‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’

Submitted by गौतमिपुत्रशालिवाहन on 17 June, 2012 - 06:31

हा विषयाचा मायबोलीवर अनेकदा गांधीवादी आणि सावरकरवादी आयडीनी कीस काढलेला आहे.
तरी सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ विचार व्हावा.
प्रा. शेषराव मोरे यांनी संशोधन करून ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केला आहे.

"""एका टप्प्यानंतर ‘अखंड भारता’चा आग्रह धरल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे रक्षण करणे आणि एक राष्ट्र म्हणून कारभार चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव गांधीजींसह कॉंग्रेसला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच भारताची फाळणी कॉंग्रेसने पूर्ण विचारांती स्वीकारली.""" http://bit.ly/MV5vGN

या ग्रंथातील मते जर खरी सप्रमाण असतील तर सावरकर x गांधी हा वाद कायमचा मिटेल हि अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

>>> एक क्रांतिकारक वाघिणीचे दुध पिऊन म्हणे <<<<
जौद्याहो, तुम्हाला नै झेपायचे ते! तो क्रान्तिकारक कोण हे आज २०१२ मधेही नावानिशी तुम्ही बोलू शकत नाहीत यातच सगळे आले. Wink
अन माफिपत्रान्चे म्हणाल तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजान्नीदेखिल अनेक मुसलमानी सत्तान्ना अनेकवेळा तत्सम पत्रे लिहून दिलीत! पण असो.
तूम्ही नाव घ्या त्या क्रान्तीकारकाचे! Proud लाजता काय?
तसही त्या पुणेकरान्ना काही उद्योग नाही, दादोजीनन्तर कुणाचा तरी पुतळा हलवायचाच आहे, तुम्ही नाव तेवढे घेतलेत की ते तिकडे ठराव/मोर्चे वगैरे करुन पुतळा हलवायला मोकळे, कसे बरोबर ना? Proud

limbutimbu | 25 June, 2012- 10:11 नवीन
>>> एक क्रांतिकारक वाघिणीचे दुध पिऊन म्हणे <<<<
जौद्याहो, तुम्हाला नै झेपायचे ते! तो क्रान्तिकारक कोण हे आज २०१२ मधेही नावानिशी तुम्ही बोलू शकत नाहीत यातचसगळे आले.
>>>>' माफिपत्रे' म्हण्टले की तुम्ही लगेच धाग्यावर हजर, यावरुन ठरवा ते कोण Proud
<<तूम्ही नाव घ्या त्या क्रान्तीकारकाचे! लाजता काय?>>> लिंबुजी, लाजत त्यांचे नाव घ्यायचा आजीवन परवाना तुम्हालाच मिळाला आहे ,त्यामुळे तुम्हीच घ्या कि नाव.

"तो हिरा आहे आणि आम्ही कोंदण आहोत" असे वीतभर छाती काढून बरळता कि ,मग तुमचेच जास्त घनिष्ठ संबंध आहेत की त्यांच्याशी Proud Proud Wink

>>> I became more than ever convinced that it was not the sword . . . . . . . not the sword carried everything before them and surmounted every trouble."

Biggrin Sad Angry Lol Rofl
आता मात्र हसू आवरत नाहीय्ये (:फिदीफिदी: :खीखीखी:). त्याचवेळी मनात अतीव करूणा दाटून येत आहे (:अरेरे:) आणि तीव्र संतापही येतोय (:राग:).

>>> साधेपणा

एकीकडे स्वत:च्या घरापासून हजारो मैल दूर उवापिसवांनी भरलेल्या एका अत्यंत छोट्या कोठडीत हातात दंडाबेडी ठोकलेल्या अवस्थेत तरटावर झोपणे, आत्यंतिक छळ सहन करत अनेक वर्षे तुरूंगवास भोगणे, अतिशय हालअपेष्टा सहन करणे, घरादाराची संसाराची रांगोळी करणे आणि हे सर्व देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी . . . तर दुसरीकडे राजवाड्यातली स्थानबद्धता, आंघोळीला टब, गाद्यागिरद्यांना टेकून बसणे, बिर्लांसारख्या उद्योगपतींकडे मुक्काम . . .

साधेपणाची कमाल मर्यादा ! ! !

