एवढंच ना?

Submitted by रीया on 11 April, 2012 - 14:08

त्यादिवशी हापिसला सुट्टी घेतली म्हणुन आमच्या आऊसाहेब माझ्यावर स्वयंपाकाची जबाबदारी टाकुन शाळेत निघुन गेल्या. मी आपलं सगळं साग्रसुंदर जेवण तयार केलं खर पण माझ्याकडुन ना स्वयंपाकात थोडीशी चुक झाली आणि काही काही (काहीकाहीच हं!) पदार्थ बिघडले Sad
आता कधीतरी स्वयंपाक करणार म्हणल्यावर बिघडणारच ना?
पण......! Sad
जे ओरडायला सुरुवात केली आईने....पार माझ्या (माहित नसलेल्या) सासरपर्यंत पोहचली. "नवर्‍याला उपाशी मारशील गं कार्टे" इथपासुन ते "सासु घराबाहेर हकलुन देईल तुला" इथपर्यंत सगळं झालं. (तरी बरं तिला मी आवर्जुन 'ससुराल गेंदा फुल','एका लग्नाची दुसरी गोष्ट' सारखे कार्येक्रम पहायला लावते. की बघ आजकालच्या सासवा गरीब बिचार्‍या असतात गं! Proud )

आणि त्यात माझ्या भगिनींनी एक वाक्य टाकलं "आई काळजी करु नकोस, तिचा नवरा शेजारी जेवायला जाईल रोज!"
त्यात (बिचार्‍या) संदिपच 'एवढंच ना' सुरु झालं लॅपटॉपवर Happy
आणि मग हे सुचलं..... Happy

पुन्हा एकदा संदिप खरेची क्षमा मागुन.....

एवढंच ना?

एवढंच ना...एकटे खाऊ...एवढंच ना...
करपली फोडणी,भाजी अळणी
चटणीदेखील बिघडली वरुनी...एवढंच ना....

लाडवाचा घास,दाताला त्रास
हातोड्याने तोडू एकेक घास
जाड जाड पोळी, पापडही जळी
कोशिंबिर बाद,अन भरीत मिळमिळी...
एवढंच ना.....

बायको सुगरण होतीच कधी?
तिच्या हाताला चव होतीच कधी?
खमंग वास? शेजारी खास
पक्वानांचे भासच भोगत जगू
एवढंच ना....

आलात तर आलात वाटते किव
जेवलात तर जेवलात तुमचा जीव
स्वतःचा हात, स्वतःचे ताट
स्वतःच खावा, कच्चा भात
एवढंच ना.....

शेजारीण माझी श्रीखंडापरी
साधीच खीर बायको जरी
बायकोच खरी, बायकोच बरी
रोज रोज श्रीखंड परवडेल काय?

-प्रियांका विकास उज्जवला फडणीस.

Smiley Smiley

गुलमोहर: 

प्रिया....... तू हे जे काही चालवलं आहेस त्याला.....

"खर्‍याचे खोटे" Proud असंच नाव दे....... Rofl (संदीप खरेंना Light 1 )

भारी लिवलय बाकी........

बायको सुगरण होतीच कधी?
तिच्या हाताला चव होतीच कधी?
खमंग वास? शेजारी खास
पक्वानांचे भासच भोगत जगू
एवढंच ना....
....... जबरदस्त..........

आभार ऑल्स Happy

प्रिया, का त्या खर्‍यांच्या मागे हात धुवुन लागली आहेस?
>> अग जाम आवडतो संदिप मला
सारख्या त्याच्याच कविता ऐकत असते मी
त्यामुळे विडंबनासाठी कवितेचा विचार केला की तोच सापडतो Happy

"खर्‍याचे खोटे" असंच नाव दे.......
>>>
Lol
चालेल तस Proud
पुन्हा एखादं विडंबन सुचलंच तर सिरिज करुन टाकेन या नावाने Wink

स्वारी पण मला नाही आवडलं...आय् मीन मजा म्हणून ठीक आहे पण तो शेवटचा प्~अरा पूर्ण अनपटेबल्...प्रिया तुझं लगीन लागलं आणि प्रत्यक्षात आलं की कदाचित तूही अनुमोदन देशील..सो चिल्....
असो पण आता खरंच खर्^यांना सोड नाहीतर आम्ही खर्या खर्^यांना विसरू आणि फक्त विडंबनेच वाचु....:)

वेके मी चांगला स्वयंपाक करते गं
कधी तरी फसतं काही तरी
ते मी सहज लिहिलय....
केवढ सिरिअसली घेतलं बाई हिने
Lol

आई हजार मोदक खिलवेल हिला घरी आली की
Proud

--------------------------------

अरे बाप्रे
आता बरेच दिवस विडंबन प्रकार बंद करावा लागणारेय मला अस दिसतय Sad

प्रिया अग तुझ्या स्वयंपाक फसण्याबद्दल मी बोल्ले नं तर जौचदे..:)
बाकी उकडीचे मोदक मिळणार असतील तर अशा कमेंट्स करायला मी तयार आहे....:D

प्रिया, का त्या खर्‍यांच्या मागे हात धुवुन लागली आहेस? >>>
"खर्‍याचे खोटे" असंच नाव दे....... (संदीप खरेंना Light 1 ) >>>

विडंबन तर भारी आहेच, पण प्रतिसादही Lol

प्रिया ताई... "विडंबन" फिल्ड वर सोल्लिड वर्चस्व गाजवताय राव! आणि बिचार्या संदिप दादाला बकरा केलाय तुम्हि!

"आयुष्यभर बोलु काही!" नावाने programme सुरु करा!

Lol

आयला! हे बर आहे राव! एकिकडे डार्लिंग म्हणायचं आणि दुसरीकडे त्याचाच कवितांची सर्रास विडंबनं पाडायची!

ये बात कुच हझम नही हुई! Happy

जाम आवडतो संदिप मला
सारख्या त्याच्याच कविता ऐकत असते मी
त्यामुळे विडंबनासाठी कवितेचा विचार केला की तोच सापडतो

जाम आवडतो संदिप मला
सारख्या त्याच्याच कविता ऐकत असते मी
त्यामुळे विडंबनासाठी कवितेचा विचार केला की तोच सापडतो>>>>>>>>>>>

हेहेहे....................................हे माझ्या मानातल्या वाक्याचं विडंबन आहे रिया !! .

जाम आवाडतो विठ्ठल मला
सारख्या त्याच्याच गझला करत असतो मी
त्यामुळे.......विडंबनासाठी 'प्रतिसादाचा' विचार केला तरी तोच सापडतो !!

तात्पर्य : काहीही म्हण ..........मला रॉयल्टी हवीच !!
Biggrin Biggrin Biggrin