स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री गजानन विजय ह्या ग्रंथात गजानन महाराज "चंदन चावल, बेल की पतिया" असे भजन म्हणत असा उल्लेख आहे.
हे पुर्ण भजन कोणाकडे आहे का?

चंदन चावल ...

भोलेनाथ हे दिगंबर दुख मेरा हरो रे
चंदन चावल बेल की पतिया शिवजीके माथे धरो रे

अगर चंदन का भस्म चढाऊ ते शिवजी के पय्या पडो रे
नंदी उपर स्वर भये रामा, मस्तकी गंगा धरो रे

शिवशंकर को तीन नेत्र है, अद्भुत रुप धरो रे
अर्धांग गौरी, पुत्र गजानन, चंद्रमा माथे धरो रे

आसन डाल सिंहासन बैठे, शांती समाधी धरो रे
कांचन थाली कपुरे की बाटी, शिवजी की आरती करो रे

मीरा के प्रभु गिरीधर नागर, चरनोंमे शिष्या धरो रे

हे माझ्याकडे असलेले version आहे. काही काही अर्थ मला पण लागत नाही. चुकले असल्यास सांगावे.

http://www.youtube.com/watch?feature=fvwp&v=uJH3i5S-dGk&NR=1

Kubera Money Mantra (God of Wealth)

It is composed of bija mantras, rough meanings: Shreem for Lakshmi (love, beauty, health, prosperity), Hreem for Great Goddess/Sun (illumination/dispel illusion), kleem for Kama/Krishna (love and fulfiller of desires from material to moksha, where your intention is) and Vitteswaraay (Kubera)

Lord Kuber (or Kubera or Kuvera) is believed to be the lord of riches and wealth in Hinduism. Kuber Sadhana is considered a great way of pleasing the lord to bestow one with wealth and fortune. Kuber is many a times called the treasurer of gods. If pleased with you the lord opens avenues of wealth and riches for believers. Lord Kuber is also believes to be the head of the Yakshas (savage beings). The Yakshas are both human and demon and are responsible for the security of the treasures hidden beneath the earth of the great mountain Himalayas.

Kubera Yantra is used as a tool to attract the cosmic wealth energy, accumulation of riches, increase cash flow at home, etc. It opens up street for new sources of income. Worship of Kuber Yantra is also suggested for excellent growth in business, career and profession and increase in personal income and abundance.

The specially of this Yantra is their No. 72 should come by winning the Number from any side the joint on of 72 Total 9.

For realization of Lord Kubera, massive monetary gain, wealth, fortune and all round success.

http://www.thereligiousproducts.com/mantras.html

For worshiping him you have to sit facing North Director.
You can use a Rudraksha mala as he is a follower of Shiva or a White Crystal Mala to chant his nama.

श्रीगजाननमहाराज यांचे प्रगटदिनाचे निमित्ताने (आज १४/०२/२०१२ रोजी),
आमचे येथिल श्रीगजाननमहाराज मंदिराचे स्मरणिकेत प्रसिद्ध झालेले हे श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र पुढे देत आहे.
(काही टायपो एरर असल्यास कृपया सांगावे)

शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें तयांच्या हरतील विघ्न ।
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१॥

ये‌ऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती ।
उच्छिष्ट पात्राप्रती सेवियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२॥

उन्हा तहानेची नसे त्यास खंत । दावियलें सत्य असेचि संत ।
पाहूनी त्या चकित बंकटलाल झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥३॥

घे‌ऊनी गेला आपुल्या गृहासी । मनोभावे तो करी पूजनासी ।
कृपाप्रसादे बहु लाभ झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥४॥

मरणोन्मुखीं तो असे जानराव । तयांच्या मुळे लाभला त्यास जीव ।
पदतीर्थ घेता पूनर्जन्म झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥५॥

पहा शुष्कवापी भरली जलाने । चिलिम पेटविली तये अग्निविणें ।
चिंचवणें नाशिले करीं अमृताला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥६॥

ब्रह्म गिरीला असे गर्व मोठा । करि तो प्रचारा अर्थ लावूनि खोटा ।
क्षणार्धा त्याचा परिहार केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥७॥

बागेतली जाती खाण्यास कणसं । धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश ।
योगबळे काढिलें कंटकाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥८॥

भक्ताप्रती प्रिती असे अपार । धावुनी जाती तया देती धीर ।
पुंडलिकाचा ज्वर तो निमाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥९॥

