कोल्हापुरच्या आठवणी

Submitted by झकासराव on 25 April, 2012 - 04:46

हा बीबी काढण्याच कारण आहेत आमचे कोल्लापुरचे अशोकमामा म्हणजेच अशोक पाटील.
आज सहजच कोल्हापुर बीबी वर चटणीचा उल्लेख आला आणि अशोकमामानी एक खुप उत्तम अशी पोस्ट टाकली.
तेव्हा अशाच काही खास कोल्हापुरच्या आठवणींसाठी हा बीबी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसं बरेच वेळा गेलो आहे पण कोल्हापुर पहायला मात्र आजुन जमले नाही
रंकाळ्यावर मात्र दोन तिन वेळा थांबलो आहे.

कोल्हापूरशी माझे नाते दोन टप्प्यातले.

माझे आजोळ मलकापूर. दर मे महिन्याच्या सुट्टीत तिथे जायचोच. पण त्यावेळी
मलकापूरला जायला थेट एस्टी नव्हती. त्यामूळे कोल्हापूरला जाऊनच पुढे जावे लागे.
मालवणला जायचे तरी, मलकापूरहून परत कोल्हापूरला यायचे, मग तिथून मालवण.

कोल्हापूरला, (पाचलगांचा वाडा, गुजरीच्या मागची गल्ली, वणकुद्रे यांच्या दुकानातून
सुरु होते ती) माझ्या आईची आत्या आणि तिचे पति, कै. बाबूराव बेडके रहात असत.
मोठा अवलीया माणूस. छत्रपति शाहू महारांजांच्या प्रेरणेने त्यांनी भिक्षुकी शिकून घेतली. आणि राजवाड्यातल्या अंबाबाईचे ते पुजारी होते.
भिक्षुकी हा जरी व्यवसाय असला तरी ते सोनारकाम, सुतारकाम, लोहारकाम, गवंडीकाम अशा सर्वच कामात तरबेज होते. त्यांचे सतत काहीनाकाही चाललेलेच असे.
आणि भयंकर गोष्टीवेल्हाळ.
आईची आत्या, तिला आम्ही कोल्हापूरची अक्का म्हणत असू. तर मूर्तिमंत रखुमाई होती.
तिचा प्रसन्न हसरा चेहरा, आजही डोळ्यासमोर आहे. गेल्यावर तिला खुप आनंद
व्हायचा. तिच्या हातचे साधे जेवणही फार रुचकर असायचे. आणि त्यांच्याघरी एका
माणसाचे जेवण, कायम तयारच असायचे.
पुढे मलकापूरला जायला थेट एस्टी झाल्यावर आम्ही एक वर्ष तिच्याकडे गेलो नाही.
तिला खुप वाईट वाटले, तायने, माया पातळ केलीस जनू, असे म्हणाली. मग आम्ही
मुद्दाम तिच्याकडे जात असू.
मी कॉलेजला जायला लागल्यावर, पुढे सी.ए. करताना मला उन्हाळ्याची सुट्टी
अशी नसायचीच. मग गावाला जाणेही थांबलेच.
पण आई जात राहिली. पुढे तिचे पति गेल्यावर तिला घशाचा कॅन्सर झाला. पण त्याला तिने खुप धीराने तोंड दिले. पुढे तिला काही गिळणे अशक्य झाले तरी
मिक्सरमधून बारीक करुन ती जेवत असे. शेवटच्या दिवसात टाटामधले उपचार
घेण्यासाठी, ती आमच्याकडेच होती. पण त्या काळातही, तिने कधी त्रागा, चिडचिड
केल्याचे आठवत नाही.
मग बरीच वर्षे माझे कोल्हापूरला जाणे झाले नाही, मग मात्र ३ वर्षे सतत, दर
शनिवारी-रविवारी कोल्हापूरला जात असे. तो दुसरा टप्पा. त्याबद्दल मग लिहीन.

झक्या कोल्हापूरच्या आठवणी खरंच बीबीवर लिहिण्याजोग्या आहेत. नो डाऊट. जुन्या माबोवर मी एक बीबी उघडला होता जुने दिवस म्हणून. त्यात कोल्हापूरच्या खूप आठवणी होत्या..

