वीकारला यावर ते ठरते <<
इतिहासात 'महान' अशी नोंद होण्यासाठी ' त्याने दाखविलेला मार्ग किती लोकांनी स्वीकारला' हा एकमेव निकष आहे का? हिटलरनेतथाकथित लोकशाही मार्गानेचअल्पावधित जवळपास सगळे जर्मन लोक आपल्यामागे खेचले, त्यांना युद्धात लोटले, जर्मनीचा संपूर्ण पराभव होईतोवर ते त्याच्याबरोबर राहिले, मग जर्मन लोकांनी हिटलरला महान ठरवावे काय? ते समर्थनीय होईल का? तसे करणेयोग्य होणार नाही. तेव्हां हे तत्व तपासायला लागेल.>>>>हिटलरच्या हातात लष्करी सत्ता होती तो त्याचा गैरवापर करायचा, गेस्टेपोच्या ,गोबेल्सच्या मदतीने प्रत्येक विरोधक संपवला, त्यामुळे जर्मन नागरीक हतबल होऊन त्याच्या पाठीशी राहिले. जर्मन्स जर हिटलरला एवढे मानत असते तर तो कुत्र्यासारखा मेला नसता. जगभरातले वंशवादी आणि धर्मांध नेते आत्महत्या करुनच निजधामास गेले आहेत. Wink

हिटलरच्या हातात लष्करी सत्ता होती तो त्याचा गैरवापर करायचा, गेस्टेपोच्या ,गोबेल्सच्या मदतीने प्रत्येक विरोधक संपवला, त्यामुळे जर्मन नागरीक हतबल होऊन त्याच्या पाठीशी राहिले. जर्मन्स जर हिटलरला एवढे मानत असते तर तो कुत्र्यासारखा मेला नसता. जगभरातले वंशवादी आणि धर्मांध नेते आत्महत्या करुनच निजधामास गेले आहेत.<<<<

अरे Er.rohit बाळा इतिहास म्हणजे काय हे तुझ्या गावी आहे का? की आज सकाळी-सकाळीच बेवडा ढोसलायस, म्हणून असे बेताल लिहू लागलायस परत. आधी इतिहासाचा अभ्यास कर, कारण असा कोणताही अभ्यास न करता कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिवर चिखलफेक करु नये मग तो चांगला असो अथवा वाईट. तेंव्हा नीट वाचून समजून घे विषय आणि मग तुझी नसलेली अक्कल पाजळ. कसे!

रोहीत यांच्या शेवटच्या प्रतीसादाशी सहमत. मात्र पाकी नेते हिंसक पद्धतीने मारले गेले. भुट्टोंना मारणारे झिया विमान अपघातात स्वतःच्या कर्माने मेले. हुकुमशाही लादणार्‍यांचे विचीत्र हाल होतात हे खरे.

लाखो करोडो भारतीय जनता एकमुखाने ओरडून सांगत होते की आम्हाला फाळणी नको-फाळणी नको, पण सत्तेसाठी हावरट बनलेल्या काँग्रेजी पक्षा पुढे मान टाकणारा, आणि शेवटी फाळणीला मान्यता देवून, दोन्ही देशातील करोडो निरपध्यांचा बळी घेणारा अंहीसेचा कर्ताधर्ता आणि आपल्या सुरवातीच्या काळात स्वत:च्या अमोघ वक्तृत्वांनी अवघ्या जर्मन जनतेची मने जिंकून घेऊन शेवटी त्यांना महायुध्दाच्या खाईत नेऊन लोटणारा "फ्युरर" यात फरक तो काय?

लाखो करोडो भारतीय जनता एकमुखाने ओरडून सांगत होते की आम्हाला फाळणी नको-फाळणी नको :
बाप रे!
हो का? कधी अन कुठे झाला हा एकमुखाने ओरडण्याचा कार्यक्रम? भलताच गोंगाट झाला असेल नाही?
तेव्हा आपण स्वतः बाजूलाच उभे राहून हा लाखो करोड भारतीय जनतेने उच्चरवाने केलेला एकमुखी आक्रोश नक्कीच पहात-ऐकत होता. होय ना?
गज्जूजी, या वयातही छाण स्मरणशक्ती आहे हो तुमची ते सगळं कसं नीट आठवतंय तुम्हाला! तुमच्या चष्म्यातून पहाताना जणू त्या काळातच वावरत आहोत असे वाटते.

..फिर क्या हुआ?

पुढील ष्टोरीची वाट पहाणारा (नटवरलाल) इब्लिस.

