पेढ्यासाठी:
२५० ग्रॅ. रिकोटा चीज
१/४ कप साखर
वेलदोड्याची पूड आवडीनुसार
दोन चिमूट बेकिंगपावडर
मलाईसाठी :
एक छोटा डबा मास्करपोने चीज ( mascarpone cheese )
चवीनुसार एक-दोन चमचे साखर
केशर
वेलदोडा पावडर आवडीनुसार
सजावटीसाठी बदाम,पिस्ते किंवा साखरेची फुलं,मणी इत्यादी.
अवन १८० डिग्री से. किंवा ३५० फॅ ला तापायला ठेवावा.
एका भांड्यात रिकोटा चीज, साखर, वेलचीपूड आणि बेकिंगपावडर एकत्र करुन घ्यावे.
मफिन पॅनमध्ये एकेक मोठा चमचा मिश्रण घालून अवनमध्ये ३० ते ३५ मिनिटे बेक करावे.
पेढे बाजूने सोनेरी तांबूस दिसू लागले की सुरी घालून पाहावी. ती कोरडी बाहेर आली तर पेढे तयार आहेत.
आता हे पेढे गार करत ठेवावे ( फ्रीजमध्ये नव्हे. )
मलाई बनवण्यासाठी एका भांड्यात मास्करपोने चीज, आवडीनुसार एखाददोन चमचे साखर ( मी थोडे अगोडच ठेवले होते. ) वेलचीपूड, केशर असे सगळे एकत्र ढवळून घ्यावे.
पेढे गार झाले की त्यावर हे मलाईचे मिश्रण लावावे.
वरुन बदाम-पिस्त्याचे काप किंवा दुसरी आवडीची सजावट करावी.
मलाईबहार तयार आहे
मला बंगाली मिठाई अतिप्रिय आहे. मध्ये नेटवर रिकोटा चीजच्या रसगुल्ल्याची रेसिपी मिळाली पण केल्यावर लक्षात आलं की हा प्रकार रसगुल्ल्यासारखा लागत नाही. मग विचार केला ह्याची रसमलाई करुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा बंगाली मिठाईचाच वेगळा प्रकार करता येईल. त्यातून तयार झाली ही मिठाई 'मलाईबहार'
बेक केलेले असल्यामुळे काही पेढे तांबूस होतात पण त्याने चवीत काहीही फरक पडत नाही. उलट ते छानच लागतात.
मास्करपोने चीज गोडसर सायीसारखे लागते. ते ह्या रेसिपीसाठी वापरायची कल्पना सुचली. ही कॄती करुन उरले तर सायीसारखे भाज्या, डिप्स ह्यात वापरता येते.
करायला एकदम सोपा, झटपट आणि तोंडात विरघळणारा हा पदार्थ करुन बघाच.
हा रिकोटा चीजचा रसगुल्ला नव्हे. बंगाली मिठाईचाच हायब्रिड प्रकार म्हणायला हरकत नाही.
भारतातल्या लोकांनी घरी करायच्या फंदात पडू नये. त्यापेक्षा हलवायाकडून बंगाली मिठाई आणून चापावी
अगो, भन्नाट फोटो आहे. लगेच
अगो, भन्नाट फोटो आहे. लगेच तुकडा तोंडात टाकावासा वाटतोय.कृती पण फार अवघड वाटत नाहीये. नक्की करुन पाहणार.
मस्त!!! दोन्ही फोटो व कृती.
मस्त!!! दोन्ही फोटो व कृती.
कातिल आहे एकदम! सिंडे, तु
कातिल आहे एकदम!
सिंडे, तु लगेच करुन बघितलेस म्हणजे ---------^-------- मस्त दिसतेय तुझी पण!
सही आता करावेच म्हण्ते
सही आता करावेच म्हण्ते
मस्त मिठाई आहे.आता पुढच्या
मस्त मिठाई आहे.आता पुढच्या "वारी"त करीन.
फोटो कसा टाकायचा?
फोटो कसा टाकायचा?
हा आमच्याकडचा नमुना:
हा आमच्याकडचा नमुना:
मस्त !
मस्त !
बापरे. आशिषने फोटो
बापरे. आशिषने फोटो टाकला?
आशिष, तुम्ही केली का?
सिंडी आणि आशिष- फोटो मस्तच. उरक !!
भारी आयडिया. पण मी देशातली
भारी आयडिया. पण मी देशातली असल्याने तुझा सल्ला नक्की मानेन.
सगळ्यांचेच फोटो यम्मी दिसतायत.
अस्चिग ह्यांचेकडील मिठाईचा
अस्चिग ह्यांचेकडील मिठाईचा रंग केशरी कसा ? रंग घातलात का ? भारी दिसतेय.
बहारदार मिठाई आहे.
बहारदार मिठाई आहे.
मनःपूर्वक धन्यवाद सर्वांना.
मनःपूर्वक धन्यवाद सर्वांना. एवढ्या प्रतिक्रिया पाहून मूठभर मलई चढली
आश्चिगनी बहुतेक थोडी जास्त बेक केली असावी म्हणून केशरी रंग आलाय.
प्रॅडी, मास्करपोने चीज केकमध्ये वापरायची आयडिया छान. ट्रायफल पुडिंगमध्ये वापरले आहे मी. मस्तच लागते.
