इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'

Submitted by लाजो on 4 April, 2012 - 02:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बटरनट स्नॅप कुकिज (किंवा खोबरं असलेल्या कुठल्याही कुकिज्/बिस्किट्स);
कुकिंग व्हाईट चॉकलेट;
फ्रेश क्रिम,
इस्टर एग्ज;
चॉकलेट स्प्रिंकल्स

nest10.JPG

क्रमवार पाककृती: 

इस्टर ट्रीट्स

येत्या रविवारी इस्टर आहे त्यामुळे सध्या आमच्याकडे अगदी इस्टरमय वातावरण आहे. दुकानं चॉकलेट एग्ज, हॉटक्रॉस बन्स, बनी चॉकलेट्स, इस्टर ग्रिटींग कार्ड्स, गिफ्ट्स इ इ ने भरुन वहातायत. मग लेकीला इस्टर ट्रीट्स न देऊन कसे चालेल? Happy

मागच्या वर्षी लेकीच्या डेकर मधे देण्यासाठी "चॉकलेट नेस्ट अँड इस्टर एग्ज केक" केला होता. पण यंदा जास्त वेळ न मिळाल्यामुळे लेकीच्या प्रीस्कुलमधे द्यायला ही चॉकलेटची छोटी छोटी घरटी बनवली Happy

nest9.JPGक्रमवार पाककृती :

१. ऑव्हन १५०डिग्री से ला तापत ठेवा.

२. कुकिज पाकिटातुन काढुन ती पॅटी पॅन्स/उथळ मफिन पॅन्स/छोट्या वाट्यांमधे ठेवा.

nest1.JPG

३. पॅन ओव्हनमधे ठेवा आणि साधारण ३ ते ४ मिनीटात (कुकिज किती जाड आहेत त्यावर अवलंबुन), बोटाला जरा नरम लागल्या की बाहेर काढा.

४. कुकिज गरम असतानाच छोट्या डावेने/गोल चमच्याने हलके दाबुन त्यांना खोलगट वाटीचा शेप द्या.

nest2.JPG

५. आता या वाट्या गार व्हायला जाळीवर्/तातलीत काढुन ठेवा.

nest3.JPG

६. मावे सेफ काचेच्या बोल मधे कुकिंग व्हाईट चॉकलेट आणि थोडे क्रिम घ्या आणि ४०-४५ सेकंद मावेमधे गरम करा.

nest4.JPG

७. बोल बाहेर काढुन चॉकलेट आणि क्रिम नीट एकत्र करा.

८. हे मिश्रण आता चमच्याने आपल्या कुकिवाट्यांमधे भरा. चॉकलेट जरा सेट होऊ द्यात.

nest5.JPG

९. या तयार चॉककुकिवाट्यांमधे आता १-१ चॉकलेट एग ठेवा. बाजुने हवे तर चॉकलेट स्प्रिंकल्स पसरा.

nest6.JPGnest7.JPG

१०. तयार आहेत छोटी छोटी चॉकलेट घरटी - इस्टर ट्रीट्स Happy

nest8.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तेव्हढे
अधिक टिपा: 

१. कुकिज / बिस्किटं घेताना त्यात खोबरे आहे का ते बघा. खोबर्‍यामुळे बिस्किट गरम करतच पटकन मऊ होते आणि गार झाल्यावर चामट न होता खुसखुशीतच रहाते. मी वापरलेल्या बटरनट स्नॅप कुकीज मधे ओट्स पण आहेत.

२. कुकीवाट्यांमधे चॉकलेट आयत्यावेळेस भरा. नाहीतर त्या नरम पडतिल. पण नरम देखिल चाम्गल्याच लागतात Happy

३. आमच्याकडच्या एका पाकिटात २१ कुकिज होत्या. मी एकुण ३० घरटी केली. त्यासाठी मला २५०ग्रॅम कुकिंग व्हाईट चॉकलेट आणि ५० मिली क्रिम लागले.

४. या कुकिज मिट्ट गोड होतात त्यामुळे मुलांना एका वेळेस एकच द्या. तुम्ही खा हव्या तेव्हढ्या Lol

५. मी अश्या बिस्किटवाट्या करुन त्यात वॅनिला आयस्र्किम आणि वरुन कॅरॅमल / चॉकलेट सॉस घालुन मस्त झटपट डेझर्ट करते Happy हवे त्याला वरुन टोस्टेड नट्स / स्प्रिंकल्स घालते.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

________________________/\___________________________________________

अजुन काही बोलु शकत नाही Proud

लाजो ___________________/\___________________________
सुचत बर तुला १-१. महान आहेस.

लाजो __/\__
अमेझिंग!!!!!!!!!!!

धन्यवाद मंडळी Happy

@मंजुडी, चॉकलेट व्यवस्थित सेट होते. क्रिम थोडचं घालायचंय....अगदी जस्ट चॉकलेटला स्मुथनेस यायला.

अगं कसली डोकेबाज आहेस तू Happy अफाट आवडली तुझी आयडिया ! मस्त मस्त मस्त ! तु भेटलीस की माझ्याकडून एक बक्षिस, नक्की Happy

हिची रेसिपी आली की अगदी डोळे झाकुन आधी कौतुकाची पोस्ट टाकायची आणि मग नंतर डिटेल रेसिपी वाचायची !!! Happy

केवळ महान!!

मी अश्या बिस्किटवाट्या करुन त्यात वॅनिला आयस्र्किम आणि वरुन कॅरॅमल / चॉकलेट सॉस घालुन मस्त झटपट डेझर्ट करते स्मित हवे त्याला वरुन टोस्टेड नट्स / स्प्रिंकल्स घालते.>>> ही कल्पना भारी आहे. Happy

अग लाजो, आत्ताच तुझ्या पोटली...च्या प्रतिसाद मधे तुसी ग्रेट हो लिहेले... आता तर काय लिहु तेच कळत नाही. या साठी तर शब्द्च नाही. ही कल्पना अप्रतिम तर आहेच, पण त्याबरोबर तुझी मेहनतही दिसते. तुला खंरच मनापासुन सलाम!

हे जर का मी केलं तर माझा मुलगा पण माबोवर येऊन मला रेसिपी शोधुन हे कर ते कर म्हणायला लागेल........
जाम टेम्प्टिंग आहे......खरं म्हणजे मी मनातल्या मनात विचार करत होते की असं काही करून जर मला शेजारच्या दोन गोड पोरांनाही देता आलं (ती प्रत्येक अमेरीकन सणाला काही न काही तरी घेऊन य़ेतात माझ्या मुलासाठी) तर खरंच छान होईल...(पण आपण फ़क्त मनात)
प्रत्यक्षात, लाजोच्या पाककृतीचा फ़्यान क्लब काढायचा असल्यास माझं नाव टाका तिथे...मस्तच दिसतंय......लाजोजी जियो....

मस्तच !लेकीच्या मित्र मैत्रीणी नक्की आतुरतेने तुझ्याकडून दरवेळेस येणार्‍या ट्रीट ची वाट पाहात असतीलः)

Pages