उदय म्हणतात त्याप्रमाणे महात्माजींचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान मोठेच आहे हे आम्ही अनेकदा लिहिले आहे. पण इतर हजारो लोकांचा इतर मार्गांनीही त्याला प्रचंड हातभार लागला होता हे नाकारणे सत्त्याचा अपलाप करणारे, करंटेपणाचे, आणि निखालस कृतघ्नपणाचे आहे.

'१९४० पासूनच गांधीजी सातत्याने सांगत होते की, आठ कोटी मुसलमानांना फाळणी पाहिजेच असेल तर जगातील कोणतीही शक्ती ती रोखू शकणार नाही. मुसलमानांची इच्छा असेल तर फाळणी करण्यास ते नेहमीच तयार होते. त्यांचे म्हणणे एवढेच होते की, फाळणी जिनांना पाहिजे असली तरी मुसलमानांना नको आहे. ती त्यांच्या हिताविरुद्ध व इस्लामविरोधी आहे. आपण आधी स्वातंत्र्य मिळवू, मग फाळणी करू, असेही ते त्यांना सांगत असत. १९४३ ची फाळणीची ‘राजाजी योजना’ त्यांच्या संमतीनेच तयार केलेली होती. सप्टेंबर १९४४ मध्ये १७ दिवस मुंबईत जिनांच्या घरी जाऊन त्यांनी ‘राजाजी योजने’च्या धर्तीवरच फाळणी स्वीकारण्याची जिनांना विनंती केली होती.'
असे शेषराव मोरे त्यांच्या लेखात म्हणतात.

म्हणजे १९४३ पासूनच फाळणीची तयारी झाली होती तर! आणि १५ दिवस मनधरणी करूनही जीनांना पटविण्यात यश आलेले नव्हते. असे जर होते तर मग ती अत्त्याचार , रक्तपात आणि वित्तहानी न होता कशी होईल याची काऴजी कुणी घ्यायची होती? भारताच्या त्यावेळच्या मुख्य नेत्यांनीच कि नाही/

*‘माझ्या प्रेतावरूनच देशाची फाळणी होईल,’ असे गांधीजी अनेकदा म्हणाले होते. अखंड भारताचे भावनिक, आध्यात्मिक व नतिक समर्थन; तर वस्तुत: व व्यवहारत: फाळणीच्या दिशेने वाटचाल- अशी त्यांची राजनीती होती.* असे शेषराव मोरे त्यांच्या लेखात म्हणतात.

ज्या भागातील लोकांवर फाळणीची कुर्‍हाड कोसळणार होती, त्यांचा समज कांहीही झाले तरी गांधिजी फाळणी स्वीकारणार नाहीत असाच झाला असेल नाही का? गांधिजी बोलतात तसे करतात अशीच त्याकाळि लोकांची भावना नव्हती का? त्यांची आतील राजनीति सामान्यांना कळली असेल का? खुद्द खान अब्दुल गफारखानांनी 'आम्हाला लांडग्यांच्या तोंडी दिले' असे म्हटले, तर मग सामान्यांना गांधिजींचे राजकारण कळण्याची अपेक्षा कशी करायची? ज्या भागातील लोकांवर फाळणीची कुर्‍हाड कोसळणार होती, त्यांची जी सर्व प्रकारची अपरिमित हानी झाली त्याचा दोष कोणाचा?

देशाचे तीन तुकडे करून, लाखोंना कायमचे विस्थापित करून आणि अंदाजे लाखो निरपराध लोकांची हिंसा होऊ देऊन मिळालेले स्वातंत्र्य हिंसेविना मिळाले असे म्हणणार्‍यांना काय म्हणावे?

एकीकडे स्वत:च्या घरापासून हजारो मैल दूर उवापिसवांनी भरलेल्या एका अत्यंत छोट्या कोठडीत हातात दंडाबेडी ठोकलेल्या अवस्थेत तरटावर झोपणे, आत्यंतिक छळ सहन करत अनेक वर्षे तुरूंगवास भोगणे, अतिशय हालअपेष्टा सहन करणे, घरादाराची संसाराची रांगोळी करणे आणि हे सर्व देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी >>>>>>>
.
.आता मात्र हसू आवरत नाहीय्ये Lol . Biggrin . त्याचवेळी मनात अतीव करूणा दाटून येत आहे (:अरेरे:) आणि तीव्र संतापही येतोय Angry

इथल्या गांधीवाद्यांना "महात्मा गांधी" हा कसा महान माणूस होता. हे सिद्ध करण्याकरता, सतत "सावरकरांना" लहान करावे लागतेय, यावरुन सावरकरांचा मोठेपणा दिसून येतो.