सीमा, हा प्रकार चुकायची शक्यता नाहीच एवढा सोपा आहे. नक्की करुन बघ.
झंपी, रिकोटाचीज घातलेल्या पुरणपोळ्यांची आयडिया वेगळीच आहे. एक स्वतंत्र रेसिपी म्हणून टाका ना इथे.
सिंडी आणि आश्चिग खरंच उरक सॉलिड आहे. मस्त दिसतेय मिठाई
शूम्पी आणि झंपी, तुमच्या सजवायच्या आयडिया सही आहेत. ही मिठाई वेगवेगळ्या साच्यात घालून तसेच वरची मलाई आयसिंग गनमधून वेगवेगळ्या नक्षीत पाडून एकदम प्रोफेशनल दिसेल तसंच वेगळे रंग, फ्लेवर्स, प्रयोगाला खूपच वाव आहे. इथल्या कलाकार लोकांनी टाका असे वेगवेगळे छान छान फोटोज
वुमन्स डे असल्याने
वुमन्स डे असल्याने लिंगनिरपेक्ष भाषेत आमचे (अनु, मी, जय) लेबर डिव्हीजन सांगतो. एकाने केली, एकाने फोटो काढला, एकाने फोटो टाकला - खाल्ली (चवीने) सगळ्यांनी.
व्वा! मस्तच दिसतेय. करुन
व्वा! मस्तच दिसतेय. करुन बघितलीच पाहिजे
फोटो कसा टाकायचा कोणी सांगेल
फोटो कसा टाकायचा कोणी सांगेल का? मी २-३ दा प्रयत्न केले पण "Upload Failed" असा मेसेज येतो आहे.
साइझ कमी करुन बघितली का ?
साइझ कमी करुन बघितली का ? पेंट ब्रशमध्ये फाइल ओपन करुन रिसाइझ करा आणि सेव्ह अॅज जेपेग करा.
प्राजक्ता३०, सिंडीने
प्राजक्ता३०, सिंडीने सांगितलंय तसं करा नाहीतर ह्या ऑनलाईन साईटवरुन फोटो रिसाईझ करुन सेव्ह करा
खुप छान आहे रेसीपी!! सुंदर
खुप छान आहे रेसीपी!!
सुंदर सजावट आणि तोंपासु फोटो......
आयला! लय भारी
आयला! लय भारी
सुरेख फोटोसह चविष्ट पाककृती
सुरेख फोटोसह चविष्ट पाककृती लिहायची आणि वरून लिहायचं की भारतातल्या लोकांनी घरी करायच्या फंदात पडू नये. This is not fair!!
सिंडी आणि aschig चा उरक भारी आहे. मस्त दिसताहेत तुमच्याही मलईबहार
थँक्स अगो इतकी छान आणि सोपी
थँक्स अगो इतकी छान आणि सोपी रेसिपी दिल्याबद्दल. माझ्या दोन्ही मुलींनी (अगदी कधी चीज न खाणारीनेसुध्दा) चट्टामट्टा केला.
प्राजक्ता३०, मस्तच झालीय
प्राजक्ता३०, मस्तच झालीय मिठाई. त्या वरच्या आख्ख्या बदामामुळे अगदी हलवायाच्या दुकानात मांडून ठेवलेली असते तशी दिसतेय
मंजूडी, अगं भारतातल्या मिठाया इथे मिस करतो म्हणून तर अशा हायब्रिड मिठाया शोधून काढायचा अट्टहास
हे बघा.. आमचं मलाई बहार !
हे बघा.. आमचं मलाई बहार ! रंगसंगती गंडली जरा.. पण चव चांगली होती..

आकार पाहून घरी ह्याचं 'मलाई बॉम्ब' असं नामकरण झालं..
अगो.. तुझ्या डेजर्टच्या रेसिप्या भारी असतात ! मागे मँगो पायची रेसिपीपण सही होती..
पग्या, ते बदामाचे काप सुतळी
पग्या, ते बदामाचे काप सुतळी बॉम्बसारखे वरून लावले आहेत, नामकरण योग्यच आहे
पण एकदम सही दिसतेय मलईबहार! एकदम उचलून तोंडात टाकावी असं वाटतंय.
>>एकदम उचलून तोंडात टाकावी
>>एकदम उचलून तोंडात टाकावी असं वाटत>><<
अरे बापरे! अहो वजनाचा विचार करा की जरा..( अहो तुमच्या नाही, बर्फीच्या..)
'मलाई बॉम्ब' <<< मलाइका अरोरा
'मलाई बॉम्ब'
<<<
मलाइका अरोरा चं टोपण नाव वाटतय
तोंपासु फोटो.
तोंपासु फोटो.
आई ग्ग्ग्ग कसली दिसतेय जबरीच.
आई ग्ग्ग्ग कसली दिसतेय जबरीच.
व्वा! अगो..........अरुषची
व्वा! अगो..........अरुषची मज्जाच असणार मग.....एवढी सुगरण आई.............!
असो भारतातल्या लोकांसाठीची सजेशन मान्य......आता नगरातला बंगाल्या शोधते.........मिठाईवाला गं(गो)!
लेकीला मात्र पाठवलीच ही रेसिपी!
Pages