कॉफी-वॉलनट मफिन्स विथ कॉफी आयसिंग (फोटोसहित)

Submitted by लाजो on 31 May, 2012 - 19:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कॉफी-वॉलनट मफिन्स

- २ कप सेल्फ रेझिंग फ्लार (२ कप मैदा + २ टीस्पून बेकिंग पावडर) चाळून
- १२५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर - मऊ (रूम टेंपरेचर)
- १ कप बारीक साखर
- अर्धा कप दूध
- २ अंडी
- २-३ टीस्प्पुन इंस्टंट कॉफी (नेस्कॅफे, ब्रु कुठलीही)
- पाव कप अक्रोडाचे तुकडे

कॉफी आयसिंग

- १ कप आयसिंग शुगर
- १ टीस्पून इंस्टंट कॉफी (नेस्कॅफे, ब्रु कुठलीही)
- २-३ चमचे उकळते पाणी
- सजावटीसाठी अक्रोडाचे तुकडे

CWM-4.JPG

क्रमवार पाककृती: 

ऑफिसच्या मॉर्निंग टी साठी काल हे मफिन्स केले होते Happy

कॉफी-वॉलनट मफिन्स

१. ओव्हन १८० डिग्री सेल्सीयस ला तापत ठेवा. मफिन पॅन मधे पेपर कप्स घालुन ठेवा किंवा सिलीकॉन मोल्ड्स तयार ठेवा.

२. चाळलेला मैद्यामधे अक्रोडाचे तुकडे घालुन ते नीट घोळवून घ्या.

३. काचेच्या बोल मधे मऊ बटर, साखर आणि कॉफी फेटायला घ्या. चांगले क्रिमी होईपर्यंत फेटा. यात एका वेळेस एक अंडे घालुन हलके मिक्स करुन घ्या.

४. आता या ओल्या मिश्रणात, वरचे मैदा+अक्रोडाचे मिश्रण हलके हलके मिक्स करा. यासाठी चमचा नाहीतर स्पॅट्युला वापरा. मिक्स करतानाच यात हळुहळु दुध देखिल घाला.

५. हे मिश्रण आता मफिन पॅन्समधे घाला.

CWM-1.JPG

६. हे मफिन्स १५ मिनीटे बेक करा. मफिन्स तयार झालेत की नाही हे टूथपीक्/सुई/स्क्युअर ने चेक करा आणि ओव्हनमधुन बाहेर काढा.

७. मफिन्स पूर्ण थंड होऊद्यात.

CWM-2.JPG

-----

कॉफी आयसिंग

८. कॉफी उकळत्या पाण्यात नीट विरघळून घ्या.

९. आयसिंग शुगर एका बोलमधे घेऊन त्यात हे कॉफी चे मिश्रण हलके हलके मिक्स करा.

१०. आयसिंगची कन्सीस्टंसी साधारण भज्यांच्या पिठासारखी यायला हवी. त्याप्रमाणे कॉफी चे मिश्रण कमी जास्त वापरा.

-----

असेंब्ली

११. थंड झालेल्या मफिन्सवर तयार कॉफी आयसिंग बटर नाईफ / पॅलेट नाईफ वापरून पसरा.

१२. आयसिंग ओले असतानाच त्यावर अक्रोडाचे तुकडे सजावटीसाठी लावा. थोड्या वेळाने आयसिंग थिजेल.

CWM-3.JPG

वाढणी/प्रमाण: 
या मिश्रणात १२ मोठे किंवा १८ मध्यम आकाराचे मफिन्स होतात.
अधिक टिपा: 

१. अक्रोड मैद्यात घालुन नीट घोळल्यामुळे तुकडे नंतर तळाशी बसत नाहीत, बॅटरमधे नीट मिक्स होतात.

२. तयार मिश्रण मफिन पॅन्समधे घालण्यासाठी दोन टेबलस्पून किंवा आयस्क्रिम स्कूप वापरा म्हणजे मिश्रण नीट कपात पडेल.

३. मफिन्सचे मिश्रण थोडे कोरडे वाटल्यास अजून चमचाभर दूध घाला. काल मला घालावे लागले. से रे फ्लार च्या बॅचेस मधे फरक असू शकतो.

४. मूळ रेसिपीमधे ओव्हनचे टेंपर्चर २०० डिग्री दिले आहे. पण मला वाटतं हे तापमान जास्त झाले त्यामुळे मफिन्सना थोड्या भेगा पडल्या. म्हणून १८० डिग्री ला ओव्हन तापवा. अर्थात तुमच्या ओव्हनचे तापमान त्याच्या प्रकारा प्रमाणे (फॅन फोर्स्ड, कन्वेक्शन, मावे इ इ ) आणि तुमच्या अंदाज / अनुभवा प्रमाणे कमी जास्त अ‍ॅडजेस्ट करावे लागेल.

४. आयसिंग शक्यतो फार आधी बनवून ठेऊ नका कारण ते थिजायला लागेल. थिजलेच तर गरम पाण्यात बोल ठेऊन ते परत नरम करता येते. पण शक्यतो टाळा कारण आयसिंग शुगर गरम केल्याने आयसिंगची कन्सिस्टंन्सी बदलते.

५. सजावटीसाठी अक्रोडाचे तुकडे न वापरता अर्धा अक्रोड लावता येइल किंवा रोस्टेड कॉफी बीन्स पण वापरता येतिल.

