ही मृण्मयी ची पाककृती आहे. मी फक्त माझ्या विचारपुशीतून इथे आणतेय.
खस्ताम्हणजे पापुद्रे सुटलेलं. तेव्हा कचोरीला छान पापुद्रे सुटले पाहीजेत. फारतेलकट लागु नये म्हणून कचोरी-चाट केली तर जास्त छान लागते. एक पोटभरीचापदार्थ होतो.
पावणे दोन वाट्या मैदा
पाव वाटी कॉर्न फ्लावर
एक चमचा बारिक रवा
एक चमचा मीठ
पाव चमचा इनो फ्रुट सॉल्ट
पाव स्टिक बटर वितळवून
एक कप गरम पाणी
आतलं सारण :
१ कप पिवळी मूग डाळ
२ मोठे चमचे बेसन
जिरं
मीठ
तिखट
आमचूर पावडर
चमचाभर साखर
१ चमचा आलं-मिरची पेस्ट
चमचाभर बडीशेप पावडर
चमचाभर गरम मसाला
एक चमचा धणेपावडर
३ मोठे चमचे तेल.
गरम पाण्यात मीठ, इनो, बटर घालून एकत्र केलेलं कॉर्न फ्लावर आणि मैदा घट्टभिजवून घ्यायचा. गोळा फुलक्यांच्या कणकेपेक्षा जास्त घट्ट भिजवायचा.त्याव्हे १०-१२ गोळे करून ओल्या कपड्यात गुंडाळून घट्ट डब्यात बंद करूनअर्धा तास तरी मुरु द्यायचे.
मूगडाळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळि निथळायची. फोडणीत तेल घालून जीरं,हिंग,मूगडाळ घालून परतायचं (पाणी निघून जायला हवं). आलं मिरची पेस्ट घालूनपरतायचं. बाकी पावडरी घालून झाकण ठेवून न जळू देता ४-५ मिनिटं वाफवायचं.रुम टेंप ला थंडं करून फूड प्रोसेस्रमधून जितपत बारिक होईल तितपट (पाणी नघालता) वाटूण घ्यायचं. बारा भागात डिवाइड करायचं.
हे सारण मोदकाप्रमाणे वरच्या पारित (कव्हरमधे) भरून हलक्या हातानीलाटायचं. सगळ्या कचोर्या लाटून फ्रिजमधे तासभर ठेवून मग गरम तेलात खरपूसतळायच्या. सारण लाटाताना बाहेर यायला नको. तळण्याआधी प्रत्येक कचोरीलाबोटाने मध्यभागी हलकं दाबून तो भाग आधी वर घेऊन तळायचं.
खायला देताना गार दह्यात चाट मसाला-तिखट मीठ साखर घालून फेटायचं. हेदही कचोरीवर घालून त्यावर हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा, कोथिंबीर आणि शेवघालून द्यायचं.
सौजन्य : मैत्रिणीची आई. (मारवाडी पध्दत).
ज्ञाती.. कॉर्नफ्लोअर किंवा
ज्ञाती.. कॉर्नफ्लोअर किंवा राईसफ्लोअर घातल्याने क्रिस्पी व्हायला मदत होते का??
लोला च्या कचोर्याही मस्त तोंपासु झाल्यात!!
सही...कातील फोटो आहेत हे!!!
सही...कातील फोटो आहेत हे!!!
लोला आणि ज्ञाती, मस्त आहेत
लोला आणि ज्ञाती, मस्त आहेत फोटो! तों.पा.सु.
आता करणं आलं.
मी पण करून पाहिल्या.. मस्त
मी पण करून पाहिल्या.. मस्त झाल्या..
फोटो नाही काढला.. ११ झाल्या वरच्या प्रमाणात. सारण मुद्दाम थोडे जास्त केले - दोन्ही चटण्या पण जास्त केल्या पुन्हा करायला.
खस्ता कचोरी यशस्वी करणार्या
खस्ता कचोरी यशस्वी करणार्या भारतीय सुग्रणींनी "पाव स्टिक बटर वितळवून" म्हणजे नक्की किती लोणी/तेल/तूप घेतलं ते सांगा.
मंजूडे , कशाला खस्ता खातेस
मंजूडे , कशाला खस्ता खातेस , खस्ता कचोरी करायला ???
तिरथराम शर्मांकडून शेगावी
तिरथराम शर्मांकडून शेगावी कचोरी विकतच आणू म्हणतेस का संपदा?
मग्ग क्काय ... नेकी और पूँछ
मग्ग क्काय ... नेकी और पूँछ पूँछ ???
खस्ता आम्ही खातो गं :फिदी:, तू शर्माच्या कचोर्या खा 
खस्ता कचोरी यशस्वी करणार्या
खस्ता कचोरी यशस्वी करणार्या भारतीय सुग्रणींनी "पाव स्टिक बटर वितळवून" म्हणजे नक्की किती लोणी/तेल/तूप घेतलं ते सांगा. >>> सुग्रीण नै तरी सांगते
, मी लोणी घरात नसल्याने तूप वापरले. कमी तेलकटच करायच्या होत्या (चवीशी तडजोड करण्याची तयारी ठेवून) तर मिडीयम चमच्याने ३ चमचे टाकले.
