भरली भेंडी

Submitted by मृण्मयी on 24 July, 2008 - 13:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो भेंडी (कोवळी असेल तर फार छान!)
दोन मोठे चमचे गरम मसाला
चवीनुसार ति़खट
मीठ
पाऊण वाटी तेल
हिंग
एक वाटी बारिक चिरलेला कांदा
एक जुडी कोथिंबीर
एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
गुळाचा खडा
खसखस, तीळ आणि शेंगदाणे भाजून, कुटून सगळा कूट साधारण एक वाटी व्हावा.
आलं लसून हिरवी मिरचीचं वाटंण एक मोठा चमचा.

क्रमवार पाककृती: 

भेंडी धुवून, कोरडी करून घ्यावी. चिरताना एका भेंडीचे दोन तुकडे आणि मधे पण चीर.
एका वाडग्यात तेल सोडून बाकी इतर जिन्नस व्यवस्थीत एकत्र करून घ्यावे. (अगदी भेंड्या सुध्दा.)
कढईत तेल गरम करून, हिंग घालून हे मिश्रण त्यात ओतावं.
नीट ढवळून भेंड्या शिजेपर्यंत (झाकण न ठेवता) भाजी शिजवावी.
वरून चिरलेली कोथिंबीर घालावी.

bharali-bhendi-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांपुरती
अधिक टिपा: 

भाजी शिजताना कांदा व्यवस्थीत गळतो.
आलं लसणाचा उग्र वास पण निघून जातो.
भाजीत ओला किंवा सुका नारळ अगदी ऐच्छीक.
भेंडीत मसाला भरण्याची गरज नाही. व्यवस्थीत आत शिरतो, भाजी शिजल्यावर.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऍक्वेरियममधे फळं कधीपासून ठेवतात <<< मी लोकांना फ्रिज चा उपयोग कपड्यांचे कपाट म्हणून करताना पाहिलं आहे, तेव्हा फळं तेथे ठेवली तर फारसे वावगे होउ नये Happy

फोटो चांगला यावा म्हणून मुद्दाम टेबलमॅट, काचेचा बोल वगैरे कौतुकाने वापरले, तर लोक बघा.. एक्वेरियम काय न् दगडगोटे काय! काहीही म्हणतात Sad पुढच्या वेळी ओट्यावरच्या पसार्‍यासकट फोटो काढायला हवा Proud
------------------------------------------
Times change. Do people??

अग पूनम मूळात डिश चांगली झाली असेल तर बाकीच्या मसाल्याची गरज नाही असे सांगायचे असेल लोकांना Lol मिल्याला लिहायला सांग डिशबद्दल Wink

Lol
मलाही तसंच दिसायला लागलंय..
पूनम, तो इफेक्ट कसा आणलास ते सांग की. Light 1

अहो ताई हिच ती भेंडी जी मी सासरी पहिल्यांदा गेले तेव्हा केलेली (आणि अर्ध्या पटण्याला फोन गेला बहु ने भेंडी बनायी) Proud

काल केली होती ह्या पद्धतीने भेंडीची भाजी. मस्त झाली होती. एकदम सोप्पी आहे करायला.
माझ्याकडे तीळ आणि चिंच नव्हते. त्याऐवजी मी चक्क तिळगुळाच्या पोळीसाठी करुन ठेवलेले सारण आणि आमचुर पावडर वापरले!
धन्यवाद मृण्मयी!

मस्त रेसीपी आहे. पुर्वी वाचली असेल पण लक्षात नव्हती. मी लसूण+हिरवी मिरची+तीळ+खोबर्+कोथिंबीर्+जीर अस वाटण करून करत असे नेहमी.

मसाला हाच वापरला पण भेंड्यांना चीर देऊन भरलापण.... 'किलर झालीये'... असा प्रतिसाद पहिल्या घासाला एका खवैय्या कडून मिळाला...
मृण्मयी त्याची पोच तुला देतेय Happy

थँक्स दाद!

>>एक जुडी जास्त होईल ना?
नाही होणार. कोथिंबीर भरपूर असली की चांगली चव येते.

भाजी करून बघणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांना धन्यवाद!

छान

आत्तापर्यंत भेंडी, छोटी गावरान भोपळी मिरची अशा दोन्हींसाठी ही पाकृ करून पाहिली.
मस्तच.
फक्तं भेंडी आणि भोमि दोन्ही एक एक खाच देऊन आधी परतून घेतल्या.
भेंडी करताना कोळ न घालता आमचूर पावडर घालून तयार प्रकरण परतविण्याआधी त्यावर पाण्याचे एक दोन हाबके मारले.

पाकृसाठी धन्यवाद!

काल केली भरली भेंडी. मसाल्याची चव अप्रतीम. पण माझा मसाला आपोआप भेंडीत गेला नाही. बाकी भाजी एक नंबर. ५-५० लोकं आल्यावर करता यावी अशी झटपट पा.कृ आहे. धन्यवाद Happy

photo(22).JPG

आरती, सुंदर फोटो आहे. भेंडी इतकी छान हिरवी कशी राहिली?

मसाला सगळ्याच भेंड्यामध्ये व्यवस्थीत शिरतो असं नाही. पण भाजी शिजल्यावर बर्‍यापैकी भरला जातो.

अनू, साती, भाजी केल्याचं कळवल्याबद्दल धन्यवाद.

Pages