म्युच्वल फंड

Submitted by webmaster on 14 May, 2008 - 09:09

म्युच्वल फंड या विषयावरची सर्वसाधारण चर्चा. एखाद्या विशिष्ट फंडाबद्दल चर्चा करायची असेल तर नवीन गप्पांचं पान सुरू करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !
आम्ही नोव्हेंबर २००७ मध्ये ५ म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणुक केली होती. मध्येच स्टॉक मार्केट कोसळल्यामुळे त्यापैकी बहुतेकांमध्ये तोटा होत आहे. हे सर्व SIP आहेत. आणि रक्कम पण बर्‍यापैकी (१५००० - ५ फंडांमध्ये मिळून) आहे. तर आता ते बंद केले तर exit & re-entry (इतर फंड मधे) करणे आणखी तोट्याचे ठरेल का ? वाट पाहणे पण त्रासदायक होत आहे. वाट पहायची तर किमान १ वर्ष पाहवी का ? ही गुंतवणुक आम्ही स्वतःच थोडा अभ्यास करुन केली होती, कन्सल्टंट ला न विचारता, त्यामुळे चुकीची गुंतवणुक होउन तोटा झाला असेल का ? कन्सल्टंट चा सल्ला घेणेच योग्य आहे का ?

म्युचवल फंडांची निर्मीतीच सल्ला न घेता गुंतवनुक करन्यासाठी केली आहे, जेने करुन सामान्य गुंतवनुकदार थोडाफार मार्केट रिसर्च करुन गुंतवनुक करेल. जानेवारी व फेब मध्ये मार्केट पडले त्यामुळे सर्वाचेच नुकसान झाले. काही फंडांचे कमी काहींचे जास्त.
जेव्हा आपण गुंतवनुक करतो तेव्हा त्याचा परतावा मिळायला काही वर्ष वाट पाहावी लागते. शिवाय तुम्ही नोव्हे मध्ये म्हणजे मार्केट खुप तेजीत होते त्यामुळे तुमची गुंतवनुक मुद्दलातच यायला काही वेळ जावु द्यावा लागेल. आत्ता लगेच विकु नका.
म्युचवलफंड पण शेअर्स सारखे अनेक घ्यायचे नसतात तर ३ ते ४ घ्यायचे. शिवाय त्यातील एक इंडेक्स फंड ठेवायचा.
तुम्ही कुठले फंड घेतले आहेत ते द्याल का? मग त्यावर आपण ठरवु ते विकायचे का नाही? लगेच विकु नका.

अनेक धन्यवाद केदार जोशी.
इंडेक्स फंड माहीत नाही, गुगल करते.
तुम्ही सांगीतल्याप्रमाणे आताच विकत नाही. हे किती वर्षे ठेवायचे ते कसे ठरवायचे ?
आमचे सगळे SIP आहेत. - Franklin India Bluechip Fund - Growth, HDFC Growth Fund, Reliance Diversified Power Sector Fund, SBI Magnum Sector Umbrella Contra Growth, Franklin Prima Plus Growth.
SIP करणे जास्त चांगले की ३-४ वर्शांच्या मुदतीने ठेवणे ?
शिवाय, गेल्या वर्षी ४ SIP चालू केले असतील आणि आता या वर्षअखेर परत गुंतवणुक करायची असल्यास कुठे करावी ?

नमस्कार केदार,

खालील फंड सध्या काय परतावा देतील असे वाटते ?
कृपया मदत करावी .
धन्यवाद.

-------------------------------------------------
Equity: Tax Planning:
HDFC TAX SAVER - GROWTH PLAN$$
SBI MAGNUM TAX GAIN SCHEME$$
SUNDARAM BNP PARIBAS TAX SAVER - OE GROWTH$$
SBI Tax Advantage Series I-G
-------------------------------------------------
Equity:
Birla Infrastructure-G
Franklin India Opportunities-G
Magnum Balanced-G
Magnum Contra-G
Magnum Global-G
Tata Infrastructure-G
UTI Infrastructure Advantage - Series I-G
-------------------------------------------------