माझं घर कोल्हापूरला मोठ्या शिवाजी पुतळ्याजवळ होतं. आख्खं लहानपण तिथेच गेलं. खूप महत्वाची आणि मनाच्या सर्वात जवळची आठवण म्हणजे शिवाजी महाराजाचा पुर्ण पुतळा त्यापासूनच सुरूवात. कोल्हापूरात कोणिही कुठे राहतेस विचारलं की 'शिवाजी पुतळा' हे उत्तर ठरलेलं. मग मध्येच एकदा कुणितरी विचारलं की अर्धा की पुर्ण? Uhoh मी सरप्राईज. मग एके दिवशी बाबांनी मला अर्धा शिवाजी पुतळा हा एरिया दाखवला तो तिकडे (बलभीम बँकेच्या आसपास आहे बहुतेक)

तर तो हा शिवाजी पुतळा..

DSC04336.JPG

दत्त सहकारी साखर कारखान्यात कामाच्या निमित्ताने अनेक वेळा येणे-जाणे होत रहाते कोल्हापूरात. Happy
ऐतिहासिक वारसा लाभलेले एक अतिशय सुंदर शहर होते ते कोल्हापूर काही वर्षापूर्वी...!

या शिवाजीच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला शिवाजी मंडई आहे ३ मजली, डाव्या बाजूला शिवाजी रोड, समोर भाऊसिंगजी रोड आणि मागील रस्ता महानगरपालिकेकडे जातो. शिवाजी पुतळा हे तसं मध्यवर्ती ठिकाण होतं राहण्यासाठी त्यामुळे बस्/मंडई/देऊळ्/शाळा/कॉलेज सर्व जवळ. सुट्टीत गावाहून कोल्हापूरात परतलं की स्टँडवर उतरून फक्त महाराणा प्रताप चौक ही बस सोडून कोणत्याही बसमध्ये डोळे झाकून बसायचं.. ती शिवाजी पुतळ्यावरूनच जाणार. तसा म.प्र. चौक ही लांब नाही तिथून. ५ मिनिटं चालण्याच्या अंतरावर असेल फक्त.

अरे बिंदु चौक व त्या ऐतिहासिक सभा कशा काय विसरला मंडळी तुम्ही?
आता तो बिंदु चौक राहीला नाही ना ते नेते राहीले... ही पण गोष्ट महत्त्वाचीच म्हणा..

(खासबा जाधव यांचा पुतळा कोल्हापुरात कोठे आहे सांगा पाहू? जो सांगेल त्याला एक चॉकलेट :प )

कोल्हापूर आणि माझ पण खूप जवळच नात आहे, माझी मावशी तिथे दिली आहे, महाद्वार रोड वर जो चीपडे वाडा आहे तिथे ती राहायची, नंतर मग दुसरी कडे राहायला गेली
मी लग्न होईपर्यंत दर वर्षी तिथे जायचे, खूप आणि सगळ फिरून झालं आहे, काही मचमच नाही, सगळ कस अगदी शांत जीवन, खरच मुंबई सोडली कि खर life आहे अस मला अजूनही वाटत, पण किती दिवस मुंबई सोडून राहू शकेन तो पण एक प्रश्न आहे, सवयी चा भाग..

<<खासबा जाधव यांचा पुतळा कोल्हापुरात कोठे आहे सांगा पाहू? जो सांगेल त्याला एक चॉकलेट >>

ओ राजे! भवानीमंडपात जो पैलवानाचा एका पायावरचा पुतळा आहे त्या बद्दल म्हणत आहात काय?

>>ओ राजे! भवानीमंडपात जो पैलवानाचा एका पायावरचा पुतळा आहे त्या बद्दल म्हणत आहात काय?

येप्प!

निपोंना एक चॉकलेट दिले जावे Wink

आपणा सर्वांचे प्रेम असलेल्या 'कोल्हापूर' म्हणजेच करवीर नगरीतच मी जन्माला आलो, प्राथमिकपासून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षणही इथे झाले. योगायोगाने सरकारी नोकरीही इथेच मिळाली {बेकारीचा एकही दिवस पाहिला नाही....त्यामुळे ह.मो.मराठेच्या 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी....' सारखी अवस्था वाट्याला कधीच आली नाही}, घरसंसारही इथेच.....एकूण आढावा घेतल्यास इथून पुढील सारे आयुष्य [जे काही ६०-७० वर्षाचे कसेबसे शिल्लक आहे ते...] इथेच जाईल यात तीळमात्र शंका नाही. त्यामुळे या माझ्या शहरावर मी जसा बेहद्द खूश आहे, तद्वतच मी त्याचा कायमचा ऋणी आहे.

