खस्ता कचोरी

Submitted by ज्ञाती on 27 April, 2012 - 14:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ही मृण्मयी ची पाककृती आहे. मी फक्त माझ्या विचारपुशीतून इथे आणतेय.
खस्ताम्हणजे पापुद्रे सुटलेलं. तेव्हा कचोरीला छान पापुद्रे सुटले पाहीजेत. फारतेलकट लागु नये म्हणून कचोरी-चाट केली तर जास्त छान लागते. एक पोटभरीचापदार्थ होतो.

पावणे दोन वाट्या मैदा
पाव वाटी कॉर्न फ्लावर
एक चमचा बारिक रवा
एक चमचा मीठ
पाव चमचा इनो फ्रुट सॉल्ट
पाव स्टिक बटर वितळवून
एक कप गरम पाणी

आतलं सारण :
१ कप पिवळी मूग डाळ
२ मोठे चमचे बेसन
जिरं
मीठ
तिखट
आमचूर पावडर
चमचाभर साखर
१ चमचा आलं-मिरची पेस्ट
चमचाभर बडीशेप पावडर
चमचाभर गरम मसाला
एक चमचा धणेपावडर
३ मोठे चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

गरम पाण्यात मीठ, इनो, बटर घालून एकत्र केलेलं कॉर्न फ्लावर आणि मैदा घट्टभिजवून घ्यायचा. गोळा फुलक्यांच्या कणकेपेक्षा जास्त घट्ट भिजवायचा.त्याव्हे १०-१२ गोळे करून ओल्या कपड्यात गुंडाळून घट्ट डब्यात बंद करूनअर्धा तास तरी मुरु द्यायचे.
मूगडाळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळि निथळायची. फोडणीत तेल घालून जीरं,हिंग,मूगडाळ घालून परतायचं (पाणी निघून जायला हवं). आलं मिरची पेस्ट घालूनपरतायचं. बाकी पावडरी घालून झाकण ठेवून न जळू देता ४-५ मिनिटं वाफवायचं.रुम टेंप ला थंडं करून फूड प्रोसेस्रमधून जितपत बारिक होईल तितपट (पाणी नघालता) वाटूण घ्यायचं. बारा भागात डिवाइड करायचं.

हे सारण मोदकाप्रमाणे वरच्या पारित (कव्हरमधे) भरून हलक्या हातानीलाटायचं. सगळ्या कचोर्‍या लाटून फ्रिजमधे तासभर ठेवून मग गरम तेलात खरपूसतळायच्या. सारण लाटाताना बाहेर यायला नको. तळण्याआधी प्रत्येक कचोरीलाबोटाने मध्यभागी हलकं दाबून तो भाग आधी वर घेऊन तळायचं.

खायला देताना गार दह्यात चाट मसाला-तिखट मीठ साखर घालून फेटायचं. हेदही कचोरीवर घालून त्यावर हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा, कोथिंबीर आणि शेवघालून द्यायचं.

सौजन्य : मैत्रिणीची आई. (मारवाडी पध्दत).

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निवेदिता, ती सार्वजनिक करा.
'कचोरी' असं शोधलं तर या दोन्ही येत नाहीत. Happy ज्ञातीच्या शब्दखुणांत कचोरी आहे तरी.

सुंदरच............
आमच्या इथे मस्त कचोरी मिळते, त्यात चिंचेच्या चटणीबरोबर.. पांढर्या वाटाण्याची उसळ पण घालतात,
अप्रतिम लागते.

छान (आणि बर्‍यापैकी) सोपी कृती Happy

(पण 'लागणारा वेळ - ५ मिनिटे' हे काही पटत नाही ब्वा... पूर्वतयारीला लागणारा वेळही यात गृहित धरायला हवा असं माझं मत.... अनेक पाकृंच्या बाबतीत होतं हे... )

ज्ञाती,

कसली यातनामय पाककृती आहे म्हणून सांगू! भुकेच्या शेकडो इंगळ्या डसल्या पोटाला! लेखाच्या सुरुवातीला धोक्याची पूर्वसूचना प्रसारित करायला हवी होती. काय घोर अत्याचार होतात हो आम्हा वाचकांवर!
Happy
आ.न.,
-गा.पै.

खायला देताना गार दह्यात चाट मसाला-तिखट मीठ साखर घालून फेटायचं. हेदही कचोरीवर घालून त्यावर हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा, कोथिंबीर आणि शेवघालून द्यायचं.>>>>>वा .. असे आयते मिळाले त र .........

खस्ता खाल्ल्या!
वाटी आणि कपाचं जे प्रमाण आहे ते इथल्या मेजरिंग कपानुसार (लिक्विड मोजायचा नव्हे) घेतले. मला पाणी अर्धा कपच पुरले. सगळे घातले तर पीठ सैल होईल असे वाटले. बाकीचे प्रमाण अगदी बरोबर. १० कचोर्‍या झाल्या. कॉर्नफ्लावर ऐवजी मी रवा घातला. डाळ सकाळी भिजवून संध्याकाळी केल्या.
दोन खाल्ल्यावर जेवण झाले.

फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी. (नंतर साध्या डब्यात ठेवल्या, छिद्राच्या नाही)
kachori1.jpg

तळल्यावर
kachori2.jpg

आतून-
kachori4.jpg

दही, चटण्या, कांदा, चाट मसाला वरुन घालून-
kachori3.jpg

मृ, ज्ञाती, निवेदिता, मैत्रिणीची आई यांना धन्यवाद.

लोला, फोटो जबरी आहे. चवही मस्त लागत असणार! कचोरी आयती खायला मिळाली तर फारच छान! Happy

लोला , क्काय दिसताहेत , व्वा व्वा Happy आता करणे आले Happy एव्हढ्याच प्रमाणाच्या केल्यास हे बरे झाले, त्यामुळे अंदाज ठरवणे सोपे होईल.

धन्यवाद ज्ञाती, पाककृती इथे लिहिल्याबद्दलः)

लोला, मस्त दिसतायत कचोर्‍या!
मृ आणि ज्ञाती, कृतीबद्दल धन्यवाद.

लोला, कसले जबरी फोटो आहेत!!!! मस्तचः)

माझा फोटो त्यामानाने फारच 'हा' आहे, पण चव भन्नाट आली होती.
मी दिलेल्या प्रमाणानेच केल्या १२ कचोर्‍या झाल्या. कॉर्न्फ्लोअरच्या ऐवजी तांदळाचे पीठ वापरले.
kachori.jpg

निवेदिता, हा धागा सुरू करण्यापूर्वी तुझा धागा शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता.

ज्ञाती, चालेल गं, शेवटी रेसिपी इथे असण्याशी आणि सापडण्याशी मतलबं. मस्त फोटो लोला आणि ज्ञाती.

फोटो छानच आहेत. एक प्रश्ण : ह्या कचोर्‍या फुलतात का नीट कचोरी चाट करता येईल ईतपत? लोला तू कचोरी फोडून चटण्या भरल्यात की न फोडता वरून चटणी घालून सर्व केल्यात?

Pages