कोल्हापुरच्या आठवणी

Submitted by झकासराव on 25 April, 2012 - 04:46

हा बीबी काढण्याच कारण आहेत आमचे कोल्लापुरचे अशोकमामा म्हणजेच अशोक पाटील.
आज सहजच कोल्हापुर बीबी वर चटणीचा उल्लेख आला आणि अशोकमामानी एक खुप उत्तम अशी पोस्ट टाकली.
तेव्हा अशाच काही खास कोल्हापुरच्या आठवणींसाठी हा बीबी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार, कोल्हापुरात फक्त बाईचे नाव शिवाजी ठेवत नाहीत. (शिवाई ठेवतील). त्यामूळे चौक, पूल, रस्ते, इमारती, नगरे, सोसायट्या सगळ्याचे नाव असे असू शकते.

दिनेश Lol

कोल्हापूरातले फाईव्ह स्टार हॉटेल.. शालिनी पॅलेस.. हे रंकाळ्याच्या थोडंसंच पुढे आहे. लहान असताना कायम या हॉटेल बद्दल लोक बोलायचे. काही लोक बढाया मारायचे इथे आपल्या नातेवाईकांचं लग्न कसं झालं त्याच्या. आम्ही काय फक्त बाहेरूनच पहायचं ते. माझे गणिताचे सर अंबाई टँक परिसरात रहायचे तिथे जाताना शालिनी पॅलेस हमखास लागायचे. बस मधून अगदी डोस्कं बाहेर काढून काढून पहायचं. Happy

hotel-haripriya-kolhapur-places-04.jpg

मंद्या नावं सगळी मोठ्ठी बरं का कोल्हापूरातली
उदा. छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल (हे कोल्हापूरात सीपीआर या नावाने ओळखले जाते.)
सरस्वतीबाई मदनमोहन लोहिया हायस्कूल (स.म.लोहिया हायस्कूल)
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल (पीपीजी) Proud

त्यावरून आठवलं. कोल्हापूरचं आयसोलेशन हॉस्पिटल दिसतं कसं ते ही आठवत नाही आता मला. माझी आई काविळ झाली होती तेव्हा तिथे ३ दिवस अ‍ॅडमिट होती. मी ६ वर्षांची होते, तेव्हा आमच्या घराजवळून बस जायची तिथे.. आईसाठी मी थर्मास मधून चहा घेऊन गेले आणि त्याच बस मधून घरी परत आले. आई आयसोलेशनमधून मिशन हॉस्पिटल मिरज ला गेली. परत आलीच नाही घरी.

सगळी मोठ्ठी बरं का कोल्हापूरातली>>>
दक्षे आमच्या शाळेच नाव लिहु का?
शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर हायस्कुल.

परत आलीच नाही घरी.>> Sad

कुणाला महाद्वार् रोडवर मोठ्या अक्षरात लिहलेल बुलबुले चे दुकान आठवते का?
त्या च्या आधी ची २ initials आठवत नाहीयेत. Sad

नीळकन्ठ भिमाजी बुलबुले असे मोठ्या अक्षरात लिहिले होते.....आता आहे की नाही ...कल्पना नाही....पुढच्या वेळी बघुन येईन...

आम्ही १९७७ ते १९८० ह्या काळात कोल्हापुरात होतो... शिवाजी च्या अर्ध पुतळ्या जवळ आठल्ये वाड्यात रहात होतो..... तेव्हाची वाडा सन्स्कृती खूप छान होती....... मैत्रीणीबरोबर आम्ही कोल्हापुरात सगळ्या (१५ ) थिएटरा मध्ये सिनेमे बघितले आहेत......सुशीला नावाच्या सिनेमाचे शुटिन्ग सुद्धा बघितले आहे.......दुपारी १२ च्या शो .चे तिकीट १ रु.. ०५ किन्वा ८५ पैसे असायचे....ती मजा काही और होती..

कोल्हापूर माझे आजोळ आहे..... शाळेत असतानाची तर माझी हरेक सुट्टी कोल्हापूरात गेलेली आहे..... मस्त दिवस आणि त्याहून मस्त गाव!

विषयाला अनुसरुन आहे म्हणून ही रिक्षा:
http://www.maayboli.com/node/11183

मी मागे कोल्हापुरच्या वाहत्या धाग्यावर विचारले होते व अशोक पाटील व अजुन कुणीतरी माहीती पण दिली होती , १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ईथे प्रत्येक घरात जिलेबी खाल्ली जाते त्या प्रथेविषयी.
मी १५ ऑगस्टला बघीतले व माहीती घेतली होती .
हे वाहते पान नसल्याने ह्यावर ती माहीती करवीरवासीयांनी द्यावी , हि विनंती.

विप्रा, फक्त कोल्हापुरातच नव्हे पण बहुतांशी पश्चिम महाराष्ट्रात २६ जाने आणि १५ ऑ ला जिलेबी खाल्ली जाते.... कारण नक्की माहित नाही पण या दिवशी लोक रांगा लावून जिलेबी विकत घेत असतात आणि जागोजागी जिलेबीचे स्टॉल लागलेले असतात.... पुण्या-मुंबई वाल्यांना याचे फार आश्चर्य वाटते!

विप्रा, हो कोल्हापुरात १५ ऑ आणि २६ जा ला तुम्हाला जिलेबी साठी रांगा दिसतील च ... आणि आजकल तर बचत गट या मधेय आघाडी वर आहेत.

हि प्रथा मला कोल्हापुर जिल्ह्यातच बघायला मिळाली ,
ह्याआधी श्री अशोक पाटील व अजुन कुणीतरी त्या संबंधात अतीशय रंजक गोष्ट सांगीतली होती.

हे वाहते पान नसल्याने ह्यावर ती माहीती करवीरवासीयांनी द्यावी , हि विनंती.

कोल्हापुरला ३-४ वेळा गेलो , मला फार आवडले शहर . सोलापुर पेक्षा हवामान फारच मस्त वाटले होते,
ती प्रसिद्ध मिसळ खायची आहे .

आमचा बन्गला चान्गला १०८ वर्शाचा, पाच बन्गले परिसरात होता. फार फार आठवण येते. .हाह, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..

जुलैत कोल्हापूरला जाण्याचा योग आला. शाळेवरून चक्कर मारताना आठवण आली. शिवस्वरूप या दुकानाची. त्या दुकानातून आम्ही अनेको शालोपयोगी कधी पैसे देऊन तर कधी उधार घेतल्या Happy तिथला काऊंटरवरचा माणूस त्यावेळी जसा होता तसाच दिसला फक्त मिशी आणि डोक्याचे केस पुर्ण पांढरे. सेम विथ ज्योतिर्लिंग भेळ वाला..... तो ही तसाच दिसला....

दक्षे.....तू म्हणतेस तो माणूस....शिवस्वरुपचे मालक....सूर्यकांत गायकवाड....अगदी आमच्या अपार्टमेन्टच्या शेजारीच राहातात.

'ज्योतिर्लिंग भेळवाला' म्हणजे कोण ?

मी पण कोल्हापूरचा आहे, माझे बालपण शिवाजि पेथ
school : न्यू एज्युकेशन सोसायटीच्या रामदास नारायणदास सामाणी विद्यालयात (1 to 4)
and 4~10 new high school shivaji peth

मी एकदाच गेलेय पाच वर्षांपूर्वी . जास्त काही बघता आल नाही. आंबा बाईच्या दर्शनाला गेलो होतो आणि किल्ला बघितला पण छान वाटल होत Happy
या बाफ वरची माहिती आणि फोटोज पण चांगले आहेत Happy

Pages