चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol सायो..ROFL असामी Proud
********** स्टाइल मे रहनेका !! ************

परत माधुरी चर्चा ? जुने हितगुजवर यावर झालेले प्रेमळ संवाद आठवले!! मला अजून असाम्याची कमेन्ट आठवतेय, दीदी तेरा देवर.. मधल्या माधुरीबद्दल Biggrin

डीजे, हम आपके... मधली माधुरी तेव्हातरी खूप आवडली होती. तू म्हणतेस ते काही लक्षात नाही, कदाचित तिचा screen presence आणि overall personality आवडली. आताच्या दीपिका पदुकोण, बिपाशा बासू, करीना कपूर (काय ते झीरो साइझ वगैरे), प्रियांका चोप्रा फॅशन शास्त्रीय दृष्ट्या जास्त अचूक असतील पण हम आपके... च्या माधुरी पुढे टोटल भंगार आहेत हे नम्रपणे सांगू इच्छितो :P. बाकी लारा दत्ता, डायना हेडन वगैरेंना कोणी घेतलं मला अजूनही आश्चर्य वाटतं. ही नावे/आडनावे क्रिकेट मधेच ठीक आहेत Happy

>>दीदी तेरा देवर.. मधल्या माधुरीबद्दल
काय वर्णावा तो सोहळा पारणे फिटे डोळ्यांचे Lol

>>>आताच्या दीपिका पदुकोण, बिपाशा बासू, करीना कपूर (काय ते झीरो साइझ वगैरे), प्रियांका चोप्रा फॅशन शास्त्रीय दृष्ट्या जास्त अचूक असतील पण हम आपके... च्या माधुरी पुढे टोटल भंगार आहेत हे नम्रपणे सांगू इच्छितो

हवे असतील तितके मोदक. फॅशनच्या(त्या वेळच्या) बाबतीत नाही तरी माधुरीच्या चेहर्‍यापुढे नी त्या गोडव्यापुढे फिक्या आहेत ह्या सगळ्या बाया.

पण हम आपके... च्या माधुरी पुढे टोटल भंगार आहेत हे नम्रपणे सांगू इच्छितो >> हे बाकी बरोबर आहे. तशी "पाठ" होणे नाही Lol

तशी "पाठ" होणे नाही >>>smiley36.gifsmiley36.gif

बिपाशाचा आजकालचा लाऊड मेकप पाहिला, की मला साक्षात चेटकीण आठवते. करीनाचे पहिलेचे सिनेमे बघा, तिचा चेहरा आणि भुवया अशा काही दिसतात की तिचे बाबा बारीक होऊन आलेत असं वाटतं आणि साईझ झीरो अगदी चांगला दिसत नाही. विमानतळावर प्रियंका चोप्राला समोरासमोर बघितल्यावर अपेक्षाभंगच झाला. ती बरीच काळी आहे (सिनेमात अगदी गोरी दिसते) आणि चेहरा अगदी सामान्य आहे. त्यातल्या त्यात दीपिका बरी वाटते.
पण माधुरी ती माधुरीच!

वाटलच माधुरी चे पंखे जमणार म्हणून Biggrin
माधुरी च्या अदा , डान्स स्किल्स वगैरे सगळं निर्विवाद आहे पण सुपरस्टार असून ही असे भयानक ड्रेसेस (ते ही तिच्या 'फिगर' चे प्रचंड फ्लॉज हायलाइट करणारे), भयानक लाउड मेक अप चे लेप चोळणारी सुपरस्टार अ‍ॅक्ट्रेस झाली नाही .. स्टार असून कस् काय सहन केलं तिनी असले असले अर्टिस्ट्स !