हा बाफ वाहता नसल्यास फार बरे होईल कारण मी या निमित्ताने कोल्हापूरची काही दुर्मिळ छायचित्रेही जालावरील सदस्यांसाठी [जे या शहरावर प्रेम करतात] या निमित्ताने देत आहे. [यासाठी मी नवीन राजवाड्यावरील छत्रपतींच्या ग्रंथालयाचा आभारी आहे. तिथूनच ही छायाचित्रे माझ्या आणि इतरांच्या आनंदासाठी घेतली आहेत.]

अर्थात सुरुवातीला एकदोनच अशासाठी देत आहे की, बाफ कायम वाचनासाठी राहतो की तो वाहता राहील याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

river1"

शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून पंचगंगेच्या पात्राला योग्य ती दिशा दिली आणि मग ही नदी बारमाही वाहती झाली. पावसाळ्यातील नदीचे हे रौद्र रूप

river2"

त्यापूर्वी कुठेही बांध नसल्याने नदीची अशी दयनीय अवस्था होत असे. हे चित्र १९०८ चे आहे.

saathmri"

हत्तीच्या खेळाचे शहरातील हे ठिकाण जे 'साठमारी' या नावाने ओळखले जाते. सध्या अर्थातच हा खेळ बंद आहे; पण जुन्या आठवणी आजही लोक काढतात.

haar"

ज्या काही अनोख्या वैशिष्ट्यांसाठी कोल्हापूर देशात प्रसिद्ध आहे त्याची ही एकत्रित चित्रे. १. कोल्हापूरी चप्पल, २. कोल्हापूरी गूळ, ३. कोल्हापूरी दूध, ४. कोल्हापूरी साज.

तूर्तास इतकेच.

@ दक्षिणा ~

अर्धशिवाजी पुतळा आहे तो पेठेतील निवृत्ती चौकात. आता हा चौक 'दावणगिरी डोसा' नामाने ओळखला जात आहे. ....खादाडीमुळे.

"डाव्या बाजूला शिवाजी रोड, समोर भाऊसिंगजी रोड..."
या दोन्ही ठिकाणाची प्रकाशचित्रे [कालची आणि आजची] इथे नंतर देतो, म्हणजे मग तुला समजून येईल की 'क्या जमाना था, और क्या हो गया...समय की धारा में"

मी खूप लहान असताना, म्हणजे अगदी बालवाडीत सुद्धा जात नसे. तेव्हा आमच्या घरी कुणी अजून एक जोशी बाई यायच्या.. त्या बहुतेक प्रायव्हेट हायस्कूलला शिकवायला होत्या. त्या काळी बहुतेक काशीकर काशीकर हे नाव ही खूप घेतलं जायच. एक दिवस मला विचारल्यावर मी काशिकर बाईंच्या शाळेत जाणार असं सांगितलं घरी. मग बालवाडीला मी महाद्वार रोडवरच्या काशिकर बाईंच्या माँटेसरीत होते, बहुतेक एक वर्ष. तेव्हा काही ३र्‍या वर्षी वगैरे शाळेत घालायचं फॅड नव्हतं. मी चांगली ५ वर्षांची असताना पहिल्यांदा शाळेत गेले. रडणे वगैरे केलं की नाही माहित नाही. फक्त काशीकर बाई बर्‍याच वयस्कर होत्या आणि त्या मला चहा पोळी (चहात पोळिचे छोटे छोटे तुकडे भिजवून) खाऊ घालत इतकं नक्कीच आठवतंय. Happy

तदनंतर मी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या रामदास नारायणदास सामाणी विद्यालयात शिकायला गेले. पहिलीला वर्गशिक्षिका बहुतेक विमल कुलकर्णी बाई होत्या आणि चौथीत पण. दरम्यान बरेच शिक्षक माहीत होते फक्त दुरून यज्ञोपवित, चव्हाण बाई, आरती कुलकर्णी, चव्हाण सर तेव्हा मुख्याध्यापक होते. उंच आणि त्यांचं व्यक्तिमत्व एकदम भितीदायक होतं. ही माझी शाळा.