बुडताच नौका नर्मदेच्या जलांत । धावा करिती तुमचाचि भक्त ।
स्त्री वेष घे‌ऊनी तिने धीर दिला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१०॥

संसार त्यागियला बायजाने । गजानना सन्निध वाही जिणे ।
सदा स्मरे ती गुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥११॥

पितांबरा करी भरी उदकांत तुंबा । पाणि नसे भरविण्यास नाल्यास तुंबा ।
गुरुकृपेने तो तुंबा बुडाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१२॥

हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा । पितांबराची घेत गुरु परीक्षा ।
गुरुकृपा लाभली पितांबराला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१३॥

चिलीम पाजावी म्हणून श्रीसी । इच्छा मनी जाहली भिक्षुकासी ।
हेतू तयाचा अंतरी जाणियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१४॥

बाळकृष्न घरी त्या बालापुरासी । समर्थरुपे दिले दर्शनासी ।
सज्जनगडाहूनी धावुनी आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१५॥

नैवेद्य पक्वान्न बहु आणियेले । कांदा भाकरीसी तुम्ही प्रिय केले ।
कंवरासी पाहुनी आनंद झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१६॥

गाडी तुम्ही थांबविली दयाळा । गार्डप्रति दावियेली हो लिला ।
शरणांगती घे‌ऊनी तोही आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१७॥

जाति धर्म नाही तुम्ही पाळियेला । फकिरा सवे हो तुम्ही जेवियेला ।
दावूनी ऐसे जना बोध केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१८॥

अग्रवालास सांगे म्हणे राममूर्ति । अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती ।
सांगता क्षणीं तो पहा मानिला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१९॥

करंजपुरीचा असे विप्र एक । उदरी तयाच्या असे हो की दु:ख ।
दु:खातुनी तो पहा मुक्त झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२०॥

दुर्वांकुरा वाहुनी एकवीस । नमस्काररुपी श्रीगजाननास ।
सख्यादास वाही श्रीगुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२१॥

|| श्री हनुमान स्तुती ||

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी |
अनादिनाथ पूर्ण तारावयासी ||
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||१||

तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे |
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे ||
तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||२||

गिळायासी जाता तया भास्करासी |
तिथे राहु तो येउनी त्याजपासी ||
तया चंडकीर्णा मारिता तो पळाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||३||

खरा ब्रह्मचारी मनाते विचारी |
म्हणोनी तया भेटला रावणारी ||
दयासागारू भक्तीने गौरविला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||४||

सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा |
धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा ||
गिरी आणुनी शीघ्र तो उठविला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||५||

जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी |
समस्तांपुढे तापसी निर्विकारी ||
नमू जावया लागी रे मोक्षपंथा |
नमस्कार माझा तुम्हा हनुमंता ||६||

* गणपती प्रार्थना *

प्रारंभी विनती करू गणपती
विद्या दयासागरा ||
अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे
आराध्य मोरेश्वर ||
चिंता,क्लेश,दारिद्र्य,दुख: अवघे
देशांतरा पाठवी ||
हेरंबा गणनायका गजमुखा
भक्ता बहु तोषवी ||

[हे सर्च मधे मला सापडले नाही म्हणुन इथे देत आहे]

हा धागा उत्तमच आहे, पण पूर्वीच्या मायबोलीवर ज्याप्रकारे "पोस्टची" लिन्क देता यायची व त्यानुसार पहिल्या पोस्टमधे प्रत्येक विषयास ती लिक देऊन वाचकास एकदम त्या त्या अपेक्षित पोस्टवर जाता यायचे. इथे तसे होत नाही. जर ती सुविधा पुन्हा चालू झाली, तर प्रत्येक पोस्टची लिन्क वरिल मुख्य पानावर देता येईल. आत्ताही देता येत असेल, अन मला कळलेच नसेल, तर ते क्रुपया समजवावे.

mukti, धन्यवाद Happy हे स्तोत्र ५ व्या पानावर आहे.

लिंबू, जुन्या मायबोलीतलं मला माहित नाहिये कारण मी तेव्ह अगदीच नवी होते. मी नक्की प्रयत्न करते Happy

अश्विनी, गामा पैलवानना विचारून बघ. त्यांना ती कला नविन मायबोलीतही अवगत आहे. इथे त्यांनी वापरलेली भवदियची लिंक बघ.

