सुंदल्/सुंडल

Submitted by प्राजक्ता on 12 April, 2012 - 14:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी छोले किंवा चवळी
२ चमचे ऊडिद डाळ
२ सुक्या मिरच्या
४ मोठे चमचे ओला नारळ्(ताजा खवलेला असेल तर ऊत्तम)
२ चमचे तेल
१-२ सुक्या लाल मिरच्या
कढिपत्त्तयाची पान १-२
मोहरी,हिंग,मिठ

क्रमवार पाककृती: 

सुंदल् किंवा सुंडल हे म्हणजे दाक्षिणात्य सॅलेड,कोशिंबिर सारखा एक प्रकार,त्यांच्याकडे नवरात्रित केला जाणारा.
क्रुती अगदी सोप्पी आहे, छोले किंवा चवळी रात्रभर भिजवुन सकाळि कुकरला लावुन मउ शिजवुन घ्यायची शिजताना दाणा अक्खा राहिला पाहिजे.
कढईत तेल तापवुन मोहरी, हिंग,मिरच्या टा़कावे कढिपत्त्याची पाने टाकुन तडतडली की उडिद डाळ टाकुन तळुन घ्यावी त्यात पाणी निथळून छोले/चवळि
आणी चविप्रमाणे मिठ टाकुन परतावे शेवटी ओल खोबर टाकुन एक टॉस द्यावा.

वाढणी/प्रमाण: 
१-२
अधिक टिपा: 

कॅन छोले/चवळि वापरले तर अगदी पटकन होणारा प्रकार.
याचे दोन्ही उच्चार मी एकले असल्याने दोन्ही नाव लिहलियत.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लागतं हे. माझ्या शेजारणीकडे नेहमी देवीची पूजा, पठण असे कार्यक्रम असतात तेव्हा हा प्रकार आणि शिरा असतो.

मी इकडे आल्यावर पहिल्यांदा शेजारणीच्या हातचा असा हाच पदार्थ खाल्ला होता. मस्त लागतो हा प्रकार Happy

छान लागतं हे. नवरात्रीत खाल्ले आहे. नाव माहिती नव्हतं. आमच्या शेजारी पार्थसारथी मामी, आम्हाला
प्रसाद या नावानेच देतात.

आमचे कानडी स्नेही "राव" या,च्याकडे नवरात्रात केळीच्या लहानशा पानावर काळे/देशी चणे उकडुन केलेले संदल्,करंजी आठवले.त्याबरोबर चणाडाळ उकडुन त्यात गुळ -खोबरे घालुन शिजवलेले गोड,यात डाळ जवळ्-जवळ सबंध दिसायची. -त्याचे नांव आठवत नाही.त्यानंतरहळकुंड,सुपारी,नारळ्,तांदुळ्,हळद्-कुंकु व मद्रासी सुपारीची पुडी,बांगड्या,खास मद्रासी घाटणीची कॉटन साडी अशी ओटी देत असत.पुर्वी हे सगळे ओटीचे सामान खास मद्रासी टाईप "सुपात" द्यायचे म्हणे.

हापिसात दर २ दिवसांनी हेच असायचं चहाबरोबर कँटीनमधे >> आमच्या इथे तर रोजच असतं... पण छान लागतं आणि जास्त तेलकट पण नाही लागत! आज समजलं कसं करतात ते, आता करून पाहीन Happy

धन्यवाद सगळ्यांना! दाक्षिणात्य लोकांत हे नवरात्रित केले जाते त्याला 'गोलु' म्हणतात पुजेत पायर्‍या पायर्‍याच्या उतरंडिवर अनेक लहान मोठ्या मुर्त्या मांडल्या जातात आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे अस कडधान्य भिजवुन सुंडल केले जाते(त्यात सुधा घरटी वेगवेगळ्या प्रथा आहेतच)आणी आपण जस चैत्रगौरिच्या हळदिकुंकवाला भिजवलेले हरभरे आणी कैरिचि डाळ प्रसाद देतो तसे हे त्यांच्याकडे प्रसाद म्हणुन दिले जाते.

मस्त आहे.

सोसायटीमधे नवरात्रात परवा एका तमिळ फॅमिलीकडून वाटाण्याची ह्याच प्रकारची उसळ होती. त्याला सुंदल म्हणतात. हे प्राजक्ता आणि नंदीनी ह्यांची रेसिपी वाचल्यावर आज कळलं. Happy