R.N.Samani Vidyalay.jpg

पुढे चौथी पास झाल्यावर चक्क मला चॉईस होता इयत्ता ५ वीत कोणत्या तुकडीत बसायला आवडेल या साठी. Uhoh पद्माराजे शाळा फिक्स होती. पण तुकडी मनाजोगती निवडायची मुभा. मार्क 'ब' तुकडीवाले मिळाले असले तरिही जोशींची मुलगी आहे तिला 'अ' वर्गात घेऊ अशी कुजबुज ऐकू यायचीच. मग सध्या तु १५ दिवस 'ब' मध्ये बस, मग तुला 'अ' तुकडीत बसवू. हजेरीपटाची कायतरी भानगड होती.. नक्की काय ते देव जाणे. Happy १५ दिवसात मी 'ब' मध्ये रूळले. आणि मी 'अ' वर्गात जाण्यास नकार दिला... मग इयत्ता १० वी पर्यंत तीच तुकडी. Happy

ppg.jpg

वाह!!!!!!!!!
मजा येणारे ह्या बीबी वर.. Happy
राजे भवानी मंडपात पुतळा आहे खाशाबा जाधवांचा.
त्याचा फोटोदेखील आहे माझ्याकडे.

From maajh kolhapur" alt="" />

नमस्कार कोल्हापूरकर
मी नविन सदस्य
कोल्हापूर चे मायबोलिकर आहेत का ते शोधत होते.
सापडले एकदाचे.
दक्षिणा तु पण कोल्हापूरि आहेस ते आत्ता कळल मला

नंदुजी
कोल्हापूर विषयी वाचून गदगदुन येत म्हंजे कोल्हापूर ची खूप आठवण येते, हो की नाई??
मग होउन जाउद्या ना एक ट्रीप कोल्हापूर ला.
म्हण्जे गदगदुन येण उत्साहात बदलेल ना

मी वयाच्या ३ र्‍या वर्षापर्यंत कोल्हापुरात होते, अर्ध्या शिवाजी पुतळ्याजवळच्या आठल्ये वाड्यात. तिथून मुंबईला परत आल्यावर कोल्हापुरातल्या शेजार्‍यांशी जिव्हाळ्याचे संबंध अजूनही टिकून आहेत. त्यामुळे कोल्हापूर सोडल्यावर सुद्धा आमची दर उन्हाळ्याच्या सुट्टीत फेरी होत असे. आईबाबा अजूनही कोल्हापुरात चक्कर टाकत असतात, तेव्हा कोल्हापुराची लेटेस्ट माहिती कळते. खरंतर कोल्हापूर माझा वीकपॉईंट Happy त्यापैकी अंबाबाईचं देऊळ, महाद्वार रोड, रंकाळा, राजाभाऊची भेळ, सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस, मिसळ,कांदा लसूण चटणी, राजाराम पुरीतली घरं, पन्हाळा, ज्योतिबा हे सर्व जास्त आवडीचं Happy

मी पण कोल्हापुर ची आहे . इथे नविन आहे.
सध्या मुम्बै मधे अस्ले तरि मनाने कोल्हापुर मधे च असतो कायम.
हा बीबी वाचला की एक्दम कोल्हपुर मधे अस्ल्या सारख वाटते.

http://www.maayboli.com/node/1660#comment-2111381

मित्रहो कोल्हापुरकरांशी गप्पा मारायला वेगळी बीबी आहे. Happy
वरच्या लिन्क वर क्लिक करा.

ह्या बीबी वर तुमच्या कोल्हापुरच्या खास आठवणी लिहा.
जशा अशोक मामानी लिहिल्यात तशा.

कोल्हापुर मधल तस सगळच जगातभारी.
मग ते दुध कट्टा असो की राजाभाउ ची भेल
किवा सोलकी चे ice cream

दूपारी college लव्कर सुटले की भ्वानी अम्बा बाई च्या देवलात जाउन गप्पा मारत बसणे हा तर favorite timepass असायचा.

घरी जाताना एक तरी फेरी महाद्वार रोड वरुन होत्च असे.

फुल लाईन वरन जाताना तो फुलाचा मन्द वास घेत, देवळा त वाजणार्या आरती चा मन्गल असा आवाज ... मस्त दिवस होते ते...

जाताना विद्यापीथ school च्या इथ्ल चाट , रगडा , मस्त च....
अर्धा शिवाजी पुतळ्या जवळचा दावन्गिरी डोसा तर कधी त्रुषा-शान्तिची लस्सी...

मोहक लस्सी ची बात च काहि और...

आम्च्या कलम्ब्याला साई मन्दिर मन्दिर जवळ जी मिनि चोपाटी असाय्ची तिथ्ला बटाटे वडा ...
म्ह्न्नुन तर कोल्हापुर म्ह्जए अख्या जगात world famous...

मंद्या, तुला काय करायच्यात भोचक चौकश्या?
इतकी हौस असेल तर स्वखर्चाने जाऊन मोजून ये कोल्हापूरातले चौक Proud

Pages