Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 July, 2011 - 15:40
काल माझ्याघरी दिवाळी आल्यासारखच मला वाटत होत. कारण काल आमच्याकडे २० दिवे झगमगले. आहो म्हणजे २० ब्रम्हकमळे फुलली (ह्याचे खरे नाव ब्रम्हकमळ नाही. हा निवडुंगाचा प्रकार आहे हे माहीत आहे तरी मला ह्याला ब्रम्हकमळ म्हटले की खुप चांगले वाटाते).
१) संध्याकाळी कळ्या मस्त गुबगुबीत झाल्या होत्या.
३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती.
६) फुलाचे संपुर्ण रुप पाहुन उपमा द्यायला शब्दच सुचत नाहीत
७) ह्यांनी आपला परिसर सुगंधाने धुंद केला होता.
८) आता ह्यांना काय उपमा द्यायची ?
९) आम्ही बाजुला आहोत आमच्याकडेही लक्ष द्या.
१०) रात्री ११.३० ला फुललेली फुले अंधारात दिव्यांप्रमाणे उजळून दिसत होती.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वा वा सुरेख आहेत फुलं !
वा वा सुरेख आहेत फुलं ! घमघमाट सुटला असेल इतकी फुलं एकावेळी म्हणजे...
सहीच.. मस्त आहेत फुलं नी फोटो
सहीच.. मस्त आहेत फुलं नी फोटो पण
आहा!!सह्हीच!!कित्ती फ्रेश
आहा!!सह्हीच!!कित्ती फ्रेश वाटलं फुलं नुस्ती बघूनच!!
सुंदर फुलं...बघुनच छान वाटलं
सुंदर फुलं...बघुनच छान वाटलं
सुंदर फुलं...बघुनच छान वाटलं
सुंदर फुलं...बघुनच छान वाटलं
वॉव सही आहेत फुलं जागू. २०
वॉव सही आहेत फुलं जागू. २० एकदम!!
अप्रतिम फोटो आणि फुले!!
अप्रतिम फोटो आणि फुले!! प्र.चि. ४ मधे पानावरची गोगलगाय पण छान आहे.
वा! सुरेख!! मन प्रसन्न
वा! सुरेख!! मन प्रसन्न झाले!!!
गर्भ रेशमी पोत, लेवुनी मंद उषेचा रंग
पर्ण पटलं उलगडुनी देती, फुलास कोंदण संग
पातळ इतकी, पारदर्शी जणू, उमलती पुष्पदले
पराग सळ्या फेर धरती, त्यामधेच शय्या उले
तारारूपी छत्र त्यावरी, ऐटीत समीरे डुले
कुठले ऐसे सुकृत, ज्याचे पुण्य एवढे खुले
मंद सुवासही, शुभ्र रंग अन्, रम्य उषेची प्रभा
हिरव्या पानांतून खुलतसे, ब्रह्मकमळ हा उभा
सुरेख !!
सुरेख !!
अप्रतिम!! एकदम वीस फुलं
अप्रतिम!! एकदम वीस फुलं म्हणजे भारीच एकदम
मस्त !
मस्त !
आहाहा... क्या बात है! सुंदर,
आहाहा... क्या बात है! सुंदर, खुबसुरत, मश्शाल्ला, ब्युटीफुल...
जागु तुझी बाग बघायला आलंच पाहिजे
नरेंद्र गोळे यांची कविताही छानच
अती सुंदर.
अती सुंदर.
जागु जबरीच. खूप हेवा वाटतो
जागु जबरीच. खूप हेवा वाटतो तुझा.
आमच्या घरी २ च्या वर यायला तयार नाहीत ब्रम्हकमळे.
सही $$$$$$$$$
सही $$$$$$$$$
२० ब्रम्हकमळे. हे निसर्ग वैभव
२० ब्रम्हकमळे. हे निसर्ग वैभव पाहून साक्षात ब्रम्हदेवच येतील खाली.
किप ईट अप अल्वेज.
जागू, लकी आहेस तू.
जागु मस्तच गं एकदम.. काय
जागु मस्तच गं एकदम.. काय तोरणं लागलीत तुझ्याकडे दिवाळीची.. आणि तुझी प्रतिभाही काय बहरलीय... अगदी तुझ्या ब्रम्हकमळासारखीच...
गोळेसाहेबांची कविताही तितकीच सुरेख..
सुपर्ब!!!! प्रचि १४ खूप
सुपर्ब!!!!
प्रचि १४ खूप आवडला.
गोळेकाकांची कविताही खूप सुंदर
आमच्या घरी २ च्या वर यायला तयार नाहीत ब्रम्हकमळे.>>>>>>केपी, आमच्याकडे एकच्या वर यायला तयार नाहीत.
हि तुझ्याकडच्या ब्रह्मकमळाची इवलुशी कळी
खरंच दिवाळीची दुर्मिळ शुभदायक
खरंच दिवाळीची दुर्मिळ शुभदायक दीपमाळ ! ङोळेची कविताही साजेशी !
]
[ शीर्षक वाचून वाटलं घरीं मायबोलीकर आले होते त्याचीं प्र.चि. आहेत कीं काय !
अप्रतिम
अप्रतिम
मस्तच
मस्तच
सुंदर
सुंदर
Wow!! भाऊ- सेमपिंच. मलाही
Wow!!

भाऊ- सेमपिंच. मलाही तसेच वाटले.
वाव मस्त. मी १-२ दा ३-४ एवढी
वाव मस्त. मी १-२ दा ३-४ एवढी पाहीली आहेत. पण हे तर सहीच.
व्वा ... मस्तच
व्वा ... मस्तच
वा ग्रेट जागू.. फुले आणि
वा ग्रेट जागू..
फुले आणि तुझी रसिकता दोन्ही.. 
पराग, चनस, वर्षू निल, एक
पराग, चनस, वर्षू निल, एक मुलगी, सावली, सुचित्रा, सिंडरेला, मंजिरी, श्री, लाजो, छाया, कांदेपोहे, वर्षा म, नादखुळा, साधना, भाऊ, विशाल, म्हमईकर, अश्विनी, रैना, मोनालिपा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
नरेंद्रजी तुमची कविता खुप सुंदर आहे. धन्यवाद फुलांचे वर्णन कवितेत केल्याबद्दल.
जिप्सि मला धागा काढताना तुझ्याकडे ह्या फुलांच्या कळीचा फोटो आहे हे आठवत होत. आणि मला वाटलच होत की तु आज पोस्टशिल ती. धन्स.
भाऊ, रैना माबोकर घरी आलेले तेंव्हा दिव्यांची नाही माश्यांची दिवाळी होती
(खर्या अर्थाने मैत्रीची दिवाळी होती.)
मस्तच. फोटो बघताना एवढ
मस्तच. फोटो बघताना एवढ प्रसंन्न वाटते आहे. प्रत्यक्ष बघताना काय मस्त वाटत असेल.
<< भाऊ, रैना माबोकर घरी आलेले
<< भाऊ, रैना माबोकर घरी आलेले तेंव्हा दिव्यांची नाही माश्यांची दिवाळी होती >> म्हणूनच कदाचित ब्रह्मकमळं श्रावणाची वाट बघत उमलायची थांबलीं होतीं, आपल्याकडे फक्त तेंव्हांच लक्ष खेंचलं जाईल हें ओळखून !
अप्रतीम
अप्रतीम
Pages