लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
शिळ्या पोळ्यांचा कुस्कर
कांदा
हिरव्या मिरच्या
बारीक चिरलेली कोथिंबीर
दाण्याचे कूट
मीठ
क्रमवार पाककृती:
१) शिळ्या पोळ्यांचा कुस्कर थोडा पाण्याचा हबकारा मारून नरम होऊ द्यावा .
२) हिरव्या मिरच्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात.
३) पोळ्यांचा नरम कुस्कर + बारीक चिरलेला कांदा + मिरचीचे वाटण + मीठ + दाण्याचे कूट + बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून थालीपीठासाठी गोळा मळून घ्यावा.
४) तेल सोडून मस्त पातळ व खरपूस थालीपीठे भाजावीत.
५) उलटताना मोडण्याचा संभव असल्याने खूप मोठी थालीपीठे लावू नयेत.
गरम गरम थालीपीठावर तूप घालावे. लिंबाचे गोड लोणचे /चुंदा/ दही वा टोमॅटो केचप बरोबर छान लागतात.
वाढणी/प्रमाण:
मी पाच शिळ्या पोळ्या कुस्करून घेतल्या होत्या. ४ मीडीयम साईझची थालीपीठे झाली.
अधिक टिपा:
पुढच्या वेळी उकडलेला बटाटा पण अॅड करून बघणार आहे. त्याने कुस्कराला एकजिनसीपणा येईल असे वाटतेय.
फोटु नाहीत, त्याआधीच निंबुडा यांची थालीपीठे गट्टम झाली होती.
माहितीचा स्रोत:
निंबुडा यांचे "पोह्याचे थालीपीठ" ही पाककृती
टोके मग तळलेला करून बघ
टोके
मग तळलेला करून बघ
यक्स. तुम इतनी गंदी बात सोच
यक्स. तुम इतनी गंदी बात सोच भी कयसे सकते हो?
देणार्याने देत जावे.. तसं
देणार्याने देत जावे.. तसं झालंय. मला कविता करणे जमले नाही दहा वर्षात, पण
बाकी सगळ्यांना रेस्प्या जमायला लागल्या !!
कारण तुम्ही त्या कशा करायच्या हेही लिहिता. आम्ही स्वतःला कवी समजणारे मुळ्ळीच लिहीत नाही की कविता कशी करतात
लै भारी......
हे हे पुन्हा आवडली पाकृ
हे हे पुन्हा आवडली पाकृ
Pages