तसे चाफ्याचे काही प्रकार आहेत. सोन चाफा, कवठी चाफा, हिरवा चाफा नागचाफा, देवचाफा.
खर आहे चाफा कधी बोलला नाही, कधी चालला नाही पण बालपणीच्या मधुर आठवणी मात्र मनात साठवुन आहे अजुन. लहानपणी घराच्या पडविला लागुनच एक देव चाफ्याचे झाड होते. इतके जुने होते की एखाद्या देवळातल्या पुरातन खांबाइतके जाडे होते. आजीला त्याची फुले देवाला वाहण्यासाठी लागायची. ती खाली पडलेली किंवा काठीने काढता येतील अशी फुले घेउन देवाला वाहायची. मग तिला फुले काढून द्यायची म्हणून मी कधी कधी झाडावर चढायचे. झाडावर चढणे सोपे होते कारण झाड थोडे बैठे आणि पडविच्या पत्र्यावर आलेले होते. त्यामुळे पत्र्यावर चढून ही फुले काढता यायची. हे झाड म्हणजे पत्र्यावर चढण्याचा जिनाच होता. पत्र्यावर चढण्याच्या आकर्षणामुळे मला ही फुले काढायला खुप आवडायची.
फुले नसली काढायची तरी कधी कधी खेळ म्हणून मी ह्या झाडावर चढून पडविच्या पत्र्यावर जाउन बसायचे. त्या चाफ्याच्या पाकळ्या काठायच्या त्याचे हार बनवायचे, असे उद्योगही चालायचे. चाफ्याचे झाड ठिसुळ असते, फांदी कधीही तुटू शकते म्हणून घरचे काळजीने ओरडायचे. पण लहानपणीचा हट्ट, जिज्ञासा आणि उस्तुकतेने मला ह्या झाडावर चढायला कधी आळा घातला नाही.
काही दिवसांनी आमच्या घराच्या डागडुगीचे काम निघाले. त्यात पडविचा पत्रा काढून स्लॅप टाकायचा ठरले. मी आनंदात होते. आता पत्र्या ऐवजी स्लॅपवर चढून फुले काढता येतील, व स्लॅपवर खेळायला मिळेल. पण माझ्या बाल मनाला हे लक्षातच आले नाही कि हे झाड पत्र्यावर पुर्ण झुकल्यामुले पत्रे काढताना व स्लॅब घालताना अडथळा आणेल. दुर्देवाने ते झाड काढावे लागले व आता फक्त त्या झाडाच्या आठवणी माझ्या मनात आहेत.
चाफा बोलला नाही, चालला नाही तरी त्याचे अस्तित्व मात्र लगेच जाणवते. दुरवर डोंगरात असलेला चाफा त्याच्या रुपावरुनच ओळखता येतो. ग्रिष्मात ह्या चाफ्यावर पाने कमी असुन फुलेच ह्या झाडाचे रुप, रंग, आकार नावारुपाला आणतात. चाफ्याचा मंद सुगंधही मोहक असतो. ह्या चाफ्याच्या झाडाला क्वचित शेंगा लागतात. त्या शेंगा खाण्यासाठी साप ह्या झाडावर येतात असे म्हणतात. तसेच ह्या शेंगेतील बीचा साप चावल्यावर होणार्या दंशावर औषधी आहे असेही म्हणतात.
ग्रामिण भागात कृष्ण्जन्म, रामजन्माला ह्या चाफ्याला विशेष महत्व असते. चाफयाच्या फांद्या अगदी ठिसुळ असतात. पुर्वी पांढरा आणि मध्ये पिवळा असा चाफा डोंगर, रानात व इतरत्र दिसुन यायचा ज्याच्या फुलांबरुनच तो दुरवरुन ओळखला जायचा व अजुनही काही भागात दिसतो. आता ह्या चाफ्याचे विविध रंग व रुपही आले आहेत. त्यांची लागवड बागेतही केली जाते. पण ह्या झाडांचा पर्णसंभारही जास्त असतो.
मस्त मस्त !
मस्त मस्त !
जागू मस्त! पण सोनचाफ्याशिवाय
जागू मस्त! पण सोनचाफ्याशिवाय अपूर्ण वाटतय
सही रे. शेवटचा खास.
सही रे. शेवटचा खास.
वा ! फारच सुंदर फोटो.
वा ! फारच सुंदर फोटो.
अग जागु, किती सुंदर प्रचि.
अग जागु, किती सुंदर प्रचि. सोनचाफा, हिरवाचाफा आणि कवठीचाफा पण मिळाले तर इथेच अॅड कर. समस्त परिवार एकत्र राहुंदे.
खतरनाक सुंदर
खतरनाक सुंदर
अ प्र ति म!!! मामींना
अ प्र ति म!!!
मामींना अनुमोदन. सगळी चाफा फॅमिली येऊ देत
(No subject)
मामीला अनुमोद>>न!!!! कित्ती
मामीला अनुमोद>>न!!!! कित्ती सुरेख फुलं..इथपर्यन्त दरवळला सुवास!!!
मस्तच ग जागू
मस्तच ग जागू
जागू, सुंदर फोटो, आणि लेखन पण
जागू,
सुंदर फोटो, आणि लेखन पण छान! काही काही आठवणी मनात अगदी घर करून असतात नाही? मस्त, खूप आवडले फोटो आणि लेखन. मामी यांना अनुमोदन.
मस्तच प्रचि आणि लेखन दोन्ही.
मस्तच प्रचि आणि लेखन दोन्ही.
जागु, मला आज मिळालेली नविन
जागु,

मला आज मिळालेली नविन माहिती (धडा) ...धन्स !
१.चाफ्याचे एकूण तीन प्रकार असतात,खुप पुर्वी पासुन आहेत ,मला आज कळालं.
सुंदर गुलाबी चाफा प्रथमच
सुंदर गुलाबी चाफा प्रथमच पाहिला
व्वा जागू...........छान!
व्वा जागू...........छान!
जागू.. मस्त एकदम !!
जागू.. मस्त एकदम !!
वॉव ! गुलाबी चाफा अफलातून !
वॉव ! गुलाबी चाफा अफलातून !
जागुतै व मस्त फोटो. मला
जागुतै व मस्त फोटो. मला चाफ्याच्या फुलाचि अंगठी घालायला खुप आवडते.
(लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या)
माझ्या शेजारच्या घरात कवठी चाफ्याच झाड ( झुडुप) आहे पण मी त्यावर फुल कधिच पाहिलं नाहि.
छान ..
छान ..
सुरेख
सुरेख
व्वा! जागू, मस्तच. माझ्या पण
व्वा! जागू, मस्तच. माझ्या पण काही आठवणी जाग्या झाल्या.
मामीना १०००० मोदक.
जागु - एक दीर्घ श्वास घेतला
जागु - एक दीर्घ श्वास घेतला मी, फोटोज बघितल्यावर. मला एकदम सुगंध जाणवला, इतके मस्त फोटोज आहेत.
साक्षी - मला पण देवचाफा बघितल्यावर फुलाच्या पाकळ्या दुमडुन केलेली अंगठी आठवली आणि तिचा गार गार मुलायम स्पर्श पण.
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल
सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.
मस्त मस्त....
मस्त मस्त....