Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
व्ही गार्ड च्या इन्व्हर्टरची
व्ही गार्ड च्या इन्व्हर्टरची अॅड तद्दन बकवास आणि वाह्यात आहे.
>>>>>>>> अगदी. कैच्याकै अॅड आहे
फ्लिपकार्टची नवी अॅड छान
फ्लिपकार्टची नवी अॅड छान आहे. मॅक्स न्यू यॉर्क लाईफची पण चांगली आहे पण कुठलीही विमा कंपनी इतकी सचोटीने वागेल असं वाटत नाही.
हॅवल्स पंख्यांची राजेश खन्ना
हॅवल्स पंख्यांची राजेश खन्ना असलेली जाहिरात हृदयद्रावक आहे. गालफडे बसलेला राजेश खन्ना अब्राहम लिंकनसारखा दिसतोय.
कॅडबरीच्या शुभारंभ - बसस्टॉपवरच्या जाहिरातीतला तो मुलगा परवरिश मालिकेत एका गुंड मुलाचा थर्ड असिस्टंट म्हणून दिसतोय.
उषा नाडकर्णी क्लेमंट असलेल्या इन्शुरन्स कंपनीची जाहिरात मला दिशाभूल करणारी वाटतेय. जाहिरातीत ते खात्यावर जमा झालेल्या युनिट्सच्या मार्केट व्हॅल्यूचा चेक ४८ तासांत पाठवू असे सांगतात (असे आजकाल सगळेच करतात, त्यात काय?) क्लेम अमाउंट (किंवा इन्शुअर्ड व्यक्तीचा ज्या रकमेसाठी विमा काढला, ती किती दिवसात देणार त्यावर अळीमिळी गुपचिळी आहे.)
श्री.मयेकर यानी 'हॅवेल्स'
श्री.मयेकर यानी 'हॅवेल्स' च्या [जी आयपीएलवर कंटाळा येईपर्यंत झळकत आहे] जाहिरातीमधील 'राजेश खन्ना' बद्दल जे लिहिले आहे ते मलाही लिहायचे होते, पण त्याचा सुवर्णकाळ मी पाहिला असून त्या सुंदर आठवणी आजही मनी वसत असल्याने काकाचे "उद्ध्वस्त धर्मशाळा' रूप पाहून डोळे मिटून घ्यावेत असे वाटत राहिले आणि मग त्याविषयी काही लिहूच नये असे वाटू लागले. पण आता वरील प्रतिसाद वाचल्यावर पटले की त्याच्या सद्यस्थितीविषयी अशी खिन्नता व्यक्त करणारे त्याचे चाहते इथेही आहेत.
काय जमाना होता.....सर्वार्थाने एका सुपरस्टारचा....आणि आज ऐरावताचे रुपांतर एका आटून गेलेल्या सुकड्यात झाले आहे.
सर्व गर्वावर "काळ" जालीम औषध आहे हेच खरे.
मला ती जाहिरात आवडली. बराच
मला ती जाहिरात आवडली. बराच म्हातारा दिसत असला तरी एकूण जमल्यासारखी वाटली. मधे त्याच्याबद्दल ऐकलेल्या गोष्टींच्या मानाने बराच डिग्निफाईड दिसला.
"मधे त्याच्याबद्दल ऐकलेल्या
"मधे त्याच्याबद्दल ऐकलेल्या गोष्टींच्या मानाने बराच डिग्निफाईड दिसला...."
~ फारएण्ड, जाहिरात असल्याने काकाला सादरकर्त्याने मुद्दाम 'डिग्निफाईड' केले असण्याचीही शक्यता आहे. शेवटी हॅवेल्स धंदा पाहणार असल्याने जाहिरातीसाठी घेतलेली व्यक्तीचे 'प्रेझेन्टेशन' सुसह्य कसे होईल याकडे निर्माता लक्ष देणारच. त्याच्याबद्दल [म्हणजे प्रकृतीविषयक] ऐकलेल्या बातम्यात तथ्य असेलदेखील....विशेषतः जाहिरातीच्या अखेरच्या क्षणात त्याचे डोळे तिरळे झाल्याचे जाणवते.
इंडियन आयडॉल्स च्या अॅडस
इंडियन आयडॉल्स च्या अॅडस मस्त आहेत
हॅवल्स आणि इंडियन आयडॉल्स
हॅवल्स आणि इंडियन आयडॉल्स च्या अॅडसबद्दल अनुमोदन. अमूलची दुधाची अॅड छान वाटली.
फारेण्ड, काल तुमच्या
फारेण्ड, काल तुमच्या प्रतिसादावर उत्तर लिहिले आणि मायबोली गायब. असे दुसर्यांदा झाले आहे!! (याआधी 'अबब.....'वर.)
