सुगरण ( हजल )

Submitted by वर्षा_म on 6 January, 2012 - 03:48

मी "गझल रचना.... तरही गझल" मधे केलेली एकमेव हजल गुलमोहरात टाकतेय Happy

===========================================

सुगरण तुला उगीचच्,म्हणण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

तू लाटलीस पोळी,झाला तिचा नकाशा,
तो देश कोणता हे,वदण्यात अर्थ नाही

तू वाढलीस आमटि,पातळ कशी जहाली?
रुचकर म्हणून जल्,ओरपण्यात अर्थ नाही

तू पापलेट केले,मज आवडे म्हणूनी
इतुके महाग मासे खाण्यात अर्थ नाही

येता घरी अतीथी,व्यंजन हजार केले
ताटात सपक सारे,देण्यात अर्थ नाही

दिलि जाहिरात आता,ठेवीन खानसामा
बेहाल उदर आता,करण्यात अर्थ नाही

================

डॉ. कैलाश यांना स्पेशल धन्स दुरुस्तीसाठी Happy

गुलमोहर: 

तू लाटलीस पोळी,झाला तिचा नकाशा,
तो देश कोणता हे,वदण्यात अर्थ नाही >> अगं काय हे वर्षे, कित्ती हसावं Lol

तू वाढलीस आमटि,पातळ कशी जहाली?
रुचकर म्हणून जल्,ओरपण्यात अर्थ नाही>> टू मच Biggrin

इतुके महाग मासे खाण्यात अर्थ नाही>>> Rofl

Rofl

तू लाटलीस पोळी,झाला तिचा नकाशा,
तो देश कोणता हे,वदण्यात अर्थ नाही

जगाचा नकाशा असेल कदाचित! Lol

अफाट, भन्नाट, अचाट, अफलातून, चाबूक, इ. इ. इ. सर्वगुणसंपन्न हजल!

जगाचा नकाशा असेल कदाचित! >> कदाचित नाही ओ ताई "क्वचीत"च होतो जगाचा नकाशा ( गोल आकार ) Wink
मस्तच वाटले तुमचा प्रतिसाद पाहुन Happy

सगळ्यांना धन्स Happy

अक्के माझ्या इवलुशा केसांचा खोपा Lol

घरी येवुन बघायला हवय आता नक्की काय खातात ते >> गुब्बे नुसते बघायला नाही मिळणार खावे लागेल. येतानाच डॉक्टरची अपॉइंटमेंट घेउन ये Wink

प्रिती , बाबु धन्स Happy

धम्माल ! Biggrin
>>>नुसते बघायला नाही मिळणार खावे लागेल. येतानाच डॉक्टरची अपॉइंटमेंट घेउन ये <<< Lol

स्वानुभवातुन स्फुरलेली हजल वाटतेय >> अरे काय हे.. नीट वाच बघु...
(त्यांच्या)नुभवातुन स्फुरलेली हजल वाटतेय ही Lol

तुमच्या दुसर्‍या हजलेच्या प्रतीक्षेत. >> डॉक्टर कशाला स्वतःच्या पायावर दगड पाडुन घेताय Uhoh Proud

Pages