Franklin India Bluechip Fund - ब्ल्यू चिप फंड असल्यामुळे विकु नका. मार्केट वर जाताना पहिले ब्ल्यू चिप कंपन्याच वर जातात.
HDFC Growth - परत एकदा ईक्वीटी डायवर्सीफाईड फंड. गेल्या तिन महिन्यात ५ टक्के तोटा त्यामुळे अगदीच वाईट नाही. कारण बर्याच फंडस ना साधारण १० टक्के तोटा झालेला आहे.
Reliance Diversified Power Sector Fund - येत्या ३ चार वर्षात नक्कीच फायदा होईल. पावर नक्कीच चांगली गुंतवनुक आहे.
SBI Magnum Sector Umbrella Contra Growth & Franklin Prima Plus Growth. दोन्ही ओके आहेत.
मुळात तुम्ही गुंतवनुक ही तेजीत असताना केली आहे त्यामुळे अजुन बरीच वाट पाहावी लागेल.
तुम्ही एक ईंडेक्स फंड विकत घ्या. ऐस आयपि मुळे झाला तर फायदाच होतो कारण त्यात मार्केट टायमिंग नसते. गुंतवनुक ही साधारन ३ वर्षासांठी करावी पण दर तिन ते चार महिन्याने त्याचे अवलोकन करावे.

ट्रिश - फंड काय परतावा देतील हे सांगता येत नाही कारण एकाच वेळी एका फंड मध्ये अनेक कंपन्यांचे समभाग असतात व फंड हे एक डेरीव्हेटीव टाईप गुंतवनुक असल्यामुळे त्या सर्व समभागांचा अभ्यास करावा लागेल पण साधारण सर्वच फंड हे ३ ते ८ टक्के फरकाने चालत असतात. तु गुंतवनुक करताना सर्वच टाईपच्य फंड मध्ये केलेली आहेस त्यामुळे तसा तुझा पोर्टफोलीओ बॅलेन्सड आहे. टाटा इन्फ्रा ने अजुनही चांगले रिट्रन्स दिले नाहीत पण एखादे वर्ष वाट पाहावी लागेल. शिवाय टॅक्स फंडस मध्ये एवढी गुंतवनुक (म्हणजे एवढे फंड्स) का घेतले? तु पण एक इंडेक्स फंड घे. कुठलाही चालेल.

म्युचवल फंड हे शेअर्स सारखे अनेक घेतले नाही तरी चालतात. साधारण ३ ते ५ फंड मध्ये गुंतवनुक करावी.

केदार छान सल्ला!
gold मध्ये जर गुंतवणुक करायची झाली तर तु काय सल्ला देशिल? कोणती खरेदी अधिक चांगली? with bank or broker? माझ्या माहितीप्रमाणे mutual fund मध्ये Kotak Gold ETF, UTI Goldshare, Benchmark Goldbees इथे सोन्यामध्ये गुंतवणुक करता येते. याबद्द्ल विस्तृत माहिती असेल तर इथे देशिल का?
अलिकडिल Dollar मधिल वाढ पाहता जागतिक स्थरावरिल तेलाच्या किंमतीमध्येहि वाढ दिसुन येतेय. एकंदरित भविष्यात सोन्याचे दर खुपच वाढतिल अस वाटत आहे म्हणुन हि गुंतवणुक समभागापेक्षा याक्षणी उचित वाटते आहे. म्हणुन सल्ला अपेक्षित.. Happy

Mutual Fund मधे गुंतवणूक करताना एकाच प्रकारच्या दोन सारख्या Fund गुंतवणूक करू नये असे सुचवले जाते. उदा. दोन वेगळ्या कंपन्यांचे पण एकाच category मधले Mutul FUnd
म्हणून असे सुचवावे वाटते
Birla Infrastructure-G
Tata Infrastructure-G
UTI Infrastructure Advantage - Series I-G
या ३ फंडांचे उद्देश सारखे असल्याने जे diversification हवे आहे ते मिळणार नाही.
एकदा ५-६ पेक्षा जास्त फंडांमधे पैसे गुंतवले तर हवा तो फायदा कमी होण्याची आणि रिस्क वाढण्याची शक्यता वाढते कारण तुमच्या नकळत diversification कमी होते.

केदार, अजय, धन्यवाद.

हो सुरवातीला अधिक ज्ञान नसल्या मुळे काही फंड निवडताना चुका झाल्या, किंवा असे म्हणा घाइ केली संपुर्ण पोर्टफोलीओ चा विचार नाही केला. इन्फ्रा चा बूम होता, मग त्यात एका फंड वर अवंलबून राहु नये म्हणुन अनेक घेतले, त्यातले बिर्ला आणि युटिआय जरा चांगले निघाले. तर मागल्या र्वषि पेक्षा ह्या वेळी टाटा ने निराषा केली. या पुढे कुठल्या इन्फ्रा मधे अधिक लक्ष द्यावे असे वाटते ?

