कलियुग

Submitted by रीया on 22 February, 2012 - 10:54

कलियुग

एकदा मला भेटला देव
दिसायला वेगळा,वागायला वेगळा
अपेक्षेपेक्षा फारच आगळा
चक्क होता पँट शर्ट मध्ये
एक ऐटदार गॉगल डोळ्याला
मला 'Excuse me' म्हणाला
च्यायला हा तर इंग्लिश बोलतोय Uhoh
विचारलं "कोण हवाय आपल्याला?"
माझ्याकडे बघून हसायला लागला
"अगं देव देव म्हणतात तो मीच"
मी किंचाळले "हलकट,नालायक,पाजी,नीच"
तो म्हणाला "कलियुग! घोर कलियुग आलाय"
म्हणलं "चल फुट इथून टिव्हीवर श्री गणेश लागलाय "
तो : "मी आहे ना इथे? मग बघ कि मला"
मी : म्हणाले "तू आणि देव?? काय वेड बिड लागलाय का तुला?"
तो : "अगं खरचं ! don’t you recognize me"
मी : "ए शहाण्या, मराठीचं 'राज' आहे, इंग्रजीचा वापर कमी"
तो : "श्शी ! हा प्रदेश अगदीचं old fashioned वाटतोय"
मी : "याचमुळे माझा अवघा महाराष्ट्र बाटतोय"
तो : “सोड ते, अमिताभ कडे बघ ,चालत येतो अनवाणी"
मी : "म्हणूनच तर safe ठेवल्यास ना त्याच्या जमिनी?"
तो : "अन शिर्डीत ही सिंहासन दिलाय सोन्याचं"
मी : "सारं काम श्रीमंताचं! आमच्या नाही तोलामोलाचं"
तो : "बरं बरं computer कुठाय? जरा नारदाला पिंग करतो "
"किती गं slow हे नेट, थांब मी आपला mobile च लावतो"
मी आपली गप्प गार ! हा असला कसला देव?
तेवढ्यात तो ओरडला "नारदा balance संपतोय माझा, फोन ठेव"
मी : "काय रे देवा तुला रे कसली balance ची चिंता?"
तो : "पहावं लागतं गं, पेट्रोल चे दर पण वाढलेत आता"
मी: "तुला का लागतं रे पेट्रोल ? तुझा उंदीर कुठे गेला?"
तो :"अगं काय सांगू four wheeler चा पार्किंग issue,trafic police ने जप्त केला" Sad
मी : "आणि मला एक सांग तू इथे कशाला आलास ?"
तो : "एकदा मोदक मिळाले ना की माझं काम खल्लास "
मी: "काय रे हे? स्वर्गातले देव ! तरी पृथ्वीवर मोदक मागतात?"
तो:"काय करणार अगं ! मला फ़क़्त चितळ्यांचेच मोदक लागतात"
"बर बर बास आता ते channel बदल शीला-मुन्नी ऐकायचं आज"
मी म्हणाले "काय रे हे! तुला आहे का काही लाज ?"
तो म्हणाला chilax babes ! कुठल्या जमान्यात वावरतीये?
"खर सांगतो तू ना अगदी आजीबाईंसारखं बोलातीयेस"
मी घाबरले पण सावरले
तो म्हणाला "ही सारी तुमचीच कारणी"
"दहा दिवस उत्सवातले मी ऐकतोय हीच गाणी"
"काही हवं असेल तर मग पटकन निघायला हवं आता "
"पण इच्छा तुझी पुरी होईल फक्त चितळे मोदक देता"
म्हणलं "काय रे देवा हे असं काय झालाय ?"
तो हसला आणि म्हणाला
"कलियुग ! घोर कलियोग आलाय !"

-प्रियांका विकास उज्जवला फडणीस

ता.क : कृपया ही कविता एक प्रसंग म्हणुन वाचावी.

गुलमोहर: 

महान आहेस
>>> लोल्झ्झ्...अरे हो कारण खर सा़ंगायच झाल तर मला याच्या वृत्त, मात्रा,छंद वैगेरे काही काळाल नव्हत आणि मग ही मुक्तछंद आहे वैगेरे वादात मला पडायच नव्हत म्हणुन..(थोडक्यात आधीच्या अनुभवाने शहाणी होउन) अस लिहिल Happy
कल्पनिक प्रसंग अस लिहायला हव होत खर तर पण वाचक सुज्ञ आहेत Happy

लोला धन्यु Happy

पण वाचक सुज्ञ आहेत >>>> संशोधनाबद्दल अभिनंदन

मुक्तछंद आहे यावरून वाद कुठे होतात? मुक्तछंद नाही यावरून वाद होतात.

संदेश आवडला प्रियांका

खूप शुभेच्छा तुला Happy

(अवांतर - अजून जागी कशी काय आहेस???)

-'भूषण कटककर'!

मुक्तछंद आहे यावरून वाद कुठे होतात? मुक्तछंद नाही यावरून वाद होतात>>>> तेच रे म्हणजे तत्सम वाद...

(अवांतर - अजून जागी कशी काय आहेस???) : रोजची सवय ! रोजच मि उशिरा झोपते...आज फक्त मबो वर अहे इतकच...थोपु वर शोधल पण साप्डेचना Sad

निखळ व निर्मळ विनोदाचा आविष्कार खूपच आवडण्यासारखा. वाचतावाचता टोचावं ही व्यवस्थाही उत्तम.

ता.क : कृपया ही कविता एक प्रसंग म्हणुन वाचावी.
>>>>>>>>>>>

द.ही. : आताशा मायबोलीकर अश्या मुक्तछंदांना सरावलेत......

ल. स्सी. : "प्रियांका विकास उज्जवला फडणीस" .... काय काय छंद असतात एकेकाला Wink

दू. ध. : नाइइस थॉट

द.ही. : आताशा मायबोलीकर अश्या मुक्तछंदांना सरावलेत......
>>>>>>>
ए भुंग्या जुनी कविता आहे ती फार Angry
कोणीतरी वरती काढली

ल.स्सी Uhoh

रच्याकने (आवडतं नसलं तरी) (फक्त) दुधाबद्दल धन्स

Happy chaan

मस्त आहे....................आवडली गं रिया........ Happy