विकतच्या सारख्या तेलकट नाही, पण खुसखुशीत झाल्या. तेल लावून पीठ मळले... शिवाय आमास्नी मैदा चालत नसल्याने कणीकच घेतली अन कॉ. ऐवजी तांदुळपीठ वापरले.
सगळ्या कचोर्या लाटून राञि
सगळ्या कचोर्या लाटून राञि फ्रिजमधे ठेवून मग सकाळी केले तर चालेल का ??
मंजूडी US measurement १ स्टीक
मंजूडी US measurement
१ स्टीक बटर = साधारण ११० ग्रॅम = अर्धा कप = ८ टेबलस्पून = २४ टीस्पून.
फोटो मस्त आलेत दोघींचेपण.
झकास कचोर्या लोला आणि
झकास कचोर्या लोला आणि ज्ञाती.
मस्त रेसिपी आणि बेस्ट फोटो!
मस्त रेसिपी आणि बेस्ट फोटो!
वर्षु माझ्याकडे कॉर्न्फ्लोअर
वर्षु माझ्याकडे कॉर्न्फ्लोअर नव्हते म्हणून मी तांदळाचे वापरले होते. कव्हर छान खुसखुशीत झाले होते. दुसरे म्हणजे मी कव्हरचे पीठ मळून फ्रीझमध्ये ठेवले पण कचोर्या लाटून लगेचच तळल्या. पहिल्यांदाच केल्या असल्याने, तेलात फुटतील की काय या भीतीने म्हटलं लगेच तळून पाहू.
या कचोर्या फुलतात. मी ईनो
या कचोर्या फुलतात. मी ईनो ऐवजी २ चमचे बेकिंग पावडर घातली. तेल नीट तापवावे. एक तळण झाल्यावर पुन्हा थोडे तापू द्यावे. जश्या तळत गेले तश्या नंतरच्या जास्त फुगल्या. मी कचोरी फोडून मग कांदा, चटण्या इ. घातले आहे. फक्त मध्ये किंवा + अशी फोडता येईल.
सोनाली
मस्त फोटो आणि रेसिपी. नक्की
मस्त फोटो आणि रेसिपी.
नक्की करणार.
वर सगळ्यांनी लिहिल्याप्रमाणे
वर सगळ्यांनी लिहिल्याप्रमाणे दिलेल्या प्रमाणात बरोब्बर बारा कचोर्या झाल्या. पण एक कप मुगाच्या डाळीचं सारण खूप झालं. आता उरलेलं सारण डब्यात भरून फ्रिजमधे ठेवलंय. रुनीच्या पोस्टीनुसार तेल घेतलं. छोट्या कढईत तळल्याने एका वेळी एकच कचोरी तळली. लोला म्हणाली तशी नंतर नंतर खूपच फुलत गेल्या कचोर्या... आणि अगदी शेवटच्या तीन-चार कचोर्या तर खूपच तेल प्यायल्या. पण चव खूप आवडली.
मंजू, तू दुष्ट आहेस.
मंजू, तू दुष्ट आहेस.
घ्या, खस्ता खाल्ल्यासच वाटतं
घ्या, खस्ता खाल्ल्यासच वाटतं
. मस्त दिसताहेत , चटण्या घालून खाल्ल्या नाहीस वाटतं ???
मस्त दिस्तयायेत
मस्त दिस्तयायेत
प्राची, हो संपदा, एक मेची
प्राची,
हो संपदा, एक मेची सुट्टी होती, म्हटलं खाऊया खस्ता
सॉसबरोबर खाल्ल्या.
केल्या आज. छान खुसखुशीत
केल्या आज. छान खुसखुशीत झाल्या होत्या

धन्यवाद ज्ञाती
मी पण काल केल्या.मस्त झाल्या
मी पण काल केल्या.मस्त झाल्या होत्या...बरोबर १२ होतात या प्रमाणात.. धन्यवाद ज्ञाती
सगळ्यांच्या कचोर्या सह्हीच
सगळ्यांच्या कचोर्या सह्हीच दिसताय्त
मंजूडी, मस्त दिसतायत
मंजूडी, मस्त दिसतायत कचोर्या!
व्वा! ज्ञाती, मृण्मयी मस्तच
व्वा! ज्ञाती, मृण्मयी मस्तच आहे कचोरी.
बर्याच सुगरणींनी खस्ता खाल्लेल्या दिस्तात.
मंजूडीच्या कचोर्या तर आत्ता बटरचं प्रमाण विचारलं...म्हणेपर्यंत झाल्याही! गुड!
कीपिटप मुलींनो!
खस्ता कचोरी बनवण्यासाठी
खस्ता कचोरी बनवण्यासाठी बर्याच खस्ता खाव्या लागत असाव्यात
ज्ञाती, मंजूडी, कचोर्यांचे
ज्ञाती, मंजूडी, कचोर्यांचे फोटो फारच मस्त!
मंजूडी, मस्त दिसतायत
मंजूडी, मस्त दिसतायत कचोर्या..................सह्ही...........
कचोरया झकास दिसताहेत, बेक
कचोरया झकास दिसताहेत, बेक करता येतील का?
Pages