मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्होडाफोनच्या लेटेस्ट अ‍ॅड्स पैकी एकही अ‍ॅड नाही आवडली. इंस्टंट कनेक्शन Sad बहुदा चष्मा बदलावा लागेल मल Lol

>>फँटाची 'मचल मचल जाये' वाली अ‍ॅनिमेटेड जाहिरात मस्त आहे. << सहमत, मस्त आहे जाहिरात.

व्होडाफोनची एक जाहीरात बरी आहे, ज्यात कुत्रं सायकलची घंटी ऐकून पोराला बाहेर खेचत आणतं ती....
दुसरी ज्यात पोरं गप्पा मारतायत आणि खाली अजोबांची वाट कुत्र्याने अडवून धरली आहे ती एकदम बकवास Angry
मूळात ते बुटकं-बसकं कुत्रंच माझ्या टाळक्यात जातं. Angry

आधी कुणी ह्याबद्दल लिहिलंय का माहीत नाही; पण 'मध्य प्रदेश टूरीझम' ची अ‍ॅड - हाताच्या सावल्यांनी केलेली - भन्नाट आहे! माझे दोन्ही ज्युनिअर्स आणि मी ही अ‍ॅड लागली की त्या हातांची कॉपी करायचा प्रयत्न करतो. जाम मजा येते! Happy

व्होडाफोनची एक जाहीरात बरी आहे, ज्यात कुत्रं सायकलची घंटी ऐकून पोराला बाहेर खेचत आणतं ती.... >>> त्यात ते मुलगा-मुलगी जरा मोठ्या वयाचे दाखवले असते तर चाललं असतं, इतकी लहान शाळकरी मुलं त्यात शोभून दिसत नाहीत.

चेंज द गेम ची लेटेस्ट जाहिरात छान आहे.

त्यात ते मुलगा-मुलगी जरा मोठ्या वयाचे दाखवले असते तर चाललं असतं, इतकी लहान शाळकरी मुलं त्यात शोभून दिसत नाहीत.>> मलाही अगदी असच वाटत.

व्होडाफोन बद्दल सहमत. कन्सेप्ट्स चांगले आहेत. मुलं थोडी मोठी जास्त योग्य होती. मला तर हे Irresponsible Marketing वाटते.

वोडफोन अ‍ॅड्स बद्दल सहमत... पोरं फार कमी वयाची घेतली आहेत.

ती एक अश्याच टेलिकॉम ऑपरेटरच्या अ‍ॅडची कन्सेप्ट मस्त आहे, तो मधे मधे थांबतो आणि ती त्याला कॉईन टाकत टॉक टाईम वाढवते Happy

तो मुलगा जिमनॅस्टीक करतोय, पडतोय आणि त्याची आई मख्खासारखी बसून पाहतेय, काय तर म्हणे 'अभी पूरी रात बाकी है'. बहुतेक बॉर्नव्हिटा.
त्या आईच्या कानाखाली दोन ठेवाव्या वाटतात>>>>

आगाऊ, ती जाहिरात 'ऐकली' का? तो मुलगा मनात म्हणत असतो की, आई म्हणते काय चुका करायच्या त्या प्रॅक्टिसमध्येच कर, उद्या स्पर्धेत नको Happy ह्यात एवढा राग येण्यासारखं काय आहे?

ती 'बिट्टू टेस्ट'वाली बाई कोण आहे? तिचा/ तिला दिलेला आवाज खूपच ओळखीचा वाटतो आहे.

मंजूडी, मला स्पर्धा आणि ती जिंकण्यासाठीचा त्यात दाखवलेला आटापिटा, त्या आईच्या चेहर्‍यावरील भाव; सगळच 'इनह्यूमन' वाटले. इतकी तयारी करुन स्पर्धेत चूक झाली तर बया पोराला बदडून काढेल असे वाटते. खेळाची मजा, चुका करण्यातली, त्यातून शिकण्याची मजा असं काही आहे की सगळं फक्त 'तैय्यारी जीत की' साठीच?
एनी वे, नॉट माय कप ऑफ टी ऑर बॉर्नव्हिटा Happy

मंजूडीला अनुमोदन. तो मुलगा कॉन्फिडण्ट वाटतो, आईचं आणि त्याचं घट्ट नातं जाणवतं त्या जाहिरातीत.

बाकी, तो मुलगा पाहून मला नेहमी वाटतं की चिनूक्स लहानपणी तसा दिसत असावा Happy

आगाऊला अनुमोदन - 'इनह्यूमन' शब्द सोडून.
या वयात पण फक्त जिंकण्याकरताच खेळायचं तर मग खेळण्याकरता कधी खेळायचं? पण असे अतिमहत्वाकांक्षी पालक विशेषतः आया खूपच दिसतात आजकाल.
हा तो मुलगा मात्र 'दुर्मिळ नमुना' म्हणायला हवा. इतक्या वेळ सराव करून न कंटाळणारी मुले अभावानेच आढळतात - पण आढळतात. त्यामुळे 'इनह्यूमन' नाही वाटली. पण जराही अपिल नाही झाली.

पूर्वी 'I am a complan boy' म्हणणारा मुलगा (शाहिद कपूर होता तो) जितका जवळचा वाटायचा तितकाच हा मुलगा लांबचा वाटतो.

खेळाची मजा, चुका करण्यातली, त्यातून शिकण्याची मजा असं काही आहे की सगळं फक्त 'तैय्यारी जीत की' साठीच?>> पटल..
या वयात पण फक्त जिंकण्याकरताच खेळायचं तर मग खेळण्याकरता कधी खेळायचं? पण असे अतिमहत्वाकांक्षी पालक विशेषतः आया खूपच दिसतात आजकाल.>> खरय अगदी..

