रेखाचित्रांसाठी मदत हवी आहे

Submitted by साजिरा on 24 April, 2012 - 06:39

माझ्या एका (वैयक्तिक) कामामध्ये काही रेखाचित्रे लागणार आहेत. आधीच केलेल्या कॉपीरायटिंगला अनुसरून चित्रे- असं त्याचं साधारण स्वरूप आहे. या कामात आपल्यापैकी कोण आणि कशी मदत करू शकेल? (हे काम जाहिरात क्षेत्रातलं नाही.)

स्केचेस शक्यतो कृष्णधवल असतील. पेन्सिल स्केचेसही चालतील. मला हवी असलेली स्केचेस कशी असावीत याचा विचार केल्यावर प्रकाश संतांच्या पुस्तकांतली स्केचेस नजरेसमोर आली. पण अगदी 'तशीच' असणं आवश्यक नाही, हे आहेच.

सारं ठरवल्याप्रमाणे झालं आणि हे काम व्यावसायिक पातळीवर उतरवायचं ठरलं, तर त्याची कल्पना अर्थातच आधी देण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष बोलून मोबदला आणि इतर गोष्टी बोलता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त व्यावसायिक तत्वावर मी माझा मित्र चित्रकार संजय शेलार ह्याला विचारू शकतो. किती रेखाचित्रे ते ही सांगाल तर बरे होईल.

साजिरा,
कशा प्रकारची चित्र हवीत याचे एखादे उदाहरण टाकणार का इथे?
आणि कसली चित्रे, म्हणजे साधारण विषय काय असणार त्याचा अंदाज देता आला तर तेही चांगले होईल.

साजिरा
मी केलं असतं पण सध्या खूप काम आहे. माझ्या पुतणीला सध्या वेळ आहे. तिला एक संधी देणार का ? चित्रं ज्याची आवडतील त्याचीच घ्या. जर हे काम पूर्ण झालं आणि पसंत पडलं (रिजेक्ट झालं तरी चालेल ) तर तिला यातून शिकायला मिळेल हाच मोबदला. वेगळी अपेक्षा नाही.

फार पूर्वी कुणितरी मागणी केली म्हणून मी गोटीच्या माऊसने गायवासरूचे स्केच फटाफट्ट काढून दिले होते. तसे काही चालणार असेल, तर मला बिनधास्त विषयाची यादी पाठव, जमतील तेवढी काढून देतो, पटतील तेवढी घ्या, नैतर सोडून द्या! कस?
तसे माबोकरामधे अजय, फ इत्यादी चान्गले कलाकार आहेत, त्यान्नाही बातमी पोहोचवा.

मायबोलीवरच्या एक चांगल्या चित्रकार >> मला वाटतं त्यांच नाव अभिप्रा आहे. त्यांची चित्रे फार सुंदर असतात.
पण खरच आधी कुठल्या प्रकारची आणि विषयावरची चित्रे हवी हे माहित असेल तर सुचवणे सोपे जाईल.

दिव्या( नवा आयडी बहुतेक समर्पण) , अश्विनी काशीकर, पल्ली यांनी पण दिवाळी अंकासाठी रेखाटनं केली होती.
सीमा , अंजली यांना पण मी इथे डोकवायला सांगते ,
कामाच्या स्वरुपाबद्दल फारच कुतुहल आहे मला. काही व्यावसायिक सिक्रेट नसेल तर इथेच अजून माहिती देता येईल का ? :फर्मास नवे पुस्तक वाचायला मिळेल अशा आशेतली बाहुली:

साजीरा...
विषया बद्दल कल्पना येत नाही... तरी देखिल 'नीलू' देखिल चांगल्यापैकी चित्रकार आहे, आणी तिने एका वर्षी दिवाळीअंका साठी खूप छान काम केलेलं आहे... तिला देखिल विचारुन पहा...
Happy

नीलूने आमच्या लि नि प विशेषांकासाठीही उत्कृष्ट मुपृ केले होते. ती ग्राफिक डिझायनर आहे.

सावली | 24 April, 2012 - 03:46 नवीन
साजिरा,
कशा प्रकारची चित्र हवीत याचे एखादे उदाहरण टाकणार का इथे?
आणि कसली चित्रे, म्हणजे साधारण विषय काय असणार त्याचा अंदाज देता आला तर तेही चांगले होईल.

<<<
सावलीला अनुमोदन.
उदाहरण म्हणून एखादं स्केच टाकलं तर मग सांगु शकेन. :).

साजिरा,
कशा प्रकारची चित्र हवीत याचे एखादे उदाहरण टाकणार का इथे?
आणि कसली चित्रे, म्हणजे साधारण विषय काय असणार त्याचा अंदाज देता आला तर तेही चांगले होईल.
+१

तसेच रेखाटने कधीपर्यंत हवी आहेत, साधारण कलावधी याची माहिती पण देवू शकशिल का?

इथे अभिप्रा म्हणून आयडी आहे. त्यांची स्केचेस खूप सुंदर असतात त्यांना विचारू शकतोस.
तसेच वर्षा यांनीपण पक्ष्यांची काढलेली स्केचेस खूप सुंदर आहेत.

लोक प्रश्नावर प्रश्न विचारतायेत... आणि धागाकर्ता कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात रमलाय....

साजिर्‍या उत्तरं दे की पटापटा...

चांगली रेखाटने करुन देणारे कितीतरी जण आहेत माबोवर... नक्की कसे हवे आहेत ते सांगितलेस की कोण करु शकेल ते स्वतःहूनच सांगतील..

धन्यवाद मित्रांनो. Happy

इथे उशिरा लिहित असल्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व. या कामासंदर्भातल्या इतर काही गोष्टींची वाट पाहावी लागल्याने उशिर झाला.

वर प्रतिसादांतून कामाची, मदतीची तयारी दाखवलेल्या मित्रांना संपर्कातून मेल केले आहेत.

मेधा, रैना Happy फार मोठे व्यावसायिक सिक्रेट वगैरे नाही, पण हे काम पुस्तकाचं मात्र नाही.