इथल्या गांधीवाद्यांना "महात्मा गांधी" हा कसा महान माणूस होता. हे सिद्ध करण्याकरता, सतत "सावरकरांना" लहान करावे लागतेय, यावरुन सावरकरांचा मोठेपणा दिसून येतो. >>>>>>>> हे वाक्य विनोदी बाफ वर हलवा...आता मात्र हसू आवरत नाहीय्ये Lol .. Biggrin

हे वाक्य विनोदी बाफ वर हलवा...आता मात्र हसू आवरत नाहीय्ये <<<
हे वाक्यच काय, पण आजच्या घडीला जो म्हणतो कि मी सच्चा गांधीवादी आहे, अश्या एकूण-एक व्यक्तिंना, एक तर सर्कशीत "विदुषक" म्हणून, नाहीतर "वेडा" म्हणून आग्र्याला वेड्यांच्या इस्पितळातच हलवावे लागेल.

Lol ...................... तवा गरम झाला............मार दो हतोडा.........:खोखो: .............

एकीकडे स्वत:च्या घरापासून हजारो मैल दूर उवापिसवांनी भरलेल्या एका अत्यंत छोट्या कोठडीत हातात दंडाबेडी ठोकलेल्या अवस्थेत तरटावर झोपणे, आत्यंतिक छळ सहन करत अनेक वर्षे तुरूंगवास भोगणे, अतिशय हालअपेष्टा सहन करणे,घरादाराची संसाराची रांगोळी करणे आणि हे सर्व देशाला स्वातंत्र्य मिळावेयासाठी . . .>>>> मायबोलीवरचा सर्वोत्तम विनोद
>>>. . . तर दुसरीकडे राजवाड्यातली स्थानबद्धता,आंघोळीला टब, गाद्यागिरद्यांना टेकून बसणे, बिर्लांसारख्या उद्योगपतींकडे मुक्काम . . .
साधेपणाची कमाल मर्यादा ! !>>>>मास्तुरे, तुमचे तथाकथीत क्रांतीवीर दररोज सुग्रास भोजन करायचे, सोन्याचा चष्मा ,सोन्याचे घड्याळ वापरायचे ,इंग्लंडात बॅ Wink व्हायला प्रचंड पैसा खर्च करायचे, टाळकी बडवून वेडे तयार करायचे...... वा वा तर, किती तो मातृभुमीसाठी त्याग... Proud Proud Wink Biggrin

Er.rohit | 25 June, 2012 - 18:33 नवीन

एकीकडे स्वत:च्या घरापासून हजारो मैल दूर उवापिसवांनी भरलेल्या एका अत्यंत छोट्या कोठडीत हातात दंडाबेडी ठोकलेल्या अवस्थेत तरटावर झोपणे, आत्यंतिक छळ सहन करत अनेक वर्षे तुरूंगवास भोगणे, अतिशय हालअपेष्टा सहन करणे,घरादाराची संसाराची रांगोळी करणे आणि हे सर्व देशाला स्वातंत्र्य मिळावेयासाठी . . .>>>> मायबोलीवरचा सर्वोत्तम विनोद
>>>. . . तर दुसरीकडे राजवाड्यातली स्थानबद्धता,आंघोळीला टब, गाद्यागिरद्यांना टेकून बसणे, बिर्लांसारख्या उद्योगपतींकडे मुक्काम . . .
साधेपणाची कमाल मर्यादा ! !>>>>मास्तुरे, तुमचे तथाकथीत क्रांतीवीर रत्नागिरीत दररोज सुग्रास भोजन करायचे, सोन्याचा चष्मा ,सोन्याचे घड्याळ वापरायचे ,इंग्लंडात बॅ डोळा मारा व्हायला प्रचंड पैसा खर्च करायचे...... वा वा तर, किती तो मातृभुमीसाठी त्याग... फिदीफिदी Proud डोळा मारा<<<<<<<<

अरे "Er.rohit " नावाच्या माकडा तुला देवाने अक्कल नावाची चीज दिलेलीच नाही, म्हणून बेवडा ढोसुन आल्या सारखा समोरच्याने काय लिहलय, काय नाही. हे न वाचताच काहीही बरळत आणि लिहीत सुटलायस. वर ते गांधीविषयी लिहलय ते त्याच्या तुरूंगवासाच्या किंव्हा स्थानबध्दतेच्या दिवसातील राजेशाही थाटातील चैनी बद्दल लिहलेय.

