मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती तो शब्दशः भाषांतराचा अट्टाहास !!! >>>> प्रचंड अनुमोदन.. अश्या सरसकट सगळ्या जाहिरातींचं घडतं

ओरिओ ची जूनी जाहिरात क्यूट होती..
ओढणी गुंडाळून ते एवढूसं पिल्लू तिच्या बाबांना म्हणते
"आ गये, थक गये होगे आप, मैने खाना बनाया है आपके लिये"
असं म्हणात दोन ओरिओ बिस्किटं पुढे करते

लहान मुलांना अगदी लहानपणी आपल्या आईसारखं वागण्याची लहर येते, ते मssssस्त टिपलंय त्यात.

(तिचे बाबा बनून आलेला तो मॉडेलही फारच मस्ताय Happy )

सध्याची करीना व सैफची ती नमस्ते नमस्तेवाली डॅन्डरफ शॅम्पूची अ‍ॅड खूप डो़क्यात जाते. (तश्याही ह्या दोघांच्या सगळ्याच अ‍ॅड कंटाळवाण्या असतात.)

किती तो शब्दशः भाषांतराचा अट्टाहास !!! >>>> प्रचंड अनुमोदन.. अश्या सरसकट सगळ्या जाहिरातींचं घडतं>>>>
अगदी.

ती कुठल्यातरीटूथब्रशची का पेस्ट ची अ‍ॅड आहे ना...तिच भाषांतर एकदम पथेटिक आहे.
म्हणे रोज रोज ब्रश करवतात, सकाळी करवतात, रात्री करवतात!!!

करवतात काय अर्रे??

त्या सॅमसंगच्या फ्रिजच्या अ‍ॅडमध्ये ती मुलगी प्रियांका चोप्राला 'दिदी' म्हणते तेव्हा हसायला आलं. 'आन्टी' म्हणायला पाहिजे. प्रियांकाच्या पंख्यांनी माफी द्यावी

ती garnier shampoo ची सध्याची जाहीरात लई डोक्यात जाते. त्यात ती एक मुलगी खोलीत ( की बाथरूम मधे? ) दाराला टेकून बसली आहे आणि तिची आई बाहेरुन तेल लावायला सांगते आहे. आणि ही टवळी आत बसून 'blah blah' ची expressions देते आहे. वर म्हणे 'टाईम कहां?'!! अरे! आणि तो टाईम वाचवून तिला करायचं काय असतं तर पिकनिकला जायचं असतं, केस पसरून गवतावर लोळायचं असतं इत्यादी?? काहीही दाखवतात!

विद्याबालनच्या डबलरोल वाली ओट आणि कशाकशापासून बनवलेल्या स्नॅक ची जाहीरात डोस्क्यात जाते. 'डर्टी...' च्या त्या अमलातून अजून बाहेरच आलेली नाहिये ती. Uhoh

नविन सन्तूर साबणाची अ‍ॅड पाहिली ??

सगळ्या संतूर वापरणार्या बायकांना मुली असतात .. की फक्त मुली असलेल्या बायका संतूर वापरतात ?

सगळ्या संतूर वापरणार्या बायकांना मुली असतात .. की फक्त मुली असलेल्या बायका संतूर वापरतात ? >> मला पण हाच प्रश्न पडला होता. Happy

सगळ्या संतूर वापरणार्या बायकांना मुली असतात .. की फक्त मुली असलेल्या बायका संतूर वापरतात ?
>>>>>>> स्वस्ति, अगदी हेच माझ्यापण मनात येत ही अ‍ॅड बघून....

'डर्टी...' च्या त्या अमलातून अजून बाहेरच आलेली नाहिये ती. >>> तिच्यापेक्षाही जाहिरात निर्माते बाहेर आलेले नाहीत असं म्हणावं लागेल. ती काय, पैसे देऊ केले की ते सांगतील तशी जाहिरात करणार !!

>> स्वप्ना_राज | 14 August, 2012 - 12:17 नवीन
त्या सॅमसंगच्या फ्रिजच्या अ‍ॅडमध्ये ती मुलगी प्रियांका चोप्राला 'दिदी' म्हणते तेव्हा हसायला आलं. 'आन्टी' म्हणायला पाहिजे. प्रियांकाच्या पंख्यांनी माफी द्यावी
<<<

अहो, आन्टीच म्हणायला सांगितलं होतं. पण सेटवर प्रियंकाने असला गोंधळ घातलाय म्हणता! शेवटी स्क्रिप्ट बदलून आंटीचं दिदी केलं तेंव्हा कुठे बाई शूटिंगला उभ्या राहिल्या..

मला सध्या ती एक अ‍ॅड आवडते
रोशनी ,प्रकाश्,ज्योती, वाली ट्युब लाईटची...मस्त लिहली आहे ती अ‍ॅड Happy

सहारा क्वालिटी ची कोणतीतरी जाहीरात आहे आपली क्रिकेट टिम आहे त्यात. भयंकर आहे अ‍ॅड ती, अंगावरच आली पहिल्यांदा पाहिल्यावर. Sad

मुली, बायका कांती चांगली होते किंवा उजळते अशी अ‍ॅड करणार्‍या साबणांच्या जाहिरातीत (संतूर, लक्स, डव्ह) आणि पुरुष, मुलं जंतुनाशक म्हणून प्रसिध्दी पावलेल्या साबणांच्या जाहिरातीत (लाईफबॉय, डेटॉल) अशी सरळ विभागणी आहे. कारण पुरुषाचं कर्तृत्त्व पहायचं असतं ना. आणि बायकांना फक्त छान छान दिसायचं असतं. Proud

घर शोधणार्‍या मुलिंची एक सनसिल्कची अ‍ॅड टाळक्यात जाते.
मॉडर्न मुली नकोत तर या पोरी वेण्या घालून जातात, हाय क्लास हव्यात तर हाय बो घालून जातात. आणि सगळीकडे होकार येतो असं दाखवलंय. Uhoh
नुसत्या हेअर स्टाईली बदलून घरं मिळतात? कशाचं वाट्टेल त्याचं भांडवल करतात.

आणि एक जाहीरात पाहिली एकदाच, त्यात बरेच लोक आहेत 'my action is to take a break, मग नेक्स्ट माणूस्/बाई म्हणते 'my action is to be a lean'... ती जाहीरात मस्त आहे. कशाची आहे?

अरे त्या सलमान च्या wheel अ‍ॅड मधे ते काय म्हणतात सांगा ना कोणीतरी प्लीज! मला तर 'कांदा है' ऐकू येतं ते कायम. Sad

दक्ष्स +१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००
मला ती मनमे लड्डू फुटावाली अ‍ॅड उगाच आवडतेय
तो स्टारकास्ट शोधत असतो ती

rmd Lol

Pages