राजेश खन्ना हा पहिला आपला सुपरस्टार. त्याच्यासाठी वेड्या झालेल्या तरुणी त्याला ताप आला तर आपल्याजवळच्या त्याच्या फोटोवर उपचार करायच्या असा एक प्रसंग 'गुड्डी'त आहे, आणि तो खराही वाटावा. मागे लागणारे फॅन्स आणि भोवतीचे चमचे हेच त्याच्यासाठी श्वास आणि अन्नपाणी होते.
अशा माणसाला आज कोणी विचारत नाही, कदाचित ओळाखतही नाही, अशी स्थिती झाली आहे. त्या जाहिरातीतूनही हेच दिसले, त्यामुळे ती जाहिरात आणखीच हृदयद्रावक वाटली. ही जाहिरात करून राजेश खन्नाने वास्तवाचा स्वीकार केल्याचे दिसत असले तरी म्हातारा सिंह गवत खाताना बघवत नाहीच.
ही आणि युवराजच्या कॅन्सरची बातमी कॅश करणारी जाहिरात काही वर्षांपूर्वी अनुचित मानली गेली असती का असे वाटले.
ह्याच जाहिरातीवर लिहायला आले
ह्याच जाहिरातीवर लिहायला आले होते! पहिल्यांदा पाहिली तेव्हा तो खरा राजेश खन्ना नाहीच असेही वाटले होते. खप्पड झालेला राजेश खन्ना खरंच बघवत नाही. शिवाय 'मैं मेरे फॅन्स कभी नहीं भूलता'चं प्रयोजन काय? म्हणजे राजेश खन्नालाच घेऊन ही जाहिरात का केली? तो अनिवार्य का आहे ह्या जाहिरातीसाठी?
हॅवेल्सच्या इतर जाहिराती- यह हमारे पूरे साल की मेहनत है, हम न्यूजपेपर बडी मेहनतसे छापते है- ह्या मस्त आहेत.
"हॅवेल्सच्या इतर जाहिराती- यह
"हॅवेल्सच्या इतर जाहिराती- यह हमारे पूरे साल की मेहनत है......, "
~ सहमत. उत्तरपत्रिकेंचा पंख्यासाठी वापर करणार्या शिक्षिकेसमोर उभ्या राहिलेल्या त्या छोट्या बाहुल्या तर एकदम खास, त्यातही 'यह हमारी पूरे साल की मेहनत है....' म्हणणारी छोकरी शेवटी इतके सुंदर हसते की जीव ओवाळून टाकावा तिच्यावर.
[इतक्या लोभस जाहिराती काढून खन्नाची मुडदूस जाहिरात टाकावी असा विचार हॅवेल्स मॅनेजमेन्टने का केला असेल याचे राहूनराहून आश्चर्य वाटते.]
मीही हॅवेल्सच्या
मीही हॅवेल्सच्या जाहीरातीबाबतच लिहायला आलो होतो. मलाही राजेश खन्ना कडे बघवत नव्हते.
ती मगरमच्छ और कुत्ता ची अॅड
ती मगरमच्छ और कुत्ता ची अॅड जाम डोकं खाते. आणि पाच मिनीटात तीन चार वेळा दाखवतात.
मला आवडली हॅवेल्सची अॅड, ये
मला आवडली हॅवेल्सची अॅड, ये शाम मस्तानीची ट्यून आणि त्याचे टिपीकल मान हलवणे!
ये शाम मस्तानीची ट्यून आणि
ये शाम मस्तानीची ट्यून आणि त्याचे टिपीकल मान हलवणे!>>> एक्झॅक्टली! मलाही. आत्तापर्यंत एरव्ही त्याचे ते पहिले काही चित्रपट सोडले तर त्याचे ते हावभाव कायम कृत्रिम वाटले होते पण येथे नाही वाटले.
अरे ती जेम्सची अॅड जाम
अरे ती जेम्सची अॅड जाम डोक्यात जाते!
हेमा मालिनीची वॉटर
हेमा मालिनीची वॉटर प्युरिफायरची अॅड डोक्यात जाते माझ्या. बाटली लपवून आणते
ते कशाला?
त्याचे टिपीकल मान हलवणे!>> ते
त्याचे टिपीकल मान हलवणे!>> ते तुम्हाला करूण नाही वाटले? सिरियसली विचारत आहे.
नाही वाटले, सिरिअसलीच
नाही वाटले, सिरिअसलीच सांगतोय.
इट्स बीन लाँग दॅट ही हॅज मेड अ कॅरिकेचर ऑफ हिमसेल्फ, नाऊ देअर इज नो मोअर पिटी लेफ्ट!
नाऊ देअर इज नो मोअर पिटी
नाऊ देअर इज नो मोअर पिटी लेफ्ट!>> ओह्के!
ति कूथल्याशा मोबाईल्ची
ति कूथल्याशा मोबाईल्ची जहीरात.. त्यात शेवटी ती मुलगी "अंकल" म्हणुन चिडवते ते नाही आवडले. मोठ्यांचा अपमान करायचा संदेश जातो त्या जहीरातीतुन असे वाटते.
