लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
शिळ्या पोळ्यांचा कुस्कर
कांदा
हिरव्या मिरच्या
बारीक चिरलेली कोथिंबीर
दाण्याचे कूट
मीठ
क्रमवार पाककृती:
१) शिळ्या पोळ्यांचा कुस्कर थोडा पाण्याचा हबकारा मारून नरम होऊ द्यावा .
२) हिरव्या मिरच्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात.
३) पोळ्यांचा नरम कुस्कर + बारीक चिरलेला कांदा + मिरचीचे वाटण + मीठ + दाण्याचे कूट + बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून थालीपीठासाठी गोळा मळून घ्यावा.
४) तेल सोडून मस्त पातळ व खरपूस थालीपीठे भाजावीत.
५) उलटताना मोडण्याचा संभव असल्याने खूप मोठी थालीपीठे लावू नयेत.
गरम गरम थालीपीठावर तूप घालावे. लिंबाचे गोड लोणचे /चुंदा/ दही वा टोमॅटो केचप बरोबर छान लागतात.
वाढणी/प्रमाण:
मी पाच शिळ्या पोळ्या कुस्करून घेतल्या होत्या. ४ मीडीयम साईझची थालीपीठे झाली.
अधिक टिपा:
पुढच्या वेळी उकडलेला बटाटा पण अॅड करून बघणार आहे. त्याने कुस्कराला एकजिनसीपणा येईल असे वाटतेय.
फोटु नाहीत, त्याआधीच निंबुडा यांची थालीपीठे गट्टम झाली होती.
माहितीचा स्रोत:
निंबुडा यांचे "पोह्याचे थालीपीठ" ही पाककृती 
शिळ्या पोळ्यांचे थालिपिठ हे
शिळ्या पोळ्यांचे थालिपिठ हे शीर्षक बघितले आणि पाकृ म्हणुन उघडणार तोच "विडंबन" दिसले.
आणि चला आता वाचुया काय लिहिलेय ह्या विडंबनात म्हणुन आत आले तर आत चक्क पाकृ...>>>>>++१
बेफि, विडंबन चा विरुद्धार्थी
बेफि, विडंबन चा विरुद्धार्थी शब्द काय ? म्हणजे तसे प्रयत्न करायला सांगू.
म्हणजे इथे लिहिलेली कविता विडंबन मानून, वरिजिन्ल ल्ह्याची !!
बागेश्री, ती कविता नै का ?
देणार्याने देत जावे.. तसं झालंय. मला कविता करणे जमले नाही दहा वर्षात, पण
बाकी सगळ्यांना रेस्प्या जमायला लागल्या !!
झालंय. मला कविता करणे जमले
झालंय. मला कविता करणे जमले नाही दहा वर्षात, पण
लई भारी 
बाकी सगळ्यांना रेस्प्या जमायला लागल्या !!>>
विडंबन चा विरुद्धार्थी शब्द
विडंबन चा विरुद्धार्थी शब्द काय >>
अशोक यांना विचारायला हवे
रेस्प्या जमायला लागल्या -
कारण तुम्ही त्या कशा करायच्या हेही लिहिता. आम्ही स्वतःला कवी समजणारे मुळ्ळीच लिहीत नाही की कविता कशी करतात
दिनेशदा, मी तुमच्या पाककृतीला
दिनेशदा, मी तुमच्या पाककृतीला हात नाही हो घातलेला
(अजूनतरी
)
_______________________/\____
_______________________/\_____________________________
काय बोलताय राव, हे वरचे
काय बोलताय राव, हे वरचे विडंबन कशाचे आहे मग?
पाककृतीचे विडंबनही पाककृतीच की?
जसे कवितेचे विडंबन ही कविताच
हे असं तुम्ही एडिट करता आणि
हे असं तुम्ही एडिट करता आणि माझी पंचाईत करून ठेवता
ओ म्हणजे बेफी, आता कवितेची
ओ म्हणजे बेफी, आता कवितेची रेस्पी येणार तर !!
बचकभर प्रेम, छटाकभर विरह, त्रासाची फोडणी, अश्रुंचा इसेन्स,
चवीला चंद्रमा, सजावटीला नक्षत्रे, वासासाठी फुले...
अहो बेफी, "तुमच्या" लिहायचं
अहो बेफी, "तुमच्या" लिहायचं राहिलं हो.....
आता पाककृतीचं विडंबन करून तिथेच "छे मी पाककृतीचे विडंबन केलेच नाही" असे धाधांत खोटे बोलायला मी काय........