हे वाक्यच काय, पण आजच्या घडीला जो म्हणतो कि मी सच्चा गांधीवादी आहे, अश्याएकूण-एक व्यक्तिंना, एक तर सर्कशीत "विदुषक" म्हणून, नाहीतर "वेडा" म्हणून आग्र्याला वेड्यांच्या इस्पितळातच हलवावे लागेल.>>> आंग्रे साहेब,'आग्र्याला वेड्यांच्या ईस्पितळात'.... 'आग्र्याला' या शब्दातील आ वर टिंब द्या ,बघा तुमचेच नाव तयार होतेय Biggrin

वावावा!
गज्जूभाऊंनी इव्ल्या इव्ल्याशा टिकल्या टिकल्यांचे घर बांधायला सुरुवात करण्याआधी त्यांची मुक्त चिंतने अजरामर करून ठेवतो:
001.jpg

"गांधीविषयी" "त्याच्या" उत्तम.

तसा धागाही संग्रहणीय आहेच. पण सेव्ह केलेलं संपूर्ण वेबपेज इथे डकवता येत नाही म्हणून एक स्क्रीनशॉट वानगीदाखल लावला आहे वर.
कुठून अन का धागा वर आला कुणास ठाऊक...

सच्च्या गांधीवाद्यांच्या साधेपणावरून आठवलं.

१-२ वर्षांपूर्वी सच्च्या गांधीवाद्यांच्या युपीए सरकारमध्ये साधेपणाची लाट आली होती. मूर्तीमंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणीच्या मॅडम, एकदा विमानातून सरकारी खर्च कमी करण्यासाठी व साधेपणाचा आदर्श दाखवून 'वॉक द टॉक' करण्यासाठी कॅटल् क्लासने (इकॉनॉमी क्लास) गेल्या होत्या म्हणे. अर्थात त्यांच्या मागच्यापुढच्या १०-१५ ओळी रिकाम्या ठेवल्या होत्या आणि उरलेल्या आसनांवर त्यांचे संरक्षण करणारे कमांडो होते असे त्यांच्या साधेपणाची हेटाळणी करणार्‍यांनी टोमणे मारले होते.

त्या काळात युवराजसुद्धा दिल्लीहून अमॄतसरला चक्क रेल्वेने गेले होते. त्यांच्याही साध्या राहणीची हेटाळणी केली गेली. आता ते दिल्लीहून अमृतसरला पोचायच्या आतच त्यांच्या अमृतसरमधल्या वास्वव्यासाठी ३०-४० बुलेटप्रूफ कार्स आणि १००-१५० कमांडोज रेल्वेने आधीच पाठवले होते हे उघड करण्याची काय गरज होती?

आपल्या पवारसाहेबांनी सुद्धा साधेपणाचा आदर्श घालून दिला आहे. ते सुद्धा त्या काळात एकदा किंगफिशरच्या कॅटल् क्लासने मुम्बईला आले होते. काही विघ्नसंतोषी लोकांनी लगेच उघड केलं की त्या काळात इंडियन एअरलाईन्सचा संप सुरू होता व त्यामुळे इतर एअरलाईननेच प्रवास करावा लागत होता आणि किंगफिशरच्या विमानामध्ये सरसकट एकच क्लास असतो. मग त्या क्लासला तुम्ही इकॉनॉमी क्लास म्हणा नाहीतर बिझनेस क्लास म्हणा.

मायावती तर साधेपणाची परमावधी. ती अगदी साध्यासुध्या हिर्‍यांच्या कुड्या घालते आणि अगदी साध्या मर्सिडीजमधून प्रवास करते. वाढदिवसाला अगदी साधा केक कापते. मागच्या वर्षी तर तिने वाढदिवस जेमतेम ५०-६० कोटीत उरकला होता म्हणे.

