कुमुद (वॉटरलिली), कमळ

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 June, 2012 - 03:34

चिखलातून उगवणारे सुंदर फुल म्हणजे कमळ. कमळा सारखेच दिसणारे कुमुद ह्यालाही आपण कमळच म्हणतो.
काही दिवसांपूर्वी सगुणा बागेत जाण्याचा योग आला. तिथे कमळे, कुमुद व त्याबद्दल माहीती सांगणार्‍या पाट्या दिसल्या. पाट्यांमुळे माझे टायपिंगचे श्रम वाचले Lol

खालील सर्व फोटो कुमुदचे आहेत.
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)
कमळाचे फळ त्यात बिया आहेत त्यांना मखाणे म्हणतात. बाकी माहीती वरच्या तक्त्यात आहेच.

१६)

फुलझाडांवरील इतर लेखन व प्रकाशचित्रे.
सुरंगी - http://www.maayboli.com/node/24503
हिरवा चाफा - http://www.maayboli.com/node/26242
अनंत - http://www.maayboli.com/node/27080
आली माझ्या घरी ही दिवाळी (ब्रह्मकमळ फोटो) - http://www.maayboli.com/node/27731
चाफा - http://www.maayboli.com/node/27357
प्राजक्त फुलला दारी - http://www.maayboli.com/node/32489
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया - http://www.maayboli.com/node/32841
मदनबाण - http://www.maayboli.com/node/34478
अबोली - http://www.maayboli.com/node/34998

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा जागू नि ग वर सांगीतल्यापासुन वाट पहात होते यांची. मस्त आहेत ही दोन्ही भावंडे Happy

छान माहीती जागुतै, कमळ आणि कुमुद यातला फरक आत्ताच कळला, ऐरवी सगळी फुल कमळाचीच आहेत, असेच समजत होतो.

धन्यवाद माहीती बद्दल. Happy

स्स्स्...आहाहा!!! सुर्रेख कमळं ... कुमुद आणी कमळ यांतील फरक आज समजला..
धन्स जागुले..
त्या कमळाच्या बिया ना, इकडे मिळतात.. अश्याच हिरव्यागार्,ताज्याताज्या.. त्या सोलून तशाच खायला खूप मजा येते..
मकाणे व्ह्यायची कोणी वाटच पाहात नसावेत इकडे..

मस्त मस्त मस्त.....:)

पंधरावा फोटॉमध्ये कस्ला डेडली लुक आलाय त्या कमळाच्या बियांना.....घाबरलुच म्या...

अप्रतिम प्रचि. जागूजी, असंच आम्हाला निसर्गप्रेमी व्हायच्या मार्गावर सदा हांकत रहा. धन्यवाद.

" चिखलातील कंदमुळाची, म्हणजेच 'भे' ची रुचकर पौष्टीक भाजी करतात" , विशेषतः सिंधी लोकांची ही खूप आवडती भाजी !
" कमळाच्या ' बी' ची उगवण क्षमता हजार वर्षांपर्यंत असते असा संदर्भ आहे" !!!!

माधव कमळ संध्याकाळी दिसले पण ते कोमेजलेले त्यामुळे फोटो काढलाच नाही.

भाऊ धन्यवाद. खुप दिवसांनी तुमची प्रतिक्रिया आली.

जयु, वेका धन्यवाद.

<< खुप दिवसांनी तुमची प्रतिक्रिया आली. >> जागूजी, वाचतो तुमचं लिखाण पण प्रतिक्रिया द्यायला चांगलीं, नवनवीन विशेषणं कुठून आणूं ? Wink

Pages