वाह मिलिंद , छानच आहे ही
वाह मिलिंद , छानच आहे ही रेसीपी !
बचकभर प्रेम, छटाकभर विरह,
बचकभर प्रेम, छटाकभर विरह, त्रासाची फोडणी, अश्रुंचा इसेन्स,
चवीला चंद्रमा, सजावटीला नक्षत्रे, वासासाठी फुले...>>आणि हो वैताग, हास्य, चांदणे ह्यांची पेस्ट टाकायला विसरू नका- मस्सालेदार भाजी- रेडी टू सर्व
बचकभर प्रेम, छटाकभर विरह,
बचकभर प्रेम, छटाकभर विरह, त्रासाची फोडणी, अश्रुंचा इसेन्स,
चवीला चंद्रमा, सजावटीला नक्षत्रे, वासासाठी फुले..>>
ते गझलेत असतंच आधीपासून, पाच वेगवेगळे शेर करायचे म्हंटले की मिक्श्चर घ्यावेच लागते
असे धाधांत खोटे बोलायला मी काय.>>
(No subject)
चला, दिनेशराव, तुम्ही प्रदान
चला, दिनेशराव, तुम्ही प्रदान केलेल्या प्रेरणेचा इतका परिणाम झाला आहे की मी आता कवितेची रेसिपी लिहायला
घेतोच
पंधराच मिनिटांत तुम्हाला दिसेल ती
मनापासून धन्यवाद
नक्की करून पाहीन
नक्की करून पाहीन
मी आता कवितेची रेसिपी
मी आता कवितेची रेसिपी लिहायला
घेतोच
>>> ही घ्या माझी रेसीपी http://www.maayboli.com/node/21645
देणार्याने देत जावे.. तसं
देणार्याने देत जावे.. तसं झालंय. मला कविता करणे जमले नाही दहा वर्षात, पण
बाकी सगळ्यांना रेस्प्या जमायला लागल्या !!
दिनेशदा निळू फुलेंचा एक डायलॉग आठवला... नागड्याशेजारी उघडं गेलं आन ते बी....
अरे काये?? कविता तर कविता
अरे काये?? कविता तर कविता पाकृ चे पण विडंबन

पण विडंबन का असेना पाकृ जेनुइन वाटते बरे
काय रे हे? पाककृतीचं विडंबन?
काय रे हे? पाककृतीचं विडंबन? पण आयड्या एकदम फर्मास!
भुंगा, टू मच.... किती
भुंगा, टू मच....

किती सिरियसली वाचायला आले होते...
अरे वा.. दिनेश दा ला कविता लिहायला जमलं नसेल पण इन्ग्रेडिएंट्स तर माहीत आहेतच नक्कीच..
(No subject)
(No subject)
भुंग्या दिनेशदा आणि बेफी
भुंग्या
दिनेशदा आणि बेफी
बाकी सगळेच
वावा ... अश्याने नवनव्या
वावा ...
अश्याने नवनव्या पाककृती करण्यास हुरूप येतो
अश्याने नवनव्या पाककृती
अश्याने नवनव्या पाककृती करण्यास हुरूप येतो >>>>
विडंबन पाककृतीचे फोटु पण हवेत आम्हाला!!:स्मित:
शिळ्या पोळ्यांचं थालिपीठ नीट थापलं जातं का शंका आहे जरा!!:खोखो:
भुंग्या ...झोप आता ... उद्या
भुंग्या ...झोप आता ...:फिदी:
उद्या शिळ्या थालीपीठाची एक फर्मास पाककृती टाकायचीये तुला
सगळेच
सगळेच
प्रश्न : 'शिळ्या पोळ्यांचं
प्रश्न : 'शिळ्या पोळ्यांचं थालिपीठ' खाऊन पोट बिघडल्यास...........कसे करावे?
उत्तर : ........'जमते तसे करावे'......हे वाचा
http://www.maayboli.com/node/33664
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईई>>>>>>>>
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईई>>>>>>>>>>> उकडलेला भुंगा क्कॉय?????
मी शेवटपर्यंत सिरीयसली वाचली पाकृ, अन प्रतिसादात कळले की, हे निंबीच्या पाकृ चे विडंबन आहे. नाहीतर येत्या वीकेंडला नवर्याला ह्या नवीन प्रयोगास सामोरे (न्यु एक्स्प्रीमेंटला फेस करावे लागले अस्ते असेच म्हणणार होते खरं तर.....पण जौदे
) जावे लागले अस्ते. 
Pages