>> इतिहास,कोणी किती कठोर शिक्षा भोगली यावर व्यक्तीचे महानपण ठरवीत नाही. अनुयायी किती होते, त्याने दाखविलेला मार्ग किती लोकांनी स्वीकारला यावर ते ठरते. <<

(१) व्यक्तिंचे मूल्यमापन कालांतराने इतिहासकार करतात. व्यक्तिंच्या हयातीतच सर्वच थोर व्यक्तींना पुरेसे अनुयायी मिळतातच असे नाही.
(२) एकाच पुराव्याआधारे वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळे विरुद्ध निष्कर्ष काढतांना अनेकदा दिसतात. त्यामुळे इतिहासकार किति प्रमाणात निष्पक्ष आहे याला फार फार महत्व आहे.
(३) कालची थोर (विशेषतःराजकीय) व्यक्ति सत्तापालटानंतर वाईट ठरू शकते.
(४) कालची थोर व्यक्ति नवे पुरावे मिळाल्यास इतिहासकारांकडून नंतर वाईट ठरू शकते.
(५) आधी फारसे अनुयायी न लाभलेल्यांना बर्‍याच काळानंतर मान्यता मिळून ते थोर ठरल्याचीही उदाहरणे आहेत.
अगदी ठळक उदाहरण येशू ख्रिस्ताचे आहे. त्याला सुरुवातीला मिळालेले अनुयायी नगण्य होते म्हणूनच शासकांना त्याला क्रुसावर चढविण्याचे धाडस झाले. त्याला अनुयायी लाभत गेले आणि तो महान ठरत गेला ते त्याच्या मृत्युनंतर खूप काळाने! आधीच्या काळातील वाईट गोष्ट कालांतराने चांगली ठरू शकते. म्हणजे खरे चित्र दिसायला बराच काळ जावा लागतो.
(६) इतिहास घडविणारीही आणि इतिहास लिहिणारीही सरतेशेवटी माणसेच असतात आणि त्यामुळे माणसांचे दोष कमिअधिक प्रमाणात त्यांच्यात असतात हेही लक्षात घेतले पाहिजे.
आणि आणखीही कांही निकष निघू शकतात.
त्यामुळे महानत्व ठरविण्यास अनुयायांची संख्या असा एकमेव निकष अत्यंत अपुराच नव्हे तर अत्यंत अयोग्य आहे. इतरही खूप निकष लावल्यावरच आपण महान व्यक्तिचा शोध घेऊ शकू, असे मला वाटते.

(२) एकाच पुराव्याआधारे वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळे विरुद्ध निष्कर्षकाढतांना अनेकदा दिसतात. त्यामुळे इतिहासकार किति प्रमाणात निष्पक्ष आहे याला फार फार महत्व आहे.>>>>दासु,हे मात्र खरे आहे बरं का. महाराष्ट्रात गेल्या दिडशे वर्षात अनेक पक्षपाती इतिहासकार होऊन गेलेत. सध्याचे ,2004 नंतर दिसेनासे झालेले एक ज्येष्ठ ईतिहासकार विशिष्ट विचारसरणी पसरवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नाटककार, कांदबरी लिहणारे ईतिहासकार होतात ,ईतिहासाची मोडतोड करुन अनेक दशके खोटा ईतिहास जनतेच्या माथी मारतात. काय म्हणावे असल्या बनवेगिरीला?

Er.rohit Rofl

इतरही खूप निकष लावल्यावरच आपण महान व्यक्तिचा शोध घेऊ शकू, असे मला वाटते.

अनुमोदन. जनतेलाही हे माहित असते,

लाखो करोडो भारतीय जनता एकमुखाने ओरडून सांगत होते की आम्हाला फाळणी नको-फाळणी नको :

Proud

Rofl

एक मुख.... कुणाचे नथुरामाचे का? Biggrin

विजय Happy

>>> त्यामुळे महानत्व ठरविण्यास अनुयायांची संख्या असा एकमेव निकष अत्यंत अपुराच नव्हे तर अत्यंत अयोग्य आहे. इतरही खूप निकष लावल्यावरच आपण महान व्यक्तिचा शोध घेऊ शकू, असे मला वाटते.

+१

निव्वळ अनुयायांची संख्या हा निकष लावला तर त्या निकषानुसार कलमाडी हे अत्यंत महान व्यक्तिमत्व ठरते कारण कलमाडी १-२ महिन्यांपूर्वी विमानाने दिल्लीहून पुण्याला आला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर तोबा गर्दी लोटली होती. बँड वाजवून व फटाक्यांची आतषबाजी करून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले होते. मागच्याच आठवड्यात तो महापालिकेत आला तेव्हाही त्याच्या अशाच स्वागताची पुनरावृत्ती झाली होती. तामिळनाडूचा रामस्वामी नायकर, एम जी रामचंद्रन, एन टी रामाराव, योहान सॅम्युअल राजशेखर रेड्डी, मायावती, लालू यांना असंख्य अनुयायी लाभले. वरील निकषानुसार या व्यक्तीसुद्धा अत्यंत महान ठरतात.

