कच्च्या टोमॅटोची चटणी

Submitted by Geetanjalee on 25 April, 2012 - 03:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काही माबोंना हा प्रकार माहित असेल........तरीही झटपट होणाऱ्या चटण्या इथे देत आहे....रोज एक करून पाहत आहे....

कच्चे टोमॅटो, कड़ी पाला , कच्चे शेंगदाणे, तेल , मीठ , हिरवी मिरची, मोहरी , हिंग , जिरे,

क्रमवार पाककृती: 

कच्चे टोमॅटो,मिरची तेलावर थोडेसे तेल घालून खरपूस परतून घ्या.
त्यात बाकीचे साहित्य चवीप्रमाणे घालून मिक्सर मधून / खलबत्यात वाटून घ्या . शेंगदाणे जास्त नकोत .
कालवून वरून मोहरीची फोडणी द्यावी....चवीपुरता गूळ घालावा
२-३ दिवस फ्रीझ शिवाय ही टिकते.

अधिक टिपा: 

गावरान टोमॅटो मिळाले तर फारच उत्तम, इकडे पुण्यात मिळत नाहीत , सासू बाईनी परवा गावाकडून आणले, त्याची चव आणि इकडे मिळणारे टोमॅटो च्या चवीत बराच फरक पडतो...कारण गावरान टोमॅटो ला आंबट पणा असतो)
ह्या चटणी ला कच्चे शेंगदाणेच घालावेत ..तरच चव जमते....

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

छान आहे ही चटणी.मी वरील साहित्याबरोबर एखादी लसुण पाकळी घालते.गुळ व गावरान टोमॅटो च्या आंबटपणामुळे चव खुप मस्त येते.

मस्तच लागते ही चटणी. एकदम गावकडच्या टोमॅटोची आईने केलेली चटणी आठवली.
कच्चे टोमॅटो,मिरची तेलावर थोडेसे तेल घालून खरपूस परतून घ्या.>> मग टोमॅटो कच्चे कसे राहतील Happy