Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माधवचे उत्तर जास्त चपखल
माधवचे उत्तर जास्त चपखल वाटतेय.
फार पूर्वी टीव्हीवर 'कही जिया
फार पूर्वी टीव्हीवर 'कही जिया जले कही दिया' अशी सिरियल होती त्याची आठवण झाली
येस येस माधव इस म्हणींग द
येस येस माधव इस म्हणींग द राईट
माधव बरोबर कोडं क्र.
माधव बरोबर
कोडं क्र. ०३/०४८
कही दीप जले कही दिल जरा देख ले आकर परवाने
Permit = परवाना
2 Permit = परवाने
०३/०५० >> तसविर तेरी दिलमे
०३/०५० >> तसविर तेरी दिलमे जिस दिन से उतारी है ?
माधव डोळे नाहियेत तुझ्या
माधव डोळे नाहियेत तुझ्या गाण्यात.....आणि ती तरुणी जिप्सीची मनधरणी करतेय. जिप्स्या, तुला आज रात्री स्वप्नात काय काय दिसणारे माहित नाही रे बाबा
तस्वीर तेरी दिलमें जिस दिनसे
तस्वीर तेरी दिलमें जिस दिनसे उतारी है ???
ओह ते परमीट चित्राचा भाग होता
ओह ते परमीट चित्राचा भाग होता का? मला वाटले की माबोवर जो बदल होतोय त्यामुळे तिथे ती जाहिरातच दिसतेय कसली तरी. माडोदो.
स्वप्ना दिलकी नजर से नजरोके
स्वप्ना
दिलकी नजर से नजरोके दिलसे
ये बात क्या है
कोई हमे बताए ???
माधव, मला तर ते परमिट दिसलंच
माधव, मला तर ते परमिट दिसलंच नाही. जिप्सी, तुझ्या गाण्यात फोटो गायब आहे. काय हे? शोनाहो!
स्वप्ना, आखोंसे जो उतरी है
स्वप्ना, आखोंसे जो उतरी है दिलमे तसवीर है एक अन्जाने की? (पण तुला हे गाणे सुचण्याची शक्यता कमीच आहे
)
माधव, यू अंडरएस्टिमेट
माधव, यू अंडरएस्टिमेट मी.....हेच ते गाणं.....माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.
कोडं क्र. ०३/०५०
मामी तुमच्या कोड्याला जोडून माझं कोडं. जिप्सीला त्या आदिवासींची भाषा येत न्सते आणि त्यांना ह्याची. पण ती मुलगी रागावली आहे हे जिप्सीला कळतं. तो तिला समजावयाचा प्रयत्न करतो. पण भाषा येत नसल्याने त्याचा नाईलाज होतो. मग तो तिथून निघून जायची तयारी करतो. त्या मुलीला पश्चात्ताप होतो. पण पुन्हा भाषेचा प्रश्न. त्याला समजवायचं कसं? मग ती कॅमेराने जिप्सीचा फोटो काढायची अॅक्शन करते (जिप्सीने विरु बसंतीला बंदूक चालवायला शिकवतो तस्स तिला कॅमेरा शिकवलेला असतो बहुतेक!). मग स्वतःच्या डोळ्यांकडे बोट दाखवते आणि शेवटी हृदयाकडे नेते. हे कोडं जिप्सीला लगेच सुटतं (सुटणारच!). ती असं कोणतं गाणं सुचवते जे जिप्सीला थांबवतं?
उत्तरः
आंखोसे जो उतरी है दिलमे तस्वीर है एक अन्जानेकी
खुद धुंड रही है शमा जिसे क्या बात है उस परवानेकी
मलाही ते परमीट दिसलंच नाही.
मलाही ते परमीट दिसलंच नाही. मग उत्तर पाहिल्यावर पुन्हा चित्रं पाहिलं तेव्हा दिसलं.

तात्पर्य : परमीटची गाणी विचारलीत तर चित्र मधोमध टाकणे.
अजुन एक कोडं क्र. ०३/०५१
अजुन एक
कोडं क्र. ०३/०५१
दम भर जो उधर मुंह फेरे ओ
दम भर जो उधर मुंह फेरे ओ चंदा
मै उनसे प्यार कर लूंगी
बातें हजार कर लूंगी
योगेश, आज ज्वलनशील गोष्टी का
योगेश, आज ज्वलनशील गोष्टी का रे प्रत्येक कोड्यात
सह्हिए मामी कोडं क्र.
सह्हिए मामी
कोडं क्र. ०३/०५१

दम भर जो उधर मुंह फेरे ओ चंदा मै उनसे प्यार कर लूंगी
बाते हजार कर लूंगी
बागेश्री good observation
बागेश्री good observation

हरे रामा! आता हे गाणं ऐकलं की
हरे रामा! आता हे गाणं ऐकलं की डोळ्यांपुढे लुंगी दिसणार.
लुंगी
लुंगी
०३/०५२ एक भिषण सोपे चित्रकोडे
०३/०५२ एक भिषण सोपे चित्रकोडे
स्वप्ना काल मी "एकच मेली के
स्वप्ना

काल मी "एकच मेली के मंडवेतले" गुणगुणत होतो.
(No subject)
एक भिषण सोपे
एक भिषण सोपे चित्रकोडे>>>>>फक्त भीषणच दिसतंय सोप्पं कुठाय???
कोडं क्र. ०३/०५३ शबाना
कोडं क्र. ०३/०५३
शबाना आयटीआयचा टर्नर आणि फिटरचा कोर्स करत असते. अंतिम परीक्षेत तिला सगळे पेपर्स उत्तम जातात. प्रॅक्टिकल तर तिला नेहमीच सोप्पं जात असतं. पण आजच्या स्क्रू फिटिंगच्या प्रॅक्टिकल मध्ये तिला स्क्रू फिट करायला खूप प्रयास पडत असतात. तेव्हा ती खुदाची प्रार्थना करते. कशी?
चित्रकोडे ०३/०५३
चित्रकोडे ०३/०५३
फक्त भीषणच दिसतंय सोप्पं
फक्त भीषणच दिसतंय सोप्पं कुठाय??? >>
चित्रात फक्त दोनच शब्द दिले आहेत. ते शब्द कळले की गाणे सुचायला काहीच वेळ लागणार नाही. महाप्रसिद्ध गाणे आहे.
माधव एक शब्द सामना + वॉल-ई =
माधव
एक शब्द सामना + वॉल-ई = सामनेवाली आहे का?
मामी आता सांग उत्तर
मामी
आता सांग उत्तर
हे पण ओळखा ना कुणीतरी - दिनेश
हे पण ओळखा ना कुणीतरी - दिनेश / भरत / जिप्सी?
०३/०४५: महाराजांनी सुरत लुटले तेव्हा एका सैनिकाच्या सामानात बसून एक भुंगी पण सुरतला जाते. तेंव्हा सुरतमध्ये गुलाबी फुलांची काटेरी झाडे खूप होती. तर त्या गुलाबी फुलातला मध पीता पीता भुंगीला भुंगा भेटतो आणि दोघांचे प्रेम जमते. तर भुंगी कुठले गाणे म्हणेल?
Pages