..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं क्र. ०३/०४४ चे क्लु:

१. काळ्या कपड्यातील स्त्री - तनहाई
२. झोपण्याच्या विरूद्ध

आत्ता तरी ओळखा Happy

०३/०४५: महाराजांनी सुरत लुटले तेव्हा एका सैनिकाच्या सामानात बसून एक भुंगी पण सुरतला जाते. तेंव्हा सुरतमध्ये गुलाबी फुलांची काटेरी झाडे खूप होती. तर त्या गुलाबी फुलातला मध पीता पीता भुंगीला भुंगा भेटतो आणि दोघांचे प्रेम जमते. तर भुंगी कुठले गाणे म्हणेल?

फुलाचे नाव जिप्सी सांगेलच. पुढचे गाणे तुम्ही ओळखायचे आहे Happy बरेच जुने पण अप्रतिम गाणे आहे.

स्वप्ना, तुझ्या कोड्यातलं गाणं 'ओ साथी रे, दिन डूबे ना..' हे आहे का? (चुकीचं असावं. सिनेम्यात तीन हिरो आहेत कारण.)

माधव, पत्थरकी मूरत आणि गमका पता ह्यापुढे गाडी जात नाहिये....गेंद हा शब्द कुठे बसत नाही. श्रध्दा, नाही ग

मामी? मी ड्यु.आयडी नाहीये ग Sad

गाण्याची चित्रं (शब्द) उलटे पालटे केले आहेत. आणि अर्थातच सगळ्या शब्दांची चित्रं दिलेली नाहीत. गाण्याच्या दोन ओळी आहेत त्यात.

जिप्सी नाही. तुला फुल कुठे दिसले?

मला पत्थर के सनम वाटलं होतं
उदासगाणे आहे म्हणून गम चे चित्र .. पण नसावे ते बहूधा Proud

माधव भुंग्यावरची सगळी गाणी आठवतेय.

१) भवरेने खिलाया फुल फुलको ले गया राजकुवर
२) गुन गुना रहे है भवरे खिल रही हई कली कली

माधव, सॉरी रे.....जिप्सी, ४ * ३ = १२ असं तर नसेल? किंवा गाण्यात 'पार' हा शब्द असेल.....माझ्या कोड्याचं उत्तर सांगू का?

माधव ते तिसरे चित्र बॉल आणि बाउंड्रीचे आहे का? >> हो. आणि त्या अनेक आहेत Happy आणि हो त्या गाण्यात जिप्स्याची काळी बाई पण आहे Happy सांगा आता.

जागू त्या गाण्यात भवरा नाहीचे Happy

माधव,

ये शाम की तनहाइयां, ऐसे मे तेरा गम
पत्ते कही खडके, हवा आई तो चौंके हम

मूर्ती 'शाम'ची आहे. Happy आणि 'चौंके'... Lol भारी होतं.

श्रद्धा, सही रे सही (सही ग सही जास्त बरोबर होइल)

००३/०४६: ये शाम की तनहाइयां, ऐसे मे तेरा गम पत्ते कही खडके, हवा आई तो चौंके हम

चित्रात दिलेले शब्द ठळक केले आहेत.

कोडं क्र. ०३/०४१

लग्न होऊन ती परदेशात आली खरी पण निसर्गाचं चक्रच अजब होतं. रात्रिचे बारा वाजले तरी आकाशात सूर्य आपला तळपतोय. त्यातून नवरा निशाचर. जाड पडदे ओढून हिने खोलीत अंधार केला तरी हा टेबललॅम्प लावून लॅपटॉपवर काम करत बसलेला. वर हिने काही म्हटलं की म्हणायचा 'अग, कसली रात्र? बाहेर बघितलंस का किती उजेड आहे ते?'. हिची झोप काही पूर्ण होईना. शेवटी एकदा वैतागून तिने तो टेबललॅम्प फोडला. तिचा रुद्रावतार बघून नवरा आधी अवाक झाला पण मग त्याने एक झक्कास गाणं गुणगुणायला सुरुवात केली आणि ती कधी हसायला लागली ते तिलाच कळेना. ओळखा बरं गाणं.

उत्तरः

हम तुमको जो पसंद वही बात करेंगे
तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे

Pages