आताच्या दीपिका पदुकोण, बिपाशा बासू, करीना कपूर (काय ते झीरो साइझ वगैरे), प्रियांका चोप्रा फॅशन शास्त्रीय दृष्ट्या जास्त अचूक असतील पण हम आपके... च्या माधुरी पुढे टोटल भंगार आहेत हे नम्रपणे सांगू इच्छितो
<<<< अता माधुरी ला नावं ठेवली म्हणजे या सगळ्या चांगल्या आहेत अस् थोडीच आहे , सुमार च आहेत सगळ्या (अभिनयात) Proud
पण ९० च्या साजन-राम लखन च्या काळातल्या माधुरी सारखा भयानक ग्लॉसी तेलकट मेक अप कोणी करत नाही.. त्या वेळी बहुदा दिल्ली स्टाइल च्या बायकांना मेक अप ला बसवत असतील!..असा भयानक मेक अप.. त्या पेक्षा बिन मेक अप ची माधुरी कदाचित जास्त चांगली दिसत असेल !
आज काल च्या अ‍ॅक्ट्रेसेस ना प्रेझेंट चांगलं करतात, डिझायनर्स चांगले असतात ज्यामुळे अगदी दीपिका पादुकोणे सारखी एरवी अम्मा दिसणारी बाई पण स्क्रीन वर चांगली च दिसते, फिटनेस च्या बबातीत जास्त जागरुक आहेत सगळ्या, लठ्ठ अ‍ॅक्ट्रेसेस अगदीच कमी दिसतात, म्हणून च म्हंटलं कि 'आजा नच ले' वाली माधुरी जास्त प्रेझेंटेबल दिसते स्लिम झाल्यावर !

********** स्टाइल मे रहनेका !! ************

तशी "पाठ" होणे नाही >>> Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin Biggrin

अजुन एक माधुरीचा भयनक पिक्चर म्हणजे अंजाम :(.. फक्त ते चन्ने के खेत मे आणि शाहरुक चे एक गाणे झकास होते एकदम Happy

मला 'हम आपके..' मधले ते चॉक्लेट्-लिम्लेट गाणे, आणि ते मरतुकडं कुत्तरडं याची डोक्यात भयानक तिडिक जायची..पण रेणुका शहाणे चा वावर प्रसन्न होता Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

>>असा भयानक मेक अप.. त्या पेक्षा बिन मेक अप ची माधुरी कदाचित जास्त चांगली दिसत असेल !
हो ( तो ठळक अपुरा असेल तर हा मोठठठाऽऽ हो) पुण्यात एका लग्नाला आली होती आनंद मंगलमध्ये तेव्हा काय दिसत होती.. अगदी जितक्यास तितका मेकप आणि सुंदर प्लेन साडी.. या मुलाखतीत पण मस्त दिसते.. एकदम बाळबोध Happy

माधुरी इ़ज 'बॅक'! चालुदे... Proud

माधुरी कधी कधी एकदम बारीक (राजा) तर कधी एकदम ढोल (याराना) दिसायची...

असम्या सोनालीला सोडून माधुरीच्या 'पाठी'मागे का लागला आहेस आता? Happy
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

असम्या सोनालीला सोडून माधुरीच्या 'पाठी'मागे का लागला आहेस आता?

<< सोनाली प्रकरण ऑलरेडी तोंड'पाठ' असेल न त्याला म्हणून असेल फॉर अ चेंज ! Proud
********** स्टाइल मे रहनेका !! ************

डीजे ९०मधल्या वाईट मेकप आणि कपड्यांबद्दल अनुमोदन.. हॉरिबल कपडे! कंबरपट्टे अन् पायजम्यासारख्या सलवारी, फुग्यासारखे स्कर्ट्स.. का ही च्या का ही! मेकपही शाळेच्या गॅदरिंगमध्ये करतात तसा- एकजात सगळ्यांना सारखा! लाल किंवा गुलाबी लिपस्टिक आणि अतर्क्य हेअरस्टाईल्स.. तरीही तरीही तरीही, माधुरीच उठून दिसली, टीकून राहिली Happy

आणि तिने आताच्या ट्रेन्डप्रमाणे स्वतःला बदललंही आहे.. Happy
अमिताभच्या सेकंड इनिंगप्रमाणे तिलाही तगडे सिनेमे का नाही मिळतेत? Sad कॉमेडी सेन्स जबरदस्त आहे तिचा.. 'ईडली डू'वाला 'खेल' आठवतोय? सही होता, पण चालला नाही फार..

तेव्हाचे आता वाईटच दिसते.....मला इतर सर्वांप्रमाणे अमिताभचे जबरदस्त वेड होते. आता त्याचे जुने पिक्चर पाहते तेव्हा ती बेलबॉटम पँट, आखुड, रंगीत डिजाईनचे शर्ट, जाडजुड बेल्ट वगैरे पाहुन हसायलाच येते.. तेव्हा लक्षातही येत नव्हते.