तो मुलगा कॉन्फिडण्ट वाटतो >> अगदी अगदी.

त्या जाहिरातीत निदान मुलाची स्वतःची जिद्द दिसते.

त्या उलट दुसरी जाहीरात ( complan की horlics आठवत नाही.)

खीचके लम्बा तो नही कर सकती ना ... basketball ची .... ती आई मला जास्त अतिमहत्वाकांक्षी वाटते.

आणि आणखी एक डोक्यात जाणारी आइ म्हन्जे 'नितु सिंग '
I know everything ...... अतिशय वैताग आणते ... रेडियोवर लागली तर जास्तच.

मला आवडलेली जाहिरात "pear soap"... " छोटी मुलगी आणी आई ची-
"मीम्मी मीम्मी.....
क्या हुआ???
आज मेली इझ्झाम हॅ.. Sad
तो??
आप का चेहला मेले लिये लकी हॅ.. Wink Lol "

खुप छान आहे हि जाहिरात Happy

मला सगळ्याच सेलिब्रिटी/एक्स-हिरवीण आया जाम डोक्यात जातात. आणि जाहिरातीतील बरीचशी मुलेही Happy

ऑरेंज बुड्बुडे
तोंडात सारीकडे,
नाचती हो थुई थुई....

मन... आनंदी होई.
मन आनंदी होई
मन आनंदीई होओओई

आणि आणखी एक डोक्यात जाणारी आइ म्हन्जे 'नितु सिंग '
I know everything ...... अतिशय वैताग आणते ... रेडियोवर लागली तर जास्तच.>>
रॉकस्टार च्या डयरेक्टरने बनवली आहे ना!

ती करिश्माची cereal ची अ‍ॅड पण डोक्यात जाते. सकाळी सकाळी ते चॉकोज देते त्या मुलाला आणि म्हणे पौष्टीक आहार. डोक्यात बटाटे भरलेत का काय हिच्या?

तसंच केलॉगची ती स्पेशल नॉन-फॅटवाल्या cereal ची अ‍ॅड. ती बाई आपण कित्ती बारीक झालोय ते दाखवायला टीव्हीवर मॅच बघत असलेल्या नवर्‍याच्या समोरून जाते आणि तो मॅच बघायचं सोडून हिला बाय करतो तर केव्हढं ते कौतिक. अरे, तुम्ही स्वतः फिट रहावं म्हणून वजन घटवताय का त्या ठोंब्या नवर्‍यासाठी? हे प्रॉडक्ट बघितलं की मला माझी एक मैत्रिण आठवते. तिच्या एका मैत्रिणीच्या आईने ह्या cereal ची अ‍ॅड बघून मुलीला विचारलं की हे जेवणाआधी खायचं का नंतर. तिची मुलगी म्हणाली - जेवणाऐवजी.

या वयात पण फक्त जिंकण्याकरताच खेळायचं तर मग खेळण्याकरता कधी खेळायचं?>>> बापरे!! हे जरा जास्तच गंभीरपणे घेतलं जातंय. जाहिरातीत, त्या आईची फक्त 'स्पर्धेत चुका करू नकोस' इतकी साधी अपेक्षा दाखवली आहे, तेही अप्रत्यक्षपणे. आता तो मुलगा स्पर्धेचीच तयारी करताना दाखवलंय तर 'मुलांनी खेळण्याकरता कधी खेळायचं' वगैरे म्हणणं जरा अतीच आहे. सोसायटीच्या ग्राऊंडमधे जिम्नॅस्टिक्ससारखा खेळ मुलांनी खेळणं तसं मुश्किलच आहे. दगड का माती, चोरपोलीस, लंगडी, लपाछपी, आबाधुबी, वगैरे खेळत असेल की तो मुलगा.... आपल्याला काय माहीत. Happy

सध्या व्होडाफोनच्या लहान मुलांच्या प्रेमाच्या जाहीराती डोक्यात जात आहेत. Sad पूर्वी मस्त असायच्या त्यांच्या जाहीराती.

कापो, सहमत. ते गाणेही त्यांच्या भावना बिवना व्यक्त करत नाही (आणि त्या कुत्र्याच्याही Happy ). १०-१२ वर्षाची सुद्धा नसतील ती मुले आणि "just me.... just you..." काय, काहीही. आता पुढे काय मग? तो मुलगा गुढग्यावर बसून तिला प्रपोज बिपोज करणार काय? Happy

The biggest problem is such ads tell the kids that this is something cool

>>> सध्या व्होडाफोनच्या लहान मुलांच्या प्रेमाच्या जाहीराती डोक्यात जात आहेत.

या जाहिरात कर्त्यांनी बहुतेक "शाळा" चित्रपट बघितलेला असावा.

सध्या व्होडाफोनच्या लहान मुलांच्या प्रेमाच्या जाहीराती डोक्यात जात आहेत>> खरय.
यांची कंप्लेंट नाही का करता येत कुठे?

एक अत्यंत घाणेरडी जाहीरातः

मलाईका अरोरा-खानच्या उरोजांवरुन पाण्याचे काही थेंब बाष्पीभवन होऊन उडून जातात आणि ती म्हणते "I am as hot as ice"

ही कुठल्यातरी दारूची जाहिरात आहे. नक्की नाव आठवत नाही.
म्युझिक सी.डी.च्या नावाखाली दारूची जाहीरात करणार्‍या जाहीरातींपैकी एक आहे.

>> सध्या व्होडाफोनच्या लहान मुलांच्या प्रेमाच्या जाहीराती डोक्यात जात आहेत>> खरय. यांची कंप्लेंट नाही का करता येत कुठे?

करता येते. इथे करायची का?
http://www.ascionline.org/index.php/asci-about/52-cat-about-asci-regulat...

Pages