टॅक्स फंडस मध्ये सुरवातिला एचडीएफसी आणि एसबीआय घेतले, सुंदरंम चा या र्वषी परतावा चांगला वाट्ला म्हणून गुतवले.

>>>तुमच्या नकळत diversification कमी होते.
या वर काही उपाय आहे का, किंवा हे कसे पडतळायाचे ? काहि अधिक माहीती मिळेल का!

आणि काहि NFO घेतले.....valueresearch च्या rating नुसार. पण आत्ता बाजार कोसळ्या मुळे फायदा काही दिसत नाही आहे. तरी अजुन किती वेळ लागेल हे सगळे सावरायला असे तुम्हाला वाटते ?

Tata Infrastucture Fund चा आजपासून मागच्या वर्षीचा परतावा @ ३५% आहे,तसेच २ आणि ३ वर्षांचा परतावाही ३०% पेक्षा जास्त आहे. साधारणतः सातत्याने ३ वर्षे २०-२५ % पेक्षा जास्त परतावा देणारे फंड चांगले म्हणता येतात.मागचे काही वर्षे मार्केट तेजीत असल्याने काही फंडांचे परतावे ५०% पेक्षा जस्तही होते. म्यूचुअल फंडाचे मुल्यांकन करतांना त्याच तेजीतला परतावा लक्षात घ्यावाच पण मंदीला असलेला resistance तितकाच महत्वाचा ठरतो.

NFO मध्ये गुंतवणूक करणे सहसा टाळावे.. कारण त्याचा ट्रॅक रेकोर्ड उपलब्ध नसतो. मुळातच MF हे ३ किंवा अधिक वर्षांच्या दीर्घमुदतीचे साधन म्हणूनच बघावे म्हणजे जोखीम कमी होतो. Rather than timing of the market, time in the market gives great returns.
MF हे मार्केट्संबंधित असल्याने त्याबबतितही वरील विधान लागू होते.

मला सुध्धा सोन्यात गुंतवणूक करायला आवडते. मी युटीआय मध्ये एस आय पी सुरु करायचा विचार करते आहे.
आणी इंडेक्स फंड सध्या कोणता बरा वाटतो आहे?

गिरीश Tata Infrastucture Fund मि आत्ताच घेतला आहे सधारण काही महिन्या पुर्वी....तेव्हा शेअर बाजार वरती होता....त्या मुळे काही परतावा नाही उलट तोटाच झाला आहे...त्या मुळे या चालू वर्षी काही आशा वाटत नाही...तरी साधारण अजुन किती महीने लागतील recover होण्या साठी असे वाटते जाणकारांना.

(घेण्याचा हेतु हा short term म्हणजे किमान दोन अडीच वर्ष)

तेल आणी पेट्रोल sector सबंधीत कोणते Mutual Funds आहेत का?

सुंदरम एर्नजी ओर्पच्युनिटीज आणि रिलायन्स न॑चरल रिसोर्सेस फंड हे तेल आणि पेट्रोल सेक्टर फंड आहेत.

फन्डाच्या ओफीस मध्ये जावुन पैसे भरल्यास एन्ट्री लोड लागत नाही. कम्स च्या ओफीस मध्ये बर्याच फन्डान्ची गुन्तवनुक स्वीकारली जाते. "www.camsonline.com"

मला tax savings साठी principal mutual funds मधे invest करायचे आहेत्.आत्ता करावे की थोडे थाम्बले तरी चालेल? कोणी सल्ला देइल का?कारण मागे कोटक मधे मी गुन्तवणुक केली आणि १५ दिवसानी त्याच रकमेत जास्त युनिटस मिळाले लोकाना. त्यामुळे ह्यावेळेस जरा माहितीगारानी मदत करावी ही विनन्ती.

जर सीप (दरमहा) करायचे असेल तर आत्तापासुन सुरुवात करणे चांगले. प्रिन्सीपल फंडाचा लाभांश डिसेंबर महिन्यापासुन मार्च पर्यंत डिक्लेअर करतात त्या दरम्यान एकरकमी गुंतवणुक करणे देखील योग्य.
शेअर मार्केट वर खाली होणारच त्यामुळे आपण केलेल्या गुंतवणुकीवर परतावा किती मिळाला हे महत्वाचे.

ऑन् लाईन ट्रेडिन्ग कसे करतात कोण सान्गेल का?

ऑन लाइन ट्रडिंग साठी खालील ३ ची आवश्यकता असते.