आताच्या हिरॉईनींचे कपडे आणि मेकप पाहिले की हळहळ वाटते.. माधुरीला हे सगळे का नाही मिळाले? अजुन सुंदर दिसली असती ती....

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

पुकारच्या एका गाण्यात ती इतकी जाडी आणि भयंकर दिसलीय की बाप रे बाप! क्लबात की हॉटेलात नाचत असते आणि नम्रता आणि अनिल कपुर तिथे डेट्साठी आलेले असतात.
माधुरीला हे सगळे का नाही मिळाले? अजुन सुंदर दिसली असती ती....>> अनुमोदन. अभिनय, नृत्य या सगळ्याच्या जोरावर तीनं स्वतःच स्थान बनवलं. त्या विचित्र कपड्यात, वाईट्ट मेकअपमधुनसुद्धा तीचं वेगळेपण जाणवावं ह्यात बरच काही येतं.

माधुरी , नेन्यांसोबत Happy

7116d453-81c9-42bc-9be3-ee6b86a2e7e6HiRes.jpg

अन ही ऐश्वर्या Happy

aishfullsmtp7.jpg

**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!

ऐश्वर्या मस्त दिसतेय................. एकदम ' चांदोबा' मधल्या राजकन्ये सारखी Happy
मला आवडला तिचा लग्नातला गेट अप...चक्क साउथ स्टाइल जपली तिनी, तोच घीसा पीटा लाल शेड मधला लेहेंगा नाही घातला !

माधुरी ताइ मात्र अगदीच घरगुती , नही सुधरेंगी ..काय ती साडी!!
********** स्टाइल मे रहनेका !! ************

दिपांजली- तु घरी अशा साड्या नेसतेस ? आँ ( दिवे, दिवे !)

एकदम ' चांदोबा' मधल्या राजकन्ये सारखी >>> अगदी अगदी.. खुप दिवसानी चांदोबा आणि त्यातल्यी गोष्टी आल्या डोळ्यापुढे :).. खासक्रुन विक्रम्-वेताळ चे सदर Happy

पण त्यातली चित्रे एकदम नादखुळा असायची..

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

असामी, फारेंड :d

माधुरी किती सुन्दर दिसतेय.मलातरी ती साडी आवडली.
परीन्दामधे माधुरी काय गोड दिसत होती.ते पण विना मेक-अप.

आताच्या हिरॉईनींचे कपडे आणि मेकप पाहिले की हळहळ वाटते..
>>>
आताच्या हिरविणींचा मेकप दिसतो, कपडे कुणाला दिसले म्हणे? Wink

परीन्दामधे माधुरी काय गोड दिसत होती>> पण जास्त वेळ कुठे होती पिक्चर मधे ?? मारुन टाकली लगेच तिला Sad

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

कपडे कुणाला दिसले म्हणे? जे काय थोडेफार घालतात त्याबद्दल नाही बोलत मी.. कधीकधी व्यवस्थित अंगभर घालतात एखाद्या दृश्यात त्याबद्दल बोलत होते... Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

कधीकधी व्यवस्थित अंगभर घालतात एखाद्या दृश्यात त्याबद्दल बोलत होते >>> असे दृश्य आलेच एखादे तर टण्या लगेच बाहेर जातो गं धूम्रवलये सोडायला त्यामुळे त्याला माहित नसेल Happy
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

दिपांजली- तु घरी अशा साड्या नेसतेस ? >> ती दिवसभर हिंदी सिरीयल्स बघत असते डिशवर त्याचा परिणाम असेल Lol

कपडे कुणाला दिसले म्हणे? >> Lol

मिल्या, विसरू नकोस "आपली" प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, ... Lol

परीन्दामधे माधुरी काय गोड दिसत होती>> पण जास्त वेळ कुठे होती पिक्चर मधे ?? मारुन टाकली लगेच तिला >>>>>>>>>हम्म....पण जेवढा वेळ आहे,त्यात झक्कास दीसते.

मिल्या, विसरू नकोस "आपली" प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, ... >>> Biggrin दामट्याची आठवण झाली Happy

आता समर्‍या असता तर म्हणाला असता की आता एस्व्हीएस असे म्हणेल .. ही प्रतिज्ञा कोण? Biggrin

-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

केदार, आहे की शेवटपर्यंत, शेवटीच मारतो ना नाना?

Pages