अर्थात त्यांच्या मागच्यापुढच्या १०-१५ ओळी रिकाम्या ठेवल्या होत्या आणि उरलेल्या आसनांवर त्यांचे संरक्षण करणारे कमांडो होते असे त्यांच्या साधेपणाची हेटाळणी करणार्‍यांनी टोमणे मारले होते.>>>> सुरक्षतेच्या हिशोबाने हे बरोबर होते......... वाजपेयी तर रिकामे विमान घेउन जात असे अतिरेक्यांना सोडवायला ..........तेव्हा कुठे खर्चाचा हिशोब दिलेला...... अडवाणी जिन्नाची $%^ लांगुलचालन करायला जाताना लावजमा घेउन गेलेला......तेव्हा साधी राहणी उच्च विचार हे कुठे .......शेपुट घालुन बसलेले...... राजनाथ सिंग च्या घरी महिन्याला ८० -९० सिलेंडर जातात.......विचार करा ही साधी राहणी........ प्रमोद महाजन साधे मुंबईतुन रायगड किंवा पुण्याला जाताना सुध्दा हेलिकॉप्टर वापरत .... बाकी ठिकाणी तर डायरेक्ट विमानच अख्खे....:हाहा:
वाजपेयी कुठे ही जाताना लगेच कार .विमान. का? गुढघे दुखण्याचे कारण...... संघांने दिले...... Happy
असला साधे पणा ..............व्वाव्वा.............

मास्तुरे | 25 June, 2012 - 14:52
सच्च्या गांधीवाद्यांच्या साधेपणावरून आठवलं.
१-२ वर्षांपूर्वी सच्च्या गांधीवाद्यांच्या युपीए सरकारमध्ये साधेपणाची लाट आली होती. मूर्तीमंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणीच्या मॅडम, एकदा विमानातून सरकारी खर्च कमी करण्यासाठी व साधेपणाचा आदर्श दाखवून 'वॉक द टॉक' करण्यासाठी कॅटल् क्लासने (इकॉनॉमी क्लास) गेल्या होत्या म्हणे. अर्थात त्यांच्या मागच्यापुढच्या १०-१५ ओळी रिकाम्या ठेवल्या होत्या आणि उरलेल्या आसनांवर त्यांचे संरक्षण करणारे कमांडो होते असे त्यांच्या साधेपणाची हेटाळणी करणार्‍यांनी टोमणे मारले होते.
त्या काळात युवराजसुद्धा दिल्लीहून अमॄतसरला चक्क रेल्वेने गेले होते. त्यांच्याही साध्या राहणीची हेटाळणी केली गेली.आता ते दिल्लीहून अमृतसरला पोचायच्या आतच त्यांच्या अमृतसरमधल्या वास्वव्यासाठी ३०-४० बुलेटप्रूफ कार्स आणि १००-१५० कमांडोज रेल्वेने आधीच पाठवले होते हे उघड करण्याची काय गरज होती?
आपल्या पवारसाहेबांनी सुद्धा साधेपणाचा आदर्श घालून दिला आहे. ते सुद्धा त्या काळात एकदा किंगफिशरच्या कॅटल् क्लासने मुम्बईला आले होते.काही विघ्नसंतोषी लोकांनी लगेच उघड केलं की त्या काळात इंडियन एअरलाईन्सचा संप सुरू होता व त्यामुळे इतर एअरलाईननेच प्रवास करावा लागत होता आणि किंगफिशरच्या विमानामध्ये सरसकट एकच क्लास असतो. मग त्या क्लासला तुम्ही इकॉनॉमी क्लास म्हणा नाहीतर बिझनेस क्लास म्हणा.
मायावती तर साधेपणाची परमावधी. ती अगदी साध्यासुध्या हिर्‍यांच्याकुड्या घालते आणि अगदी साध्या मर्सिडीजमधून प्रवास करते. वाढदिवसाला अगदी साधा केक कापते. मागच्या वर्षी तर तिने वाढदिवस जेमतेम ५०-६० कोटीत उरकला होता म्हणे.
>>>>> मास्तुरे, तुमची चिखलनिवासी कमळे किती निस्वार्थी हो... अगदी निस्वार्थी .जनतेचा पैसा वाचावायचा म्हणुन कमळे पायीच प्रवास करतात, यात्रा काढतात, संपुर्ण पॅन्ट कशाला घालायची त्यापेक्षा हाफचड्डीतच फीरतात ......
अजुन काही वर्षांना हाफचड्डी ऐवजी लंगोट हाच त्यांचा पोषाश असेल... कारण, परमनिस्वार्थ.....
आणखी काही वर्षांनी....निस्वार्थीपणाचा डेड एन्ड.... (समजुन घ्या) Wink Biggrin

