भरली भेंडी

Submitted by मृण्मयी on 24 July, 2008 - 13:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो भेंडी (कोवळी असेल तर फार छान!)
दोन मोठे चमचे गरम मसाला
चवीनुसार ति़खट
मीठ
पाऊण वाटी तेल
हिंग
एक वाटी बारिक चिरलेला कांदा
एक जुडी कोथिंबीर
एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
गुळाचा खडा
खसखस, तीळ आणि शेंगदाणे भाजून, कुटून सगळा कूट साधारण एक वाटी व्हावा.
आलं लसून हिरवी मिरचीचं वाटंण एक मोठा चमचा.

क्रमवार पाककृती: 

भेंडी धुवून, कोरडी करून घ्यावी. चिरताना एका भेंडीचे दोन तुकडे आणि मधे पण चीर.
एका वाडग्यात तेल सोडून बाकी इतर जिन्नस व्यवस्थीत एकत्र करून घ्यावे. (अगदी भेंड्या सुध्दा.)
कढईत तेल गरम करून, हिंग घालून हे मिश्रण त्यात ओतावं.
नीट ढवळून भेंड्या शिजेपर्यंत (झाकण न ठेवता) भाजी शिजवावी.
वरून चिरलेली कोथिंबीर घालावी.

bharali-bhendi-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांपुरती
अधिक टिपा: 

भाजी शिजताना कांदा व्यवस्थीत गळतो.
आलं लसणाचा उग्र वास पण निघून जातो.
भाजीत ओला किंवा सुका नारळ अगदी ऐच्छीक.
भेंडीत मसाला भरण्याची गरज नाही. व्यवस्थीत आत शिरतो, भाजी शिजल्यावर.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूनमनं सांगितल्यानुसार लोखंडाच्या तव्यावर करून बघितली, कांदा घातला नाही. पण इतका सुंदर हिरवा रंग आला नाही. बिल्वानं सांगितलंय तसं तळून बघितली नाही.

तेलात हळद पण घातली होती. त्याने रंग चांगला रहातो (बरेचदा) आणि भेंडी खरच ताजी आणि कोवळी होती त्यामुळे जास्त शिजवावी लागली नाही.

बाकी तर वेगळे काहीच नाही.

सुनिधी, हा तयार भाजीचा फोटो आहे. Happy

>>भेंडी खरच ताजी आणि कोवळी होती त्यामुळे जास्त शिजवावी लागली नाही.
इतकी सुंदर कोवळी भेंडी इथे मिळाली नाही. चुकून कधी मिळालीच असेल तर मी शिजवून शिजवून तिचा चोथा केला असणार. आता हळदीचंपण लक्षात ठेवेन. थँक्स!

म्रुण! देसी वाण मिळते का तुमच्याकडे? आमच्याकडे देसी भेन्डि वेगळी मिळते, ती कोवळी असते,पटकन शिजते त्यामूळे रन्ग ही टीकतो.
रन्ग हिरवा राहण्यासाठी थोड लिन्बु पिळुन बघ!

आधी प्रतिसाद दिलाय की नाही कल्पना नाही पण ह्या रेसिपीने करून पाहीन. मला स्वतःला भेंडी आवडत नाही पण नवर्‍याला आवडते.

Pages