........................... कविता ............................
कविता ...अगदी करायचीच असेल तर ...
घे अर्धा डझन यमकं ...ट ला ट ..प ला प
आहे ला आहे ..नाही ला नाही ....लागेल गझले साठी
नाहीच मिळाली तर घे एखादं वृत्त नाहीतर छंद
आणि शब्दांना लाव त्यांचा गळफास
तेही नाही जमलं तर ते घे दोन चार अगम्य शब्द ..अगम्य वाक्य ...अगम्य अर्थाची
तेही नाही सुचलं तर सुचतीलच काही अर्वाच्य शिव्या ...थोडा "भ"... थोडा "झ" ...
अभिजाततेचा आव आणला की " सब चलता है" .
.
.
.
किंव्वा मग
आरश्यासमोर उभं राहुन ..नजरेत नजर मिसळुन बुडी मार खोल आतवर... .
आठवेल ...
जाता जाता...एयरपोर्टवर... पाया पडल्यावर बाबांची मुक शाबासकी
आठवेल ...
आईने दिलेल्या पुरणपोळीची चव ...हॉट्डॉग खातानाही ..
आठवेल ...
पासपोर्ट्च्या आत दडुन बसलेली नाजुकशी राखी
आठवेल ....
जाता जाता ....सखीचे ते गहिरे मौन ..अन खांद्यावर पडलेले २ अश्रु ...ते ही अबोल ...
.
.
मग कदाचित तुझाही गळा दाटुन येईल
कदाचित पापण्या ही ओलावतील ....
अन कदाचित ...एखादा सच्चा अश्रु ...झुगारुन सारी बंधने ...ओघळेल तुझ्या कवितेच्या वहीत ...
.
.
.
ते पान कोरेच सोड मित्रा ...
प्रत्येक वेळी रेसीपी अशी जमुन येईलच असे नाही !
.
.
प्रसादपंत........ सिक्सर
प्रसादपंत........ सिक्सर
मस्त पंत.
मस्त पंत.
पंत...... यावर चर्चा झाली
पंत...... यावर चर्चा झाली होती आपली, त्यापेक्षा वेगळी केलीत..... पण ही भारी आहे...... बोले तो...!!
जरा टायपो पहा...... सुभाषितसम्राटांकडून इतके टायपो...... काय खरंच खांद्यावरचे ते २ अश्रु आठवून गहिवर आलाय की काय..... !!!!!
मस्त आहे रेसिपी, पंत
मस्त आहे रेसिपी, पंत
कैलासरावांशी सहमत आहे. ही
कैलासरावांशी सहमत आहे. ही सिक्सर आहे.
क्या बात है प्रसाद... खरंच
क्या बात है प्रसाद... खरंच सिक्सर आहे!!!
मस्त.
मस्त.
रेसिपी सुरेख जमलिये!!
रेसिपी सुरेख जमलिये!!:-)
मस्त....
मस्त....
मस्तच...
मस्तच...:)
मस्त
मस्त
सुरवातीपासून शेवटपर्यंत मस्त
सुरवातीपासून शेवटपर्यंत मस्त वळणं घेणारी वेगळीच कविता
....... आवडली.
'किंवा मग' पासून पुढे कविता
'किंवा मग' पासून पुढे कविता आहे. ती खरच छान आहे.
भारी
भारी
पहिला प्रयत्न वाटत नाही ईतका
पहिला प्रयत्न वाटत नाही ईतका सफाईदार आहे हा मुक्तछंद....
लगे रहो पंत....
(No subject)
सुरेख जमलीये रेसिपी
सुरेख जमलीये रेसिपी
आठवेल ... जाता
आठवेल ...
जाता जाता...एयरपोर्टवर... पाया पडल्यावर बाबांची मुक शाबासकी
आठवेल ...
आईने दिलेल्या पुरणपोळीची चव ...हॉट्डॉग खातानाही ..
आठवेल ...
पासपोर्ट्च्या आत दडुन बसलेली नाजुकशी राखी
आठवेल ....
जाता जाता ....सखीचे ते गहिरे मौन ..अन खांद्यावर पडलेले २ अश्रु ...ते ही अबोल ...
.हे मनापासून आवडले .मस्त.लिहित राहा !!
जबरी रे... आवडली खूप..
जबरी रे...
आवडली खूप..
प्रगो, जबरी दणका रे
प्रगो,
जबरी दणका रे
अप्रतिम..!!
अप्रतिम..!!
पंत, रेसिपी छान जमून आलीये.
पंत, रेसिपी छान जमून आलीये.
:
मस्त
मस्त
पंत..... तुमच्या त्या कोर्या
पंत.....
तुमच्या त्या कोर्या पानासाठी..... वाकुन मुजरा देवा
वाह वा!! रेसिपी जमेश
वाह वा!!
रेसिपी जमेश आहे!!
अभिजाततेचा आव....
आणि शेवट कातिल आहे.
विशालशी सहमत.
त्रिवार मुजरा!
व्वा पंत ! लई भारी ! चाबूक
व्वा पंत ! लई भारी ! चाबूक !!!!
व्वा... सुरेख...
व्वा... सुरेख...
http://merakuchhsaman.blogspot.com/
बेफिकिरजी.... आपल्या लेखणीला
बेफिकिरजी....
आपल्या लेखणीला नेहमीप्रमाणे सलाम.....
पण ३ कादंब-या एकावेळी चालवण्याचा अट्टहास का...हे मानवीय क्षमतेच्या पलीकडच आहे....ते तुम्ही करताय...पण सक्षमपणे करताय अस नाही म्हणणं चाटुगिरी ठरेल...एक लिहा पण अत्योत्तम लिहा...जे चिरकाल स्मरणात राहील..जे लिहीताय ते छान आहे पण आमच्या अपेक्षा ब-याच उंच आहेत आणि त्या तुमच्याच लिखाणाने वाढवल्या आहेत..गुडमॅर्निग मॅडम बेस्ट होती....त्याहीपेक्षा काहीतरी कसदार अपेक्षित होतं...पण ब-याच गोष्टींची खिचडी झाल्यामुळे मजा नाही येत....आणि कलाच्या विश्वातून बनाच्या विश्वात उड्या माराव्या लागतात...त्यापेक्षा असं करा कलाला बनाकडे कामाला ठेवा आणि सोबत येउ द्या...खरेच बेफिकीरजी...
राग येउ देउ नका
आपला पंखा
शामा
Pages