१) आय सी आय सी आय, एच डी एफ सी, कोटक महिंद्र, शेरखान अशा कोणत्यातरी ऑन लाइन सुविधा पुरविणार्‍यांकडे ऑन लाइन ट्रेडिंगचे खाते उघडावे लागते. खाते उघडण्यासाठी ते बहुतेक ७००-८०० रू. घेतात. नंतर दरवर्षी ३००-४०० रू. फी घेतात.

२) ऑन लाइन शी लिंक केलेले DeMat खाते देखील उघडावे लागते.

३) Settlement व खरेदी विक्री साठी एक बचत खाते देखील उघडावे लागते.

ही तीनही खाती एकमेकांशी जोडलेली असतात. खरेदी केलेले समभाग DeMat खात्यात ठेवलेले असतात. Online Trading a/c च्या माध्यमातून हे समभाग विकता येतात किंवा नवीन समभाग खरेदी करता येतात. खरेदी करण्यासाठी बचत खात्यातील पैसे वापरले जातात. तसेच विकलेल्या समभागांचे पैसे देखील याच खात्यात जमा होतात.

खरेदी - विक्रिच्या प्रत्येक व्यवहारात ब्रोकरेज द्यावे लागते. ICICI चे ब्रोकरेज ०.८५ टक्के (खरेदी किंवा विक्रीच्या व्यवहाराच्या एकूण किंमतीच्या) आहे. इतर बहुतेक जण ०.५५ टक्के ब्रोकरेज कापतात. परंतु ICICI ची वेब साईट इतरांच्या मानाने खूपच चांगली आहे.

On line Treding ची साईट वापरून फक्त समभागच नव्हे तर IPO, Mutual Funds, Futures and Options असे अनेक व्यवहार online करता येतात.

धन्यवाद !!!!!!!!!सतिश जी ,खुपच चान्गली माहिति दिलीत.

पन मी आता जपान् मध्ये आहे तर मला कसे करता येइल?

जपानमधून सुद्धा Online Trading a/c उघडता येते. तुम्ही http://www.icicidirect.com or www.hdfcsec.com अशा साईटवर जाऊन a/c जपानमधून उघडता येईल का याची माहिती मिळवा. त्यांच्या customer support ला ईमेल पाठवून सुद्धा माहिती मिळविता येईल.

www.hdfcsec.com वर Online Trading कसे कर तात कुनाल महिति अहे का? मि जपान मधे अहे

मी ही साईट वापरली आहे. परंतु मायबोलीच्या माध्यमातून हे कसे सांगणार?

तुमच्या गेस्त् बूक मधे एमैल चेक करा

केदार वरती इंडेक्स फंड घेण्याबद्दल सुचवले आहे. इंडेक्स फंड म्हण्जे काय?

बाजार ज्या इंडेक्स वर आधारीत आहे ( बिऐसई, ३० प्रकारचे समभाग, व निफ्टी) व त्या दिवशी प्रत्येक समभागाचे जे वेटेज आहे तेवढीच गुंतवनुक ईंडेक्स म्युच्वल फंड करते. थोडक्यात त्या ईंडेक्स ची कॉपी करते. व रोज ही गुंतवनुक् बदलत राहाते. (बाजार कमी झाला तर कमी व जास्त झाला तर जास्त.) ईंडेक्स म्हणजे काय हे ईथे बघता येईल. http://bseindia.com/about/abindices/bse30.asp

उदा साठी बिऐसई, ३० प्रकारचे समभाग. आय सि आय सि आय चे त्या दिवशीचे वेटेज समजा ५ टक्के आहे व महीन्द्रा चे ३ तर ईंडेक्स फंड ही त्याचा पुर्ण गुंतवनुकीच्या ५ टक्के आय सि आय सि आय व ३ टक्के महीन्द्रा कडे गुंतवले. दुसर्या दिवशी लगेच ते बदलेल.

ईंडेक्स फंड मध्ये गुंतवनुक केल्यास ईंडेक्स जसा वर किंवा खाली जाईल तसा फायदा वा तोटा होत राईल. शिवाय टॉप ३० कंपन्याच ईंडेक्स मध्ये असल्यामुळे वर जाताना जास्त फायदा होऊ शकतो.

धंन्यवाद केदार, छान माहीती मिळाली.

नमस्कार केदार,आजय,

मला सीपमधे गुन्तवनुक करायचि आहे तर, कुथे करु? अत्ता काय चान्गले options आहेत?

I want to invest in shares - Long term. Any suggestions? which will give better returns after 1/2 yrs

Pages