माधव, जो उपाय आहे तो खुप अवघड आहे. सोर्स कोड बघुन त्यातुन विशिष्ट पोस्टचा लिन्कनम्बर वगैरे शोधुन ते देता येईलही. तरीही गामाना विचारले पाहिजे. ही अशी सोय ऐसीअक्षरे वर असल्याने मी तिथे हाच विषय सुरू केला होता, पण प्रतिसादाअभावी वा उणेमुल्यान्कनामुळे सोडून दिला.

श्रीगुरुचरित्र - अध्याय १४ वा

श्री गणेशाय नमः| श्री सरस्वतै नमः| श्री गुरुभ्यो नमः|

नामधारक शिष्या देखा | विनवी सिद्धासि कवतुका | प्रश्न करी अती विशेखा| एक चित्ते परियेसा |१|
जयजया योगिश्वरा | सिद्धमूर्ती ज्ञानसागरा | पुढील कथा विस्तारा | ज्ञान होय आम्हासी ||२||
उदरव्यथेच्या ब्राह्मणासी | प्रश्न झाले परियेसी | पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती ||३||
ऐकोनी शिष्याचे वचन | संतोषे सिद्ध आपण | गुरुचरित्र कामधेनू जाण | सांगता झाला विस्तारे ||४||
ऐक शिष्या शिखामणी | भिक्षा केली ज्याचे भुवनी | तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा ||५||
गुरुभक्तीचा प्रकारु | पूर्ण जाणे तो द्विजारु| पूजा केली विचित्रु | म्हणोनी आनंद परियेसा ||६||
तया सायंदेव द्विजासी | श्रीगुरु बोलती संतोषी | भक्त हो रे वंशोवंशी | माझी प्रिती तुजवरी ||७||
ऐकोनी श्रीगुरुचे वचन | सायंदेव करी नमन | माथा ठेवोनी चरणी | नमिता झाला पुन्हा पुन्हा ||८||
जय जय जगद्गुरु | त्रयीमुर्तीचा अवतारु | अविद्यामाया दिससे नरू | वेदा अगोचर तुझा महिमा ||९||
विश्वव्यापक तुची होशी | ब्रम्हाविष्णुव्योमकेशी | धरिले स्वरूप तू मानुषी | भक्तजन तारावया ||१०||
तव महिमा वर्णावयासी | शक्ती कैची आम्हासी | मागेन एक तुम्हासी | कृपा करणे गुरुमुर्ती ||११||
माझे वंशपरंपरी | भक्ती द्यावी निर्धारी | ईह सौख्य पुत्रपौत्री | उपरी द्यावी सद्गती ||१२||
ऐसी विनंती करोनी | पुनरपी विनवी करुणावचनी | सेवा करतो द्वारी यवनी | महाक्रुर असे तो ||१३||
प्रती संवत्सरी ब्राह्मणासी | घात करतो जिवेसी | याची कारणे आम्हासी | बोलवित असे आज ||१४||
जाता तयाजवळी आपण | निश्चये घेईल माझा प्राण | भेटी झाले तुमचे चरण | मरण कैचे आपणासी ||१५||
संतोषोनी श्रीगुरुमुर्ती | अभय देती तयाप्रती || विप्रा मस्तके हस्त ठेवती | चिंता न करी म्हणोनिया ||१६||
भय सांडोनी तुवा जावे | क्रूर यवनासी भेटावे | संतोषोनी प्रियभावे | पुनरपी पाठवील आम्हापासी ||१७||
जो वरी परतोनी तू येसी | असो आम्ही भरवसी | तुवा आलीया संतोषी | जावू मग येथोनिया ||१८||
निजभक्त आमुचा तुची होशी | पारंपार वंशोवंशी | अखिलाभिष्टा तू पावसी | वाढेल संतती तुझी बहुत ||१९||
तुझे वंश परंपरी | सुखे नांदती पुत्रपौत्री | अखंड लक्ष्मी तयाघरी | निरोगी होती शतायुषी ||२०||
ऐसा वर लाधोन | निघे तो सायंदेव ब्राह्मण | जिथे होता तो यवन | गेला त्वरीत तयाजवळी ||२१||
कालांतक यम जैसा | यवन दुष्टा परियेसा | ब्राह्मणाते पाहता कैसा | ज्वालारूप होता जाहला ||२२||
विमुख होवेनी गृहात | गेला यवन कापत | विप्र जाहला भयचकीत | मनी श्रीगुरु ध्यातसे ||२३||