CWM-5.JPG

माहितीचा स्रोत: 
बेकिंग बुक आणि माझे प्रयोग
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई गं........ अगदी लग्गेच उचलून तोंडात टाकावेसे वाटताहेत.
कमाल आहे यार लाजो तुझी...... Happy

यम्मी$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

मृण्मयीला अनुमोदन.

लाजो आज करून बघितले.
आयसिंग केले नाही..कारण खूप गोड नको होते. आणि वॉलनट्स कुणाला आवडत नाहीत. पण मफिन्स मस्त झालेत. कॉफीची चव छान लागते आहे. Happy
photo-12_0.JPG

आमचे जंबो मफिन Happy

Coffeecake.jpg

मस्त झाले होते. गरमागरम असतानाच पोरांनी चॉकलेट सॉस ओतून खाल्ले.

वरचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. जसंच्या तसं डोळे मिटून घ्यायचं आणि मफिन करायचे. या प्रमाणात एवढ्या मोठ्या आकाराचे बारा मफिन झाले.

लाजो, 'कप'चे ग्रॅम्स करून सांगतेस का?
मंजू कोणत्या मापाचा 'कप' वापरलास? साधारण चहाचा कप १५० मिली असतो.

लाजो, कालच कणीक वापरुन केले, बटरऐवजी ऑ ऑ वापरले, टर्बिनाडो साखर वापरली. एवढे बदल करुनही मस्त झालेत..घरी गेले की फोटो टाकते. परफेक्ट प्रमाण दिले आहेस. धन्यवाद!

मस्तच गं सोनपरी Happy फोटो नक्की टाक.

कणिक आणि ऑऑ घातल्याने हाय फायबर, लो-कॅल मफिन्स झाले Happy

*टर्बिनाडो साखर << याला आमच्याकडे 'डारामेरा शुगर' म्हणतात. आणि याचे जरा जास्त ब्राऊनिश आणि सॉफ्टर व्हर्जन म्हणजे 'मास्कावाडो शुगर'.

डारामेरा शुगर युज्वली वरतुन पेरण्यासाठी, बिस्किटं वळुन ती बेक करण्याआधी यात रोल करतात तर मास्कावाडो केक, बिस्किटे इ पदार्थात घालण्यासाठी वापरतात. पण असा काहिही रुल नाहिये Happy

मीही केले. मंजूडीने एक कप म्हणजे किती हे मोजून सांगितले. नंतर लाजोने Conversion Tableच दिले त्यामुळे काम सोपे झाले.
चव मस्त, कॉफीचा स्वाद सुरेख लागतो. मला जास्त वेळ ठेवावे लागले पण, १८ मिनिटे.

लाजो, हे बघ माझे मफीन्स्!

Muffin1.jpgMuffin2.jpg

मस्त झाले आहेत ..

मी ह्यात १ tsp व्हॅनिला ही घातलं (सवयीने .. :)) .. तसंच अर्धा कप अक्रोडाचे तुकडे घातले .. अव्हन मध्येही २५ मिनीटं राहू दिले (हेही परत कपकेक्स् च्या नेहेमीच्या सवयीने .. :))

रेसिपीकरता धन्यवाद!

लाजोssssss
मोssssssssठ्ठ्याने खूssssssssप मनाssssssssपासून धन्यवाssssssssद.
मला चॉकलेट फ्लेवरचं बरच काही (जवळ जवळ काहीही) आवडत नाही. त्यामुळे "तुझ्यासाठी काही बेकिंग करता येत नाही"... असं म्हणणार्‍या एका सख्ख्या मैत्रिणीच्या डोम्बलावर ठेवते ही रेसिपी...
आता कुठे जाशील ठके?

लाजो, वीकेण्ड ला एका पार्टी करता परत तुझ्या रेसिपी ने मफीन्स् केले .. ह्यावेळी अ‍ॅक्सिडन्टली बटर दोन tbsp जास्त झालं आणि अक्रोड अर्धा कप च (मागच्या वेळेसारखे) घातले .. १९-२० मिनीटं बेक केले ..

त्यावर कॉफी फ्लेवर्ड क्रीम मात्र एक दुसरी रेसिपी बघून मास्कार्पोन चीज चं केलं .. (घाईघाईत फ्रॉस्टींग करता घेतलेली नॉझल्स् मिळाली नाहीत आणि नुसत्याच झिपलॉक ने सुद्धा जास्त व्यवस्थित पणे घालता येईल हे डोक्यात आलं नाही त्यामुळे चक्क चमच्याने कसंतरी ओबडधोबड पसरवलंय Wink ..

Coffee muffins1.jpgCoffee muffins2.jpg

सशल ने केलेले वरचे मफिन्सचे २ ट्रे माझ्या सकट काही बेकर्सनी फस्त केले.
फार छान चव होती. सशल त्या वरच्या क्रीम ची कृती दे Happy

अय्या, थँक्यू थँक्यू मीपु ..

मी वरचं क्रीम http://www.bbcgoodfood.com/recipes/9075/coffee-cream-and-walnut-cupcakes ह्या लिंकवर जी रेसिपी दिली आहे क्रीम करता ते वापरून केलं .. मास्कार्पोन चा डबा ८ आउन्सांचा होता आणि साखर रोजचीच .. Happy

अरे व्वा सशल!! मस्त दिसतायत मफिन्स Happy आयसिंग पण रिच आणि क्रिमी झाले असेल मस्त Happy

मिच विसरले होते हे मफिन्स.. आता विकांताला करायला हवेत Happy

Pages