इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'

Submitted by लाजो on 4 April, 2012 - 02:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बटरनट स्नॅप कुकिज (किंवा खोबरं असलेल्या कुठल्याही कुकिज्/बिस्किट्स);
कुकिंग व्हाईट चॉकलेट;
फ्रेश क्रिम,
इस्टर एग्ज;
चॉकलेट स्प्रिंकल्स

nest10.JPG

क्रमवार पाककृती: 

इस्टर ट्रीट्स

येत्या रविवारी इस्टर आहे त्यामुळे सध्या आमच्याकडे अगदी इस्टरमय वातावरण आहे. दुकानं चॉकलेट एग्ज, हॉटक्रॉस बन्स, बनी चॉकलेट्स, इस्टर ग्रिटींग कार्ड्स, गिफ्ट्स इ इ ने भरुन वहातायत. मग लेकीला इस्टर ट्रीट्स न देऊन कसे चालेल? Happy

मागच्या वर्षी लेकीच्या डेकर मधे देण्यासाठी "चॉकलेट नेस्ट अँड इस्टर एग्ज केक" केला होता. पण यंदा जास्त वेळ न मिळाल्यामुळे लेकीच्या प्रीस्कुलमधे द्यायला ही चॉकलेटची छोटी छोटी घरटी बनवली Happy

nest9.JPGक्रमवार पाककृती :

१. ऑव्हन १५०डिग्री से ला तापत ठेवा.

२. कुकिज पाकिटातुन काढुन ती पॅटी पॅन्स/उथळ मफिन पॅन्स/छोट्या वाट्यांमधे ठेवा.

nest1.JPG

३. पॅन ओव्हनमधे ठेवा आणि साधारण ३ ते ४ मिनीटात (कुकिज किती जाड आहेत त्यावर अवलंबुन), बोटाला जरा नरम लागल्या की बाहेर काढा.

४. कुकिज गरम असतानाच छोट्या डावेने/गोल चमच्याने हलके दाबुन त्यांना खोलगट वाटीचा शेप द्या.

nest2.JPG

५. आता या वाट्या गार व्हायला जाळीवर्/तातलीत काढुन ठेवा.

nest3.JPG

६. मावे सेफ काचेच्या बोल मधे कुकिंग व्हाईट चॉकलेट आणि थोडे क्रिम घ्या आणि ४०-४५ सेकंद मावेमधे गरम करा.

nest4.JPG

७. बोल बाहेर काढुन चॉकलेट आणि क्रिम नीट एकत्र करा.

८. हे मिश्रण आता चमच्याने आपल्या कुकिवाट्यांमधे भरा. चॉकलेट जरा सेट होऊ द्यात.

nest5.JPG

९. या तयार चॉककुकिवाट्यांमधे आता १-१ चॉकलेट एग ठेवा. बाजुने हवे तर चॉकलेट स्प्रिंकल्स पसरा.

nest6.JPGnest7.JPG

१०. तयार आहेत छोटी छोटी चॉकलेट घरटी - इस्टर ट्रीट्स Happy

nest8.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तेव्हढे
अधिक टिपा: 

१. कुकिज / बिस्किटं घेताना त्यात खोबरे आहे का ते बघा. खोबर्‍यामुळे बिस्किट गरम करतच पटकन मऊ होते आणि गार झाल्यावर चामट न होता खुसखुशीतच रहाते. मी वापरलेल्या बटरनट स्नॅप कुकीज मधे ओट्स पण आहेत.

२. कुकीवाट्यांमधे चॉकलेट आयत्यावेळेस भरा. नाहीतर त्या नरम पडतिल. पण नरम देखिल चाम्गल्याच लागतात Happy

३. आमच्याकडच्या एका पाकिटात २१ कुकिज होत्या. मी एकुण ३० घरटी केली. त्यासाठी मला २५०ग्रॅम कुकिंग व्हाईट चॉकलेट आणि ५० मिली क्रिम लागले.

४. या कुकिज मिट्ट गोड होतात त्यामुळे मुलांना एका वेळेस एकच द्या. तुम्ही खा हव्या तेव्हढ्या Lol

५. मी अश्या बिस्किटवाट्या करुन त्यात वॅनिला आयस्र्किम आणि वरुन कॅरॅमल / चॉकलेट सॉस घालुन मस्त झटपट डेझर्ट करते Happy हवे त्याला वरुन टोस्टेड नट्स / स्प्रिंकल्स घालते.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो पटकन उचलून तोंडात टाकावसं वाटतय मला Happy लेक आणि तिच्या मैत्रिणींची मज्जा आहे एकदम Happy

काय डोकेबाज आहेस ग तू ! छान पाकृ अन टीपान्मधली बिस्कीट वाट्यात आईसक्रि म भरायची कल्पना सुध्दा ग्रेटच आहे.. Happy बरीच मेहनत अन कलाकुसर असते तुझ्या पाकृ. मध्ये__________/\_________

जो.....कस्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्या टेम्प्टींग रेसीपीज करतेस गंssssss
एकदम तोंपासु आणि तितकंच सुंदर प्रेझेंटेशन ही Happy

खुप खुप आभार्स सगळ्यांचे Happy

लेकीच्या मित्र-मैत्रिणींना तर आवडलीच ही घरटी पण तिच्या टिचर्सनी देखिल आवर्जुन सांगितले की त्यांना देखिल आवडली म्हणून Happy

आपण नाय बा इतकी आटाआटी करणार... आयतं मिळेल तर छान... लाजो... ़खरचं छान दिसताहेत नेस्ट्स!!! --/\-- Happy

Pages