कोप आलिया ओळंबियासी | केवी स्पर्षी अग्निसी | श्रीगुरु कृपा होय ज्यासी| काय करील क्रूर दुष्ट||२४||
गरुडाचिया पिल्लांसी | सर्प तो कवणेपरी ग्रासी | तैसे तया ब्राह्मणासी | कृपा असे श्रीगुरुंची ||२५||
का एखादे सिंहासी | ऐरावत केवी ग्रासी | श्रीगुरुकृपा होय ज्यासी | कळीकाळाचे भय नाही ||२६||
ज्याचे हृदयी श्रीगुरुस्मरण | त्यासी कैसे भय दारूण | कालमृत्यु न बधे जाण | अपमृत्यु काय करी ||२७||
ज्यासी नाही मृत्युचे भय | त्यासी यवन असे तो काय | श्रीगुरुकृपा ज्यासी होय | यमाचे मुख्य भय नाही ||२८||
ऐसेपरी तो यवन | अंतःपुरात जावुन | सुषुप्ती केली भ्रमित होवुन | शरीरस्मरण त्यासी नाही ||२९||
हृदय ज्वाळा होय त्यासी | जागृत होवोनी परियेसी | प्राणांतक व्यथेसी | कष्टत असे तये वेळी ||३०||
स्मरण असे नसे काही | म्हणे शस्त्रे मरितो घाई | छेदन करतो अवेव पाही | विप्र एक आपणासी ||३१||
स्मरण जाहले तये वेळी | धावत गेला ब्राह्मणाजवळी | लोळत असे चरणकमळी | म्हणे स्वामी तुची माझा ||३२||
येथे पाचारिले कवणी | जावे त्वरीत परतोनी | वस्त्रे भुषणे देवोनी | निरोप देई तो तये वेळी ||३३||
संतोषोनी द्विजवर | आला ग्रामा सत्वर | गंगातिरी असे वासर | श्रीगुरुंचे चरणदर्शन ||३४||
देखोनिया श्रीगुरुंसी | नमन करी तो भावेंसी | स्तोत्र करी बहुंवसी | सांगे वृत्तांत आद्यत ||३५||
संतोषोनी श्रीगुरुमुर्ती | तया द्विजा आश्वासती | दक्षिण देशा जावू म्हणती | स्थानास्थान तिर्थयात्री ||३६||
ऐकोनी श्रीगुरुंचे वचन | विनवितसे कर जोडून | ना विसंबे आता तुमचे चरण | आपण येई समागमे ||३७||
तुमचे चरणाविने देखा | राहू न शके क्षण एका | संसारसागरतारका | तुची देखा कृपासिंधु ||३८||
उद्धारावया सगरांसी | गंगा आणली भुमीसी | तैसे स्वामी आम्हांसी | दर्शन दिधले आपुले ||३९||
भक्तवत्सल तुझी ख्याती | आम्हा सोडणे काय निती | स्वये येवू निश्चिती | म्हणोनी चरणी लागला ||४०||
येणेपरी श्रीगुरुंसी | विनवी विप्र भावेसी | संतोषोनी विनयेसी | श्रीगुरु म्हणती तयेवेळी ||४१||
कारण असे आम्हा जाणे | तिर्थे असती दक्षिणे | पुनरपि तुवा दर्शन देणे | संवत्सरी पंचदशी ||४२||
आम्ही तुमचे गावासमिपत | वास करु हे निश्चित | कलत्रपुत्रैष्टभ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा ||४३||
न करा चिंता असाल सुखे | सकळ अरिष्टे गेली दु:खे | म्हणोनी हस्त ठेविती मस्तके | भाक देती तये वेळी ||४४||
ऐसेपरी संतोषोनी | श्रीगुरु निघाले तेथोनी | जेथे असे आरोग्यभवानी | वैजनाथ महाक्षेत्रे ||४५||
समस्त शिष्यासमवेत|| श्रीगुरु आले तिर्थे पहात | प्रख्यात असे वैजनाथ | तेथे राहिले गुप्तरुपे ||४६||
नामधारक विनवी सिद्धासी | काय कारण गुप्त व्हावयासी | होते शिष्य बहुंवसी | त्यांसी कोठे ठेविले ||४७||
गंगाधराचा नंदनु | सांगे श्रीगुरुचरित्र कामधेनु | सिद्धमुनी विस्तारुनी | सांगे नामधारकासी ||४८||
पुढील कथेचा विस्तारु | सांगता विचित्र आपरु | मन करोनी एकाग्रु | ऐका श्रोते सकळीक हो ||४९||