कटरिनाची टायटन रागा ची
कटरिनाची टायटन रागा ची (बहुतेक) ती अॅड नाही आवडली. कुणाचं तरी फ्लाईट डिले होतं म्हणून ही टवळी स्वत:च्या आईकडे जाऊन तिला विचारते की या वीकेन्डला काय करतेयस?
पहिला ऑप्शन रद्द/लेट झाला म्हणून आई? 
कुणाचं तरी फ्लाईट डिले होतं
कुणाचं तरी फ्लाईट डिले होतं >>> तिच्या बॉफ्रे/नवर्याचं फ्लाईट रद्द होतं म्हणून तो म्हणतो की आपण आपली ट्रिप पोस्टपोन करू या. पण ती आईबरोबर ट्रिपला निघून जाते. मला आवडली ही जाहिरात. स्वत:चे निर्णय स्वतःच घेणारी स्त्री आवडली.
वरच्या जाहिरातीमधली आई,
वरच्या जाहिरातीमधली आई, कतरीनाची आई म्हणून शोभते.. चेहरेपट्टीत बरेच साम्य आहे दोघींच्या
नंदिनी ते इतक्या इफेक्टिव्हली
नंदिनी ते इतक्या इफेक्टिव्हली त्यांना दाखवता आलेलं नाहिये बहुतेक. किंवा कतरिनाने तरी गंडवलिये जाहिरात.
बाय द वे अशी घड्याळं घालून स्वतंत्रता येते का?
मलाही चांगली वाटली ती
मलाही चांगली वाटली ती जाहिरात. तुम्ही एखादी ट्रिप एन्जॉय करायला पुरूषांवर अवलंबून नाही, इतर बायकांबरोबर सुद्धा करू शकता असा मेसेज दिसतो. (मुलाबाळांसकटही जाऊ शकता असे दाखवले असते तर जास्त अॅप्रेशिएट झाली असती जाहिरात
)
पोस्ट दोनदा पडली.
पोस्ट दोनदा पडली.
मोठ्यांचा अपमान करायचा संदेश
मोठ्यांचा अपमान करायचा संदेश जातो त्या जहीरातीतुन असे वाटते.>>>>>>>>>>>>अग मोठे इरिटेड करत असले तर ???? फक्त मोठे आहेत वयाने म्हणुन आदर करावा का ????
जाहीरात मधला तो माणुस जोरात फोन वर बोलत अस्तो...आनि बाकीची मुल-मुली टाइमपास करत खात असतात तेव्हा तो जोरात ओरडतो ,,आनि मग ती मुलगी तो करत असलेल अवघड काम तिच्या फोन मधुन कस सोप करता येत ते सांगते.....आनि तो अंकल असल्यावर अंकल च बोलणार ना
<<<पौर्णिमा | 7 May, 2012 -
<<<पौर्णिमा | 7 May, 2012 - 13:36 नवीन
ह्याच जाहिरातीवर लिहायला आले होते! पहिल्यांदा पाहिली तेव्हा तो खरा राजेश खन्ना नाहीच असेही वाटले होते. खप्पड झालेला राजेश खन्ना खरंच बघवत नाही. शिवाय 'मैं मेरे फॅन्स कभी नहीं भूलता'चं प्रयोजन काय? म्हणजे राजेश खन्नालाच घेऊन ही जाहिरात का केली? तो अनिवार्य का आहे ह्या जाहिरातीसाठी?
हॅवेल्सच्या इतर जाहिराती- यह हमारे पूरे साल की मेहनत है, हम न्यूजपेपर बडी मेहनतसे छापते है- ह्या मस्त आहेत.>>>
राजेश खन्नालाच घेऊण ती जाहिरात केली जायला हवी
अमिताभ म्हणजे काय हे कोणालाही माहीत नसतानाचा हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिला व आजपर्यंतही एकमेवाद्वितीय असलेला सुपरस्टार आहे तो, इतके ग्लॅमर अमिताभला कधीही लाभले नाही
राजेश खन्नाची जादूच और, मला खटकले ते बाबूमोशाय असे म्हणणे. पण आता ते खटकत नाही. कारण तीच तर जाहिरात आहे. 'तू असशील कुणीही, पण माझे फॅन्स आणि फॅन्सचा संग्रह तुला कधीच लाभणार नाही' हे विधान अक्षरशः सत्य आहे.
इलाहाबादमध्ये हेमवतीनंदन बहुगुणांविरुद्ध अमिताभ उभा राहिला तेव्हा त्याच्या रस्त्यात तरुणींनी आपले दुपट्टे अंथरले होते. ही बाब राजेश खन्नाच्या वलयसमोर अत्यंत किरकोळ होती.
पंजाब आणि उत्तर प्रदेश यात हा
पंजाब आणि उत्तर प्रदेश यात हा फरक पडतो
यूपीचे पब्लिक जमीनीवर असते आणि जीवनाच्या जवळ राहून जगत राहते
पंजाब म्हणजे झिंग! तेथे आकाशाशी जवळीक केली जाते
Pages