>>> २) काळ्या पाण्याच्या शिक्षेत खितपत पडून आयुष्य वाया घालवण्यात अर्थ नाही असा साक्षात्कार झाल्यावर अनेक वेळा माफी मागून , अटी मान्य करून बाहेर आल्यावर आधी किती कठोर शिक्षा, भयंकर छळ सहन केला हे सांगण्यात काय अर्थ आहे? संसाराच्या राखरांगोळीची मग नीट रांगोळीही घातली की. स्वा. सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल, त्यांनी भोगलेल्या शिक्षेबद्दल पूर्ण आदर ठेवूनच हे लिहीत आहे.

हा पूर्णपणे अपप्रचार आहे. ही टेप सावरकरद्वेष्ट्यांकडून पुन्हा पुन्हा वाजविली जाते म्हणून परत यावर लिहिणे भाग आहे. याविषयी एका दुसर्‍या धाग्यावर खूप सविस्तर चर्चा झाली होती. सावरकरांनी अनेक वेळा माफी मागितली व अटी मान्य करून ते सुटले हे संपूर्ण खोटे आहे. तसे असते तर ते १९११ मध्येच सुटले असते. १९२३ मध्ये ते क्षयाने गंभीर आजारी पडल्यावर त्यांना १९२४ मध्ये तुरूंगातून सोडून रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची अंदमानातील तुरूंगात १४ वर्षे शिक्षा पूर्ण झाली होती. स्वतः सावरकरांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या चरित्रातील उदाहरण देऊन याविषयी पूर्ण स्पष्टीकरण दिले होते.

त्यांनी कठोर शिक्षा सहन केली, त्यांचा अनन्वित छळ झाला ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती सांगण्यात काय चूक आहे? गांधीजी आगाखान यांच्या राजवाड्यात स्थानबद्ध होते व तिथे त्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या ही सुद्धा वस्तुस्थिती होती आणि ही वस्तुस्थिती का दडपायची? इतर तुरूंगात असताना सुद्धा ते राजबंदी होते व त्यामुळे इतर सामान्य गुन्हेगारांसारखी वागणूक (दंडाबेडी, छळ, कोठडी, सक्तमजुरी इ.) त्यांना मिळत नव्हती ही सुद्धा वस्तुस्थिती आहे.

>>> ३) कोणत्या गुन्ह्याला कोणती शिक्षा द्यायची हे गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून असते.
इतिहास,कोणी किती कठोर शिक्षा भोगली यावर व्यक्तीचे महानपण ठरवीत नाही. अनुयायी किती होते, त्याने दाखविलेला मार्ग किती लोकांनी स्वीकारला यावर ते ठरते.

याचे उत्तर वर दिले आहे. हाच निकष लावला तर गांधीजींचे विनोबांसारखे जेमतेम १-२ अनुयायी सापडतील ज्यांनी गांधीजींचा मार्ग स्वीकारला. गांधीजींची जपमाळ ओढणार इतर सर्वजण म्हणजे 'मुहंमें गांधीजी बगलमे छुरी' या कल्टमधील होते/आहेत/असतील.

>>> ४) गांधींना आफ्रिकेत असल्यापासून अनेक वेळा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली.

आफ्रिकेत त्यांनी काय केले याचा व भारताचा काहीही संबंध नाही.

>>> त्यातील केवळ 'चले जाव' चळवळीनंतरच्या शिक्षेच्या वेळी त्यांना आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्धतेत ठेवले गेले होते. चले जाव आंदोलनात काँग्रेसचे संपूर्ण नेतृत्व आणि असंख्य (हजारो)कार्यकर्ते तुरुंगत होते. लाखापेक्षा अधिक भारतीयांना आपल्या नेत्यांच्या हाकेला ओ देऊन अटक करून घेतली होती. अन्य अनेक वेळा त्यांना येरवडासारख्या तुरुंगांतच ठेवले गेले. प्रत्येक वेळी त्यांची विनाशर्त सुटका झाली.

राजबंदी म्हणून तुरूंगात असणे किंवा सर्व सुखसोयी असणार्‍या राजवाड्यात स्थानबद्ध असणे याच्यात आणि निव्वळ देशासाठी घरापासून हजारो मैल दूर असलेल्या तुरूंगात हालअपेष्टा, छळ सहन करत अनेक वर्षे शिक्षा भोगणे याच्यात खूपच फरक आहे.

>>> छान प्रगती आहे.

विजय,

तुम्ही ओळखलं नाही का यांना? नाव नवीन असलं तरी प्रवृत्ती आणि व्यक्ती जुनीच आहे. हे अलिकडे माणसांची नावे न घेता प्राणीपक्ष्यांची नावे घेऊन येतात. Biggrin

Pages