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारकसंवादे क्रुरयवनशासनम्
सायंदेव-वरप्रदानम् नमः चतुर्दशोध्यायः |

श्रीगुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु|
ॐ ॐ ॐ

जेवणापुर्वी करावयाची प्रार्थना

वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे !
कृषिवल कृषिकर्मी राबती दिन रात !
श्रमिक श्रम करुनी वस्तु या निर्मितात !
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल !
उदर भरण होते चित्त होण्या विशाल !

जय जय रघुवीर समर्थ !!!!

------------------------------------------------
मला इथे भेटा

प्रार्थना, श्लोक वगैरेंना अर्थ आहे का ?पुर्वज फालतु गोष्टीत वेळ घालवायचे ,तुम्ही कशाला घालवताय?

श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् - पू. अनंतराव आठवले यांनी रचलेले.

सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरम् |
ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || १ ||

वाङ्मनोबुद्धिभावानामतीतं परमेश्वरम् |
निष्कलं सगुणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || २ ||

निर्मलं सदयं शांतं प्रणताखिलमङ्लम् |
ज्ञानैकरूपिणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || ३ ||

भक्तिकल्पतरोर्मूलं बीजं साधनसम्पदः |
सर्वलोकहितं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || ४ ||

आविर्भूतो हरि: साक्षात् पावने गौतमीतटे |
रुपेण यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || ५ ||

निवृत्तिमार्गिणो मुक्ति: सोपानसुलभा कृता |
कृपया यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || ६ ||

ज्ञानं भक्तिरसं यस्य यद्भक्तिर्ज्ञानभास्वती |
तमद्वैतपरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || ७ ||

दृष्टि: कृपावती यस्य नित्यं पीयूषवर्षिणी
नताश्रयांघ्रिं तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || ८ ||

सुधाविजयिनी तापशमनी लोकपावनी
भारती यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || ९ ||

भावार्थदीपिका यस्य अनुभवामृतजीवनी
तं बुद्धिभास्करं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || १० ||

शरदिन्दुमनोज्ञाङ्गं कमलायतलोचनम् |
पद्मासनस्थितं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || ११ ||

प्रसन्नं परमोदारं वरदं सुस्मिताननम् |
आलन्दिवल्लभं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || १२ ||

सुहृदं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभूम् |
प्रेमलं वत्सलं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || १३ ||

बुद्धिनद्या: शरत्कालं प्रग्रहं चित्तवाजिनः
पापतापहरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः || १४ ||

हे तात ! भवतैवोक्तं शिशोर्माता स्वयं हिता |
चित्तवृत्ते: समाधानं बुद्धे: स्थैर्यं सदाsस्तु मे || १५ ||

गजानन महाराजान्चा गजानन आशिश ग्रन्थ वाचणे प्रत्येकाला शक्य होत नाही म्हनुन गजानन बावनी जि रोज म्हणु शकतो

