सकाळ-संध्याकाळ-रात्र
तेव्हा गात्रांमध्ये एकच गाणं असायचं...
तू नव्हतीस कधीच,
कारण येण्याआधीच तुझं नेहमी जाणं असायचं...
मागे उरायचे फक्त आभास...
सावल्यांवर स्वार होणार्या काही
काळोखी पोकळ्या...
आणि अंधारात लागणारे
उजेडाचे चकवे
आयुष्य असतेच गं असे फसवे...
दरवेळी उरामधलं ओझं हलकंच वाटत राहिलं
माझ्याच अनुभवांचं गाव माझ्यासाठीही परकंच राहिलं
तरी तू दरवेळी कधी ठामपणे
तर कधी संभ्रमाने सांगायचीस -
"तुझं झाडपण शाश्वत असेलही रे,
पण प्रेमासाठी सरणावर चढायची
माझीच तयारी झाली नाहीये अजून!"
मला तेव्हाच कळायला हवं होतं!
तुला तुझ्या ऐन बहरामध्ये
माझं झाडपण हवं होतं,
सावली हवी होती, झोके हवे होते...
पण हे एवढंच!
माझी त्यापुढेही शेवटपर्यंत साथ
नकोच होती तुला!
एकदातरी ऐकलं असतं तुझं तर?
मीही असा उन्हात वाळून गेलो नसतो
आणि तुलाही दरवेळी समाधान मिळालं असतं - प्रेम केल्याचं!
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/02/blog-post_23.html)
या बिनआयडी च्या खात्याने
या बिनआयडी च्या खात्याने जाता-जाता बरंच खाल्लं आहे (डोकं) !

असो, विशालला अनुमोदन ! चांगली आहे कविता !
टवा़ळ, विशाल (मध्ये कॉमा आहेच
टवा़ळ, विशाल (मध्ये कॉमा आहेच :P)
धन्स!
छान आहे रे कविता. झाडपण
छान आहे रे कविता. झाडपण भावल...
तरी तू दरवेळी कधी ठामपणे तर
तरी तू दरवेळी कधी ठामपणे
तर कधी संभ्रमाने सांगायचीस -
"तुझं झाडपण शाश्वत असेलही रे,
पण प्रेमासाठी सरणावर चढायची
माझीच तयारी झाली नाहीये अजून!"
मला तेव्हाच कळायला हवं होतं!
तुला तुझ्या ऐन बहरामध्ये
माझं झाडपण हवं होतं,
सावली हवी होती, झोके हवे होते...
पण हे एवढंच!
माझी त्यापुढेही शेवटपर्यंत साथ
नकोच होती तुला!
एकदातरी ऐकलं असतं तुझं तर?
मीही असा उन्हात वाळून गेलो नसतो
आणि तुलाही दरवेळी समाधान मिळालं असतं - प्रेम केल्याचं!
दाद द्यायला शब्दच अपूरे... एवढी सुरेख आहे ही कविता ! आतल्या गाभ्याला स्पर्शून जाणारी !
मी पण प्रतिसादांची संख्या
मी पण प्रतिसादांची संख्या बघुनच आले होते. पहिल्यांदाच एखाद्या कवितेला एवढे प्रतिसाद बघितले, मग चांगलीच उत्सुकता वाटली.
जोक्स अपार्ट पण -
कविता खरोखर तेवढे प्रतिसाद (जेन्युइन) मिळण्याच्या पात्रतेची आहे >>> विकु + १. मला आवडली.
वाह .. सुन्दर कविता !!
वाह .. सुन्दर कविता !!
सुमतीताई, तुमचा प्रतिसाद
सुमतीताई, तुमचा प्रतिसाद पाहिला - मनापासून धन्यवाद!
ममा
चेतना बर्याच दिवसांनी?
वा आनंदयात्री, आवडली कविता !
वा आनंदयात्री, आवडली कविता !
Pages