कारे बाबा, "बिब्लिस" तुला ऐवढा का पुळका आला 'त्या आयडीचा', डायरेक्ट स्क्रिनशॉटच चिपकवायला धावलास, माझ्या प्रतिसादाचा या धाग्यावर. तू त्या आयडीची "डुआय" कि ती तूझ्या "आयडीची". आणि टिकल्या लावण्याची कामे तुझ्यासारख्या "टाळ्या" वाजवणार्‍या लोकांची?. आमची नाहीत समजले.

>>मास्तुरे, तुमची चिखलनिवासी कमळे किती निस्वार्थी हो<<<

कमळे चिखलनिवासी असली तरी, ती नेहमी देवाच्या मस्तकी किंव्हा चरणी वाहतात.
बाकी तो "काँगीज" झेंड्यावर जो हाताचा पंजा आहे. तो उजव्या हाताचा की डाव्या?

>>> कमळे चिखलनिवासी असली तरी, ती नेहमी देवाच्या मस्तकी किंव्हा चरणी वाहतात.

+१

काँग्रेसरूपी चिखलातच कमळ फुलते.

>>> बाकी तो "काँगीज" झेंड्यावर जो हाताचा पंजा आहे. तो उजव्या हाताचा की डाव्या?

:फिदी फिदी:

उगाच घाण बोलू नका हो. Lol

विजय_आंग्रे | 25 June, 2012 - 15:28 नवीन
>>मास्तुरे, तुमची चिखलनिवासी कमळे किती निस्वार्थी हो<<<
कमळे चिखलनिवासी असली तरी, ती नेहमी देवाच्या मस्तकी किंव्हा चरणी वाहतात.
बाकी तो "काँगीज" झेंड्यावरजो हाताचा पंजा आहे. तो उजव्या हाताचा की डाव्या?
>>>>>कराग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती
करमूले तू गोविन्दः
प्रभाते करदर्शनम .
चल उद्या प्रभाती पंजाला कर नमस्कार Biggrin

मायावती सच्च्या गांधीवादी आहेत हे नवे कळले.

***

मा. गज्जू
तुमच्या सवयी पिवळ्या टिकल्या लावण्याच्या आहेत. इतर बहुतेकांचे प्रतिसाद गायब होऊन वेगळेच एडीट्स तिथे प्रकट होण्याचा चिमित्कार दिसत नाही. तेंव्हा म्हटलं तुमचे मौलिक विचार अजरामर करून ठेवावेत. बाकी वेळोवेळी संपूर्ण वेबपेजही सेव्हड आहेच.

तुमच्या सारख्या प्रतिसादांच्या असल्या धुळवडीने माबो गोत्यात येऊ शकते हे तुमच्या अन इथे येऊन कंपूबाजी करणार्‍यांच्या डोक्यात येत नाही याचे दु:ख आहे. (दोन्ही बाजूंच्या) 'राष्ट्रीय नेत्यांविरुद्ध' असले अद्वातद्वा लेखन नको त्या सरकारी भेजाच्या हाती पडले, तर डोकेदुखी कुणाच्या पाठी लागेल त्याचा जरा विचार करत जा मग जिभा टाळ्याला, अन बोटे कीबोर्डाला लावीत जा.

टीका जरूर करा. सेन्सिबली करा. उल्लेख करताना आदरार्थी करा. अर्वाच्य बोलायचे असेल तर अनेक चॅटरूम्स आहेत इन्टरनेटवर!

ता.क.
"बिब्लिस" हा शब्द आवडला. बिब्लिओग्राफर या अर्थाने वापरला असेल, तर धागा जतन करण्याच्या माझ्या सवयीबद्दलची कॉमेण्ट झक्कास!