जय जय सदगुरू गजानना
रक्षक तूची भक्तजना
निर्गुण तू परमात्मा तू
सगुण रुपात गजानन तू
सदेह तू, परी विदेह तू
देह असून देहातीत तू
माघा वैद्य सप्तमी दिनी
शेगावात प्रगटोनी
उष्ट्या पत्रावालीनिमित्त
विदेह्त्व तव हो प्रगट
बंकट लालावारी तुझी
कृपा जाहली ती साची
गोसाव्याच्या नवसासाठी
गांजा घेसी लावून ओठी
तव पद तीर्थे वाचविला
जानराव तो भक्त भला
जानाकीरामा चिंच वणे
नासावोनी स्वरूपी आणणे
मुकीन चंदूचे कानवले
खाउन कृतार्थ त्या केले
विहिरी माजी जलविहीना
केले देवा जल भरणा
मध माश्यांचे डंख तुवा
सहन सुखे केले देवा
त्यांचे काटे योगबले
काढुनी सहजी दाखविले
कुस्ती हरीशी खेळोनि
शक्ती दर्शन घडवोनी
वेद म्हणुनी दाखविला
चकित द्रविड ब्राह्मण झाला
जळत्या पर्याकावरती
ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती
टाकळीकर हरिदासाचा
अश्व शांत केला साचा
बाळकृष्ण बाळापुराचा
समर्थ भक्ताची जो होता
रामदास रूपे तुला
दर्शन देवोनी तोषविला
सुकुलालाची गोमाता
द्वाड बहु होती ताता
कृपा तुझी होताच क्षणी
शांत जाहली ती जननी
घुडे लक्ष्मण  शेगावी
येता व्याधी तू निरवी
दांभिकता परी ती त्याची
तू न चालवोनी घे साची
भास्कर पाटील तव भक्त
उद्धरलासी  तू त्वरित
आज्ञा तव शिरसावंद्य
काकाही मानती तुज वंद्य
विहिरीमाजी रक्षियला
देवा तू गणू  जवरयाला
पिताम्बराकार्वी  लीला
वठला आंबा पल्लवीला
सुबुद्धी देशी जोश्याला
माफ करी तो दंडाला
सवडत येशील गंगाभारती
थुंकून वारिली  रक्तपिती
पुंडलिकाचे  गंडांतर
निष्टा जाणून  केले दूर
ओंकारेश्वरी फुटली नौका
तारी नर्मदा क्षणात एका
माधवनाथा समवेत
केले भोजन अदृष्ट
लोकमान्य त्या टिळकांना
प्रसाद तूची  पाठविला
कवर सुताची कांदा भाकर
भक्शिलास तू त्या प्रेमाखातर
नग्न बैसोनी गाडीत
लीला दाविली विपरीत
बायजे  चित्ती तव भक्ती
पुंडलीकावारी विरक्त प्रीती
बापुना मनी विठल भक्ती
स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती
कवठ्याच्या त्या वारकऱ्याला
मरीपासुनी वाचविला
वासुदेव यती तुज भेटे
प्रेमाची ती खुण पटे
उद्धट झाला हवालदार
भस्मीभूत झाले घरदार
देहान्ताच्या नंतरही
कितीजना अनुभव येई
पडत्या मजूर झेलीयेले
बघती जन आश्चर्य भले
अंगावरती खांब पडे
स्त्री वांचे आश्चर्य  घडे
गजाननाच्या अद्भुत लीला
अनुभव येती आज मितीला
शरण जाऊनी गजानना
दुक्ख  तयाते करी कथना
कृपा करी तो भक्तांसी
धावून येतो वेगेसी
गजाननाची बावन्नी
नित्य असावी ध्यानी मनी
बावन्न गुरुवार नेमे
करी पाठ बहु भक्तीने
विघ्ने सारी पळती दूर
सर्व सुखांचा येई पूर
चिंता सारया दूर करी
संकटातूनी पार करी
सदाचार रत साद भक्ता
फळ लाभे बघता  बघता
सुरेश बोले जय बोला
गजाननाची जय बोला
जय बोला हो जय बोला
गजाननाची जय बोला

अनंत कोटी ब्रम्हांड नायक
महाराजाधिराज योगीराज
सद्गुरू श्री गजानन महाराज की जय

joshinilu, गजानन बावनी श्लोक रुपात असेल ना? वरच्या लिखाणात जरा श्लोकांचे क्रमांक टाकू शकाल का? बावनी म्हणजे बावन्न श्लोक असतील.

धन्यवाद Happy

साक्षीमी - गणेश कवच पाहण्यासाठी लिंक देत आहे ( पण ते संस्कृत मधे आहे )

http://kelkaramol.blogspot.in/2012/04/blog-post_30.html

त्यातील चित्रावर टिचकी मारली की पीडीफ फाईल उघडेल, त्यातील पान २७ बघा.

नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरुपिणे
स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः

हा श्रीधर स्वामींचा मंत्र आहे की रेणुका देवीचा Uhoh
मी कन्फुज आहे. हे श्रीधर स्वामी म्हणजेच शिवलिलामृत कार का?

आश्विनी के
गजानन बावन्नी लिहिताना मी श्लोक क्रमांक टाकायला विसरलो
माफ करा
पण पहिल्या २ ओळींचा एक श्लोक असे वाचल्यास म्हणायला पण सोपे जाते व बावन्न श्लोक होतात

Pages