वावा! बाफ अगदी विनोदी होत चाललाय.
एवढे मोठ्ठे पुरूष ५वी ६ वी च्या मुलांसारखे भांडतायत.
मज्जाच चाललीय.
आता कसा धागा एकदम 'टाळे लावणीय' झालाय.

अग्गोबाई ! विषय काय नि बडबडतात काय ! काही समजेनासंझालय.

गांधीजीनी शेळीचं दूध प्यायचं नाही, मग त्यानी काय मासे खायला गान कोकिळेच्या घरी जायला हवे होते का? Proud ( गान कोकिळेच्या घरचे मासे कोण खात होतं, ते मात्र इचारु नका. ) Rofl

शेळीचं दूध, मोदक, अंडी, वाघिणीचं दूध, मासे... हा बीबी आता पाकविभागात हलवायला हरकत नसावी.

शेळीचं दूध, मोदक, अंडी, वाघिणीचं दूध, मासे... हा बीबी आता पाकविभागात हलवायला हरकत नसावी<<

अणुमोडण!
टाळेच नाही, धागाच अदृष्य करायची वेळ- डीजे वर धुंदावस्थेत नाचणार्‍या नवर'द्येवा'च्या मित्रांमुळे मुहूर्त टळतो, तशी- टळून चुकली आहे.

<एकीकडे स्वत:च्या घरापासून हजारो मैल दूर उवापिसवांनी भरलेल्या एका अत्यंत छोट्या कोठडीत हातात दंडाबेडी ठोकलेल्या अवस्थेत तरटावर झोपणे, आत्यंतिक छळ सहन करत अनेक वर्षे तुरूंगवास भोगणे, अतिशय हालअपेष्टा सहन करणे, घरादाराची संसाराची रांगोळी करणे आणि हे सर्व देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी . . . तर दुसरीकडे राजवाड्यातली स्थानबद्धता, आंघोळीला टब, गाद्यागिरद्यांना टेकून बसणे, बिर्लांसारख्या उद्योगपतींकडे मुक्काम . . > ही टेप वारंवार वाजविली जाते म्हणून लिहिणे भाग पडले आहे.

१) गांधींना अटक करण्यात यायची तेव्हा तेव्हा ते मायबाप इंग्रज सरकारचे पाय धरायचे की अहो मला काळ्या पाण्यावर अंदमानात पाठवू नका हो. इतेच ठेवा. मी पुढे काही खोड्या काढणार नाही. मग इंग्रज न्यायाधीश त्यांना दया दाखवून खोटा खोटा तुरुंगवास द्यायचे Wink
२) काळ्या पाण्याच्या शिक्षेत खितपत पडून आयुष्य वाया घालवण्यात अर्थ नाही असा साक्षात्कार झाल्यावर अनेक वेळा माफी मागून , अटी मान्य करून बाहेर आल्यावर आधी किती कठोर शिक्षा, भयंकर छळ सहन केला हे सांगण्यात काय अर्थ आहे? संसाराच्या राखरांगोळीची मग नीट रांगोळीही घातली की. स्वा. सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल, त्यांनी भोगलेल्या शिक्षेबद्दल पूर्ण आदर ठेवूनच हे लिहीत आहे.
३) कोणत्या गुन्ह्याला कोणती शिक्षा द्यायची हे गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून असते.
इतिहास,कोणी किती कठोर शिक्षा भोगली यावर व्यक्तीचे महानपण ठरवीत नाही. अनुयायी किती होते, त्याने दाखविलेला मार्ग किती लोकांनी स्वीकारला यावर ते ठरते.
४) गांधींना आफ्रिकेत असल्यापासून अनेक वेळा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली. त्यातील केवळ 'चले जाव' चळवळीनंतरच्या शिक्षेच्या वेळी त्यांना आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्धतेत ठेवले गेले होते. चले जाव आंदोलनात काँग्रेसचे संपूर्ण नेतृत्व आणि असंख्य (हजारो)कार्यकर्ते तुरुंगत होते. लाखापेक्षा अधिक भारतीयांना आपल्या नेत्यांच्या हाकेला ओ देऊन अटक करून घेतली होती.
अन्य अनेक वेळा त्यांना येरवडासारख्या तुरुंगांतच ठेवले गेले. प्रत्येक वेळी त्यांची विनाशर्त सुटका झाली.

Pages